Subscribe Us

वर्ग.7.मराठी.स्वप्न विकणारा माणूस

 २. स्वप्नं विकणारा माणूस


कुतूहल - कुतूहल, तुमच्याकडे, मूड, हृदय - मोहक, शैली - शैली

• वाक्प्रचार :

(१) तुच्छ लेखणे हीन लेखणे.

(२) गराड पडणे गर्दी होणे.

(३) मती कुंठित होणे विचारप्रक्रिया थाबंणे.

(४) संभ्रमात पडणे गोंधळात पडणे.

(५) तल्लीन होणे मग्न होणे.

(६) तरतरी पेरणे उत्साह निर्माण करणे.

(७) भरभरून बोलणे तोंडभरून बोलणे

(८) गहिवरून येणे कंठ दाटुन येणे.

• संकलित मूल्यमापन

प्रश्न १ - तुमचे मत स्पष्ट करा.

(१) गावात येणाऱ्या माणसाला गावकरी 'सपनविक्या' म्हणत.

उत्तर - गावात एक माणूस घोड्यावर बसून यायचा. पिंपळाच्या पाराखाली थांबायचा. देशोदेशीचे खूप अनुभव सांगायचा. त्याची बडबड लोक मोठ्या उत्सुकतेने ऐकत असत. तो निघून गेल्यावर मग लोक म्हणत की हा बडबड्या आला की आपल्यात तरतरी पेरून जातो. त्याच्या बोलण्यानं जगाची ओळख झाल्यासारखं वाटतं. काही काळ आपण आपलं दुःख विसरतो. तो त्यांच स्वप्न आपल्या डोळ्यात उतरवून जातो. म्हणून लोक त्याला 'सपनविक्या' म्हणत.

(२) स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.

उत्तर- गावात जाणे, तिथल्या लोकांना एकत्र जमवणे, त्यांच्याशी बोलण्यासाठी सुका मेवा विकणे यातून स्वप्न विकणाऱ्या माणसाला खूप आनंद मिळत असे. आपले अनुभव, आपल्याजवळचे ज्ञान इतरांना सांगावे व दुसऱ्यांना

आनंद दयावा हे स्वप्न विकणाऱ्या माणसाचं स्वप्न होतं, हा त्याचा गावात येणाचा उद्देश होता.

प्रश्न २ - स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्दद्धांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.

स्प्नं विकणारा माणूस २०००

त्याचा पेहराव

त्याचे बोलणे

त्याचे स्वप्

उत्तर - स्वप्नं विकणारा माणूस

(१) त्याचा पेहराव - तलम रेशमी धोतर, त्यावर तसाच जरीचा सैलसर कुडता, डोक्याला लाल-पांढरा फेटा, डोळ्यांवर चष्मा आणि पायात चामडी बूट असा त्याचा पेहराव होता.

(२) त्याचे बोलणे आपले बोलणे तो वेगवेगळ्या किश्श्यांनी रंगवून, फुलवून सांगायचा. तो लोकांना स्वप्नात धुंद गुंगवत असे.

(३) त्याचे स्वप्न - आपले अनुभव, आपल्याजवळचे ज्ञान इतरांना सांगावे, दुसऱ्यांना आनंद दयावा हे त्याचे स्वप्न होते.

प्रश्न ३ - खालील आकृत्या पूर्ण करा.

(१)

स्वप्नाविषयी लेखकाचे मत 000

000

1000उत्तर - ज्याला स्वप्न बघता येत नाही तो माणूसच नाही. जे स्वप्न आपल्याला समृद्ध करतं, ते बघण्यासाठी मात्र संवेदनशील असावं लागतं.

ज्याचं मन असं तीव्र संवेदनशील असतं ती माणसं आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाट्टेल ते करतात.

ही माणसं स्वतः काहीतरी आदर्श बनून वावरतात. नाहीतर इतरांना आदर्श बनवतात.

अशा संवेदनशीलतेचा अभाव असणारी माणसं, ना धड इकडे ना धड तिकडे अशी अधांतरीच तरंगत राहतात.) स्वप्नं विकणाऱ्याचे किस्से ऐकणाऱ्यांचे फायदे

उत्तर - स्वप्न विकणाऱ्याने कित्येक प्रदेश पाहिले होते. भिन्न संस्कृतीची माणसं पाहिली होती. त्यानं अनुभवलेलं असं समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किश्श्यांनी रंगवून, फुलवून सांगायचा.

किस्से ऐकताना लोक आपलं दुःख काही काळ विसरून जायचे. त्यांना आपल्याला जगाची ओळख झाल्यासारखं वाटायचं. त्याचं स्वप्न त्यांच्या डोळ्यात८

प्रश्न ४ - स्वम्नं विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघतक्ता तयार करा.

उदा., (१) पिंपळाच्या पारावर थांबणे.

