Subscribe Us

वर्ग 6.मराठी पण थोडा उशीर झाला



मराठी बालभारती - VI

पण थोडा उशीर झाला. संदीप हरी नाझरे

प्रश्न १- दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.

(१) लेखकाला सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम कोणते व का वाटते ?

उत्तर कारगील हे काश्मीर सरहद्दीवरील हिमालयातील अतिशय खडतर - हवामानाच्या दुर्गम प्रदेशातीले ठिकाण आहे. या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड काम आहे असे लेखकाला वाटते. याचे कारण तेथील अतिशय थंड हवामान आणि सतत धगधगणारी तणावपूर्ण सीमा हे होय.

(२) पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड का उडत असे ?

उत्तर - पोस्टमन आल्यावर त्याने दिलेले पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकाचं मन चंद्रमण्यासारखं पाझरून वाहायचं, एकमेकांच्या पाठीवर आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत सैनिक पुन्हा कामावर खडे व्हायचे. म्हणून पोस्टमन आल्यावर बटालियनमध्ये झुंबड उडत असे.

(३) गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाची अवस्था कशी झाली ?

 - गावाकडचा सांगावा ऐकून लेखकाचं मन ढसढसा रडले. डोळ्यातलं पाणी हटेना. जीव घाबराघुबरा झाला. मन सैरभर झालं. लेखकाची अशी अवस्था झाली.

प्रश्न २ का ते लिहा.

(१) कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.

उत्तर - उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वतरांगा हिरव्याकंच रंगाने नटून जातात. जमीन अशी दिसतच नाही. जणू वसुधेने हिरवागार शालू परिधान केला आहे. असा रमणीय निसर्ग लेखकाचे मन उल्हासित करायचा. म्हणून कारगीलमधील उन्हाळा लेखकाला सुखावह आणि आल्हाददायी वाटतो.

(२) लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.

उत्तर - लेखकाच्या पत्नीने पाठवलेल्या पत्रावर तिच्या सुकलेल्या आसवांचे डाग असायचे. त्याशिवाय लिहिलेले असे काहीच नसे. पण त्या आसवांच्या सुकलेल्या डागांतून तिच्या सर्व भावना व्यक्त व्हायच्या. ते पत्र लेखक बराच वेळ वाचत असे. म्हणून लेखकाने आपल्या पत्नीच्या पत्राला बोलके पत्र म्हटले आहे.

(३) गावाकडे जाताना रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते. उत्तर- गावाला कधी पोचतो आणि एकदाचे आईला पाहतो असे लेखकाचे

झाले. त्यांचे मन आईला भेटायला अधीर झाले होते. ते कसेबसे सामानाचा पसारा आवरून गावाच्या वाटेला लागले. पण प्रवास आठदहा दिवसांचा होता. वेळ सरता सरत नव्हता. म्हणून रस्ता कटता कटत नव्हता असे लेखकाला वाटते.

(४) पण

थोडा

उशीर झाला...

असे लेखकाने म्हटले आहे.

उत्तर- लेखक अतिशय अधीर मनाने आणि लगबगीने आईला भेटायला घरी आले. पण ते घरी पोचण्यापूर्वीच आई मरण पावली होती. म्हणून मी तिला भेटायला आलो होतो; पण थोडा उशीर झाला... असे लेखकाने म्हटले आहे. प्रश्न ३ पोस्टातील पत्राचा प्रवास कसा होतो ते माहीत करून घ्या.

उत्तर - आपण ज्याला पत्र पाठवतो त्याचा पत्ता लिहून पत्र पोस्टाच्या पेटीत टाकतो. विशिष्ट वेळी त्या पेटीतील सर्व पत्र उचलून पोस्टाच्या पिशवीत भरतात. ती पिशवी पोस्ट ऑफिसात नेतात. तेथे जिल्ह्याप्रमाणे व गावाप्रमाणे वर्गवारी करतात. प्रत्येक पत्रावर तारखेचा ठसा उमटवतात. नंतर विमान, रेल्वे,

बस यांच्या‌द्वारे ही पत्रे त्या त्या गावच्या पोस्ट ऑफिसात पोचतात. त्यावरील पत्त्यानुरूप पोस्टमन पत्रांचे वाटप करतो. प्रश्न ४ - वसुंधरेचे व सैनिकाच्या मनाचे वर्णन करणारी तुम्हांला आवडलेली

वाक्ये पाठातून शोधून लिहा.

उत्तर (१) मी बजावत असलेल्या देशसेवेची तिला जाणीव होती..

