Subscribe Us

शीख धर्माचा उदय आणि विकास,संत परंपरा

 अ) शीख उदय आणि विकास


■ गुरुनानक यांचा जन्म दि. २६ नोव्हेंबर १४६९ ला पश्चिम पंजाबमध्ये तलवंडी नामक गावात झाला.

■ आज तलवंडी या गावास नलकाना या नावे ओळखतात.

■ गुरू नानकाचे पिता, माता, बहिणची नावे अनुक्रमे कालू मेहता, तृप्ता आणि नानकी ही होती.

■ इ.स. १४८८ ला नानकांचा विवाह सुलतानपूर निवासी श्री बाबा मुलाच्या सुलक्षणी नामक मुलीशी झाला.

■ नानकांचे सिरिचंद आणि लखमीदास हे दोन पुत्र होते.

■ इ.स. १४९९ ला सुलतानपूरजवळ बईनामक नदीच्या काठी नानकास दीव्यज्ञान प्राप्ती झाली.

■ नानकांनी इ.स. १५०७-२१ पर्यंत तीन यात्रा केल्या त्यास शिख धर्मात 'उदासी' म्हणतात.

■ गुरु नानकानी हरिद्वार, अयोध्या, प्रयाग, काशी, गया, पाटणा, आसाम, जगन्नाथपुरी, रामेश्वर, सोमनाथ, द्वारका, नर्मदा किनारा, बिकानेर, दिल्ली, लाहोर, मक्का, मदिना, बल्ख आणि काबूल या ठिकाणी मुक्काम केला.

■ गुरु नानकांनी 'जपुजी' हा प्रार्थना ग्रंथ लिहिला. ■ गुरु नानकांच्या प्रातःस्मरण प्रार्थनेला आचार्य विनोबाजींनी शिखांचा हरिपाठ म्हटले आहे.

■ गुरु नानकाचा मृत्यु जालंधर दुआबातील कर्तारपूर या ठिकाणी इ.स. १५३८ ला झाला.

गुरु नानकांनी लाहिना नामक एक तिहून खत्रीला आपला वारसदार म्हणून नियुक्त केले त्याचे नामकरण 'अंगद' असे केले.

गुरुनानकांची शिकवण

मुर्ती हे देवाचे खरे रुप नाही, जातीवर माणसाची श्रेष्ठता नाही, ईश्वराचे अखंड चिंतन, प्राणी मात्राविषयी दयाभाव, परमेश्वर सर्वज्ञ आहे, राष्ट्रनिष्ठेपेक्षा मानव निष्ठेवर भर, स्त्रियांना आदर व सन्मानाने वागणूक, परदेशी भाषांच्या अंधानुकरणावर टीका, सत्य हाच परमेश्वर, चमत्कार प्रवृत्तीचा निषेध, शुद्ध आचरण इत्यादी.

• नानक आपल्या अनुयायांना 'शिख' अथवा 'शिष्य' या नावे संबोधतात.

■ अंगद म्हणजे 'अवयव' अथवा 'अंग देणारा' अथवा अंगापासून निर्माण झालेला.

■ अंगदचा जन्म हरिके येथे झाला.

■ अंगदने आपले वास्तव्य लाहौरपासून पूर्वेस ४०

मैलावरील बियासनदीवराल खदूर या गावी व्यतित

केले.

■ अंगदच्या पत्नीचे नाव दयाकौर होते.

■ अंगदास अमरू ही मुलगी व दासू व दानू हे दोन पुत्र होते.

■ गुरु अंगदाने गुरुमुखी नावाची लिपी प्रचारात आणली.

■ अंगदाने गुरु नानकाचे चरित्र बालसिंधू नामक नानकाच्या प्रथम शिष्याकडून लिहून घेतले.

- गुरु अंगदाने गुरु नानकाची तत्त्वे लोकप्रिय करण्यासाठी व शिष्यातील उत्साह कायम दाखविण्यासाठी लंगर म्हणजे अन्नछत्रे सुरु केली.

- गुरु अंगदाचा गुरुपदाचा काळ इ.स. १५३९- ५२ हा होता.

- गुरु अंगदाचा मृत्यु इ.स. १५५२ ला व्यास (बियास) नदीच्या किनाऱ्यावर कडूर या गावी झाला.

