मुघल प्रशासकीय व्यवस्था
■ मुगल प्रशासनाबद्दल माहिती देणारे प्रमुख साधन फजलद्वारा लिखित 'आइने-ए-अकबरी' होय.
■ दस्तू-उल-अमल अर्थात शासकीय नियमावली शाहजहाँ आणि औरंगजेब काळात नोंदवण्यात आली.
अ) केंद्रीय प्रशासन
■ मुगल प्रशासन व्यवस्था मुळतः फारस आणि अरब प्रशासन व्यवस्थेवर आधारित होती
■ मोगल बादशाहचे प्रशासन अत्याधिक केंद्रीत असल्याने कागदाचा प्रभाव असल्याने मोगल प्रशासनास 'कागदी राज्य' म्हणत.
■ मोगल बादशाह राज्यप्रमुख, सेनापती, न्यायाधिश आणि इस्लाम संरक्षक होता.
■ मोगल बादशाह हा कुरान सिद्धांतानुसार अमीर- उल-मोमीन (इस्लाम प्रजेचा राजा) होता.
■ बाबर आणि हुमायूनने अमीर-उल-मोमीन म्हणून राज्य केले.
■ मोगल बादशाहच्या साह्यासाठी प्रारंभी ४ मंत्री होते व नंतर ८ मंत्री राहिले.
■ मोगल बादशाह खलिफास सर्वोच्च शासक मानत नसत.
■ राज्याभिषेक राजधानी बाहेरही होत. उदा. अकबराचा राज्याभिषेक पंजाबमध्ये गुरुदासपुर येथे झाले.
■ मोगल बादशाह दीवाने खास, गुसलखाना, खाजगी कक्ष आणि न्याय दरबर या चार ठिकाणापासून राज्यकारभार करत असे
मंत्री आणि उच्च अधिका-यांशी गुप्त चर्चा बादशाह करीत असे त्यास गुसलखाना म्हणत. अकबर गुसलखान्यात धार्मिक चर्चा करे तर जहांगिर मद्यपान करत असे.
■ मोगल बादशाह दर बुधवारी 'दिवाने-आम' मध्ये न्यायदान करे त्यास 'न्यायदरबार' म्हणत.
■ औरंगजेबाकडे वजीर पदही होते.
■ वजीर हा राज्याचा प्रधानमंत्री होता.
■ अकबराच्या काळात प्रधानमंत्र्याला 'वकील' तर अर्थमंत्र्याला 'वजीर' म्हणत.
■ 'वजीर' हा राज्यव्यवहार/राजस्व आणि अन्य विभागाचा प्रमुख अस.
■ वजिराचे सामान्यतः कार्य मुलकी होते.
■ वजिराच्या साह्यास दीवाने आम (वेतन हिशोबनीस) व दीवाने खास (सम्राट भूमीचा व्यवस्थापक) हे होते. 'मीरबख्शी' हा सर्वोचवेतन अधिकारी होता.
■ मीरबख्शी चे कार्य सैन्यभरती, निरक्षण, शस्त्रपुरवठा इत्यादी होते. युद्ध क्षेत्रावर सैन्याचे वेतन देणे, खर्च करणे हे कार्य मीरबख्शीचे होते.
■ 'खाने सामान' हा शाही परिवाराचा ' भंडारी' होता वेत
■ 'भंडारी' हा राजपरिवाराला आवश्यक वस्तूंचा पुरवठा करे, युद्ध समयी व यात्रा प्रसंगी बादशाहची संपूर्ण व्यवस्था भंडारीच पाहत असे.
■ बादशाहचा दैनंदिन खर्च, भोजन, तंबू इत्यादीची व्यवस्था भंडारी करे. सदरे सदूर हा मंत्री सम्राट आणि प्रजा यांच्यातील दुवा होता.
■ सदरे सदुर हा मुस्लिम कायद्याचा संरक्षक आणि उलेमांची प्रतिनिधी होता.
■ सदरे सदूर हा उलेमांना बक्षीसरुपात जहागिरी वत निर्धन व्यक्तींना दान-दक्षिणा देत असे. अक
■ प्रांतात (सुभा) एक सदरची नियुक्ती सदरे-सदुर करत असे.