(२) पण यापुढं माझी आई मला कधीच दिसणार नव्हती. मी तिला

भेटायला आलो होतो; पण थोडा उशीर झाला.

प्रश्न ५ - तुम्हांला एका सैनिकाची मुलाखत घ्यायची आहे, त्यासाठी प्रश्न तयार करा.

उत्तर - (१) तुम्ही सैनिकच व्हायचे का ठरवले? (२) तुमच्या कुटुंबियांकडून

विरोध झाला का ? (३) तुम्ही सैनिक असूनही तुम्हांला मुलगी दयायला तुमच्या सासरची माणसे कशी तयार झाली ? (४) आपण स्वतः संकटात

असूनही आपल्या सैनिक सहकाऱ्याचे प्राण तुम्ही वाचवले, तो प्रसंग सांगा. (५) रणांगणावर शत्रुपक्षाचा सैनिक तुमचा शत्रू असतो पण तो तुमच्या गोळीने घायाळ होतो तेव्हा तुम्हीच त्याला मदत करून माणुसकीने वागवता. अशी एखादी प्रत्यक्ष घडलेली घटना सांगा. (६) तुम्ही आमचे रक्षण करता. म्हणून संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आपल्या राज्यकर्त्यांनी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे ?

प्रश्न  - सैनिक जसे देशाचे रक्षण करतात, तसे

काय करावेसे वाटते

तुम्हांला आपल्या देशासाथी

उत्तर - मी डॉक्टर होणार आहे. पण ते पैसा मिळवण्यासाठी नव्हे तर देशाची सेवा करण्यासाठी. मी गरिबांनाही आरोग्यसंपन्न ठेवणार आहे. गरिबांना आरोग्यसेवा देणं हे माझं ध्येय आहे. या दृष्टीनं बाबा आमटे हे माझे आदर्श

आहेत. त्यांनी कृष्ठरोग्यांकरिता स्वतःच जीवन वेचलं. मला सामान्य माणसाच्या आरोग्याकरिता स्वतःचं जीवन वाहून घ्यावेसे वाटते.

प्रश्न ७ - कारगील ठिकाणचे विशेष वर्णन करणारे पाठात आलेले शब्द आकृतीत लिहा.

उत्तर-

कारगील

काश्मीर सरहद्दीवरील

दुर्गम प्रदेशातील

अतिशय थंड हवामान

तणावपूर्ण सीमा

• व्याकरण व भाषाभ्यास

खेळूया शब्दांशी

प्रश्न १ - 'मन' शब्द असलेले पाठातील वाक्प्रचार लिहा.

उत्तर - (१) मन उल्हासित करणे. (२) मन चंद्रमण्यासारखे पाझरणे. (३) मन ढसढसा रडणे. (४) मन सैरभर होणे. (५) मन हेलावणे. (६) मन आतुरणे.

प्रश्न २ - 'पाव्हणेरावळे' यासारखे तुम्हांला माहीत असलेले जोडशब्द लिहा. त्या जोडशब्दांचा वाक्यांत उपयोग करा.

उत्तर - (१) पीकपाणी यंदा पीकपाणी चांगले होईल असे वाटते. (२) पैसाअडका - ती विधवा असली तरी तिच्याजवळ पैसाअडका भरपूर आहे. (३) गंमतजंमत - सहलीत खूप गंमतजंमत येते. (४) काटेकुटे - या पायवाटेवर खूप काटेकुटे आहेत. (५) कपडेलत्ते आम्ही बहिणीच्या लग्नासाठी खूप कपडेलत्ते घेतले.

रचनात्मक मूल्यांकन

तोंडी काम

प्रकटवाचन

प्रश्न १ 'पण थोडा उशीर झाला' या पाठाचे प्रकटवाचन करा.

उत्तर- विद्यार्थ्यांनी पाठातील चित्रित केलेला भावविभोर करणारा प्रसंग न अडखळता स्पष्ट उच्चाराने बाचावा

ओळखा पाह

(१) हात आहेत; पण हालवत नाही.

उत्तर: स्क्रॅपर

(२) पाय आहेत; पण चालत नाही.

उत्तर स्टूल

उत्तर -

(३) दात आहेत; पण चावत नाहीत.

कंगवा

(४) नाक आहे; पण श्वास घेत नाही.

उत्तरः सुई

(५) केस आहेत; पण कधी विंचरत नाही.

उत्तर नारळाची शेंडी



Post a Comment

0 Comments