गुरु अमरदास I.S. १५५२-७४

- गुरु अंगदाच्या मृत्युनंतर गुरु अंगदाचा शिष्य गुरु अमरदास धर्मगुरु म्हणून कार्य करु लागले. अमरदास हा खत्री 'भल्ला' या शाखेतील होते.

■ अमरदासांच्या मातेचे नाव सुलक्षणा आणि पित्याचे नाव तेजोभानू होते.

■ अमरदासांच्या पत्नीचे नाव राजकुमारी होते.

गुरु अमरदासांनी पंजाबमधील शिखांच्या वसाहतीचे २२ भाग पाडले व त्यावर एक धर्माधिकारी नेमला.

■ गुरु अमरदासांनी बियास नदीच्या काठी गोंविदवली नावाचे एक खेडे वसवले.

■ गोविंदवली येथे गुरु अमरदासांनी ८४ पायऱ्यांची विहिर खोदली.

■ गुरु अमरदासांनी सती प्रथेचा विरोध केला.

■ इ.स. १५७४ ला गुरु अमरदारांचा मृत्यु झाला.

• गुरु अमरदासांनी स्वपुत्रीचा विवाह शिष्य रामदासशी लावला.

■ गुरु अमरदासांचा शिष्य । जावाई रामदास हा पुढे गुरु बनला.

गुरु रामदास I.S. १५७४-८१

■ गुरु रामदास हे मुळचे लाहौरचे होते.

■ गुरु रामदासच्या मातेचे नाव दयाकुमारी व पित्याचे नाव हरिदास सोधी होते.

■ गुरु रामदासांच्या पत्नीचे नाव भानुमति हे होते.

■ सम्राट अकबर व गुरु रामदास हे मित्र होते.

■ सम्राट अकबराने शिख धर्मास लाहोरपासून पूर्वेकडे ५० मैल अंतरावर ५०० बिघा जमीन दिली.

■ सम्राट अकबराने दिलेल्या जमिनीच्या सभोवारच्या वसाहतीस रामदासपूर असे म्हणतात.

■ रामदासपूर येथे एक तळे आहे. या तळ्यातील पाणी शिखांना अमृतमय वाटू लागले. म्हणून रामदासांच्या मृत्युनंतर त्यास 'अमृतसर' म्हणतात.

■ अमृतसर येथील शिखांच्या भक्त मंदिरास अमृतसर गुरुद्वार म्हणतात.

- गुरु रामदास I.S. 1581 पावले मृत्यू.

■ गुरु रामदासांनंतर त्यांचा पुत्र अर्जुन गुरुपदी आला. (इ.स. १५८१)

- रामदासपूरलाच 'चकगुरु' असेही म्हणतात.

■ रामदासांनी तलाव अमृतसर व संतोषसर खोदले.

गुरु अर्जुनदेव I.S. १५८१ - १६०6

■ गुरु रामदासांना पृथ्वीचंद आणि अर्जुनदेव हे दोन पुत्र होते.

• गुरु अर्जुनदेवांनी पवित्र धर्मग्रंथात गुरु नानकासह इतर साधू संतांच्या पद्यांची भर घातली.

■ गुरु अर्जुनदेवांनी 'आदिग्रंथ' लिहिला.

■ गुरु अर्जुनदेवांनी, गुरु रामदासांनी वसवलेल्या अमृतसर या ठिकाणी हरमंदिर अथवा सुवर्णमंदिर बांधले.

■ गुरु अर्जुनदेवांनी सुवर्ण मंदिरात आदिग्रंथाची मूर्ती म्हणून स्थापना केली त्यास 'ग्रंथसाहेब' म्हणतात.

■ गुरु रामदासापासून गुरुपदाचा वारसा वंश परंपरागत चालू झाला.

■ धर्मगुरूच्या (शिख) मठाला राजदरबाराचे स्वरुप अर्जुनदेवाच्या काळात आले.

■ गुरु अर्जुनदेवांनी धर्मसंस्थेच्या पोषणासाठी कर घेण्यास प्रारंभ केला.

■ शिख समाजास स्वसंरक्षणार्थ समर्थ बनवण्यास प्रारंभ अर्जुनदेवांनी केला.

■ शिखसमाज धनसंपन्न व्हावा म्हणून त्यांनी घोडे खरेदी-विक्रीस प्रोत्साहन दिले.

■ जहांगीरचा मुलगा खुस्त्रो हा गुरु अर्जुन देवांवर विश्वास ठेवणारा होता.

