Subscribe Us

वर्ग.7.मराठी.श्रावण मास



4. श्रावणमास

बालकवी

• शब्दार्थ:

हर्ष - आनंद, मानसी मनाला, मनात, शिरवे- पावसाच्या सरी, नभोमंडपी - आकाशरूपी मंडपात, जलद मेघ, बलाकमला उडणाऱ्या बगळ्यांची रांग, अवनी – पृथ्वी, पावा बासरी, गाय गातो, सुवर्ण चंपक - आनंद, विपिनी - अरण्यात, वनात, भामा श्रीकृष्णपत्नी, सत्यभामा रोष राग, पुरोपकंठी - नगरांजवळील बागेत, ललना- स्त्रिया


उत्तर - (१) पहिला पाऊस आल्यावर

पहिला पाऊस आल्यावर वैशाखात वाढलेला प्रचंड दाह शांत होतो. लोकांना हायसे वाटते. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहतात. पहिल्या पावसाने त्यांची मने फुलून येतात. लहान मुले पावसात आनंदाने भिजतात व नाचतात. धरणीमाता ही शांत होते. पहिला

पाऊस आषाढ महिन्यात येत असतो. श्रावण महिन्यात नव्हे.

(२) सरीवर सरी कोसळल्यावर हेही दृश्य आषाढ महिन्यातच पाहायला मिळते. सरीवर सरी कोसळतात. रस्त्यावर नदीसारखे पाणी वाहू लागते. लहान लहान मुले त्या पाण्यात कागदांच्या होड्या सोडतात. त्या सरींमध्ये पक्षी भिजून जातात. ह्या सरी जर रात्रभर कोसळल्या तर नदया नाल्यांना पूर येतात.


प्रश्न २ - निरीक्षण करा व लिहा.

उत्तर - (१) श्रावण महिन्यात आकाशातून सरसर शिरवे येतात आणि क्षणात फिरून ऊन पडते.

(२) त्याचवेळी आकाशात इंद्रधनुष्याचा गोफ विणलेला दिसतो.

(३) ढगांमुळे सूर्यास्त झाल्यासारखा वाटतो आणि लगेच सूर्य दिसूही लागतो. सूर्याची पिवळी किरणे तरूशिखरांवर व उंच घरावर पडलेली दिसतात.

(४) मेघांवर अनेक रंग उमटतात.

(५) सर्व आकाशावर सौंदर्याचे रूप रेखले जाते.

(३) हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत. उत्तर - सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती.


प्रश्न ६ - कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे; क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

उत्तर - आषाढ महिन्यात भरपूर पाऊस आलेला असतो. त्यामुळे श्रावण महिन्यात सृष्टी हिरवी हिरवी झालेली असते. झाडे हिरवी दिसतात. गवत तर हिरवे हिरवे गार मखमलीचे गालिचेच वाटतात. त्यामुळे मनात खूप आनंद दाटून येतो. त्यातच इतर कोणत्याही महिन्यात न दिसणारा असा ऊन-पावसाचा खेळ श्रावण महिना खेळत असतो. छान ऊन पडलेले असते तोच एकाएकी पावसाचे शिरवे येतात. आता पाऊस चांगलाच बरसणार असे वाटू लागतातच पाऊस अदृश्य होतो आणि चक्क ऊन पडते. हा खेळ मनाला मोठा आल्हाददायक वाटतो. ज्याच्यावर प्रेम करावं असा हा श्रावण आनंददायी महिना आहे

प्रश्न १ - श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा प्रक तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर - वैशाख उन्हाळ्यात तर श्रावण पावसाळ्यात येतो. वैशाखात प्रचंड.

पाऊस : माझ्यामुळं शेतं पिकतात. तू?

छत्री : माझ्यामुळं ते निरोगी राहतात ?

पाऊस : कसे?

छत्री: वेड्या, एकानं मला जवळ घेतलं नव्हतं. तो ऊन लागून मेला.

पाऊस : माझी लोकांना शेतीसाठी, पाणी पिण्यासाठी गरज असते.

छत्री: माझी त्यांना सावलीसाठी गरज असते.

पाऊस : खरं आहे. आपण दोघंही लोकांचे हितकर्ते आहोत


प्रकल्प -

बालकवींच्या कवितांचा संग्रह करा.

उद्देश- बालकवींच्या कवितांची ओळख करून घेणे.

कृती आंतरजालाच्या सहाय्याने बालकवींच्या कविता मिळविल्या. त्या सादरीकरणात दिल्या आहेत.

सादरीकरण -

(१) आनंदी आनंद गडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे नीलनभी नक्षत्र कसे डोकावुनि हे पाहतसे कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ? तयामध्ये तो सदैव वसतो, सुखे विहरत

गरमी असते. सूर्य लवकर उगवतो व उशिरा मावळतो. दिवस मोठा व रात्र लहान असते. आकाश निरभ्र असत. हवा कोरडी असते. वैशाखात पाऊस येत नाही. पावसाचे शिरवेही येत नाहीत. नदी, नाले, तलाव कोरडे पडतात. शिरवे येत नसल्यामुळे इंद्रधनुष्य दिसत नाही. झाडे व गवत सुकलेली असतात.

श्रावणात मात्र चोहिकडे हिरवळच हिरवळ पसरलेली असते. गवत म्हणजे मखमलीचे हिरवेहिरवे गार गालिचे वाटतात. आकाशातून अचानक शिरवे पडतात आणि लगेचच ऊनही पडते. हवेत आर्द्रता असते. नदी, नाले, तलाव पाण्यानी भरलेले असतात. आकाशात कितीदा तरी इंद्रधनुष्य पाहायला मिळते.

चला संवाद लिहुया सुरू करूया.

प्रश्न १ - पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा. 

उत्तर -

पाऊस : मी खरा समाजसेवक आहे. लोक माझी आतुरतेनं वाट पाहतात. तू काय आहेस ?

छत्री : मी पण समाजसेवक आहे. लोकांना तू भिजवतोस. त्यापासून मी त्यांना वाचवतो.

इकडे, तिकडे, चोहिकडे बाहाति निर्धार मंदगती, डोलति लतिका वृक्षतती पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ? कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत बदले इकडे, तिकडे, चोहिकडे स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला इकडे, तिकडे, चोहिकडे

(२) औदुंबर

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळासावळा झरा वाहतो बेटाबेटातुन चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे शशेतमळ्यांची दाट लागली हिरवी गरदी पुढे. पायवाट पांढरी तयांतुनि अडवीतिडवी पड़े हिरव्या कुरणामधुनि चालली काळ्या डोहाकडे झांकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर वैशिष्ट्यपूर्ण नोंदी - निसर्गकवी म्हणून अढळ स्थान मिळालेल्या बालकवीर आनंद आणि उदासीनता या दोन्ही भावनांना आपल्या कवितांमधून पकडूनठेवलं. अल्पायुषी ठरलेल्या बालकवींची कविता निसर्गातील प्रतिमांच्या आसपासच फिरली, पण त्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या नि शब्दकलेच्या जोरावर निसर्गातील निरागसता कवितेत आणली. मग आनंद असो की उदासीनता, या दोन्ही भावना त्यांच्या कवितेत निरागस होऊन येतात. निसर्गाला मानवी भावभावनांची जोड दिल्याने बालकवींची कवीता रूढ अर्थाने दिसणाऱ्या निसर्गवर्णनापेक्षा वेगळी ठरते.

Post a Comment

0 Comments