ब) भक्ती पंथ आणि मध्ययुगीन संत
■ मोक्षप्राप्ती अथवा मुक्तीसाठी परमेश्वराची निष्ठापूर्वक केलेली आराधना म्हणजे 'भक्ती' होय.
■ भक्तीचा उदय वेदात, विकास महाकाव्य पुराणात तर उत्कर्ष भागवतात झाला.
■ भक्तिपंथ हा एकेश्वरवादी असून ज्ञान, कर्म अथवा भक्तीद्वारे मोक्ष प्राप्त करण्यावर भर असल्याने
यास 'एकांतिकधर्म' म्हणतात.
■ शंकराचार्यांनी भक्तिपंथाला सांस्कृतिक चळवळीचे रूप दिले.
भक्ति चळवळीच्या प्रसाराची कारणे
■ हिंदू समाजातील कर्मकांड
■ अंधश्रद्धा व जाती प्रथा
■ सामाजिक - धार्मिक अपप्रवृत्ती
■ संन्यासी जीवन जगणाऱ्यांनी समाजबांधवाची केलेली सेवा.
■ इस्लाम राजवट
■ इस्लामचा एकेश्वरवादाबद्दल आकर्षण
■ उपेक्षितांसाठीचे कार्य
■ भक्ति चळवळीला सुधारणावादाची जोड.
■ एक चळवळ म्हणून भक्तिपंथाचा इ.स ०६ व्या शतकात तामिळनाडूत उदय झाला.
■ दक्षिण भारतात हिंदू धर्माच्या शैव वैष्णव या दोन शाखात भक्ती चळवळ विकसित झाली.
■ शैवपंथाचे प्रतिपादन करणाऱ्यांना 'नायनार' तर वैष्णव पंथाचा पुरस्कार करणाऱ्यांना 'अलवार' म्हणतात.
शंकराचार्य I.S. ७८८-८२०
■ शंकराचार्यांनी अद्वैतावादाचा पुरस्कार केला.
■ सांस्कृतिक एकात्मका बळावण्यासाठी शंकराचार्यांनी मठ स्थापन केले.
भारतातील चार पीठ
■ पूर्वेला जगन्नाथ पुरी
■ पश्चिमेला द्वारका
■ उत्तरेला बद्रिनाथ
■ दक्षिणेला श्रृंगेरी
■ 'नायनार' या संज्ञेचा अर्थ नेता होय. एकूण ६३ नायनार झाले.
■ नायनार संतात सिरुकारेकल येथील एक संतस्त्री, आदनूरचा नंदन नावाचा अस्पृश्य संत, सिरुतोंडर हा लष्करी अधिकारी, अप्पार म्हणून ओळखला जाणारा तिरुना वुक्ररसु, ज्ञानसंबंदर, सुंदरमूर्ती यांचा समावेश होतो.
■ वैष्णव पंथाचे प्रतिनिधित्त्व १० आलवारांनी केले.
१० अलवार संत
पोयगयी, पुंडम, पे, तिरुमलीशाई, तिरुमंगाई, पेरियालवार, तिरुप्पन, तोंडरदीपोडी, कुलसेकरा, नम्मलवार.
■ आलवार म्हणजे 'परमेश्वराच्या गुणात डुंबणारे होय.
■ दक्षिण भारतात अलवार आणि आचार्य असे वैष्णव संतांचे दोन विभाग होते.
■ अलवार हे गुढवादी तर आचार्य हे तत्त्वज्ञानी होते.
■ १३ व १४ व्या शतकात तामिळनाडूत रामानुजांच्या अनुयायात व डंगलाई (उत्तरेकडील) तर तेंगलाई (दक्षिणेकडील) असे दोन पंथ निर्माण झाले होते.
रामानुज यांचा जन्म इ.स 1060-1118
■ भक्ति आंदोलनाचे जनक म्हणून रामानुजांना ओळखतात.
■ रामानुजांचे गुरू कांची येथील यादव प्रकाश होते.
■ वैष्णव पंथाचा पुरस्कार रामानुजांनी केला.
■ रामानुजांच्या दार्शनिक सिद्धांत 'विशिष्टाद्वैत' म्हणून ओळखतात.
शंकराचार्य - रामानुजमधील मतभेद
■ शंकरचार्यांना निर्मिती हा अभास वाटतो तर रामानुज निर्मिती परिवर्तनीय मानतात.
■ परमेश्वरात एकापेक्षा अधिक सत्य नाही असे शंकराचार्य मानतात तर रामानुज अचेतन व सचेतन या परमेश्वराकडील वस्तू मानतात.
रामानुज - वैशिष्ट्याद्वैत ?
