५ बाकी वीस रुपयांचं काय ? बाबाराव मुसळे
प्रश्न १ तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
(१) साहेबांनी विकासकडे राजूबाबत कोणती तक्रार केली ?
उत्तर - विकास सर, कालच्या त्या मुलानं मला ऐंशी रुपयांनी फसवलं. शंभराची नोट घेऊन गेला. एकदा गेला तो गेलाच. त्याची पाण्याची बाटली मला शंभर रुपयात पडली. हे सारं तुमच्यामुळं घडलं. साहेबांनी विकासकडे राजूबाबत अशी तक्रार केली.
२) दवाखान्यात राजूला पाहून विकासची उत्सुकता का वाढली ?
( उत्तर - राजूच्या गळ्यात एक पाटी अडकवलेली होती. त्यावर त्याने 'उरलेले अन्न' देण्याचे आवाहन केले होते. त्याच्या हातात एक पिशवी होती. ती पाहन त्यात काही अन्न असावे असे वाटत होते. म्हणून दवाखान्यात राजूला
पाहून विकासची उत्सुकता वाढली. (३) दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या काय लक्षात आले ?
उत्तर - दवाखान्यामध्ये फिरताना राजूच्या लक्षात आले, की पेशंटसोबत
आलेले अनेक गोरगरीब भुकेने व्याकूळ असतात. ते इथे पैशासाठी, अन्नासाठी
दुसऱ्यांसमोर हात पसरतात. आणि दुसरीकडे मात्र बरेच लोक जेवून शिल्लक
राहिलेले अन्न कचराकुंडीत फेकून देता. (४) भुकेलेल्यांसाठी राजूने कोणता उपक्रम सुरू केला ?
उत्तर - राजूने एक पुठ्ठा घेतला. त्यावर लिहिले, 'उरलेलं अन्न फेकू नका, मले दया. मी ते उपाशी लोकायले देतो. राजूने पुठ्ठ्याला दोरी बांधून ती गळ्यात अडकवली. राजूच्या गळ्यातली पाटी वाचून लोक राहिलेले अन्न त्याला देऊ लागले. ते जमा झालेले अन्न तो गरजूंना दयायचा. भुकेलेल्यांसाठी राजूने हा उपक्रम सुरू केला.
५) साहेबांचा राजूबद्दल गैरसमज कसा दूर झाला ?
( उत्तर - एक मुलगा साहेबांच्या कार्यालयात आला. परवानगी मागून आत शिरला आणि म्हणाला, 'सर, मी इरफान, राजूचा मित्र. ही शंभरची नोट त्यानं मला तुम्हाला यायला सांगितली आहे. कारण तो गावाला गेला आहे.' इरफानने
ती नोट साहेबांना दिली. यामुळे साहेबांचा राजूबद्दलचा गैरसमज दूर झाला. प्रश्न २ - तुमच्या मनाने उत्तरे लिहा.
(१) 'कोणाच्या वस्तूला हात लावू नको, असे आईने राजूला का सांगितले असेल ?
उत्तर - कोणाच्या वस्तूला हात लावण्याने ती वस्तू आपल्याजवळ ठेवायची
इच्छा निर्माण होते. त्यातून चोरीची वृत्ती निर्माण होते. म्हणून 'कोणाच्या वस्तूला हात लावू नको' असे राजूच्या आईने सांगितले असेल.
(२) 'माणसं ओळखण्यातला तुमचा अधिकार मोठा आहे', असे साहेब
विकासला का म्हणाले असतील ?
उत्तर - विकासने राजूवर विश्वास ठेवला होता. उलट, ही गरीब दिसणारी मुलं महाबिलंदर असतात असे साहेबाला वाटत होते. राजूने पैसे परत केले नाहीत. यावरून आपण माणसं बरोबर ओळखतो असे त्यांना वाटले. पण इरफानच्या हातून राजूने पैसे परत पाठवले तेव्हा विकासने राजूवर विश्वास ठेवला हेच योग्य होते व आपलेच चुकले असे त्यांना वाटले. म्हणून 'माणसं ओळखण्यातली तुमचा अधिकार मोठा आहे." असे ते विकासला म्हणाले असतील.
(३) भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे, म्हणून आणखी काय काय करता येईल?