उत्तर -

(२) पाराला असलेल्या लोखंडी कडीला आपला घोडा बांधणे.

चामडी पिशवीतल पाणी घटाघटा पिणे

(४) ऐटीत झाडाच्या पारावर बसणे.

प्रश्न ५ कल्पना करा व लिहा. स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे.

उत्तर मी तुम्ही पारावरच का बसता ?

तो - कारण इथे लोक गोळा होतात. त्यांचा गराडा पडतो. मी - स्वप्न विकल्यानं पैसे मिळत नाहीत. मग स्वप्नं का विकता ?

तो - मला समाधान मिळतं.

मी- कसलं समाधान ?• 

तो - मी अनुभवलेलं समृद्ध विश्व त्यांना फुलवून सांगण्याचं समाधान. मी मी विद्यार्थी आहे. मला एखादं स्वप्न दया ना, मला समाधान वाटेल असं


तो - शिकत असताना नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊ नकोस. नवं काहीतरी शोधून काढ. संशोधन कर. नवे प्रयोग कर.

मी- संशोधन ? ते कशासाठी ?

तो - लोकांचं जीवन सुखी करण्यासाठी. हे स्वप्न उराशी जपून ठेव.

मी- हे स्वप्न मी या क्षणापासूनच उराशी जपून ठेवलंय. धन्यवाद.

चर्चा करूया

झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील, याबाबत विचार करा. घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा.

मी - ताई, झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील ?

ताई अरे, आपण आपल्या मनात ज्या गोष्टीचं चिंतन करत असतो त्या कधी कधी स्वप्नात दिसतात. 'मनी वसे ते स्वप्नी दिसे.'

आई हे तर खरं आहेच पण शिवाय ज्या गोष्टीची आपल्याला ओढ वाटते त्याही गोष्टी आपल्याला स्वप्नातून दिसत असतात. बाबा - आणि एखाद्या घटनेचा, प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम

झाला असतो. त्याचाही आविष्कार स्वप्नातून होत असतो. प्रकटमन आपले अनुभव अप्रकट मनाजवळ ठेवतो. ते अप्रकट मन स्वप्नांना जबाबदार असते.

खेळूया शब्दांशी

प्रश्न १- पार-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार-पलीकडे. असे 'पार' या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.

(1) पराभव

(2) कर

(३) वात

उत्तर द्या

(१) हार हरणे, माळ

(२) कर - करणे, हात

३) वात - दिव्याची वात, वारा किंवा वायू.

प्रश्न २- खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

'अ' गट

'ब' गट

(१) मती कुंठित होणे.

(अ) कंठ दाटून येणे.

(२) तरतरी पेरणे.

(आ) विचारप्रक्रिया थांबणे.

(३) गहिवरून येणे.

(इ) उत्साह निर्माण करणे.

उत्तर (1 Aa), (2 – E), (3 – A)

प्रश्न ३ खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्ये तयार करा.

(a) कुतूहल

(aa) गोंधळ

(इ) ढाब

(ई) आतुरतेने

उत्तर - (१) कुतूहल - त्या छोट्या बाळाला इंद्रधनुष्याचे मोठे कुतुहल वाटत होते.

(२) संक्रम - ती कागदी फुलं इतकी हुबेहुब होती की ती खरी की खोटी असा संभ्रम पड़ायखा,

(३) इब - त्याची बोलण्याची ढब विलक्षण आकर्षक आहे.

(४) आतुरतेने - पंढरपूरहून परतलेल्या आईची आम्ही आतुरतेने वाट पाहत

खेळ खेळूया

१- दिलेल्या अक्षराने सुरू होणाऱ्या गावाचे नाव सुरुवातीला लिहायचे आहे. त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या दुसन्या गावाचे नाय लिहायचे. पुन्हा एकदा त्याच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणाऱ्या तिसऱ्या गावाचे नाव लिहायचे. आता तिसऱ्या गावाच्या शेवटच्या अक्षराने सुरू होणारे गावाचे नाव लिहायचे पण अशा गावाचे नाव लिहायचे आहे, ज्याचे शेवटचे अक्षर 'र' असेल, बघूया जमते का ते।

तुम्ही काय कराल

• तुम्ही चांगले धावपटू आहात. शाळेच्या क्रीडासंमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे, हे तुमचे स्वप्न आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याकरिता तुम्ही कोणते प्रयत्न कराल ?

उत्तर - शाळेच्या क्रीडासंमेलनात धावण्याच्या स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवायचे आहे. हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी प्रथम मी आपले आरोग्य सुधारेल. त्यासाठी दररोज सकस आहार घेईल. दररोज मैदानात धावण्याचा सराव करेल. माझ्या खेळांच्या सरांनी धावण्याशी संबंधित सांगितलेल्या अगदी बारीक गोष्टी कटाक्षाने पाळील, नियमित धावण्याचा सराव करून हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करील.

Post a Comment

0 Comments