रामानुजांच्या अद्वैतवादाला परमेश्वराच्या अंतर्गत असलेल्या दोन सत्यांचे वैशिष्ट्य आहे. (चित व अचित) त्यांच्या विचार प्रणालीचा वैशिष्ट्याद्वैत म्हणतात.
• निम्बार्क हे रामानुजांचे समकालीन होते. ■ श्रीकृष्ण भक्तीचा पुरस्कार निम्बार्कनी मथुरेजवळ
ब्रज येथे केला.
■ उत्तर भारतातील वैष्णव संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक- निम्बार्क होते.
माधवाचार्य (१२३८-१३१७)
■ माधवाचार्यांनी वैष्णव पंथावर एकूण ३७ पुस्तके लिहिली.
■ शंकराचार्य-रामानुज व माधवाचार्य हे वेदान्त दर्शनाचे मुख्य तीन दार्शनिक होत.
■ गोक्ष प्राप्तीसाठी परस्पर पूरक मार्ग म्हणून कर्म, ज्ञान द भक्तीचा पुरस्कार माधवाचार्यानी केला
■ माधवाचार्यांचा शिष्य जयतीर्थनी 'सुत्रभाष्य' वर समीक्षा लिहिली.
■ माधवाचार्य द्वैतवादाचे पुरस्कर्ते होते.
रामानंद I.S 1299-1411
■ उत्तर भारतातील भक्ती चळवळीचे प्रथम प्रसारक 'रामानंद' हे होत.
- रामानंदांनी राम-सीता भक्तीचा पुरस्कार केला. रामानंदांच्या शिष्यापैकी कबीर हे एक होत. रामानंदांनी भक्ती चळवळीचा पुरस्कार हिंदीत केला. रामानंद हे प्रथम उपदेशक होते ज्यांनी उपदेश हिंदीत केला.
कबीर आय.एस. 1425 - 1518
कबीर रामानंदाच्या शिष्यापैकी एक होते. कबीर विधवा ब्राह्मणीचे पुत्र होते. पालन-पोषण मुस्लिम विणकराने केले.
कबीरांनी पूजा-अर्चा, जपताप व कर्मकांडाचा निषेध केला.
■ कबीरचे उपदेश 'बीजक' मध्ये संग्रहीत आहेत.
वल्लभाचार्य I.S. १४७९-१५३१
■ वल्लभाचार्य तेलंग ब्राह्मण होते.
■ वल्लभाचार्यांनी वैष्णवपंथाचा पुरस्कार बनारस येथे केला
■ वल्लभाचार्यांनी ग्रह त्यागावर भर देऊन भक्तिमार्गाचा पुरस्कार केला.
■ वल्लभाचार्यांनी कृष्ण भक्तीचा पुरस्कार केला.
■ वल्लभाचार्यांनी संस्कृत आणि ब्रज भाषेत 'सुबोधिनी' आणि 'सिद्धांत रहस्य' हे ग्रंथ लिहिले
■ वल्लभाचार्यानी शुद्ध द्वैतवादाचा पुरस्कार केला.
चैतन्य बी.सी. १४८५-१५३४
- चैतन्य महाप्रभू भक्ति आंदोलनातील संत होत
चैतन्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात बंगालमध्ये झाला.
- चैतन्यांनी जातीयता आणि अस्पृश्यतेचा विरोध केला.
चैतन्यांनी कृष्णभक्तीचा पुरस्कार केला.
चैतन्यांनी पंढरपूर, सोमनाथ, द्वारका, वृंदावन, मथुरा तीर्थस्थळांचा प्रवास केला.
पुरी येथे चैतन्यांचा मृत्यु इ.स. १५३४ ला झाला.
चैतन्यांचे शिष्य हरिदास हे मुस्लिम होते.
गुरु नानक यांचा जन्म इ.स १४६९-१५३८
■ भक्ती आंदोलनातील प्रमुख प्रचारक गुरुनानक होत.
■ गुरुनानकांचा जन्म दि. २६.११-१४६९ ला पंजाबमध्ये शेखुपुरा जिल्ह्यात तलवंडी येथे झाला. तलवंडी आज पाकिस्तानमध्ये आहे.
■ गुरुनानकाच्या पिताचे नाव कालू व मातेचे नाव तृप्ता हे होते.
• गुरुनानकांच्या बहिणीचे नाव नानकी होते.
• गुरु नानक यांचे कुटुंब 'खत्री' आहे
इ.स. १४९९-१५०० ला गुरुनानकांनी गृहत्याग केला.
करतारपुर येथे झाला.
इ.स १५३८ ला गुरुनानकांचा मृत्यु पंजाबमधील
गुरुनानकांनी कर्म सिद्धांत व पुनर्जन्मावर भर दिला.
• गुरुनानकांनी ब्राह्मण आणि मुल्लांचा विरोध केला व कुराण व वेदांवर त्यांचा विश्वास नव्हता.