उत्तर - भुकेलेल्या लोकांना अन्न मिळावे म्हणून एक 'अन्न-समिती निर्माण करता येईल. त्यातील काही सदस्य लग्नसमारंभात जातील. जेवणे उरकल्यावर ते अन्न मिळवता येईल. वाढदिवसांना किंवा महाप्रसादाला जाऊनही हे कार्य करता येईल.
(४) तुम्हांला राजूशी मैत्री करायला आवडेल का ? का ते सांगा.
उत्तर - मला राजूशी मैत्री करायला आवडेल कारण मलाही त्याच्यासारखे
काहीतरी करावेसे वाटते. पण लोक काय म्हणतील याची भीती वाटते. त्याच्या
मैत्रीमुळे मला ही भीती वाटणार नाहीं आणि काहीतरी करना बेईल. (५) राहिलेल्या वीस रुपयांचे विकासाच्या साहेबांनी काय करावे असे तुम्हांला वाटते ?
उत्तर- राजू जसा प्रामाणिक तसाच इरफानाह
मधल्यामधे पैसे हडप केले नाही. यामुळे त्यांच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून विकासच्या साहेबांनी राहिलेले वीस रुपये इरफानला बक्षीस दयावे असे मला वाटते.
(६) राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगांतून दिसून यतो?
उत्तर - दवाखान्यातील पेशंटच्या नातेवाइकांना बाहेरून काही आणून ट्यायचे असेल, तर राजू पळत जाऊन आणून दयायचा. एखादया पेशंटचा जवळचा नातेवाईक कुठे बाहेर जाणार असला, तर तो 'राजू ध्यान दे माझ्या पेशंटकडे, मी जरा जाऊन येतो' म्हणून बिनधास्त निघून जायचा. राजूने विकासच्या साहेबांचे पैसे प्रामाणिकपणे परत केले. या सर्व प्रसंगांतून राजूचा प्रामाणिकपणा दिसून येतो.
प्रश्न ३ - तुम्हांला राजूची आई भेटल्यास तुम्ही राजूबद्दल तिच्याजवळ काय बोलाल ते लिहा.
उत्तर - आम्हांला राजूची आई भेटली तर आम्ही तिला सांगू की राजू खूप छान मुलगा आहे. आम्हाला तो खूप आवडतो. आपल्या प्रेमळ आणि सहृदय स्वभावामुळे तो आम्हा सर्वांचा लाडका बनला आहे. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. दवाखान्यातले सर्व लोक त्याचे भारी कौतुक करतात. तो आमचा खरा मित्र आहे.
प्रश्न ४ - एखाद्या गरजू विद्यार्थ्याला तुम्ही कशाप्रकारे मदत कराल ?
उत्तर - एखाद्या गरजू विद्यार्थ्याला आम्ही आलटून पालटून पुस्तके पुरवू. म्हणजे आम्ही इतिहासाचे पुस्तक वाचायचे ठरवल्यास त्याला भूगोलाचे पुस्तक वाचायला देऊ. आम्ही गणिते सोडवत असताना त्याला इंग्रजीचे किंवा विज्ञानाचे पुस्तक देऊ. त्याला पेनसुद्धा देता येईल आणि आईच्या परवानगीने त्याला आठवड्यातून एक दिवस जेवायलाही बोलावता येईल. गरजू विद्यार्थ्याला प्र आम्ही अशा प्रकारे मदत करू.
प्रश्न ५ - पाठात तुम्हांला राजूचे कोणते गुण दिसले ते खालील चौकटीत लिहा त्या शब्दांचा वापर करून राजूविषयी आठ-दहा ओळीत माहिती
राजू आज्ञाधारक होता. आईने सांगितल्याप्रमाणे तो दवाखान्यात तिथल्या तिथेच फिरायचा. राजू सहृदय होता. दवाखान्यात पेशंटसोबत आलेले अनेक लोक भुकेलेले आहेत असे पाहून त्याच्या मनात करुणा निर्माण झाली. तो विश्वासू होता. पेशंटच्या नातेवाइकांना बाहेरून काही आणायचे असेल तर ते आणायला राजूला सांगत असत. राजू कष्टाळू होता. कोणाचेही काम करायचा तो तो कंटाळा करीत नसे. राजू कल्पक होता. भुकेलेल्यांना अन्न कसे मिळेल याचा बाहे विचार करून, 'उरलेले अन्न फेकू नका, मले दया.' अशी पाटी गळ्यात अडकवली व अन्न मिळवले. राजू प्रामाणिक होता. तो गावाला गेला तरी त्याने आपल्या मित्राच्या हातून साहेबांचे पैसे परत पाठवले.
