Subscribe Us

सुल्तान शाही काळातील प्रशासन व्यवस्था

 दिल्लीत सल्तनत प्रशासन व्यवस्था

(a) केंद्रीय प्रशासन


• दिल्ली सल्तनत प्रशासन धार्मिक होते. • इस्लाम हा दिल्ली सम्राटाचा धर्म होता.

• सुलतान हा प्रशासनाचा सर्वोच्च शासक होता. प्रशासनाचा उद्देश दारुल-हबचे (काफिर देशाचे) रुपांतर दारुल इस्लाम (इस्लाम देशात) करणे हा होता.

• खलिपा हा मुस्लिम साम्राज्याचा प्रमुख होता. खलिफा कडुन वस्त्र घेन सलतान राज्यकारभार करे.

सुलतान खलिपाचे नाव नाण्यावर अंकित करत व खलिपा नावे 'खुतबा' वाचला जाई.

■ अल्लाउद्दीन खिलजीने खलिपा सत्ता मानली नाही तर कुतुबुद्दीन मुबारकने स्वतःला खलिपा म्हणून घोषित केले.

• भारतीय सुलतानांनी नाममात्र खलिपाची सत्ता मान्य केली होती.

सुलतान

■ सुलतान हा दिल्ली सल्तनतचा प्रमुख होता.

■ सुलतान उलेमा, सरदार व अमीर लोक निवडत असत.

■ सुलतान उत्तराधिकारीसाठी कधी कधी पैतक नियम पाळला जातअसे.

• रझिया सुलताना ही पहिली भारतीय महिला सुलतान असती.

• सुलतान मुलकी, लष्करी, न्यायिक व महसूल व्यवस्थेचा प्रमुख होता.

• सुलतानच्या मंत्रिपरिषदेला 'मजलिस-ए-खलवत' म्हणत.

• मंत्री परिषदेचा सल्ला सुलतानावर बंधनकारक नव्हता.

राय-जान-ए-दरगाह म्हणजे शाही परीषद असे. शाही परिषदेत ०४ मंत्री असत.

सुलतान 'बार-ए-आझम' पब्लिक हॉलमधून पदभार स्वीकारतील.

- अमीर-ए-हजीब हा अधिकारी सुलतानाकडे जनतक्रारी मांडत असे.

वजीर

• दास सुलतान काळात वजीराचे वजीर, आरिझ- ए-मुमालिक, दीवान-ए-इंशा, दीवान-ए-सालात या चार प्रकारचे होते.

• सुलतानानंतर सत्ता वजीराच्या हातात असे. दिल्ली सल्तनत काळात ०६ वजीर होते.

6 वजीर

१. वजीर

4. दिवाण-ए-सलत

2. अरिज-ए-मुमालिक

५. सदर-उस-सुदुर

3. दिवाण-ए-इंशा

6. दिवाण-ए-कज

■ वजीराचे कार्यालय 'दीवान-ए-विजारत' हे होते.

- बादशाहाच्या अनुपस्थित सल्तनत राज्यकारभार वजीर पाहत असे.

- वजीर सुलतानास राज्यकारभारात सल्ला आणि भदत करे.

■ वजीराच्या हाताखाली 'नायब वजीर' असत.

■ 'नायब वजिराच्या' हाताखाली 'मुशारिफे मुमालिक' असत ज्यांचे काम मोजणी हे होते.

■ राज परिवारातील व्यक्तींना प्रतिष्ठा व सन्मान होता.

■ सुलतानच्या ज्येष्ठ पत्नीला 'मलिक-ए-जहाँ' आणि आईला 'खुदबंदे-जहाँ' किंवा 'मखदूम-ए-जहाँ' म्हणतात.

■ राज परिवाराच्या वस्तु व अन्नधान्यास 'रसद' तर रसद पुरवठा विभागास 'कारखाना' म्हणत.

■ राजाचा जनानखानास 'हरम' अथवा 'अंतःपुर' म्हणत.

दिल्ली सल्तनत मंत्री अधिकारी

वजीर

पंतप्रधान

नायब वजीर

वजीराचे साह्यक

मुशरिफ मुमालिक

नायब वजीराचे साह्यक

परराष्ट्र मंत्री

सदर-उर-दूर

इस्लामचे नियम, दिग्दर्शक

दिवाणे-अरिझ

युद्ध विभाग

दिवाणइंशा

शाही पत्र व्यवहार विभाग

दिवाने-ए-खास

शाही पत्रव्यवहार प्रमुख

डबीर

दिवाने-ए-खासचे सहाय्यक

बरीद-ए-मुमालिक

वाटाघाटी विभागाचे प्रमुख

वकील-ए-दा

हॅरेम विभाग प्रमुख

नायब-उल-मुल्क

केंद्रिय प्रशासन क्षेत्र देखरेख प्रतिनिधी

अरिज-ए-मुमालिक

सेनापती

(व) प्रांतीय प्रशासन

■ सल्तनत प्रशासन प्रांतात विभक्त होते. त्यास 'इक्ता' ग्हणत. 'इक्ता' प्रमुखास 'मुक्ती/गव्हर्नर' म्हणत.

■ मुक्ती हा प्रांताचा सर्वाधिकारी होता. नव विजीत प्रांत सैनिक प्रांताध्यक्षांच्या अधीन असत त्याला 'वालिस' म्हणत.