मीराबाई I.S. १४९८-१५४६
■ मीराबाईचा जन्म राजस्थानमध्ये राठौर वंशात इ.स. १४९८ ला झाला.
■ इ.स. १५१६ ला सिसौदीया वंशातील राणासांगाचा ज्येष्ठ पुत्र भोजराजाशी मीराबाईचे लग्न झाले.
■ मीराबाईचा पती भोजराजाचे निधन राणासंगाच्या काळात झाले.
■ मीराबाईने पतीच्या निधनानंतर सर्व जीवन कृष्णभक्तीत व्यतित केले.
■ मीराबाईचे वडील रतन सिंग I.S. 1527 आणि सासरा रणसंगाचाचा मृत्यू I.S. 1528 ला झाला.
■ मीराबाईला आश्रय काका बीरमदेवने दिला.
तुळशीदास I.S. १५३२-१६३२
■ तुलसीदासांना दीक्षा रामानंदाचे शिष्य नरहरीदास यांनी दिली.
• तुलसीदास यांची अमुल्यकृती म्हणजे रामचरित मानस ही होय.
■ तुलसीदासांनी रामभक्तीचा पुरस्कार केला.
तुलसीदासृत साहित्य
रामचरितमानस, विनयपत्रिका, दोहावली, कवितावाली, वैराग्य, सांदीपनी आणि श्रीकृष्ण गोतावली.
सूरदास आय.एस. १४७९-१५८४
■ सुरदासांनी कृष्ण भक्तीचा पुरस्कार केला.
■ सुरदास यांनी उत्तम दर्जाचे काव्य लिहिले आहे.
■ सुरदासांच्या श्रेष्ठ कलाकृती- सुरसागर,
साहित्यरत्न व सुरसावली होत.
■ सुरसागर मध्ये कृष्णाच्या बाललीलांचा आढावा आहे.l
मलुकदास आय.एस. १५७४-१६८२
■ मलुकदासांचा जन्म इलाहाबाद जिल्ह्यात कारा येथे झाला.
■ मलुकदासांनी हिंदु मुस्लिम एकतेवर भर दिला.
दादूदयाल आय.एस. १५५४-१६०३
■ दादूदयाल हा अहमदाबादचा विणकर होता.
भक्ती आंदोलनात दादूदयालांनी निर्गुण उपासना केली
दादूने मुर्तीपूजा, अवतारवादाचा विरोध केला.
दादूदयाल यांचे अनुयायी 'दादूपंथीय' ओळखतात. केल म्हणून
■ दादूदयाल यांचे उपदेश दादूराम वाणीत संग्रहित आहेत.
दादूदयाल यांनी सांभर येथे 'ब्रह्मा संप्रदाय चालवला.
सुंदरदास आय.एस. 1506-1586
■ दादूदयालाचे शिष्य सुंदरदास हे होते.
■ राजस्थानमध्ये बनियाच्या कुटुंबात सुंदरदासांचा दिया जन्म झाला.
■ सुंदरदासांचे विचार 'सुंदर-विलास' मध्ये संग्रहित आहेत.
बिरभान
■ बीरभान हा दादूदयालचा समकालीन होता.
■ इ.स. १५४३ ला बीरभानचा जन्म पंजाबमध्ये नारनौलजवळ झाला.
बीरभानने सतनामी संप्रदायाची स्थापना केली. वाथ
■ बीरभानने ईश्वरदास सतनाम आणि सत्य हे नाव दिले.
■ बीरभानने जातीभेद व मुर्तीपूजेचा विरोध केला. -
सतनामींच्या धर्म ग्रंथास 'पोथी' म्हणतात.
शंकरदेव आय.एस. १४४९-१५६८
■ शंकरदेव हे आसाम प्रांतातील भक्ती चळवळीचे सर्वात मोठे पुरस्कर्ते होते.
■ वैष्णव धर्माचा पुरस्कार शंकरदेवांनी आसाममध्ये केला होता.
शंकरदेवांनी विष्णू अथवा कृष्ण भक्तीचा पुरस्कार केला.
शंकरदेवांनी सांगितलेला धर्म 'महापुरुष धर्म' म्हणून ओळखला जातो.
■ शंकरदेवांचा शिष्य माधवदेव होते. शंकरदेवाचे अनुयायी शंकरदेवास 'महापुरुष' म्हणत.
■ शंकरदेवांनी हरेहाम हरे कृष्ण हे ब्रीद दीक्षामंत्र म्हणून वापरले.
■ शंकरदेव स्वतःच्या पंथाला पुरुषसंहती म्हणत.
■ शंकरदेवांचे शिष्य माधवदेव यांनी निकासंहतीची स्थापना केली.