■ लाहोरचा दिवाण चंदूलाल आणि गुरु अर्जुनदेव यांच्यात काही कारणाने बेबनाव निर्माण झाला.

■ खुस्रोस आश्रय दिला हा आरोप ठेवून गुरु अर्जुनदेवास राजद्रोही ठरवून कैदेत ठेवले.

■ गुरु अर्जुनदेवाची हत्या लाहौरच्या किल्ल्यातून नदीत फेकून देऊन केली.

गुरु हरगोविंद यांचा जन्म इ.स १६०६-१६४५

■ गुरु अर्जुनानंतर त्यांचा पुत्र गुरु हरगोविंद सत्तेवर आला. (वय ११ वर्षे)

■ गुरु हरगोविंदाने गुरु गादीला 'तख्त-अकाल कालातीत सिंहासन/परमेश्वराचे आसन' तर सभेला 'दरबार' म्हणण्याचा प्रघात पाडला.

मोगल बादशाह जहाँगिराने सेनापती वजीरखाना यास गुरु हरगोविंदच्या विरुद्ध पाठविले.

■ जहाँगिर बादशाहने गुरु हरगोविंदला ग्वाल्हेरच्या किल्लयात कैद ठेवले.

■ शिखांची ताकद लक्षात घेऊन जहाँगिराने गुरु 1 हरगोविंदला मुक्त केले

■ लाहोरचा दिवाण चंदुलाल याला शिखांनी अत्यंत छळ, यातना देऊन मारले.

■ गुरु हरगोविंदांनी शाहजहाँच्या सैन्याचा दोनवेळा पराभव केला

■ गुरु हरगोविंदाने अमृतसर सोडून काश्मिर रस्त्यावर सतलज किनाऱ्यावर कीर्तिपूर हे शहर वसवले.

■ गुरु हरगोविंदाचा मृत्यु कीर्तिपूर येथे इ.स. १६४५ ला झाला.

गुरु हर गोविंदI.S. १६४५-६१

■ गुरुहरगोविंदने आपल्या नातवास गुरुपदी नियुक्त केले.

■ गुरु हरराय इ.स. १६४५ ला सत्तेवर आला.

■ औरंगजेबाचा ज्येष्ठ बंधू दाराशुकोह याने गुरु हररायाकडून उपचार घेतले होते.

■ दाराशिकोहला आश्रय गुरु हरराय यांनी दिला.

■ गरु हरराय यांनी उत्तरेत 'नाभाप्रतिआल' या नावाने राज्य स्थापन केले.

■ गुरु हररायांचा मृत्यु इ.स. १६६१ ला झाला.

■ गुरु हरराई हा I.S. 1661 ला आजर्ने मृत्यू पावला.

गुरु हरकिसन I.S. १६६१-१६६४

■ गुरु हरराय यांना रामराय व हरिकिसन हे दोन पुत्र होते.

गुरु हररायांचा पुत्र रामराय औरंगजेबाच्या आहारी गेला.

गुरु तेजबहादूर I.S. १६६४-७५

- गुरु हरकिसनने मृत्युपुर्व बकाला गावातील व्यक्ती गुरु गादी चालवेल असे भाकीत केले.

■ दिल्लीतील सुखन नामक व्यापाऱ्याने बकाला गावातील सोधी वंशातील तेजबहादूर यास निवडले.■ गुरु तेजबहादूरांनी गुरु नानकाची गुरु गादीमाता । नानकी देवीच्या आज्ञानुसार स्वीकारली.

■ गुरु तेजबहादूरांनी अमृतसर सोडून कर्तारपूरजवळ आनंदपूर येथे नवीन नगर वसवले.

• गुरु तेजबहादूरने सतलज नदीवर एक किल्ला बांधला.

■ मोगल बादशाह औरंगजेबाच्या दरबारातून गुरु तेजबहादूर व जयपूर राणा जयसिंह एक वर्ष वंग देशात राहण्यास गेले.

■ गुरु तेजबहादूरच्या कैदेनंतर गुरु गोविंदसिंग गुरुपदावर आले.

■ गुर तेजबहादूरचा शिरच्छेद दिल्लीत चांदणी चौकात करण्यात आला. त्या ठिकाणी 'शिरगंज' नामक मंदिर आहे.

