Subscribe Us

वर्ग.6.मराठी.सुगंधी सृष्टी



१०

सुगंधी सृष्टी

प्रश्न १ - तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

(१) सुगंधी पेटीचा एक एकरच जणू उघडत चालला होता, असे लेखकाने कशाला म्हटले आहे?

उत्तर - लेखकानें आपल्या घरी मोगऱ्याचे रोपटे लावले होते. त्याला मुगाच्या दाण्याएवढी आणि पोपटी रंगाची एक कळी लागली. ती वाढता वाढता टपोर झाली. एक दिवस संध्याकाळी तिची एक पाकळी जरा बाजूला झाली. मग अंमळशाने दुसरी पाकळी, नंतर तिसरी पाकळी. या घटनेला लेखकाने सुगंधी पेटीचा एक एक खणच जणू उघडत चालला होता असे म्हटले आहे.

(२) निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जंगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते ?

उत्तर - निशिगंधाचे रोप पूर्ण वाढून त्याच्या दांड्यावर एका पाठोपाठ फुले फुलतात. त्यांचा रोज रात्री नवा आनंद मिळतो. फुले अतिशय डौलदार असतात. ती फुले हिरव्यागार छडीवर फुलतात. म्हणून निशिगंधाला गुलछडी असेही दुसरे नाव पडले आहे. निशिगंध लाजाळू नाही. तो आपला रंग, आपला गंध, डौल उघडपणे जगापुढे मांडतो. म्हणून निशिगंध आपले सारे वैभव चवड्यावर उभा राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते.

(३) लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दांत केले आहे ?

उत्तर - गुलाब हे सोपस्कार करून घेणारे झाड आहे. त्याला कोणतीही जागा चालत नाही, पाणी कमी वा अधिक झाले तर सोसत नाही, खत वेळच्या हा

वेळी मिळाले पाहिजे, मुळे मोकळी झाली पाहिजेत. हंगाम साधून छाटणी केली पाहिजे. कीड टिपून मारली पाहिजे. एवढे सगळे केले तर हे राजश्री फुलणार, पण गुलाबाचे फुल एवढे ऐटदार असते की ते पाहिल्यावर आपण आपले श्रमः विसरून जातो. किती त्याचे आकार, किती रंग, किती गंधा त्यांना सीमा नााही. लेखकाने काळा गुलाब पाहिला. काळ्या मखमली सारख्या प्राकळ्यांचे ते फूल त्याला एक अजबचीज वाटली. लेखकाने गुलाबाचे वर्णन या शब्दांत केले आहे.

(४) लेखकाला सकाळी पारिजातकाखालून जातांना पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे का वाटते ?

उत्तर - पारिजातक हा कमालीचा निरिच्छ. त्याला कोठेही लावा, पाणी ट्या किंवा देऊ नका. पावसाळी ढगातून अमृताचा शिडकाव सुरू झाला की ह्या रांगड्या झाडाला कमालीचा आनंद होतो. त्याच्या अंगोपांगातून हिरवे रोमांच फुटतात. त्याला सुगंधी फुलांची हिरवी झुंबरे लटकतात. सकाळी पाहावे तर साऱ्या भूमीवर फुले अंथरलेली असतात. पाऊल ठेवावे तरी कोठे असा प्रश्न पडतो. ह्याला म्हणतात दान ! म्हणून लेखकाला सकाळी पारिजातकाखालून जातांना पुण्यपावन भूमीवरून जाण्यासारखे वाटते.

प्रश्न २ - तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

१) तुम्हांला कोणकोणती फुले जास्त आवडतात ? ती का आवडतात 

उत्तर- मला मोगरा, गुलाब व पारिजातक ही फुले जास्त आवडतात. दुसरे गुलाब तर फुलांचा राजाच आहे. त्याचा डौल, रंग व सुगंध मला आवडतात. डौल मोगऱ्याचा सुगंध तर लांबून घरात पसरतो. त्याचा दरवळ मनाला अतिशय प्रसन्न उभा करतो. पारिजातकाची फुले मुद्दाम तोडावी लागत नाही. अतिशय सुगंधित अशा या फुलांचा रोज सकाळी जमिनीवर सडाच पडलेला असतो..

(२) तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे ?

