अ) सुफी चळवळ
■ इस्लामधील रहस्यवादास 'सुफी' म्हणतात. सुफी म्हणजे पवित्र.
• सुफी या शब्दाचा अरबी अर्थ लोकर असा होतो. ■
सुफी म्हणजे लोकरीचे वस्त्र धारण करणारा पवित्र मनुष्य.
■ सुफी म्हणजे 'परमेश्वराच्या भक्तीत पूर्णपणे गुंतलेला गूढवादी संन्यासी मनुष्य होय
वाहदत-उल-वजूद
■ सुफिंचा उदय 'वहदत-उल-वजुद' तत्त्व.
■ वादत-उल-बुजूद म्हणजे ईश्वर एक आहे.
■ तत्त्व प्रवर्तक – मुही-उद्दीन-इब्झ-उल-अरानी.
■ भौतिक सुख त्याग, परमेश्वरास शरण, परमेश्वराच्या व्यापकतेवर विश्वास इत्यादी तत्त्व.
■ सुफींनी धर्मनिरपेक्ष नीतीचा स्वीकार केला.
■ मुस्लिम सूफींचे मुख्य केंद्र खानकाह होते.
■ खानकाहात यात्री आणि अनुयायांना राहण्या आणि भोजनाची सोय असे.
• सुफींनी इस्लाम कट्टरता त्यागून गुढवादाचा स्वीक केला.
सुफी मन्सूर हल्लाज याने आपले प्राण त्यागले सुफीनी कर्मकांडाचा विरोध केला.
सुफी विचाराचा प्रारंभ भारतात महमूद गजनी चे
पंजाब विजयानंतर झाला. ■ शेख इस्माईल हा प्रथम सुफी संत ज्यांचे भारतात लाहोर येथे आगमन झाले.
■ शेख इस्माईलनंतर शेखअली बिन उस्मान अल हजवैरी हा सुफी भारतात आला.
■ हजवैरी भारतात दातागंज बख्श या नावाने प्रसिद्ध आहे.
■ हजवैरीचा मकबरा लाहौर येथे आहे.
• भारतातील सुफी मताचा संस्थापक हजवैरी यालाच मानतात.
■ हजवैरीने सुफी विचार 'कशफूल महजूब' या पुस्तकात नमुद केले आहेत.
सुफीचीं चार तत्त्वे
उच्चाटन/निर्वाण.
सलुक/अष्टांग मार्ग.
मारकाबा/राजयोग.
करामत अलौकिक शक्तीचा वापर.
■ हजवैरीचा समकालीन सुफी संत सय्यद अहमद सुलतान सखी सर्वर हा होता. त्यास 'लखदाता' म्हणतात.
■ भारतातील प्रमुख सुफी सिलसिले चिश्ती, सुहरावर्दी, फिरदौसी, कादिरी व नक्शाबंदी होत.
भारतातील प्रमुख सिलसिला
(a) चिश्ती मालिका
■ चिश्ती सिलसिलेचा अजमेर, राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, बंगाल, ओरिसा दक्षिण भारतात विस्तार झाला.
■ चिश्ती सिलसिल्याची स्थापना ख्वाजा मयनुद्दीन चिश्तीने (इ.स. ११४१-१२३६) ला केली.
■ चिश्ती सिलसिला भारतातील सर्वात मोठा सुफी
सिलसिला आहे.
ख्वाजा चिश्तीचा जन्म मध्य आशियातील होय.
■ ख्वाजा चिश्ती इ.स. ११६१ ला लाहौरला आले.
ख्वाजा चिश्तीने अजमेर येथे सुफी केंद्र स्थापले.
■ ख्वाजा चिश्तीचे हमीद उफीन आणि कुतुबुद्दीन बख्त्यार काकी हे मुख्य शिष्य होते.
■ शेख काकी इल्तुतमिश सुलतानच्या काळात भारतात आले.
■ इल्तुतमिश सुलतानाद्वारा प्रदान महल आणि 'शेख- उल-इस्लाम' हे पद शेख काकीने स्वीकार केले.
■ शेख काकीचा मृत्यु दि. १५-११-१२३३ ला झाला.
■ काकी साहेबचा शिष्य शेख फरीद उद्दीन मसऊद गंजेशंकर याने चिश्ती संप्रदायाला व्यापक रुप प्राप्त करुन दिले.
■ हजरत शेख निजामुद्दीन औलिया (इ.स. 1238- 1325) हे बाबा फरीद यांचे शिष्य होते.
■ इ.स. १२५८ पासून दिल्लीत सुफी विचाराचे काम औलियांनी केले.
• अल्लाउद्दीन खिलजी व अन्य सुलतानाची भेट घेण्याचे वेळोवेळी औलियाने टाळले.
■ शेख निजामुद्दीन औलिया यांचा विरोध कट्टर उलेमांनी केला.
■ शेख निजामुद्दीन औलियास जनता 'महबूब इलाही' म्हणत असे.
■ औलियाचा शिष्य मुहम्मद तुघलक हा होता.
■ निजामुद्दीन औलियाची समाधी दिल्ली येथे आहे.
■ शेख हमीद-उद्दीन नगौरीने (इ.स. ११९२-१२७४) नगौर येथे चिश्ती सिलसिला चालवला.
■ चिश्ती सिलसिलेतील शेख नासिर-उद्दीन महमूद यास 'दिल्लीचा चिराग' म्हणतात.
■ शेख नासिर-उद्दीन महमूद हा औलियाच शिष्य होता.
■ चिश्ती सिलसिलेचे बंगालमध्ये केंद्र सिराजउद्दीन अली सिराजने काढले.