■ गुरु तेजबहादूरवर रायसना येथे लखीशाहने अंत्यसंस्कार केले.

■ गुरु तेजबहादूरचा गुरुद्वारा 'रकिबगंज' हा होय.

गुरु गोविंद सिंग I.S. 1675-1107

■ गुरु गोविंदसिंगाचा जन्म इ.स. १६६६ ला पाटणा येथे झाला.

■ गुरु गोविंदसिंगांनी केटनयना देवीच्या पर्वतावर यज्ञ समारंभ करुन अनुयायांना संबोधीत.

■ गुरु गोविंदसिंगांनी कोटनयना देवी येथेच स्वधर्माकरिता देहत्याग करणाऱ्यांची सत्त्वपरीक्षा घेतली त्या पाच शिष्यांना 'पंचप्यारे' म्हणतात.

■ गुरु गोविंदसिंगानी शिख समाजातील उच्च-निचता नष्ट करुन शिखांची संघटना निर्माण केली त्यास 'खालसा' पंथ म्हणतात. (दि. ३० मार्च १६९९)

■ शिख धर्माच्या रक्षणासाठी गुरु गोविंदसिंगाच्या जोरावरसिंह व फत्तेसिंह या पुत्रांनी वीरमरण पत्करले.

■ गुरु गोविंदसिंगाची हत्या नांदेड येथे झाली. गुरु गोविंदसिंगाचा मृत्यु दि. ७-१०-१७०८ ला झाला. गुरु गोविंदसिंगाच्या मृत्युनंतर गुरुपरंपरा राहिली नाही. गुरु गोविंदसिंगाचा शिष्य माधवदास हा होता.

■ गुरु गोविंद सिंग यांनी आनंदगड, लोहगड, होलपड, फत्तेगड आणि तारागड हे किल्ले बांधले.

गुरु गोविंदसिंगाची माता गुजरी, दोन पुत्र जोरावरसिंग आणि फत्तेसिंग यांना गंगू नामक व्यक्तीने मोगल सरदार वजीरखानास सुपुर्द केले.

खालसा

■ गरु तेजबहादूर गुरू गोविंदसिंग गुरुपदवार.

गुरुपदावर आल्यानंतर २० वर्षे चिंतन.

■ शिख समाजात स्वातंत्र्य, पुरुषार्थ, राष्ट्रभक्ती, क्षात्रवृत्ती रुजवली.

■ दि. १२.०४-१६९८ ला 'खालसा' स्थापना.

■ 'जय सत् श्री अकाल' हीच घोषणा.

■ लढवय्ये बनवणे हा उद्देश खालसाचा होता

■ खालसाचे केंद्र आनंदपूर हे होते.

■ नांदेड येथील गुरुद्वारास 'श्री हुजुर अबपल नगर अकाल तख्त' नावाने ओळखतात.

क्र.

शिखांचे दहा गुरु

नाव

कालखंड

योगदान

१.

गुरु नानकदेव

१४६९-१५३९

संस्थापक

२.

गुरु अंगद देव

१५३९-१५५२

गुरुमुखी लिपी

३.

गुरु अमरदेव

१५५२-१५७४

उच्च वर्ण

४.

गुरु रामदास

१५७४-१५८१

गुरुपद पूर्वज

५.

गुरु अर्जुन देव

१५८१-१६०६

आदिग्रंथाचे संकलन

६.

गुरु हरगोविंद

१६०६-१६४५

अकाल तख्त स्थापन केले

७.

गुरु हरी राय

१६४५-१६६१

शांततामय प्रचार पुरस्कार

८.

गुरु हरिकृष्ण

१६६१-६४

गुरुपदासाठी वाद

९.

गुरु तेज बहादूर

१६६४-१६७५

धर्मासाठी बलिदान

१०

गुरु गोविंद सिंग

१६७५-१७०८

'खालसा' पंचप्यारे दीक्षा

■ शिखांचा अत्यंतिक छळ मोगलांनी इ.स. १६०६- १७०७ असे १०१ वर्षे केला.

■ शिखांना मोगलांशी, शिवालिक पर्वतावरील हिंदू राजांशी व सामाजिक पातळीवर विरोधी सत्तेशी लढावे लागले.

■ सहावे गुरु हरगोविंदसिंगांनी शिख समाजास एक लष्करी समाजात रुपांतरित केले.

