माय
- स. ग. पाचपोळ
प्रश्न १ - चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा.
(१) कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे ?
उत्तर - कवितेतील कष्टकरी आई फनकाट्या वेचायला रानात जाते. त्यावेळी तिच्या पायात वहाणही नसते. अनवाणी पायानेच ती रानात हिंडत असते. तिचा पाय विंचू व काट्यालाही मोजत नाही, जुमानत नाही. कवितेतील कष्टकरी आईची अवस्था अशी आहे.
• (२) कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे ?
उत्तर - कवी सुट्टीत घरी आल्यावर आई उसनंपासनं आणून कवीला नानापरीचे पदार्थ करून खाऊ घालत असे. ती त्याला म्हणत असे की पोटभर खा. खाताना घाई करू नकोस. कवी सुट्टीत घरी आल्यावर आई हे सर्व करीत असे.
(३) कवीच्या आईचे डोळे का भरून येतात ?
उत्तर - कवीच्या वडिलांना वाटत असते की, कवीने आता शिक्षण सोडून ट्यावे आणि शेतकामाला लागावे. तेव्हा त्यांना कवीची आई म्हणते की, असे भलतेसलते सांगून त्याचे कान भरू नका. तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे. असे बोलता बोलता कवीच्या आईचे डोळे भरून येतात
(४) आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला का वाटते ? उत्तर - आई कवीला म्हणते की, तुझे लग्न कधी होते आणि कधी एकदा
मी तुझ्या राणीला पाहते असे मला झाले आहे. तुमच्या दुधावरची साय पाहायला म्हणजे तुमच्या बाळाला माझ्या डोळ्यांनी पाहायला माझे मन आतूर झाले आहे. हे बोलताना तिच्या डोळ्यात पाणी आले. आईच्या अशा उत्कट आणि आत्यंतिक प्रेमाचा कवीला अनुभव आला. म्हणून आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा, असे कवीला वाटते.
(५) आईसाठी कवीला काय करावेसे वाटते ?
उत्तर - आईची सुखानं ओटी भरावी. तिच्या पोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा. आणि तिचे पाय घट्ट धरून ठेवावे. हे सर्व आईसाठी कवीला करावेसे वाटते
प्रश्न २- कोण, कोणास व् का म्हणाले ?
(१) करू नको घाई म्हणे पोटभर खाय.
उत्तर- आई कवीला म्हणाली.
कारण गावावरून आलेल्या मुलाने चांगले पोटभर जेवावे म्हणून ती उसनेपासने आणून नानापरी जेवण तयार करीत असे.
(२) बस झालं शिक्शन याचं घेऊ दे हाती रूमनं
उत्तर - कवीचे वडील कवीच्या आईला म्हणाले. कारण शिक्षण घेऊनही आपला मुलगा मोठा साहेब होणार नाही, असे त्यांना वाटत होते.
(३) या डोयानं पाहीन रे मी दुधावरची साय.
उत्तर - आई कवीला म्हणाली.
कारण कवीचे लग्न व्हावे आणि त्याचे मूल आपण आपल्या डोळ्यांनी पाहावे, अशी तिची इच्छा होती.
(४) अन् ठेवावे माय घट्ट धरून तुझे पाय.
उत्तर- कवी स्वतःशीच म्हणाला
कारण त्याला आईच्या आपल्यावरील आत्यंतिक प्रेमाची प्रचीती आली होती.
प्रश्न ३ - कविता वाचताना तुम्हांला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा.
उत्तर - आई रानातल्या फनकाट्या वेचायला रानावनात अनवाणी जाते,
गावावरून आलेल्या कवीला उसनंपासनं आणून नानापरी जेवण तयार करून त्याला पोटभर खाण्याचा आग्रह करते. त्याने शिक्षण सोडावे व शेतकामावर जावे असा त्यांच्या वडिलांचा विचार ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी येते. कवीचे लग्न व्हावे आणि त्याचे मूल आपल्या डोळ्यांनी पाहावे अशी आपली इच्छा ती कवीजवळ बोलून दाखवते. कविता वाचताना आम्हाला हे प्रसंग अस्वस्थ करतात.
प्रश्न ४ - या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा. तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या.
उत्तर- आई, तुझ्याच पोटी मी पुन्हा जन्म घ्यावा !