■ सैय्यद मुहम्मद गेसू दारज (इ.स. १३२०-१४२२) ने चिश्ती सिलसिले गुलबर्गा येथे स्थापन केले.
■ फत्तेहपूर सिक्री येथे चिश्तीचे केंद्र शेख सलिमने स्थापन केले.
■ सम्राट अकबर फत्तेहपूर सिक्रीतील चिश्ती संत शेख सलिमच्या दर्शनार्थ जात असे.
■ अकबराने शेख सलिम सुफीच्याच नावावर पुत्राचे नाव सलिम (जहाँगिर) ठेवले.
■ शाहजहाँच्या काळात चिश्ती सिलसिलेचा प्रभाव वाढला.
चिश्ती संताची वैशिष्टचे
साधे जीवन, पवित्रता, निर्धनता, स्वीकार, व्यक्तीगत संपत्ती ही आत्मिक उन्नतीत अडसर, विवाहित निवासस्थान साधे, प्राप्त दानावर उदर निर्वाह, फाटके वस्त्र धारण, ईश्वर चिंतन, एकेश्वरवादी.
■ औरंगजेब काळात चिश्ती संत शाह कालीमुला जाहरवादी याने धर्मनिरपेक्षतेचा प्रसार केला.
ब) सुहरावर्दी मालिका
■ सुहरावर्दी सिलसिलेचा संस्थापक शेख शहाबुद्दीन सुहरावर्दी I.S. 1145-1236 अहो होय.
■ सुहरावर्दी यांनी स्वःशिष्य शेख बहाउद्दीन जकारिया सुहरावर्दीला इ.स. ११८२-१२६३ भारतात पाठवून सुहरावर्दी सिलसिला स्थापन केला.
■ शेख बहाउद्दीन जकारियाने मुलतान येथे खानकाह स्थापन केला.
■ जकारिया सुहरावर्दीने आरामी आणि सुखी जीवन व्यतित केले.
■ इल्तुतमिशचा पक्ष सुहरावर्दीने घेतल्याने इल्तुतमिशने सुहरावर्दीस 'शेख-उल-इस्लाम' ही उपाधी दिली.
■ जकारिया सुहरावर्दीच्या मृत्युनंतर सुहारावर्दी सिलसिला मुलतान आणि उच्छ या दोन भागात विभागला.
■ सुहरावर्दी क्रमाची मुख्य केंद्रे पंजाब-सिंध-बंगाल असती.
ख्वाजा निजामुद्दीन फिरदौसीचा शिष्य शेख शरीफ उद्दीन यहय्याने फिरदौसी सिलसिला लोकप्रिय बनवला.
■ शेख शरिफ उद्दीन यांनी मकतुबात आणि मलफूजात ही दोन पुस्तके लिहिली.
ड) कादिरी सिलसिला
■ बगदाद निवासी शेख अब्दुल कादिर जिलानीने कादिरी सिलसिला स्थापन केला.
■ १५ व्या शतकात न्यामतुल्लाह आणि मखदुम मुहम्मद जिलानी याने कादिरी सिलसिला भारतात लोकप्रिय केला.
■ कादिरी संत मुल्लाशाह हा दाराशिकोहचा शिक्षक होता.
■ कादिरी सिलसिला अनुयायी गायनाच्या विरोधात होते.
■ कादिरी सिलसिला अनुयायी डोक्यास हिरवी पगडी बांधत.
e नकाशबंधी मालिका
■ ख्वाजी पीर मुहम्मद याने नकसाबंदी सिलसिला भारतात आणला.
■ ख्वाजा बाकी बिल्लाह (इ.स. १५६३-१६०३) याने हा सिलसिला भारतात लोकप्रिय केला.
■ नकशाबंदीचे अनुयायी संगीताचे विरोधक होते.
■ नकशाबंदी संत शेख अहमद सरहिंदीने कट्टरवादी मुस्लिम व सूफींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला.
अकबराच्या उदार नीतीचा विरोध सरहिंदीने केला.
जहाँगीराने इ.स. १६१९-२० ग्वाल्हेर किल्ल्यात सरहिंदीला कैदेत ठेवले.
■ दक्षिण भारतात मर्दरिया सिलसिला, गुर्जमार सिलसिला, सोहगिया सिलसिला, जलीलिया सिलसिला, मूसा सिलसिला, वहाबी सिलसिला हे होते.
डॉ. ताराचंद मते - सुफीवादाचे ०५ स्त्रोत.
१) कुराण
२) पैगंबराचे जीवन
३) ख्रिश्चन तत्त्वज्ञान (प्लेटो विचार)
4) हिंदू-बौद्ध धर्म
5) झोरोस्ट्रियन धर्म
ईश्वर एकरुपतेसाठी सुफीचे १० स्तर
1) तोबा (पश्चात्ताप)
६) शुक्र (कृतज्ञता)
२) वरा (उपोषण)
७) खौफ (भिती)
३) जुहद (कुराण)
८) रझा (आशा)
४) गर्व (गरिबी)
९) तवक्कुल (उपाय)
५) रिस्त (ईश्वर इच्छापुढे शरण)
१०) संयम (नियंत्रण)
■ दक्षिण भारतात दौलताबाद या ठिकाणी चिश्ती सिलसिलाची स्थापना शेख बुऱ्हाण दीन गरीब याने केली.
■ शेख हुसैनी गेसुदराज यांनी चिश्ती सिलसिला दक्षिण भारतात लोकप्रिय केला.
■ गेसूदराजच्या प्रयत्नामुळे गुलबर्गा येथे इस्लामी शिक्षणासाठी मदरसा स्थापन झाल्या.
0 Comments