■ गुरु हरगोविंद सिंगाच्याच काळात अमृतसरला भक्कम किल्ला बांधला त्याला 'लोहगढ' म्हणतात.

■ शहाजहाँने शीखांशी एकंदरीत ६ युद्ध लढली.

बंदा बहादूर I.S. 1708-16

■ बंदासिंग बहादूर यांचा जन्म पंजाबमध्ये पूच संस्थानात राजोरी येथे दि. १६.१०.१६६० ला झाला.

■ बंदासिंगाच्या पित्याचे नाव लक्ष्मणदेव होते. बंदासिंगांनी 'माधोदास' नाव धारण करुन गृहत्याग केला.

■ महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीकाठी पंचवटी ठिकाणी माधोदासांनी अवघरनाथास गुरु मानले.

■ गुरु गोविंदसिंग आणि माधोदासांची भेट झाल्यानंतर माधोदास (बैराग्यास) गुरु गोविंदसिंगानी बंदाबैरागी,

/ बंदाबहादूर/बंदासाहेब या टोपन नावाने संबोधले,

■ बंदा बहादूरला गुरु गोविंदसिंगांनी धनुष्यबाण, पडघम, फलक व पंचप्यारे देऊन उत्तरेत पाठवले.

पंचप्यारे

■ कोटनयना येथे गुरु गोविंदसिंगांनी शिष्यांची परीक्षा घेतली. त्यात ०५ शिष्य धर्मासाठी त्रास घेण्यास पुढे आले त्यास 'पंचप्यारे' म्हणतात.

■ पंचप्यारे – बाबा विनोद सिंग, कहान सिंग, दयासिंग, कानसिंग आणि विजय सिंग.

■ सर्वप्रथम माळवा, मजदहा, दोयनाच्या शिख समाजाने बंदासिंगाचे नेतत्त्व स्वीकारले.

■ बंदाबहादूरसिंगाने कॅथल, समाणा, ठसका, शहाबाद ठिकाणी मोगल खजाना लुटला.

■ मोगल बादशाह बहादूरशहाशी संघर्ष बंदा बहादूरने इ.स. १७०८-१२ पर्यंत दिला.

■ बंदा बहादूरला गुरुदासपुरच्या किल्ल्यातून बाहेर पडल्यानंतर मोगलांनी कैद केले.

बंदा बहादूरच्या पराभवाची कारणे.

■ बादशाह फरुखसियरची महत्त्वाकांक्षा बंदास कैद करणे. बंदा बहादूर राजपुत होता. ते स्वतःस ११ वा गुरु माने. बंदाबहादूर वैष्णव पंथीय होते. ■ मांसाहाराचा निषेध, प्रबळ मोगल सैन्य. तोकडी शिखाची ताकद डोंगरी भागातील हिंदू राजांचा विरोध. बंदा बहादूरची भावनावश धोरणे.

■ शिख समाजातील 'बंदेशीख' स्वतःस बंद बैरागचे अनुयायी म्हणून संबोधतात.

■ बंदा बहादूरची समाधी जम्मू भागातील भांबरजवळ

तीन मैलावर आहे. पहिले शिख राज्य इ.स. १७०८-१७२६ या काळात उदयाला आले.

प्रथम शिख राज्य बंदासिंग बहादूरने स्थापन केले. प्रथम शिख राज्य साधुरा ते राजकोट आणि मच्छिवारा व लुधियाना ते कर्नाळ भागात पसरलेले होते. प्रथम शिख राज्यात सरहिंद, समाना व थानेश्वर हे

तीन प्रांत होते.

मुखिलिसपूर ही शीख राज्याची राजधानी होती. }

मुखिलिसपूर किल्ल्यालाच 'लोहगड' म्हणतात.

■ प्रथम शिख राज्याचा प्रमुख बंदा बहादूर तर तीन

प्रांताचे राज्यपाल सरहिंदचा वजसिंग, समानाचा

फत्तेसिंग तर थानेश्वरचा रामसिंग हे होते. ■ प्रथम शिख राज्याचा स्वतंत्र चलनावर गुरुनानक व गुरु गोविंदसिंगाचे नाव होते.

• प्रथम शिख राज्याची राजमुद्रा 'पर्शियन' भाषेत होती. त्यादर 'देघ-ओ-देघ-ओ-फत्तेह-ओ-नुसरत- इ-बेफिरंग अफ्त अजनानक गुरु गोविंदसिंग' असे लिहिलेले होते.

