५. भांड्यांच्या दुनियेत
प्रश्न १ - खालील विधानांमागील कारणांचा शोध घ्या व लिहा.
(१) शेती व्यवसाय व स्थिर जीवनामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
उत्तर - कारण अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्यांची आवश्यकता बाटू लागली. म्हणून शेती व्यवसाय व स्थिर जीवन यामुळे माणसाला भांड्यांची गरज पडली.
(२) पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
उत्तर - कारण त्याकाळी धातूंची ताटे मुबलक प्रमाणात तयार झाली नव्हती. म्हणून पूर्वी मोठ्या प्रमाणावर केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत होती.
(३) आज घरोघरी मिक्सर वापरतात.
उत्तर - कारण मिक्सरमुळे वेळ वाचतो व श्रमही वाचतात. म्हणून आज घरोघरी मिक्सर वापरतात.
(४) मातीच्या भाड्यांचा जास्तीत जास्त वापर करावा.
उत्तर - कारण भांडी तयार करण्यासाठी माती वापरण्याची परंपरा साहित्य संस्कृतीचा पाया मानला जातो. म्हणून मातीच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर
करावा.
प्रश्न २- खालील आकृती पूर्ण करा.
मानवाने ज्या घटकांपासून
भांडी बनवली ते घटक.
उत्तर -
मानवाने ज्या घटकांपासून भांडी बनवली ते घटक.
माती/चिनी माती
तांबे/लोखंड
पितळ/जर्मन
ॲल्युमिनियम/चांदी
हिंडालियम/कांस्य
• स्टेनलेस स्टील/प्लॅस्टिक
प्रश्न ३- 'भांडी हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.' या विधानाबाबत् तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर - हे विधान खरे आहे. कारण माणसानं शेती करणं आणि स्थिर जीवन स्वीकारलं आणि त्याचवेळी मानवी संस्कृतीचीही सुरुवात झाली आणि भांडी बनवायलाही सुरुवात झाली. मानवी संस्कृतीचा जसजसा विकास होत गेला तसतसा भांडीनिर्मितीतही विकास होत गेला. तसतसे भांड्यातही बदल होत गेले. याचाच अर्थ भांडी हीं मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे.
प्रश्न ४ - तुमच्या घरातील निरुपयोगी वस्तूंचे तुम्ही काय कराल, ते सांगा.
उत्तर - निरुपयोगी वस्तू जर मोड म्हणून कुणी विकत घेणार असतील तर आम्ही त्या वस्तू विकून टाकू आणि त्यात आणखी काही पैशाची भर घालून नव्या उपयोगी वस्तू खरेदी करू. स्कूटर, कूलर, दुचाकी, घरातील वेगवेगळ्या धातूंची भांडी यांचे असे करता येते. आम्हीही तसेच करू. पण आजी-आजोबा यांची काठी किंवा अन्य काही वस्तू आठवण म्हणून जपून ठेवू.
प्रश्न ५ - दोन-दोन उदाहरणे लिहा.
(१) मातीची भांडी
सुरई
राजण
(२) चामड्यापासून बनवलेली भांडी
बुधळे
मोट
(३) लाकडी भांडी
पोळपाट
बेलणे
(४) तांब्याची भांडी
ताब्या
अष्टदळ
मराठी बालभारती -
कप
(५) चिनी मातीची भांडी
बशी
(६) नॉनस्टिकची भांडी
तवा
पॅन
(७) काचेची भांडी
बरणी
पेले
प्रश्न ६ यांना काय म्हणतात ?
(१) जेवणासाठी पंक्तीत वापरण्यात येणारे ताट.
पान
(२) जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुवायचे भांडे.
बेसिन
(३) दुधासाठीचे भांडे.
कासाडी
(४) ताकासाठीचे भांडे
कावळा
(५) पूर्वी अंघोळीसाठी वापरायचे भांडे.
घगाळ
व्याकरण व भाषाभ्यास
खेळूया शब्दांशी
प्रश्न १ - कंसातील शब्द व शब्दसमूह यांमध्ये योग्य बदल करून रिकाम्या जागा भरा.
(अविभाज्य अंग, नित्योपयोगी, विराजमान होणे, सगेसोयरे)
(१) संत तुकारामांनी वृक्षांना संबोधून त्यांचा गौरव केला
(२) वस्तू जपून व व्यवस्थित ठेवाव्यात.
(३) आज शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मुख्याध्यापक पदावर झाले.
(४) कुटुंब हे मानवी जीवनाचे आहे.