जेव्हा गाय हंबरते आणि वासराला वाटते तेव्हा मला तिच्यात माझी आई दिसते. फनकाटे वेचायला माझी आई रानावनात जाते. तेव्हा तिच्या पायात साध्या वहाणाही नसतात. अनवाणी पायानेच ती रानात हिंडते. तिचे पाय काट्याकुट्यांनाही जुमानत नाही.
मी शिक्षणासाठी परगावी असतो. सुट्टीत जेव्हा मी घरी येतो तेव्हा आईला
एवढा आनंद होतो की, ती शेजारपाजाऱ्यांजवळून उसने आणून माझ्यासाठी नानाप्रकारचे जेवण तयार करते. मी ते पोटभर खावे म्हणून आग्रह करते आणि म्हणते, 'घाई करू नकोस. अगदी पोटभर खा.'
माझे वडील माझ्या आईच्या मागे सारखे टुमणे लावत असतात की, आता त्याचे शिक्षण घेणे पुरे झाले. त्याला आता शेतीच्या कामावर पाठवायला हवे. तो काही शिकल्यामुळे मोठा साहेब होणार नाही आहे. हे ऐकून आई अस्वस्थ होते.
ती वडिलांना म्हणते, 'असे भलतेसलते बोलून त्याचे कान भरू नका. तुम्हांला माझ्या गळ्याची शपथ आहे. हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले असतात.
ती माझ्याशी बोलता बोलना एक दिवस तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, 'मला तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे. तुझ्या राणीला बघायचं आहे. आणि तुझ्या दुधावरची साय म्हणजे तुला झालेलं मूल माझ्या डोळ्यांदेखत मला बघायच आहे.
आई ? तुझ्या या शब्दांनी मी भारावून गेलो. असं वाटते की तुझी ओटी आनंदानं भरावी आणि मी पुन्हा एकदा तुझ्याच पोटी पुनर्जन्म घ्यावा. तुझे पाय घट्ट धरून ठेवावे,
प्रश्न ५ - 'माझी आई' या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा.
उत्तर -
माझी आई
माझी आई प्रेमस्वरूप. वात्सल्यसिंधू आणि संस्कारांची पाठशाळा आहे. माझी आई अजूनही पहाटेला उठते. अंगणात सुरेख रांगोळी काढते. तिच्या रांगोळीमुळे मला चित्रकलेची आवड निर्माण झाली आहे. आम्ही गरीब आहोत. मीठभाकर गोड करून खात असतो. जेवताना हे चांगले न् ते वाईट असे बोलायची आम्हांला मुभा नाही. अन्न म्हणजे परब्रह्म हे आईने आमच्या पचनी पाडले आहे.
मी शिस्तप्रिय म्हणून सगळेजण माझा गौरव करतात. पण ही शिस्त माझ्यात आली कुठून ? लहानपणी मी आईच्या हातचे चांगले धपाटे खाल्ले, त्यातून मला ही शिस्त लागली. आम्हा मुलांच्या वागणुकीवर आणि अभ्यासावर तिची करडी नजर असते.
तिचा आमच्यावर असा दरारा असला तरी माझी आई प्रेमळपणाची आणि वात्सल्याची प्रत्यक्ष मूर्ती आहे. लहानपणी मी आजारी पडलो होतो. इतका की डॉक्टरांनीही आशा सोडून दिली होती. आई 'रात्रभर माझ्या उशाशी बसून राहायची,
मला धीर दयायची, देवाची प्रार्थना करायची, दिवसरात्र माझी शुश्रुषा करायची. अशी आहे माझी आहे. मी पुन्हा पुन्हा म्हणत असतो, 'आई थोर तुझे उपकार.
प्रश्न ६ - खालील शब्द पाहा.
वहाण चपला, वाहन प्रवासाचे साधन उच्चारात बरेच साम्य असलेले; पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या. लिहा. यांचे अर्थ समजून घ्या.
प्रश्न १ - खालील वाक्यांतील सर्वनामांना अधोरेखित करा.
(१) राधा म्हणाली, 'प्रशांत, तू किती छान गाणे गातोस.'
(२ ती माझी बहीण आहे.
(३) कोणी कोणाशी भांडू नये.
(४) ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे, त्याला मी घेऊन जाईन.
