३. तोडणी
दत्तात्रय विरकर
• शब्दार्थ:
पाचुंदा - कडब्याचा पाच पेंढ्यांचा गट, सरमड - बाजरीचे ताट, कडबा, पाचट - उसाचा वाळलेला पाला, चिपाड, पैकं- पैसे
• वाक्प्रचार :
(१) मनात काहूर उठणे कावरेबावरे होणे.
(२) तांबडं फुटणे सकाळ होणे.
(३) काकडून निघणे थंडीने गारठणे
(४) हबकून जाणे धक्का बसणे.
(५) उलथाल होणे अस्वस्थ, बेचैन होणे.
(६) आबाळ होणे हेळसांड होणे.
(७) आनंदाला पारावार न उरणे खूप आनंद होणे.
• संकलित मूल्यमापन
स्वत:चा अभ्यास
प्रश्न १ - तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
(१) मीराने वसंतला 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा सांगितलेला अर्थ,
उत्तर - तम म्हणजे अंधार. ज्योति म्हणजे प्रकाश, गमय म्हणजे जाणे. अंधारातून प्रकाशाकडे जाणे. अज्ञान हा अंधार होय. शिक्षण म्हणजे प्रकाश होय.•
अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाणे असा अर्थ मीराने वसंताला सांगितला.
(२) वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ.
उत्तर - वसंतच्या मनात शिक्षणाची विलक्षण ओढ आहे. शाळा शिकायची नाही. असे त्याचे वडील त्याला म्हणाले त्या दिवशी तो उपाशीच झोपला. त्याला सडकेवर पडलेला कागद दिसला. कागदावर काहीतरी लिहिले. ते वाचण्याची त्याने धडपड केली. मीराकडून ते वाचून घेतले आणि त्याचा अर्थ समजावून घेतला. वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ अशी होती.
(३) 'अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार ?'
या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ.
उत्तर - वसंत ऊसतोडणीवर काम करून पैसे मिळवत होता. त्याने असेच काम करून पैसे मिळावेत असं त्याचे वडील शंकर यांना वाटतं. वसंतनं शाळेत जाऊ नये असं त्यांनी बजावलं, वसंतचं शिक्षण वडिलांनी बंद केल. म्हणून रस्त्यावर सापडलेला कागद आपल्याला वाचता येत नाही असे तो त्याची बहीण मीरा हिला दुःखाने म्हणाला.
प्रश्न २
- वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
उत्तर - वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये (१) "दादा मले साळांत कवा धाडणार?" (२) "शंकरच्या बोलण्यानं वसंत उपाशीच झोपला." (३) "तारानं वसंतपाशी जाऊन त्याला गाडीत बसवलं सडकेवर पडलेल्या कागदावर वसंताची नजर खिळली. तसा वसंतानं कागद उचलून हातात धरला. (४) तो मीराला म्हणाला, "काही झालं तरी मी शिकणारच. (५) वडिलांनी त्याला शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला तेव्हा वसंतनं लगेच मित्रांना गाठलं,
) 'आता म्या साळेला येणार,' असं वसंता सगळ्यांना सांगत सुटला. पाठातील सर्व वाक्यातून वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दिसून येते.
प्रश्न ३ - खालील आकृतीत योग्य शब्द लिहा.
(१) बैलांचा चारा
उत्तर - सरमद
(२) ऊसतोडणी कामगारांच्या मुलांची शाळा.
उत्तर - साखरशाळा
प्रश्न ४ - तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वांत जास्त आवडले ? सकारण सांगा.
उत्तर- या कथेतील 'वसंत' हे पात्र मला सर्वांत जास्त आवडले. कारण (१) तो या कथेचा नायक आहे. सर्व कथा त्याच्याभोवती फिरते. (२) त्याची शिक्षणाची तळमळ मनाला स्पर्श करून जाते. (३) सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो परिस्थितीपुढे लाचार होत नाही. त्याच्या अंगी परिस्थितीला वाकवण्याची धमक आहे. तो मीराला म्हणतो, "ताई, काही झालं तरी मी शिकणारच.
प्रश्न - खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा.
मराठी शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात गाड्या सोडल्यावर खालील व्यक्तींनी काय काय केले ?
आनंदी, वसंत ऋतु
इतर बायका
दामू
तारा
उत्तर- (१) मीरा, वसंत झिऱ्यावर पाण्यासाठी नंबर लावला. (२) इतर बायका - गाडीजवळच चुली पेटवल्या
(३) दामू - पाचुंदा सोडून गुडघ्यानं सरमड कडाकडा मोडून बैलांसमोर सारलं.
(४) तारा- भाकरी थापून तव्यावर पिठलं टाकलं.
व्याकरण व भाषाभ्यास
खेळूया शब्दांशी
प्रश्न १ - गटांत न बसणारा शब्द शोधून लिहा.
(१) श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती.
(२) रात्र, निशा, प्रभात, यामिनी.