■ 'मोहतसीब' हा मंत्री प्रजाचे चरित्र आणि व्यवहार पाहत असे, मोहतसीबचे कार्य पैगंबराच्या आज्ञानुरूप जनतेस जीवन व्यतित करु देणे होते.
■ मोहतसीब सैन्याच्या मदतीने मद्यालय बंद करे आणि वजने आणि माप यांचीही पडताळणी करे.
■ सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधिश 'काजी-उल-कुजात' हा होता.
■ 'काजी-उल-कुजा' हा सुभा, नगर व जिल्हा न्यायाधिशांची नियुक्ती करत असे, काजीच्या साह्यासाठी 'मुफ्ती' असत.
■ 'बयुतात' हा अधिकारी मृत व्यक्तीकडे असणाऱ्या कर्जाच्या रकमा त्याच्या संपत्तीतून वसुल करे. 'बयतात' हा वस्तुमूल्य निर्धारित करत असे.
'तोफखाना' प्रमुख अधिकारी मीरबख्शी हा होता. मीरबख्शीचे अथवा दारोगा तोफखानाचे कार्य किल्ले महल सुरक्षा हे होते.हिशीद
• गुप्तचर आणि पोस्ट विभाग दरोगा-ए-डाक पोस्टच्या नियंत्रणाखाली
धार्मिक दा
मुख्य सरदार
तोफखाना..
मीर आतिश / दरोगा-ए-तोफखाना
पोस्
दरोगा-ए-डाक-चौकी
■ बाबरचा वजीर मोहम्मद खलिफा, हुमायून वजीर हिंदुबेग, अकबराचे दिवाण शाहमंसूर, मुजफ्फरखाँ व तोडरमल हे होते.
■ अकबराने इ.स. १५६५ ला वकिलाकडून आर्थिक अधिकार काढून वित्त मंत्र्यांस दिले
(ब) प्रांतीय प्रशासन
■ मोगल साम्राज्य अनेक प्रांतात विभक्त होते व प्रांतसंख्या कमी-अधिक होत असे.
■ मोगल साम्राज्यात अकबर काळात १५, जहाँगिरकाळात १७, शाहजहाँ काळात २२ तर औरंगजेब काळात २२ प्रांत होते.
अक बरकालीन १५ सुभा
काबूल, अवध, अलाहाबाद, बिहार, बंगाल, पंजाब, माळवा, अजमेर, गुजरात, बेरार, सुलतान, दिल्ली, आग्रा, खानदेश, अहमदनगर
■ जहाँगिराने बंगालचे विभाजन करुन अलग ओरिसा हा सुभा बनवला.
■ शाहजहाँने काबूलपासून काश्मीर, मुलतानपासून सिंध तर अहमदनगरपासून बिहार हे अलग सुभे बनवले.
■ इ.स १६४८ ला ईराणने मोगल सम्राटाकडून काबूल हा प्रांत हस्तगत केला.
■ 'सुभा' प्रमुखास 'साहिब-ए-सुबा/सुभेदार/नाजिम' म्हणत.
• सुभा प्रमुखाच्या साह्यास दीवाण, बुख्शी, फौजदार, कोतवाल, काजी, सदर, आमिल, बितीकची, पोतदार, खजिनदार, वाकयानवीस, कानूंगो, पटवारी इत्यादी होते.
सुभेदारास मुलकी आणि लष्करी अधिकार होते
दीवाण आणि सदर या अधिकाऱ्यांना पदच्यूत करण्याचा अधिकार सुभेदाराचा नव्हता.
सुभेदारांच्या बदल्या केल्या जात असत.
सुभेदार प्रांताचा कारभार प्रांत राजधानीतून करत असे.
दिवाण प्रांताचा दुय्यम अधिकारी होता.
• दिवाण आणि सुभेदार हे प्रतिद्वंदी होते ते परस्परांच्या अधिकारावर लक्ष ठेवण्याचे कार्य करत.
■ प्रांतीय दिवाण केंद्रिय दिवाणामार्फत नियुक्त होत असत.
■ प्रांतीय दिवाणाचे कार्य राजस्व वसुल करणे हे होत.
■ दिवाण थकित महसूल ५% व्याज दराने वसुल करे.