■ बंदा बहादूरने सरहिंदवर विजय मिळविला. (दि. ३० मे १७१०) त्यावेळापासून 'शिखसंवत' प्रारंभ झाले.

■ बंदासिंगाने राज्यात जमीनदारी नष्ट करुन रयतवारी प्रारंभ केला

■ गुरु गोविंदसिंगांनी पंचप्यारेंना दीक्षा दिली व त्यांना 'सिंह' नावाने संबोधले.

■ खालसा पंथाचे नामकरण गुरु गोविंदसिंगांनी

'पंचप्यारे' असे केले.

शिख दीक्षा पद्धत

दीक्षा पद्धतीस 'पाहूल' म्हणतात. लोखंडी कढईत पाणी व बत्तासे टाकून दुधारी खांडाने हलवायचे. पाणी हालवताना नित्य पाच मंत्र म्हणावे ते पाणी दीक्षार्थीना दिले जाते. खालसा पंथाची शपथ घेणे, 'गुरुग्रंथसाहेबा 'स नमस्कार करतेवेळी दीक्षार्थीच्या मस्तकावर पाणी टाकणे, पाच वेळा डोळ्यास लावणे, पाच कंकार धारण करणे (केस, कंगवा, कच्छ, कडे व कृपाण)

■ 'खालिस' हा अरबी शब्द असून 'खालिस' म्हणजे शुद्ध शुद्ध भावनेने गुरुची सेवा करणारा मानव म्हणजे 'खालसा' होय.

खालसा तत्वे

खालासा व्यक्तीने शस्त्र बाळगावे.

केस कर्तन करु नये.

गुरु नानकावरील स्वविश्वास दर्शविण्यासाठी काळे वस्त्र परिधान. आद्य ग्रंथाचे वाचन

आद्य ग्रंथाशिवाय मान झुकवू नये.

वर्षात दोन वेळा पवित्र तलावात स्नान.

गुरुद्वारा देणगी.

तंबाखू सेवन बंदी

हस्तदोलन 'वाहिगुरु का खालसा' 'वाहि गुरू.

की फत्ते' असे करावे.

पंचकंकर धारण करावे.

दीक्षा घेणाऱ्यांनी सिंग/सिंह उपपद लावावे.

■ शिख लोक सहा इंचाचे कट्यार वापरतात त्यास 'कृपाण' म्हणतात. ■ खालसा पंथाचा गौरवशाली कालखंड इ.स.

१७१६-४७ हा आहे

गुरु ग्रंथ साहेब

*निर्माता - श्रीगुरु अर्जुनदेव

• निर्मिती कालावधी इ.स १६०१-१६०४

* पुस्तक लेखन कार्य - भाई गुरुदासजी भल्ला यांचे.

* ग्रंथ अमृतसरच्या गुरुद्वारात. प्रथम रक्षणकर्ता भाई बुड्ढा हा होय.

* गुरुनानकाचे ९७६, गुरु मैदगचे ६१, गुरु अमरदासाचे ९०७, गुरुरामदासाचे ६७९, गुरु अर्जुनदेवाचे २२१६, तेजबहादूरांचे ११८, ईशस्तोत्र तर इतर धर्मियांचे ९३७ ईश स्तोत्र त्यात आहेत.

■ बंदा बहादूरची हत्या. 1716 लो झाले.

- बंदा बहादूरच्या मृत्युनंतर शिख समाज बंदई व तत्खालसा या दोन गटात विभागला गेला.

■ 'बंदई' हे बंदा बहादूरचे अनुयायी तर तत्खालसा कट्टरपंथीय होते.

■ इ.स. १७११ ला भाई मनीसिंहाने तत्खालसा व बन्दईतील मतभेद मिटवले.'

■ इ.स. १७२६-४५ काळात पंजाबचा राज्यपाल जकरिया खानाने शिखांवर अत्याचार केले.

■ जकरिया खानाच्या अत्याचाराविरुद्ध शिख भिलोवाल येथे एकत्र आले त्यांनी दलखालसाची स्थापना केली.

■ दलखालसात वृद्ध व तरुण असे दोन दल होते.

■ वृद्ध व तरुण दल सरबत खालसाच्या नेत्याच्या नेतृत्त्वाखाली कार्य करत.