उत्तर: (1) सगेसोयरे (2) शाश्वत (3) सिंहासनावर (4) अविभाज्य भाग
चर्चा करूया.
प्रश्न १- अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
उत्तर कारण गिझर अधिक सोयीचे आहे. म्हणून अंघोळीचे पाणी तापवण्यासाठी बंब वापरण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
प्रश्न २ - दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे.
उत्तर - कारण स्टेनलेस स्टील चांदीपेक्षा अधिक स्वस्त, न झिजणारे व चकचकीत असते. म्हणून दैनंदिन जीवनात चांदीची भांडी वापरण्याचे प्रमाण नगण्य आहे.
रचनात्मक मूल्यांकन
* तोंडी काम
* प्रकटवाचन
प्रश्न १ - 'भांड्यांच्या दुनियेत' या पाठाचे प्रकटवाचन करा.
उत्तर - विद्यार्थ्यांनी या पाठाचे न अडखळता स्पष्ट उच्चारात वाचन करावे.
माहती मिळवूया
प्रश्न १ - पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात ?
उत्तर - पत्रावळी तयार करण्यासाठी पळसाच्या झाडांची पाने, मोहाच्या झाडाची पाने व कुडाच्या झाडाची पाने वापरतात.
प्रश्न २ - पत्रावळीची पाने एकमेकांना कशाच्या साहाय्याने जोडली जातत ?
उत्तर- पत्रावळीची पाने बांबूच्या शिलकांच्या साहाय्याने एकमेकांना जोडली जातात.
प्रश्न ३ - पूर्वी वापरत असलेल्या व आता वापरत असलेल्या पत्रावळींमध्ये कोणते बदल झाले आहेत ?
उत्तर - पूर्वी पत्रावळी तयार करण्यासाठी झाडांची पाने वापरली जात. परंतू
आता मात्र कागद, प्लास्टीक, थरमाकॉल इत्यादींचा वापर करून मशीनच्या साहाय्याने पत्रावळी तयार केल्या जातात.
प्रश्न ४ - उन्हाळ्यात माठाला ओले, सुती कापड का गुंडाळतात ?
उत्तर - पाणी थंड होण्यासाठी उन्हाळ्यात माठाला ओले, सुती कापड गुंडाळतात.
प्रश्न ५ - मातीचा माठ, रांजण जमिनीत का पुरतात ?
उत्तर - पाणी थंड होण्यासाठी मातीचा माठ, रांजण जमिनीत पुरतात.
प्रश्न ६ - बांधकाम क्षेत्रात लोखंड या धातूचा उपयोग मोठ्या प्रमाणात का होत असावा ?
उत्तर - लोखंडामुळे बांधकाम मजबूत होते. हे बांधकाम दीर्घकाळ टिकणार
असते. म्हणून बांधकाम क्षेत्रात लोखंड या घातूला उपयोग मोठ्या प्रमाणात होत असावा.
तुम्ही भाजी लोखंडी कढईत किंवा पातेल्यात का शिजवता?
उत्तर - लोखंडाच्या कढईत वा तव्यात केलेली भाजी ही पोष्टिक असते. वा भाजीत लोखंडाचा अर्क मिसळतो. त्यापासून शरीराला लोह प्राप्त होते. म्हणून लोखंडाच्या कढईत व तव्यात भाजी करतात.
प्रश्न ८ - भांडी बनवण्यासाठी धातूंचा वापर का सुरू झाला असावा?
उत्तर - कारण धातूंपासून तयार झालेली भांडी अधिक मजबूत असतात. ती फुटत नाही. दीर्घकाळ टिकतात. ती भांडी वापरण्यास सोयीची असतात.
प्रश्न ९ - चूल पेटवताना फुंकणीने अग्नीवर फुंकर का घातली जाते ?
उत्तर - कारण पुंकणीने हवा एका ठिकाणी एकवटली जाते. हवेतील ऑक्सिजनमुळे चूल लवकर पेटते. म्हणून चूल पेटवताना फुंकणीने अग्नवर फुंकर घातली जाते.
प्रश्न १० - चहाची किटली, कपबश्या, प्लेट्स, वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिक्सची का असतात ?
उत्तर- चिनी मातीची किंवा सिरॅमिक्सची फुगण्याची तसेच आक्रसण्याची क्षमता फारच कमी असते. म्हणून चहाची किटली, कपबश्या, प्लेट्स, वाट्या इत्यादी चिनी मातीची किंवा सिरॅमिक्सची असतात.
.
0 Comments