उत्तर - स्वतः सुगंधित राहावे आणि आपला सुगंध जगाला वाटून दयावा ठच्या हा माझ्या मते फुलांनी माणसाला अनमोल संदेश दिला आहे

मराठी बालभारती - VI कोहिनूर

(३) 'या पाठात गुलाबाला राजेश्री व निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे. का ते सांगा.

उत्तर - गुलाब फुलांचा राजा आहे. राजाचा डौल जसा इतरांहून वेगळाच असतो. तसे गुलाबाचे आहे. राजाचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतरच तो दरबारात येतो तसे गुलाबावर विशिष्ट जागा, प्रमाणात पाणी, खताचा योग्य पुरवठा, त्याची मुळे मोकळी करणे, हंगाम पाहून छटाई करणे, कीड टिपून मारणे इत्यादी सोपस्कार केले तर गुलाब फुलत असतो. म्हणून गुलाबाला राजेश्री म्हटले आहे. निशिगंधाला हिरव्यागार छडीवर हारीने टोकापर्यंत फुले लागतात म्णून निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे.

प्रश्न ३ - पारिजातकाचे फूल तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून आठ ते दहा वाक्ये लिहा.

उत्तर - पारिजातकाचे फूल एकदा माझ्याशी बोलले. ते म्हणाले, 'अशी कशी रे तुमची माणसाची जात ? स्वतः सुगंधी व्हावे असे तुमच्यापैकी अनेकांना वाटतच नाही. तुम्ही सुगंधी होणं म्हणजे काय ? शीलसंपन्न आणि चारित्र्यवान होणं. पाहावं तर खून, दरोडे, ह्याच गोष्टी तुमच्या वर्तमानपत्रात रोज छापून येतात. कोणतं सुख मिळतं तुम्हाला यापासून ? आपण सुखासाठी, आनंदासाठी जगतो. आणि सुख किंवा आनंद देण्यात असतो, घेण्यात नाही.' एवढे बोलून ते पारिजातकाचे फूल माझ्या ओंजळीत येऊन पडले.

व्याकरण व भाषाभ्यास

खेळया शब्दांशी

प्रश्न १ - खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.

(१) बिऱ्हाड (२) मोठी (३) सुवास (४) कष्ट

उत्तर (१), बिन्हाड विढार (२) मोठी थोर (३) सुवास सुगंध

(4) कठोर परिश्रम

प्रश्न २- खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.

(१) निरुपाय (२) पांढरा शुभ्र (३) प्रसन्न (४) उदार

उत्तर - (१) निरुपाय उपाय (२) पांढराशुभ्र काळाकुळकुळीत

(3) आनंदी × दुःखी (4) लिबरल कंझर्व्हेटिव्ह

प्रश्न ३ - खालील शब्दांना 'दा' प्रत्यय लावून तयार होणारे नवीन शब्द लिहा.

उदा. दहा-दहादा, पाच-पाचदा

(१) एक (२) शंभर (३) हजार

उत्तर (१) एक एकदा (२) शंभर शंभरदा (३) हजार हजारदा

प्रश्न ४ - डौल-डौलदार यांसारखे 'दार' प्रत्यय लागलेले आणखी शब्द लिहा.

उत्तर नक्षी नक्षीदार, दिमाख दिमाखदार, रुबाब - रुबाबदार

प्रश्न ५. खालील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.

(१) घसघशीत (२) रांगडा (३) उदारता (४) टिपून मारणे.

उत्तर- (१) घसघशीत कळीतून उमलेले मोगऱ्याचे पांढरेशुभ्र व घसघशीत दिसते.

(२) रांगडा - आदिवासी मुलगा अनेकदा रांगडा दिसतो.

(३) उदारता - कर्णाची उदारता जगप्रसिद्ध आहे. (४) टिपून मारणे - पारध्याने एका पक्ष्याला टिपून मारले.

प्रश्न ६ - या पाठात रंगांच्या अनेक छटा आल्या आहेत. उदा. पांढरा, तकतकीत पांढरा, पांढरेशुभ्र, पांढुरका याप्रमाणे तुम्हाला माहीत असलेल्या रंगांच्या विविध छटा लिहा.

(१) हिरवा (२) लाल (३) काळा (४) पिवळसर

उत्तर - (१) हिरवा - हिरवाकंच, हिरवागार, हिरवागर्द, हिरवागडद

(२) लाल लालभडक, लालगर्द, लालसर

(३) काळा काळाकुट्ट, काळाकुळकुळीत, काळसर, काळाशार

(४) पिवळा - पिवळाधमक, पिवळागर्द, पिवळसर

प्रश्न ७- खालील शब्द पाहा.