■ इ.स १७४८ ला दल खालसाचे नेतृत्त्व कपूरसिंहानी जरसासिंह अहलूवालियाने केले.

■ इ.स. १७४६-४७ ला पंजाब राज्यपालपदी मीर मन्नूची नियुक्ती झाली.

■ पानिपत-III चा विजयी नायक अहमद शाह अब्दाली याला परतीच्या मार्गावर शिखांनी त्रास दिला.

■ इ.स. १७६२ ला अहमदशाह अब्दालीने शिखांचा पराभव केला.

■ अहमदशाह अब्दालीने शिखांवर इ.स. १७६२- ६४, ६६-६७ ला आक्रमण केले.

गुरु गोविंदसिंगाचे मोगलांशी संघर्ष

शीख मिसल

■ मिस्ल हा अरबी शब्द होय. मिस्ल म्हणजे समान अथवा एकसमान होय.

■ एक गटातील सर्व सदस्यास राजकीय, धार्मिक, सामाजिक अधिकार प्राप्त होते त्या गटास मिस्ल म्हणत.

■ पंजाबमधील अराजकतेच्या प्रसंगी शिख समाज नेत्याच्या नेतृत्त्वाखाली दलात संगठित झाला त्या दलास मिस्ल म्हणतात.

■कंदरीत १२ मिस्ल उदयास आले.

 अशीच चळवळ/संघटना गुरुमत्वाने केली होती.

मस्लंची केंद्रीय संस्था गुरुमता होती. गुरुमता म्हणजे धर्मगुरुचा आदेश. दीपावली, दसरा, वैशाखी निमित्त शिख अमृतसरमध्ये एकत्र येत. त्यावेळी अकाल तख्त सामुहिक कार्यवाही देई. इ.स. १७०८- १८०५ पर्यंत गुरुमता झाले.

■ मिस्लची व्यवस्था मिस्लदार करत असे.

■ मिस्ल शासन व्यवस्था मुळतः ग्रामीण शासन व्यवस्ता

होती. प्रत्येक गावात एक पंचायत कार्यरत असे. - गाव प्रत्यक्ष मिस्लच्या अखत्यारित तर काही गांव रक्षित होते. त्यांना राखी म्हणत.

मिस्ल अंतर्गत येणाऱ्या गावांकडून व राखी गावाकडून २०% महसूल घेतला जात.

१. फैजलपुरिया किंवा सिंगपुरिया मिसळ

■ फैजलपुरिया मिसलाचा संस्थापक जवाब कपूर सिंग

हा होता. कपूरसिंहाने इ.स. १७३४-४८ पर्यंत सर्वत ■

खालसाचे नेतृत्त्व केले.

• कपूरसिंहाच्या अंगावर ४३ जखमाचे व्रण होते.

■ I.S. 1753 ला खुशालसिंग कपूरसिंहछाया

मृत्युनंतर वारस बनला.

■ इ.स. १८६३ ला रणजितसिंहाने फैजलपुरिया शिख राज्यात विलीन केले.2. अहलुवालिया मिसल

∎ अहलूवालिया मिस्लची स्थापना जस्सासिंह अहलूवालियाने केली.

■ इस. १७५३ ला कपूरसिंहानंतर संपूर्ण शीख समाजाचा नेता जस्सासिंहजी बनले.

■ इ.स १७८३ ला जस्सासिंहाचा मृत्यु झाला. ■ इ.स १७८३-१८०१ पर्यंत फतहासिंगाने कार्य केले

■ इ.स. १८०१-१८३७ पर्यंत भागासिंहाने कार्य केले.

■ इ.स. १८३७ ला निहालसिंगाने कार्य हाती घेतले.

3. भंगी मिस

■ सरदार हरिसिंहद्वारा भांगी मिस्लची स्थापना झाली.

■ लाहौर आणि अमृतसर भांगी मिस्ल कार्यक्षेत्रात - मोडत. हरिसिंह, झण्डासिंह, गंडासिंहाने भंगी मिस्लचे कार्य केले.

■ इ.स. १७०२ नंतर भांगी मिस्ल रणजितसिंहाने प्राप्त केला.

4. रामगढिया मिसल

■ रामगढिया मिस्लची स्थापना जस्सासिंह इच्छेगिलियाने केली.

■इ.स १८०३ ला जस्सासिंह इच्छोगिलीयाच्या मृत्युनंतर जोधसिंह सत्तेवर आला.