■ दिवाण तकावी कर्ज वर्तमान वर्षाच्या प्रथम पिकावर वसुल करे.
■ सुभा सरकार आणि परगण्यात विभक्त असे.
■ सुभेदार फौजदाराची नियुक्त स्थानिक प्रशासनासाठी करत असे.
■ फौजदाराचे कार्य स्थानिक प्रशासन सांभाळणे व स्थानिक असंतोष नष्ट करणे हे होते.
■ सुभ्यामध्ये केंद्रिय शासन 'सदर' नियुक्त करत.
■ 'सदर' चे मुख्य कार्य आर्थिक आणि सार्वजनिक कार्यासाठी दिलेल्या जमिनीचे व्यवस्थापन करणे
हे होते.
■ सार्वजनिक व धार्मिक कार्यासाठी दिलेल्या
जमिनीला 'सयरगुल' असे म्हणत. प्रांतीय
दिवाणापेक्षा 'सदर' हा अधिकाराने स्वतंत्र होता.
■ 'सदर' च्या अधिकारात काजी आणि मीर अदल
हे कार्य करत.
■ आमिल हा महसूल वसुल करणारा प्रांतीय अधिकारी
होता, आमिल जमिनीचे निरिक्षण, व्यवस्थापन, उत्पादन क्षमता, मोजमाप इत्यादीची पडताळणी करत असे.
■ मीरबक्षी हा केंद्रिय सैन्याचे वेतन देणारा अधिकारी होता तर बक्षी हा प्रांतीय सैन्याचे वेतन देणारा अधिकारी होता.
■ आमिल अधिकाऱ्यावर लक्ष ठेवणारा 'बितकची' हा अधिकारी राजस्व नोंदी ठेवणारा अधिकारी होता, पोतदार/खजिनदार हे महसूल राज्यकोषात जमा करत.
■ कारकुन, कानूनगो व पटवारी हे प्रांतीय सुभेदाराचे साह्यक होते.
■ पटवारी महसुलोच्या नोंदी तर मुकदम गावात शांतता ठेवण्याचे कार्य करे.
कोतवाल
■ शहर रक्षा-विभागाचा अधिकारी कोतवाल होता.
■ कोतवाल कर्तव्याचा उल्लेख ऐन-ए-अकबरमध्ये आहे.
■ नगरात शांतता आणि कायद्या सुव्यवस्था ठेवणे कर्तव्य.
■ नगर सुरक्षासाठी रात्री पहारा देणे.
■ अनिच्छेने सती जाण्यापासून परावर्तित करणे.
■ मद्यपान द मद्यविक्री बंदोबस्त ठेवणे.
■ प्रांतातील घटनांची नोंद ठेवणारा 'वाकयानवीस' हा अधिकारी होता.
(a) जिल्हा प्रशासन
■ सुभा हा सरकार अथवा जिल्ह्यात विभक्त होता.
जिल्हा प्रमुख 'फौजदार' हा होता.
■ फौजदार सुभेदाराच्या अधिकाराची व आज्ञाची अमलबजावणी करे.
■ फौजदार हा जिल्ह्याचा मुलकी व लष्करी प्रमुख होता.
(ड) परगणा प्रशासन
■ जिल्हा अथवा सरकार हा परगणा अथवा महल मध्ये विभक्त होता.
■ परगणा प्रशासनासाठी शिकदार, अमिल, पोतदार व बितकची हे अधिकारी नियुक्त होते.
■ नगर प्रशासन प्रमुख कोतवाल हा होता तर नगर अनेक मोहल्लयात विभक्त असे.
(e) ठाणे प्रशासन
■ शासकीय व्यवस्था व कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी थाना क्षेत्र होते.
■ 'थाना/ठाणे' हे असंतुष्ट प्रदेश आणि शहराठिकाणी असे
■ ठणेप्रमुख 'थाणेदार' हा होता.
■ सुभेदार आणि दिवाण थानेदाराची नियुक्ती करे
■ थानेदार हा फौजदार (जिल्हा प्रमुख) अधिन कार्य करे
(ई) किल्ले व बंदर प्रशास
■ मोगल बादशाहांनी अनेक किल्ले बांधले
■ किल्ला प्रमुख किल्लेदार होता.