बाल-वास्तव्य, यास-गंध

उच्चार एकच असलेले, पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत

करून घ्या. लिहा. त्यांचे अर्थ समजून घ्या.

उत्तर (१) सूमन (१) चांगले मन (२) फूल, पुष्प

(2) पाणी (1) पाणी (2) तेज (3) मेघगर्जना

(३) सुमार (१) अंदाज (२) जेमतेम

(4) उत्तर

(१) एक दिशा (२) प्रश्नाचे उत्तर

(5) आधार (1) निराधार (2) ओठ

आपण समजून घेऊया

() विशेषणे

प्रश्न १ खालील परिच्छेदातील संख्याविशेषणे अधोरेखित करा.

अल्लाउद्दिन व फरिदा दोघे शाळेत निघाले. वाटेत एक भेळेचे दुकान होते. दुकानात अनेक प्रकारची चिक्की व फुटाणे मिळत असत. फरिदाकडे पाच रुपयांचे नाणे होते. तिने अडीच रुपयांत शेंगदाण्याच्या चिक्कीचे पाकीट घेतले, तर अल्लाउद्दीनने उरलेल्या अर्ध्या पैशांत फुटाणे घेतले. सगळे पैसे संपले. भरपूर फुटाणे आले. पसाभर फुटाणे त्याने फरिदाला दिले, तर तिने थोडीशी चिक्की अल्लाउद्दीनला दिली.

प्रश्न २- खालील वाक्यांतील मोकळ्या जागी कंसात दिलेल्या संख्यावाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा.

(एकेक, सहस्र, द्विगुणित, दुप्पट, पांच)

(१) अविनाशला पाच भाषा येतात.

(२) सूर्याच्या सहस्त्र किरणांनी जमिनीला स्पर्श केला.

(३) एकेक बेडूक उड्या मारत पसार झाले.

(४) आईला पाहताच तिचा आनंद द्विगुणित झाला.

(५) भुकेच्या तडाख्यात मीनाने दुप्पट चपात्या खल्ल्या.

खालील शब्द वाचा,

ही खारूताई, माझी वही, ज्याचे पत्र, त्याचा रुमाल, कोणता पेढा, आम्ही मैत्रिणी, त्याचा सदरा, तिच्या वेण्या.

वरील शब्दांतील ही, माझी, ज्याचे, त्याचा, कोणता, आम्ही, त्याचा, तिच्या ही सर्वनामे आहेत. पण या सर्वनामांपुढे नामे आली आहेत. ही सर्वनामे त्यांच्यापुढे आलेल्या नामांबद्दल विशेष माहिती सांगतात. म्हणजे ती विशेषणाचे कार्य करतात, म्हणून ही सर्वनामे सार्वनामिक विशेषणे आहेत.

मी, तू, तो, हा, जो, कोण, काय ही सर्वनामे असली तरी सार्वजनिक विशेषणे म्हणून काम करताना नेहमीच त्यांच्या मूळ स्वरूपात न येता त्यांच्या स्वरूपात बदल होतो.

प्रश्न ३ - खालील शब्द वापरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा. (पा.पु. पृ.क्र.३९)

झाड

फुले नदी वाट पाऊस डोंगर धरण पक्षी प्राणी

उत्तर - आम्ही सगळे जवळच एका पर्यटन स्थळी गेलो. हे पर्यटन स्थळ डोंगर व झाडाझुडपांच्या पायथ्यांशी शांतपणे विसावलेले आहे. या डोंगरावरून वाहणारी नदी व त्याच्या बाजूला असलेले धरण बघून आपला सर्वांचा क्षीण निघून जातो. जवळच असणाऱ्या बागेतील वेगवेगळी फुले बघून मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आम्ही पुढे पायवाट वरून चालत असतांना अभयारण्य दिसले. त्या अभयारण्यात वेगवेगळे रंगीबिरंगी पक्षी, हरणे, सांबार या सारखे प्राणी बघितले. थोड्याच वेळाने आभाळ भरून आले. काही वेळातच रिमझिम पावसात सुरुवात झाली या पावसात भिजतांना खूप मजा आली.


Post a Comment

0 Comments