७
आपले परमविर
प्रश्न १ - दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
(१) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ सावध का होते ?
उत्तर- १४ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूची सहा सेबर जेट विमाने श्रीनगर हवाई क्षेत्राकडे हल्ला करण्यासाठी झेपावली. म्हणून तेथे नियुक्तीवर असणारे फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ सावध होते.
(२) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखांना उड्डाण करण्यात कोणती अडचण होती ?
उत्तर - १४ डिसेंबर १९७१ रोजी शत्रूनी श्रीनगर हवाईक्षेत्राकडे हल्ला केला होता. तेथे नियुक्त असणाऱ्या फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ सावध होते, पण धावपट्टीवर अचानक उडालेल्या धुराळ्यामुळे निर्मलजीत यांना धावपट्टी दिसत नव्हती. प्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँना उड्डाण करण्यात ही अडचण होती.
(३) निर्मलजीत सेखाँनी निकराची लढाई चालू का ठेवली ?
उत्तर - निर्मलजीत सेखाँना श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्र वाचवायचे होते. शत्रूची विमाने माथ्यावर घोंगावत होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही निर्मलजीत सेखाँ प्राणाची पर्वा न करता हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने करीत होते. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असतानाही त्यांनी निकराची लढाई चालू ठेवली.
(४) निर्मलजीत सेखौनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव कसा केला ?
उत्तर - फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत यांनी शत्रूच्या दोन सेबरजेट विमानांचा अचूक वेध घेतला. शत्रू संख्येने जास्त असूनही निर्मलजीतांच्या या धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. अशा रीतीने निर्मलजीत सेखाँनी श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्राचा बचाव केला.
(५) दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी कोणता त्याग केला ?
उत्तर - दधीची ऋषींनी लोकांच्या कल्याणासाठी स्वतःच आपल्या प्राणांची आहुती दिली आणि अस्थींचे दानं दिले. केवळ यामुळे जगातले सगळे पाणी पळवून नेणाऱ्या राक्षसाचे निर्दालन झाले.
प्रश्न २ - फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ हे शत्रूशी धैर्याने लढले. त्याचे पाच सहा वाक्यांत वर्णन करा.
उत्तर - शत्रूची सेबर जेट विमाने माथ्यावर, अगदी खालून घोंगावू लागली होती. गोळ्यांच्या फैरी झाडत होती. तरीही प्राणाची पर्वा न करता फ्लाईंग ऑफिसर सेखाँचे नॅट विमान क्षणार्धात वर झेपावले. त्यांनी हल्लेखोर सेबर जेट विमानांचा प्रतिकार जोमाने सुरू केला. पाहता पाहता दोन विमानांचा त्यांनी अचूक वेध घेतला. जमिनीपासून फार थोड्या उंचीवर शत्रूच्या अधिक शक्तिशाली विमानांनी वेढले असताना निकराची लढाई त्यांनी चालूच ठेवली. शत्रू संख्येने जास्त असूनही त्यांच्या यो धाडसी हल्ल्याला पाठ दाखवून पळून गेले. त्यामुळे श्रीनगर शहर आणि हवाईक्षेत्र बचावले.
प्रश्न ३ - परमवीरचक्रधारकांची माहिती वाचून आपल्याला कोणती प्रेरणा व स्फूर्ती मिळते ?
उत्तर - आपण केवळ स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी जगलो पाहिजे. यात आपल्याला मृत्यू आला तरी ते आपले भाग्य होय. देशासाठी कोणत्याही संकटाला आपण निर्भयपणे सामोरे गेलो पाहिजे. परमवीरधारकांची माहिती वाचून आपल्याला ही प्रेरणा व स्फूर्ती मिळते.
प्रश्न ४ - आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात तुम्हांला कोणते साम्य आढळते ?
उत्तर - दधीची ऋषींनी लोककल्याणासाठी स्वतःचे बलिदान दिले. दधीची ऋषींच्या अस्थींमुळे इंद्रवज्राला सामर्थ्य मिळाले. तसेच त्या परमवीरांकडून, त्यांच्या शौर्यातून, त्यांच्या अत्युच्च अशा बलिदानातून भारतीय सेनेला अमोघ सामर्थ्य मिळते. आपले परमवीर व दधीची ऋषी यांच्यात आम्हाला हे साम्य आढळते.