■ किल्लेदार म्हणून उच्च मनसब प्राप्त मनसबदारांना मिळत असे.
■ किल्लेदार फौजदारांप्रमाणे अधिकार प्राप्त अधिकारी होता.
■ बंदर व्यवस्थापकास 'मुत्सद्दी' म्हणत.
■ सम्राट हा 'मुत्सद्दी' ची नियुक्ती करत असे.
■ मुत्सद्दी हे पद बोली पद्धतीने (लिलाव) दिले जाई. पोलीस ग्राम, जिल्हा आणि नगर या तीन प्रकारचे होते.
(f) मुघलकालीन लष्करी व्यवस्था
■ मुगल साम्राज्याचा विस्तार सैन्य सुव्यवस्थित असल्या कारणानेही झाला.
■ मुगल सैन्य व्यवस्थेत घोडेस्वार, हत्तीदल, तोफखाना, पैदल सैन्य आणि जलसेना या पाच भागात होते.
■ अबुल फजल मते घोडेस्वारांचे ८६ भाग होते.
घोडेस्वार ०६ भाग
■ मांडलिंक राजा आणि सरकारद्वारा बादशाह भेट दिलेले
■ मनसबदारांचे घोडेस्वार
■ अहदी घोडेस्वार (बादशाहचे संरक्षक)
■ बरबर्दी घोडेस्वार (निम्न नस्लचे घोडे)
■ दाखिली घोडेस्वार (मनसबदाराकडे दाखल झालेले)
- कुमकी घोडेस्वार (युद्ध समयी मनसबदारांनी भरती केलेले)
∎ हत्ती सैन्य दल ०७ प्रकारचे होते तर पैदल सैन्यात ) । तिरंदाजी, पहलवानी आणि तलवारबाज असत. ■ तोफखाना हा प्रत्यक्ष बादशाहच्या अधीन होता.
औरंगजेबाने तोफखान्यात केवळ कन्नौजच्याच तोपचींची भरती केली होती.
■ विजापूरची मालिके-मैदान, जुनागढची ललिततोफ तर आग्ऱ्याची मोठी तोफ प्रसिद्ध होत्या
पोर्तोगिजांचा तोफखाना मोगलांपेक्षा श्रेष्ठ होता. मोगलांची नाविक सेनासुद्धा श्रेष्ठ नव्हती.
मुस्लिम दरवर्षी हजयात्रेस सागरी मार्गे जात.
■ ■ केंद्रिय सैन्य सेनापतीच्या, प्रांतीय सैन्य सुभेदाराच्या तर जिल्ह्यात सैन्य फौजदाराच्या अधिकारात असे.
मोगलांचे प्रसिद्ध किल्ले
अलाहाबाद
अजमेर
रणथंभोर
औरंगाबाद
कालिंजर
ग्वाल्हेर
कंधार
विजापूर
चुनार
लाहोर
असीरगड
गोवळकोंडा
रोहतासगड
दिल्ली
दौलताबाद
आग्रा
■ मोगल सैन्यात शान आणि सौकत हे दोन दोष होते.
■ सम्राट अकबराने स्वीकारलेली सैन्य व्यवस्था 'मनसबदार प्रथा' नावाने ओळखतात.
(ग) मोगलकालीन न्यायव्यवस्था
■ मुघलांच्या काळातील न्यायव्यवस्था ही दिल्ली सल्तनतच्या न्यायव्यवस्थेसारखीच असती.
■ मोगलकाळात धार्मिक, सामान्य आणि राजकीय विधीनियमाची न्यायालये होती.
■ धार्मिक विधी नियमांच्या न्यायालयाचा न्यायाधिश
'काजी' असती.
राजकीय खटले बादशाह चालवे.
धार्मिक न्यायालयाचा आधार 'शरियत' होती.
प्रांतपाल, कोतवाल, फौजदार हे स्थानिक ठिकाणी
न्यायनिवाडा करण्यात मदत करत.
सामान्यांच्या न्यायालयाचा आणि काजींचा व शरियतचा संबंध नव्हता.
