Subscribe Us

शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास





 *शालेय जीवनातच विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास. : *कार्यकारी अभियंता मा.आशिष महाजन साहेब*


 *सेवा पंधर वाडा निमित्त जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा जयपूर लांडे येथे  महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण  देखभाल दुरुस्ती विभाग खामगाव मार्फत शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 

  देखभाल दुरुस्ती विभाग खामगाव चे अतिरिक्त  कार्यकारी अभियंता श्री दिनेश कहार साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

   या कार्यक्रमाचे अध्यक्ष जयपूर लांडे च्या सरपंचा  भारती ताई लांडे ताई,प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता श्री आशिष महाजन साहेब,अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री दिनेश कहार साहेब, श्री नितीन काळने साहेब ,श्री आर बी उबाळे साहेब उप कार्यकारी अभियंता श्री तुषार कलोरे साहेब  तथा डॉ किशोर वानखेडे उपस्थित होते. यावेळी श्री आशिष महाजन साहेब यांनी विद्यार्थी जीवनात शाळेत दिले जाणारे संस्कारामुळे भविष्यातील सुजाण नागरिक निर्माण होतात आणि हे संस्कार करण्याचे कार्य शिक्षक,समाजातील आदर्श व्यक्ती सातत्याने करीत असतात असे ठामपणे सांगितले  .त्यांचे शिक्षण ही बुलडाणा जिल्ह्यात झाले असल्याने जिल्ह्यातील शाळांबाबत विशेष आपुलकी असल्याने सांगताच विद्यार्थी तथा उपस्थित  मान्यवरांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केलं.या प्रसंगी ते म्हणाले की अन्न,वस्त्र,निवारा, आरोग्य, शिक्षण याच प्रमाणे विद्युत ही सुध्धा अत्यंत महत्त्वाची मानवाची  गरज आहे .विद्युत चा वापर काटकसरीने आणि तितक्याच काळजीने केला पाहिजे .तसेच विद्युत उपकरणे उपयोगात आणताना कोणती दक्षता घ्यावी या विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी ही विद्युत काही तयार केली जाते ? ती संपत नाही का? विद्युत तयार करण्याचे माध्यमे कोणती या सारखी प्रश्न विचारून सजगतेचा परिचय करून दिला या प्रश्नाची  उत्तरे साहेबांनी देत सखोल मार्गदर्शन केले.* 

 *या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उच्च  श्रेणी   मुख्याध्यापक सतिश महाले यांनी केले.आज जिल्हा परिषद शाळेत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जात आहे असे विचार मांडले शाळेचा विकास करतांना विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाते असे मत मांडले.डॉ किशोर वानखेडे यांनी उपस्थितांचे आभार मानताना जिल्हा परिषद शाळांतील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य केल्यास शिक्षणाचे प्रवाहात पाठबळ मिळते असे मत मांडले .यावेळी इयता 1 ते 8 वी चे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,तथा खाऊचे वाटप करण्यात आले*. *या कार्यक्रमा स गावाचे उपसरपंच श्री दुर्योधन तायडे,सामाजिक कार्यकर्ते श्री गोपाल भाऊ लांडे  आणि इतर गावकरी उपस्थित होते*

    *कार्यक्रमा साठी कु, जे एम लोहटे,श्री एस जे सरदार,श्री आर एस आढाव, कू एस एन बावणे,श्री आर डब्ल्यू  परचाके,श्री मंगेश थोरात,श्री एस एच राऊत,श्री एस एम सावंग,श्री एस डी भोपळे  कु.अश्विनी ठाकरे, सय्यद बाशिद  श्री पवन डोके,श्री योगीराज बाहेकर तथा महा पारेषण विद्युत कंपनी चे कर्मचारी उपस्थित होते.*

 *हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सतिश महाले सर,वाघोडे सर,श्री शरद वानखेडे सर,श्री सारोलकर सर,सौ भोयर मॅडम यांनी परिश्रम घेतले.*


*शब्दांकन*.

*डॉ किशोर वानखडे*

Post a Comment

0 Comments