व्याकरण व भाषाभ्यास
खेळूया शब्दांशी
पर प्रश्न १ - फसवाफसवी, कचराकुंडी, गोरगरीब यांसारखे तुम्हांत्वा माहीत असलेले जोडशब्द लिहा.
उत्तर - केरकचरा, बनवाबनवी, चोरचिलटे, गरीबगुरीब, गरमागरमी.
मूल
प्रश्न २- खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिहा.
उत्तर (1) फाइल उदाहरण (2) केंद्र केंद्र (3) रुग्ण आजारी
विंग दालन (३) हॉटेल उपाहारगृह (४) कॅन्सर - कर्करोग
प्रश्न ३ पाठात आलेल्या पुढील शब्दांचा वाक्यांत उपयोग करा.
(१) महाबिलंदर (२) आवाहन (३) अनुभवशून्य (४) निरुत्तर
उत्तर - (१) आजकालचे बिल्डर महाबिलंदर असतात.
(२)पंतप्रधानांनी स्वच्छतेचे आवाहन केले.
(३) बालक अनुभवशून्य असते.
(४) निर्दोष माणसालाही निरुत्तर करण्यात वकील पटाईत असतात.
प्रश्न ४ - 'भारी कौतुक' म्हणजे 'खूप कौतुक', 'भारी' हा शब्द तुम्ही केव्हा केव्हा वापरता ? हा शब्द वापरून तीन-चार वाक्ये लिहा.
उत्तर - (१) आईने रमेशचे भारी लाड केले.
(२) त्रिविधा भारी खट्याळ आहे.
(३) लहानगा अनुज भारी खोडकर आहे.
(४) मला बेइमान मित्रांचा भारी राग येतो.
प्रश्न ५ - 'पैसा' या शब्दाचे सामान्यरूप समजून घ्या. उदा. पैसा-पैशाला, पैशाने, पैशांसाठी, पैशांचा, पैशांहून, पैशातला. याप्रमाणे खालील शब्दांची सामान्यरूपे लिहा. (१) मासा (२) ससा (३) ठसा
उत्तर (१) मासा - माशाला, माशाने, माशांसाठी, माशांचा, माशांहून, माशातल
(२) ससा सशाला, सशाने, सशांसाठी, सशांचा, सशांहून, सशातला
(३) ठसा ठशाला, ठशाने, ठशांसाठी, ठशांहून, ठशातल
प्रश्न ६ - खालील शब्दांना की, ई, ता, वा, पणा, आई हे प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करा.
(१) सुंदर (२) प्रामाणिक (३) नवल (४) गोड (५) दांडगा
(६) शांत (७) पाटील (८) चपळ
उत्तर (१) सुंदरता (२) प्रामाणिकपणा (३) नवलाई (४) गोडवा
(५) दांडगाई (६) शांती (७) पाटीलकी (८) चपळाई
प्रश्न ७ - खालील भाववाचक शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
उत्तर (१) मित्रत्व × शत्रुत्व (२) गरिबी X श्रीमंती
(३) खरेपणा X खोटेपणा (४) महागाई X स्वस्ताई
प्रश्न ८ खाली दिलेल्या शब्दांसारखे अन्य शब्द लिहा.
उत्तर- (१) मनुष्यत्व माणुसकी (२) आपुलकी - आपलेपणा
३) नम्रता नम्रपणा (४) नवलाई नवल (५) बालपण ( बाल्य
(6) मधुर्या - गोडपणा
आपण समजून घेऊया
सर्वनाम
खाली दिलेल्या वाक्यांत अधोरेखित नामांच्या जागेवर योग्य सर्वनामे लिहा व वाचा.
समीरा गुणी मुलगी आहे. समीरा नेहमी हसतमुख असते. समीराला गोष्टी सांगायला आवडतात. समीराच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. समीराने खो-खो खेळात बक्षीस मिळवले आहे.