प्रश्न ५ परमवीर चक्राची माहिती खालील मुद्द्यांनुसार लिहा.
परमवीरचक्र
धातू
कापडी पट्टीचा रंग
↓
पदकाची दर्शनी बाजू
↑
पदकाची मागची बाजू
पदकावरील कोरलेले शब्द
भाषा
फूल
उत्तर धातू - कांस्य, कापडी पट्टीचा रंग गडद जांभळा पदकाची दर्शनी बाजू मधोमध भारताचे राष्ट्रीय बोधचिन्ह पदकाची मागची बाजू - परमवीरचक्र हे शब्द गोलाकार कोरलेले. पदकावरील कोरलेले शब्द - परमवीरचक्र
भाषा - इंग्रजी व हिंदी, पुष्प- दोन कमलपुष्पे
प्रश्न ६ - परमवीर चक्र पदकाचे डिझाईन तयार करणाऱ्या सावित्रीबाई खानोलकर
यांची सहा-सात वाक्यांत माहिती लिहा.
उत्तर - सावित्रीबाई खानोलकर या मूळच्या युरोपियन; परंतु भारतीय सेनेतील एक अधिकारी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह करून त्या भारतात आल्या. या देशावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. त्यांनी भारतीय नागरिकत्व घेतले. शिवाय भारतातील कला, परंपरांचाही खूप अभ्यास केला. मराठी, संस्कृत, हिंदी या भाषा त्या अस्खलितपणे बोलत असत.
खेळूया शब्दांशी
प्रश्न १ - खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
(१) घोंगावणे (२) झेपावणे (३) वेध घेणे (४) वेढणे (५) बचावणे
(६) सामोरे जाणे.
उत्तर (१) घोंगावणे - घाणीजवळ माशा घोंगावतात.
(२) झेपावणे - मला पाहताच इवलीशी त्रिविधा माझ्याकडे झेपावली.
(३) वेध घेणे - रडार यंत्र विमानांचा अचूक वेध घेते. (४) वेढणे - पुरामुळे नदीने संपूर्ण गाव वेढले होते.
(५) बचावणे - मी पटकन बाजूला झालो म्हणून ट्रकच्या अपघातातून बचावलो. (६) सामोरे जाणे - कोणत्याही संकटाला सामोरे जाणे हा शिवाजीमहाराजांचा
स्वभाव होता.
प्रश्न २ - समानार्थी शब्द लिहा.
(१) सावध
(२) लढाई
(3) थेट
(४) शत्रू
उत्तर -
(१) सावध
दक्ष, हशार
(२) लढाई - युद्ध
(३) प्रत्यक्ष डोळ्यांदेखत
(४) शत्रू - वैरी
(१) जो लवकर उठतो तो निरोगी राहतो.
(२) जिला तालबद्ध उड्या मारता येतात, तिला लेझीम संघात सहभाग घेता येईल.
वरील वाक्यांतील जो तो जिला तिला ही संबंधी सर्वनामे आहेत.
खालील वाक्यांतील संबंधी सर्वनामे अधोरेखित करा..
(१) ज्यांनी बचत केली, त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले.
(२) ज्याला खुंटावरचा खो खो खेळता येतो, त्याला गोल खो खो खेळता येतोच.
(३) जे दुसऱ्याला मदत करतात. ते लोकप्रिय होतात.
उत्तर - (१) ज्यांनी बचत केली, त्यांनी आपले भविष्य सुरक्षित केले.
(२) ज्याला खुटावरचा खो खो खेळता येतो, त्याला गोल खो खो खेळता
येतोच.
(३) जे दुसऱ्याला मदत करतात. ते लोकप्रिय होतात.
खालील वाक्ये वाचा. अधोरेखित केलेली सर्वनामे पाहा.
(१) हा मुलांचा संघ कोणाचा ?