(५) मला कोणी काही विचारू नये.
(६) सदा माधवच्या बाबांना म्हणाला, 'हा मला त्रास देतो. त्याला मी समजावून सांगितले, पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो'.
उत्तर - (१) राधा म्हणाली, 'प्रशांत, तू किती छान गाणे गातोस.'
(२) ती माझी बहीण आहे.
(३) कोणी कोणाशी भांडू नये.
(४) ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे, त्याला मी घेऊन जाईन.
(५) मला कोणी काही विचारू नये.
(६) सदा माधवच्या बाबांना म्हणाला, 'हा मला त्रास देतो. त्याला मी समजावून सांगितले, पण तो त्याचेच म्हणणे खरे करत
प्रश्न २ - गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा.
(1) या मुलांवर दया. (हा. हाय, हात)
उत्तर - ह्या वह्या मुलांना दया.
(२) त्याला आवडते ? (काय, कोणते, कोणी)
उत्तर- त्याला काय आवडते ?
(包) आकाशकंदील बनवले. (तू, आम्ही, स्वतः)
उत्तर - आम्ही आकाशकंदील बनवले.
(४) मी स्वयंपाकघर स्वच्छ केले. (आपण, स्वतः, त्याने)
उत्तर - मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले.
(५) त्याने काही सांगितले नाही. (कोणाला, कोणी, काय
उत्तर - त्याने कोणाला काही सांगितले नाही.
प्रश्न ३ - खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहा
(१) आज पतंग उडवणार आहे.
उत्तर - तो आज पतंग उडवणार आहे.
(२)
पतंग छान उडवते.
उत्तर - ती पतंग छान उडवते.
(३) मैदानावर पतंग घेऊन गेलो.
उत्तर - मैदानावर मी पतंग घेऊन गेलो.
(२) पतंग उडवूया.
उत्तर - आपण पतंग उडवूया.
(५) पतंग उडवण्यात तरबेज आहेत.
उत्तर - पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत.
प्रश्न ४ - खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्ये लिहा.
(१) कोण - कोण हवंय तुला
(२) हे हे काय आहे ?
(३) ती ती गाणे छान गाते.
(४) काय पिशवीत काय आहे ?
(५) कोणाचा - कोणाचा मत्सर करणे चांगले नाही.
(६) ही - ही ऑफिसमध्ये काम करते.
रचनात्मक मूल्यांकन
तोंडी काम
* प्रकटवाचन
प्रश्न १ - 'माय' ही कविता तालासुराप्त म्हणा.
उत्तर - विद्यार्थ्यांनी ही कविता तालासुरात व अभिनयासह म्हणावी.
उपक्रम
'आई' या विषयावरील कवितांचा संग्रह करा.
दूरस्थ मातेस
पहाटे आता तुझे नृत्य घडते गुळगुळीत ती दृष्टी ज्याचे शगुन आहे मग तो जातो सुखाचा दिवस तुझ्या हाताला मिळत नाही गरिबीचे रुचकर जेवण, जे मूठभर मांस देते ते मलाही येते.
तो वेडा अभिमान आहे, भीती सुद्धा माझ्यामुळे उघडी आहे, पाठीवर म्हातारा हात फिरवतो, एकटाच ओरडतो
बाहेर चौकशी करणे, मोकळेपणाने बोलणे, पुस्तक वाचून झोपी जाणे- हे आठवून डोळे ओले होतात. मी, ये, मला घट्ट करण्यासाठी हृदय दे, चांगल्याच्या आत्म्याची सेवा करण्यासाठी, मला संपत्तीचा लोभ आहे; या वेळी तुझी आठवण येईल, हे आई, मी परमेश्वराची स्तुती घेईन, आणि मी माझा श्वास घेईन. आई, मी हजेरीला का जात नाही?
आई फक्त तुझ्यासाठी
आई तुझ्या कुशीत, पुन्हा यावेसे वाटते निर्दयीव या जगापासून, दुर जावेसे वाटते ।। कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ।। कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ।। कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ।। दगडातला तो देवही, आता नवसाविना पावेना निस्वार्थ हृदय माऊली. तुलाच पूजावेसे वाटते।। असेन जर मजला, मानव जन्म कधी आई तुझ्याच पोटी, पुन्हा जन्मावेसे वाटते ।।
0 Comments