■ दामोदरदेवांनी सुरु केलेला वैष्णव उपपंथ ब्राह्मणी पंथ अथवा ब्रह्मसंहती म्हणून ओळखतात.
■ गोपाळ देवकृत वैष्णव आणि उपपंथ 'कलासंहती' म्हणून ओळखला जातो.
■ आसाममध्ये वैष्णव पंथीयांच्या भक्तगणांच्या वसाहतीस 'सत्र' म्हणत.
■ 'सत्र' मधील धार्मिक कार्यासाठी 'नामघर' म्हणत तर निवासकार्यासाठी 'हातिस' म्हणत.
■ नामघरमध्ये मनिकुट (धर्मग्रंथ ठेवण्याची जागा) व कीर्तनगृह (विशालमंडप) असत.
संत ज्ञानेश्वर I.S. १२७१-९६
■ महाराष्ट्रात भक्ती आंदोलनाला (वारकरी संप्रदाय) इ.स. १२९० ला प्रारंभ झाला.
■ ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतावर भाष्य लिहिले त्यास भावार्थदीपिका म्हणत.
■ भावार्थदीपिकास ज्ञानेश्वरी असेही म्हणतात.
■ ज्ञानेश्वरांची समाधी आळंदी येथे आहे.
संत नामदेव
■ संत ज्ञानेश्वरांचे समकालीन संत नामदेव होते. नामदेव हे जातीने शिंपी होते.
नामदेवांची भक्तीगीते आदिग्रंथातही संग्रहित आहेत. नामदेवांनी भक्तीमार्गाचा पुरस्कार केला.
नामदेवांनी पंढरपूरच्या विठोबाची भक्ती केली.
महारष्ट्रात नामदेवांना वारकरी संप्रदायात तर उत्तर भारता निर्गुण निराकार संत म्हणून ओळखतात.
नामदेवाचे शिष्यगण उत्तर व दक्षिण भारतात आहेत.
संत एकनाथ I.S. १५३३-९९
■ संत एकनाथांनी ज्ञानेश्वरीचे नवे संस्करण काढले.
• रामायणावर संत एकनाथांनी टीका लिहिली.
■ एकनाथांनी मराठी भाषेत भारूड लिहिले त्यास एकनाथी भारूडे म्हणतात.
एकनाथांनी जनतेत वारकरी संप्रदायाचा प्रसार कीर्तनाच्या माध्यमातून केला.
संत तुकाराम यांचा जन्म इ.स १५९८-१६५०
■ वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ कवी म्हणून संत तुकारामांना ओळखतात.
■ संत तुकारामांचा जन्म पुण्यापासून १८ मैल दूर देहू येथे झाला.
■ संत तुकाराम छत्रपती शिवाजी राजांचे समकालीन होते.
■ वारकरी संप्रदायाचे अनुयायी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी वारी करतात. म्हणून त्यांना 'वारकरी संप्रदाय' हे नाव पडले.
■ वारकरी संप्रदायातील संत परंपरेत संत नामदेव, जनाबाई, गोरा कुंभार, सेना न्हावी, सावतामाळी, चोखा महार, नरहरी सोना हे १८ पगड जातीतील होत.
संत रामदास I.S. १६०८-८१
रामदास यांनी 'दासबोध' हा ग्रंथ लिहिला.
रामदासांची समाधी 'जांब समर्थ' जि. जालना येथे आहे.
आदिनाथ
■ नाथ संप्रदायाची स्थापना आदिनाथ शंकर याने केली.
■ १० व्या शतकात नाथ संप्रदायाचा प्रसार मच्छिंद्रनाथांनी केला.
■ मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरखनाथांनी भारतभर नाथ
संप्रदायाचा प्रसार केला.
ध्यानयोगाद्वारे मोक्षप्राप्तीचा मार्ग मच्छिंद्रनाथांनी सांगितला.
■ गोरखनाथांचे शिष्य गहिनीनाथांनी महाराष्ट्रात नाथ संप्रदायाचा प्रसार केला.
■ गहिनीनाथांनी ज्ञानेश्वरांचे बंधू निवृत्तीनाथ यांना योगमार्ग शिकविला.
महानुभव संप्रदाय
■महानुभव संप्रदायाची स्थापना चक्रधर स्वामी यांनी केली.
■ महानुभव पंथीय वर्णाश्रम, जातीप्रथा व मुर्तीपूजेचे विरोधक होत.
■ महानुभव संप्रदायात संन्यास मार्गाला महत्त्व आहे.
■ चक्रधर स्वामींचा शिष्य नागदेवाचार्य हा होता.
■ श्रीकृष्ण व गुरुदत्त माहूर यांची उपासना महानुभव पंथीय करतात.
■ महानुभव पंथात एकंदरीत १३ शाखा आहेत.
0 Comments