(२) ही फुलांची माळ सुहासने बनवली.
(३) हे क्रिकेटचे मैदान खूप मोठे आहे.
(४) तो यशवंतरावांचा मुलगा आहे.
(५) ती माझी मैत्रीण आहे.
(६) ते सर्व खेळाडू आहेत.
(७) तिला कोणी मदत केली ?
(८) तुला खायला काय बनवू ?
(९) हा रूमाल कोणाचा आहे ?
दर्शक सर्वनामे वरील पहिल्या सहा वाक्यातील हा, ही, हे, तो, ती, ते ही सर्वनामे दर्शक सर्वनामे आहेत. हा, ही, हे या शब्दांनी जवळची आणि तो, ती, ते या शब्दांनी दूरची वस्तू, पदार्थ किंवा प्राणी दाखवला जातो.
प्रश्नार्थक सर्वनामे वरील ७,८ व ९ या वाक्यांतील कोणी, काय, कोणाला ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. या प्रश्नार्थक सर्वनामाचे वाक्य प्रश्नार्थक वाक्य असते. या प्रश्नार्थक सर्वनामाच्या आधारे प्रश्न विचारता येतो
'आपले परमवीर' या पाठाचे प्रकटवाचन करा.
प्रश्न १ उत्तर - विद्यार्थ्यांनी या उताऱ्याचे स्पष्ट उच्चारात न अडखळता वाचन करावे.
प्रश्न १ - परमवीर चक्र मिळालेल्या २१ महान परमवीरांच्या नावांचा तक्ता
करा. वर्गात लावा.
परमवीर चक्र मिळालेल्या २१ परमवीरांची नावे -
(१) मेजर सोमनाथ शर्मा (२) लान्सनाईक करम सिंग (३) सेकंड लेफ्टनंट राम राघोबा राणे (४) नाईक जदुनाथ सिंग (५) कंपनी हवालदार मेजर पीरू (६) कॅप्टन गुरूबचन सिंग सलारिया (७) मेजर धन सिंग थापा (८) सुभेदार जोगिंदर सिंग (९) मेजर शैतान सिंग (१०) कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद (११) लेफ्टनंट कर्नल अर्देशीर बुरसोरजी तारापोर (१२) लान्स नाईक अल्बर्ट एक्का (१३) सेकंड लेफ्टनंट अरूण क्षेत्रपाल (१४) मेजर होशियार सिंग (१५) नायब सुभेदार बाना सिंग (१६) मेजर रामस्वामी परमेश्वरन् (१७) लेफ्टनंट मनोज कुमार पांडे (१८) ग्रेनेडियर योगेन्द्र सिंग यादव (१९) रायफल मॅन संजय कुमार (२०) कॅप्टन विक्रम बत्रा (२१) फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सेखाँ
प्रश्न १- परमवीर चक्राचे चित्र काढा, रंगवा
प्रकल्प
आंतरजालावरून आपल्या परमवीरांची चित्रे मिळवा. चित्र, नाव व पाच-सहा वाक्यांत त्यांची माहिती या पद्धतीने चिकटवही बनवा.
*मेजर सोमनाथ शर्मा
मेजर सोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ मध्ये एका ब्राम्हण परिवारात दाध, कांगरा हिमाचल प्रदेशात झाला. ते मिल्ट्री कुटुंबातील होते. त्यांचे वडील मेजर जनरल अमरनाथ शर्मा हे आर्मी मध्ये होते. त्यांचे बंधू लेफ्टनंट जनरल सुरेंद्रनाथ शर्मा हे इंजिनिअर होते. त्यांची बहीण मेजर कमला तिवारी ही डिफेन्स फोर्सला डॉक्टर होती. ते प्रिन्स ऑफ वॉलेस रॉयल मिल्ट्री कॉलेज देहरादून मध्ये गेले. ते दुसऱ्या महायुद्धात अराकन ऑरेशन मध्ये सहभागी होते.
(टीप - उदाहरणासाठी एका परमवीराची माहिती दिली आहे. उर्वरीत परमवीरांची माहिती विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने स्वतः मिळवावी.)
0 Comments