उत्तर - समीरा गुणी मुलगी आहे. ती नेहमी हसतमुख असते. तिला गोष्टी सांगायला आवडतात. तिच्या गोष्टी सगळे मन लावून ऐकतात. तिने खो-खो खेळात बक्षीस मिळवले आहे.
सर्वनामाचे मुख्य चार प्रकार आहेत.
. (१) पुल्लिंगी सर्वनाम (२) सापेक्ष सर्वनाम (३) प्रश्नार्थक सर्वनाम
(4) प्रेक्षक सर्वनाम
खालील संवाद वाचा. अधोरेखित केलेली सर्वनामे पाहा.
रसिका दादा, तू मला बाजारात नेशील का ?
दादा : तुला बाजारात कशाला जायचे आहे ?
रसिका : मला रंगपेटी आणायची आहे.
दादा आई आणि आत्याबरोबर जा.
रसिका : त्या लग्नाला जाणार आहेत.
दादा : मग ताईला घेऊन जा.
रसिका : ती मैत्रिणीकडे गेली आहे.
दादा : अगं, मी नाही येऊ शकत. आता माझे मित्र येतील. आम्हांला प्रकल्प करायचा आहे. ते येणार आहेत, म्हटल्यावर त्यांना सोडून कसा येऊ?
रसिका : ठीक आहे. बाबा म्हणाले आहेत, दादाला विचार. तो नाही आला, तर आपण जाऊ
वरील संवादात तू, मला, तुला, त्या, ती, मी, माझे, आम्हांला, ते, त्यांना. तो, आपण ही सर्वनामे आली आहेत. ही सर्व पुरुषवाचक सर्वनामे आहेत.
खालील आकृतीचे निरीक्षण करा.
प्रथम व्यक्ती सर्वनाम (स्वतःबद्दल बोलणे
मी आम्ही स्वतः
द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे (ज्याच्याशी बोलतो
तू तुम्ही आपण
प्रश्न २ - खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार दोन परिच्छेद कर उताऱ्याला योग्य शीर्षक दया.
(टीप : पा. पु. पू. क्र. २० वरील उतारा पाहावा.) उत्तर- दमयंतीचे खेळणे समजा दमयंती जेवत असेल अन् तिला
कोणीतरी म्हणाले, 'खेळायला येतेस का?' तर दमयंती जेवण अर्धवट सोड खेळायला पळेल. एवढा खेळ तिला जीव की प्राण. मग तो कोणताही खेळ असो, मैदानी असो वा बैठा खेळ असो. दमयंती त्यात तल्लीन होऊन जाने असा एकही खेळ नाही जो तिला आवडत नाही. बैठ्या खेळात ती जेवढी तरबे तेवढीच मैदानी खेळातही. सागरगोटे, चल्लसआठ, काचापाणी, पत्त्याती सावकार-भिकार अशा खेळांत जिंकणे म्हणजे तिच्या डाव्या हातचा मळ मैदानी खेळ खेळताना कधी कधी ती एवढी हमरीतुमरीवर येते, की जणू आन तिचे पुढच्या खेळाडूबरोबर कडाक्याचे भांडण होईल; पण एकदा का खंड संपला, की प्रतिस्पर्ध्याच्या हातात हात घालून चाललेली दिसणार हे नक्की. व्यायामाचे महत्त्व - दमयंती म्हणते, 'खेळामुळे शरीराचा व्यायाम होत मन ताजेतवाने होते. हाता-पायांचे स्नायू बळकट होतात. हृदय व फुप्फुसांचे कार्यक्षमता वाढते. आपल्याला दिवसभराच्या कामाने आलेला थकवा, मरगड जाऊन आपल्यात नवा जोश, उत्साह निर्माण होतो. कबड्डी, खो-खो, लंगडी डॉजबॉल यांसारख्या मैदानी खेळांमुळे स्वतःवर येणाऱ्या संकटांशी सामना करण्याच ताकद आपल्यांत निर्माण होते. प्रत्येकाने रोज थोडे का होईना पण खेळलेच पाहिजे. तुम्हांला निरोगी राहायचे असेल, तर योग्य आहाराबरोबर योग्य व्यावः असायला हवा अन् खेळांतून शरीर व मनाला मिळणारा व्यायाम सर्वांगसुंद व्यायाम असतो, नाही का ?
0 Comments