(३) अशिक्षित, अशिक्षित, अशिक्षित, सुशिक्षित.
(४) गवसणे, मिळणे, हरवणे, सापडणे.
प्रश्न २- कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पुन्हा लिहा.
(आनंदाला पारावार न उरणे, हबकून जाणे, हातभार लावणे, आबाळ होणे.)
(१) वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची
उत्तर - वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची आबाळ झाली.
(२) गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या उत्तर - गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावार उरला
नाही.
प्रश्न ४ - खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.
(१) तांबडं फुटलं.
उत्तर - सकाळ झाली.
(२) गाडी रुळावर आली.
उत्तर - योग्य वळण घेतले.
(३) अंधाराकडून उजेडाकडे.
उत्तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे
(४) चूल शिलगावली.
उत्तर चूल पेटवली.
प्रश्न ५ खालील वाक्ये प्रमाणभाषेत लिहा.
(१) 'पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय.'
उत्तर- 'पोरा, मला तरी कुठं वाचता येत.'
(२) "अवं समदी लेकरं साळंला गेली आन् तुपलं ?"
उत्तर - अग सगळी मुलं शाळेला गेली आणि तुझं ?'
(३) "आता तुमी समदीच म्हंत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू?"
उत्तर - "आता तुम्ही सगळेच म्हणता तर मी तरी कशाला आडवा येऊ?"
(४) 'आता म्या साळंला येणार.'
उत्तर- 'आता मी शाळेत येणार.'
प्रश्न ६ खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.
शाळेचा पहिला दिवस
शाळेची इमारत
आनंद
वर्गशिक्षक
नवीन मित्र
नवीन पुस्तकांचा सुगंध
उत्तर (१) आनंद आज शाळेचा पहिला दिवस. बाबांनी माझ्याकरिता नवे कपडे आणले होते. पुस्तके आणली होती. शाळेचा पहिला दिवस म्हणून आईने शिरा केला. मी जेवलो आणि नवे कपडे घालून व पुस्तकांचं दप्तर घेऊन शाळेत गेलो. आज मी खूप आनंदात होतो.
(२) वर्गशिक्षक - आमचे वर्गशिक्षक अतिशय प्रेमळ आहे. ते खूप छान समजावून सांगतात. ते मला माझ्या बाबांसारखे वाटतात.
(३) नवीन मित्र - वर्गात खूप मुले होती.' आम्ही एकमेकांशी खूप बोललो. सर्वांनी न्याहारीसाठी डबे आणले. आम्ही सर्वांनी मिळून ते खाल्ले. मधल्या सुट्टीत थोडी दंगा मस्तीही केली. मला खूप नवे मित्र मिळाले.
(४) नवीन पुस्तकांचा सुगंध आमच्या पुस्तकात छान छान चित्रे काढली आहे. छान छान गोष्टी लिहिल्या आहे. पण शाळेच्या पहिल्या दिवशी मी माझे नवे कोरे पुस्तक उघडताच मला पुस्तकाचा सुंदर सुगंध आला.
(५) शाळेची इमारत - आमच्या शाळेची इमारत खूप सुंदर आहे. त्यात
अनेक खोल्या आहेत. त्यात वर्ग भरतात. शाळेत खेळण्यासाठी पटांगण आहे. एका बाजूला सुंदर छोटी बाग आहे. ही शाळा माझे मंदिर आहे.
• रचनात्मक मूल्यांकन
• प्रकटवाचन
तोंडी काम
प्रश्न १ 'तोडणी' या पाठाचे प्रकटवाचन करा.
उत्तर - विद्यार्थ्यांनी या कथेचे न अडखळता स्पष्ट उच्चारात वाचन करावे.
माहिती मिळवूया.
प्रश्न १ - साखरशाळा कोणत्या मुलांसाठी असते ?
उत्तर - साखरशाळा ऊस कामगारांच्या मुलांसाठी असते.
प्रश्न २ - ही शाळा कोठे भरते ?
उत्तर ऊस कामागार वस्तीच्या जवळपास भरते.
प्रश्न ३ - साखरशाळा कशासाठी सुरू झाल्या आहेत ?
उत्तर - ऊस कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी.
माहिती घ्या
प्रश्न १- शेतीच्या खालील कामांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांची माहिती घ्या व नावे लिहा
प्रश्न १ साखरशाळेत जाणाऱ्या राजेशला तुम्ही अभ्यासाबाबत कोणती मदत कराल ?उत्तर - राजेश साखरशाळेत जातो म्हणजेच गरीब आहे. आम्ही त्याला आमच्या पैशातून जुनी पुस्तकं विकत घेऊन देऊ. आम्हाला ट्यूशन आहे. त्याला नाही. म्हणून सुट्यांमध्ये कधीकधी त्याच्याकडे जाऊन त्याला जे समजले नसेल ते नीट समजावून सांगू.
0 Comments