■ प्रांतास इक्ता' अथवा 'सुभा' म्हणत.

■ प्रांत दोन प्रकारचे होते अधिकार मर्यादित असणाऱ्या प्रांतास 'इमारते आम्मह' म्हणत तर मुक्तीला न्याय आणि सैनिकी अधिकार असणाऱ्या प्रांतास 'इमारते खास्सह' म्हणत.

■ 'साहेब दीवान', 'नजीर', 'वक्फ' हे अधिकारी प्रांत कारभार चालवत. 

प्रांताची महसूल व्यवस्था दीवाण-ए-साहिब सांभाळत असे.

■मोहम्मद तुघलगाच्या काळात २३ प्रांतात साम्राज्य विभक्त होते.

■ 'हकीम' म्हणजे र होत.

दिल्ली सल्तनत - 23 प्रांत

इक्ता/शिक मध्ये 'शिक' सरकारमध्ये, सरकारच्या चार परगण्यात परगणे गावांत विभक्त होते.

(a) जिल्हा-गाव प्रशासन

■ 'गांव' हा सल्तनचा सर्वांत लहान विभाग होता,

प्रांत जिल्ह्यात विभक्त असे.

जिल्ह्यास 'शिक' म्हणत.

जिल्हा प्रमुखास 'अमील/नजीम/शिकदार' म्हणत.

शंभर गावाच्या समुहाचा प्रशासकीय अधिकारी 'अमीर-ए-सदा' होता.

■ अमीरान-ए-सदाच्या साह्यास मुस्तसरीफ, कारकून, बलाहार, मुकदम, चौधरी व पटवारी असत.

■ गावांचा कारभार पंचायत चालवे 'मुस्ती' हा अधिकारी असे.

■ प्रांता व्यतिरिक्त कांही भागास 'खालसा' म्हणत. खालसा अधिकाऱ्यास 'अमीर/शहाना' म्हणत.

(ड) सल्तनतकालीन न्यायव्यवस्था

■ इस्लामी कायदा, कुराण, हदीस, इज्मा आणि कियास या चार गोष्टींवर आधारित असे.

■ इस्लाम विधी परंपरागत ५०० संप्रदायापैकी हनफी मलिकी, शाफी, हनली संप्रदायावर आधारित होती.

■ हनफी, शफी, मलिकी व हनबली हे संप्रदाय सुफी होते.

■ मलिकी आणि हनबली ही मुलभूतवादी तर शफी आणि हनफी बुद्धिवादी होते.

इस्लामी विधी संहिताचा उगम दैवी प्रेरणेत आहे. सुलतान काळात पाच प्रकारची न्यायालये होते.

• दिवाण-ए-कझा, दिवाण-ए-मजालिक, दिवाण-ए-सियासत ही तीन वरिष्ठ न्यायालये होती.

■ वरिष्ठ काझी हा सर्वोच्च न्यायाधिश असे. त्याला काझी-इ-मुमालिक म्हणत.

■ प्रांतात न्यायदान मुक्ती अथवा अमीर करत असे.

■ मझालिक म्हणजे प्रांतीय दीवानी आणि फौजदारी न्यायालय होते.

■ कोतवाल हा पोलिस अधिकारी फौजदारीचे प्रारंभिक खटले चालवत असे.

■ साक्षीदारांना बोलावणे व न्यायनिवाडा आदेश अमलबजावणी 'अमीर-दाद' करत असे. 'दादबेक' हा अधिकारी न्यायदान करे.

(e) सल्तनत काळात लष्करी व्यवस्था

■ सल्तनतकाळात सैन्य ४० प्रकारचे होते. - स्थायी सेना, प्रांताची स्थायी सेना, युद्ध काळात भर्ती सेना, जिहाद सेना.

■ दिल्ली स्थित (केंद्रिय) सेनेस 'हश्म-ए-कल्ब' म्हणत.

■ 'हश्म-ए-कल्ब' दोन प्रकारची होती. सुलतानसेना आणि सरदार सेना.

सुलतानाच्या 'हश्म-ए-कल्बला' 'खसाह-खैल' तर सरदारांच्या सैन्यास 'अफवाज-ए-कल्ब' म्हणतात. स्थायी सेना सर्व प्रथम अल्लाउद्दीन खिलजीने ठेवली.

सल्तनत सैन्यात तुर्की, ताजीक, फारसी, मंगोल, अफगाण, अरबी, अॅबिसिनियन व भारतीय मुस्लिम व हिंदू होते.

अल्लाउद्दीन सैन्यात ७० हजार घोडे होते.

पायी सैनिकांचे 'पाइक' देह ।

■ धनुर्विद्येत निपुण सैन्यास 'धनुक' म्हणत. हत्तीदल विभागाच्या प्रमुखास 'शहनाह-ए-फील' म्हणत.

■ लष्करी यंत्रणा दशमान पद्धतीनुसार आयोजित करण्यात आली होती.

घोडेस्वार दल रचना

१० घोडेस्वार = १ सर-ए-खैल.

10 सर-ए-खैल = 1 कमांडर

10 सरदार = 1 श्रीमंत

10 अमीर =1 मलिक

दगड आणि लोखंडाचा गोळा मारा करणाऱ्या यंत्रास 'मंगनीक/मंगोनेल' अथवा 'मंगान' म्हणत.

Post a Comment

0 Comments