राज्य न्यायालयात बंड, विश्वासघात, चोरी, राजमार्गावर लूट, खून इत्यादीचे खटले चालत.■ धार्मिक न्यायालयात धार्मिक संस्था, कुटुंब कायदा, वारसा कायदा इत्यादीचे खटले चालत.
• राजकीय न्यायालयात वापरण्यात येणाऱ्या विधी नियमास 'ऊर्फ' म्हणत
■ 'ऊर्फ' म्हणते अलिखित कायदा.
■ इस्लामी विधी शास्त्रानुसार परमेश्वराविरुद्ध केलेले गुन्हे, राज्याविरुद्ध केलेले गुन्हे, सामान्य व्यक्ती विरुद्धचे गुन्हे या तीन प्रकारचे गुन्हे होते.
■ इस्लाम विधी शास्त्रानुसार 'हद्द', 'तझीर', 'किसास', 'तशहीर' या चार प्रकारच्या शिक्षा होत.
■ 'हद्द' शिक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार धार्मिक विधिनियमांनुसार दिलेली शिक्षा होती.
'मर्यादित' शिक्षण
• व्यभिचाराबद्दल दगड मारून ठेचणे.
■ शारीरिक संबंध (अनैतिक) ठेवणाऱ्यास १०० फटकै.
■ विवाहितावर खोटा आरोप (व्यभिचाराचा) ८०
फटके.
■ दारू पिणे ८० फटके
■ चोरी गुन्ह्यास उजवा हात कापणे
■ दरोडा दोन्हीं पाय तोडणे, इत्यादी
■ 'तझीर' शिक्षा उद्देश गुन्हेगाराचे हृदय परिवर्तन करणे हा होता.
'तझीर' 05 प्रकार
■ जाहीरपणे ताकीद देणे.
न्यायालयापर्यंत ओढत नेणे.
तुरुंगात डांबणे.
हद्दपार करणे.
■ शारीरिक त्रास करणे.
■ आर्थिक शिक्षा देणे.
■ 'किसास' प्रकारच्या शिक्षा म्हणजे गुन्हेगाराचे 'उट्टे' काढणे होय.
■ 'दिया' प्रकारच्या दिलेल्या शिक्षात झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई द्यावी लागे.■ 'तशहीद' शिक्षा म्हणजे लोकासमोर मानहानी करुन शिक्षा देणे होय.
■ जिझिया कर न देणाऱ्यास मृत्युदंड दिला जात असे. अकबराने चोरी करणाऱ्यास बाण मारून ठार मारण्याची शिक्षा दिली.
■ अकबर-जहाँगीर-शाहजहाने पशुहत्या बंदी घातलेल्या दिवशी पशू हत्या करणाऱ्यास शिक्षा दिल्या.
■ अकबराने चुलत-मावस भावातील विवाह, बालविवाह, बहुपत्नी विवाह बेकायदेशीर ठरविले.
■ औरंगजेब काळात दिवाळी - होळी सण मानणे, यमुना-साबरमती काठी अग्निसंस्कार करणे, अमावस्या व एकादशीस व्यवहार बंद ठेवणे गैर होते.
■ काजी-उल-काजी हा सर्वोच्च न्यायाधिश होता.
■ खटले काजी, मुफ्ति, मीर आदिल चालवत, 'काजी' हा हिंदू - मुस्लिमांचे दिवाणी-फौजदारी खटले चालवत.
■ इस्लामी न्याय पद्धत (शरियत विधी नियम) असा मिस्र जीवन पद्धतीवर आधारित होता.
■ अकबराने हिंदु खटले निवाड्यात काढण्यासाठी ब्राह्मणांना नेमले.
■ किंल्ल्यामध्ये गुन्हेगारांना कैदेत ठेवण्यात येई. कैदेतील काही व्यक्तींना बादशाह राज्य रोहणाच्या स्मृतीदिनी मुक्त करत असे.
■ अपराध्यास मोगल बादशाह सामान्यतः मंगळवारी मृत्युदंड देत असत.
■ ग्वाल्हेरच्या किल्ल्यात अपराध्यांना अफू देऊन मारण्यात येत असे.
औरंगजेबाने दाराशिकोहला ग्वाल्हेरच्या किल्ल्यात अफू देऊन मारले होते.
0 Comments