■ इ.स १८१४ ला जोधसिंहाच्या मृत्युनंतर रणजितसिंगांनी रामगढिया मिस्ल जिंकला.

५. कान्हिया मिसल 

■ जयसिंहाने कान्हिया मिस्लची स्थापना केली.

■ जयसिंहाने मुकेरिया, पठाणकोट, गुरुदासपूर जिंकले.

■ जयसिंहाने नातीचा विवाह सुकराचिया मिस्लच्या सरदार महासिंहचा पुत्र रणजितसिंहाशी लावला.

6.सुकर चाकिया मिस्ल 

■ सुकरचकिया मिस्लचा संस्थापक चरतसिंह हा होता. • चरतसिंहाने गुजराँवाला मिस्लच्या सरदार अमीरसिंहाच्या मुलीशी विवाह करुन अधिकार व दरारा वाढवला.

इ.स. १७७४ ला चरतसिंहाचा मृत्यु झाला..

चरतसिंहानंतर महासिंह हा उत्तराधिकारी बनला.

■ जस्सासिंह रामगढिया व सुकरचकिया मिस्लनी मिळून कान्हिया मिस्लचा पराभव केला.

७.फुल किया मिस्ल 

■ फुलकिया मिस्लचा संस्थापक चौधरी फूल हा होता.

■ इ.स. १६९६-१७६५ पर्यंत बाबा आलासिंह नेतृत्त्वाखाली फुलकियाँ मिस्लची प्रगती झाली.

■ अहमदशाह अब्दालीने माळवा प्रदेशाचा प्रतिनिधी म्हणून बाबा आलासिंह यास नेमले.

■ इ.स. १७६५ ला आलासिंहाचा मृत्यु झाला.

■ अहदशाह अब्दालीने आलासिंहाचा वारसदार अमरसिंहास 'राज राजगान बहादूर' ही पदवी दिली.

8. डल्लेवालिया मिस

गुलाबसिंह हा डल्लेवालिया मिस्लचा संस्थापक होता.

■ डल्लेवालिया मिस्लचा प्रभावी व्यक्ती तारासिंह हा होता.

९. निशानवालिया मिसल

■ निशाणवालियाचे संस्थापक संगतसिंग आणि मोहर सिंग असत.

■ निशानवालिया मिस्लचे क्षेत्र अम्बाला व शाहाबाद हे होते.

10. करोड दसिंघिया मिसल

■ करोडसिंघिया मिस्लचा पंचगढिया मिस्ल म्हणतात.

■ बघेलसिंग हा करोडसिंघिया मिस्लचा प्रभावी नेता होता.

■ रणजितसिंहाने कलसिया राज्यात करोडसिंघिया मिस्ल विलीन केला.

11. शहीद मिसल

■ शहीद मिस्ललाच निहंग मिस्ल म्हणतात. पसंद हा शहीद मिस्लचा प्रथम नेता होता.

■ शहीद मिस्लची स्थापना शिखांना मुस्लिमांनी धर्माध होऊन मारले होते अशा परिवारांतील व्यक्तींनी केली.

■ शहीद मिस्लचे क्षेत्र सतलज नदीच्या पूर्वभागात होते.

12. नक्काई मिसल 

■ नकाई मिसळचे संस्थापक हिरासिंग असत.

■ नक्कई मिस्लचे हिरासिंहाचे वारसदार म्हणून नाहरसिंह व रामसिंह यांनी कार्य केले.

■ इ.स. १८०७ ला महाराजा रणजितसिंहाने नक्कई मिस्ल शिख राज्यात विलीन केले.

12 शीख मिसल

संस्थापक

फुल

चौधरी फुल्ल

अहलुवालिया

जस्ससिंग अहलुवालिया

भंगी

सरदार हरिसिंह

कन्हय्या

जयसिंग

रामगढिया

जसासिंग इच्छेगिलिया

करोडसिंगिया

बघेल सिंग

निशानेबाज

संगत सिंग आणि मोहर सिंग

सुसेराचिया

चरतसिंग

डल्लेवालिया

गुलाब सिंग

१०

नक्काई

हिरासिंग

11.

हुतात्म

बाबा दीप सिंग

१२

फैजलपुरिया

कपूर सिंग उत्तर द्या


Post a Comment

0 Comments