प्रश्न 1 - दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा
(विकिरण, निर्जलीकरण, पाश्चरायझेशन, नैसर्गिक संरक्षक, रासायनिक संरक्षक)
(1) शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला असे म्हणतात.
(2) दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्नपदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला असे म्हणतात.
(3) मीठ हे आहे.
(4) व्हिनेगर हे आहे.
उत्तर (१) निर्जलीकरण (२) पाश्चरायझेशन (३) नैसर्गिक संरक्षक
(4) रासायनिक संरक्षक
प्रश्न 2 - खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
(1) दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात ?
उत्तर - पाश्चरीकरण या पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत
तापवतात. उदा. दूध 80° सेल्सिअसला 15 मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब ते थंड केले जाते. यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते.
(2) भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत ?
उत्तर - भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्याने वेगवेगळे परिणाम दिसून येतात. (i) काही भेसळीच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते.
(ii) काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न पदार्थ दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात. (iii) तसेच कॅन्सरसारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो म्हणून भेसळयुक्त अन्नपदार्थ खाऊ नयेत.
(3) घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आईबाबा काय काळजी घेतात ?
उत्तर - घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी आमचे आईबाबा पुढीलप्रमाणे काळजी घेतात. (i) अन्न नेहमी झाकूण ठेवतात (ii) स्वयंपाक घर स्वच्छ व
निटनेटके ठेवतात. (iii) आवश्यक तेवढेच अन्न ताटात वाढून देतात.
(iv) शिल्लक अन्न योग्य पद्धतीने ठेवतात. जेणे करून ते पुन्हा वापरता येईल.
(v) आवश्यक तेवढेच फळे, भाज्या खरेदी करतात. (vi) हवाबंद डबे, बाटल्यांमधील पदार्थांची वापरण्यायोग्य तारीख पाहून घेतात व त्या तारखेपूर्वीच हे पदार्थ वापरतात.
(4) अन्नबिघाड कसा होतो ? अन्नबिघाड करणारे विविध घटक कोणते ? उत्तर- अन्नपदार्थांचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यांमध्ये बदल होणे व
त्यांतील पोषकद्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्नबिघाड होय.
अन्नबिघाड करणारे विविध घटक
(i) काही वेळा फळे-फळांच्या साली काळपट पडतात. काही पदार्थांना कडवट किंवा नकोसा वाटणारा घाणेरडा वास येतो. हे पदार्थ खाण्यास अयोग्य असतात. (ii) काही वेळा निसर्गतः मिळणारे पदार्थ मानवी प्रक्रियेमुळे बिघडतात. उदा. जास्त शिजवणे, ओलसर जागी ठेवणे, अयोग्य साठवणूक यांमुळे पदार्थांचा दर्जा बिघडतो. (iii) फळांचा रंग काळपट होणे, चव बदलणे, मांसाला आंबट वास येणे, शेंगदाणे खवट लागणे अशा प्रकारचे बदल अन्नपदार्थात घडतात. हे सर्व बदल अंतःस्थ घटकांमुळेच होतात. (iv) शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळा त्यांना इजा पोहचते. जसे, अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे ते खराब होतात. (v) काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते खराब होतात. (vi) बऱ्याच वेळा हवा, पाणी, जमीन यांमधील सूक्ष्मजीव किंवा कीटकांचा अन्नामध्ये प्रवेश होऊनही अन्नात बिघाड होते.
(5) अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतींचा वापर तुम्ही कराल ?
उत्तर - अन्नधान्य आपल्याला आवश्यक असेल तेव्हा उपलब्ध होण्यासाठी, टिकवण्यासाठी विविध उपाय योजावे लागतात) हे उपाय करत असताना अन्नाची गुणवत्ताही टिकवावी लागते. अन्नपदार्थ टिकवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो.
(i) धान्य टिकवण्यासाठी वाळवणे हा मुख्य उपाय आहे. धान्यामधील पाण्याचे प्रमाण कमी केल्यास ते जास्त काळ टिकते. उन्हात वाळवणे, कोरड्या
जागी साठवणे, साठवणीच्या ठिकाणी उंदीर, घुशींचा उपद्रव होऊ नये म्हणून उपाय करणे. कीटकांपासून संरक्षण मिळावे म्हणून कडुलिंबाचा पाला किंवा संरक्षक रसायनांचा वापर करणे.
(ii) शिजवलेले पदार्थ सूक्ष्मजीवांच्या वाढीने लवकर खराब होण्याची शक्यता असते. ते जास्त काळ टिकत नाहीत. म्हणून दूध, आमटी, सार यांसारखे पदार्थ वारंवार उकळावे लागतात.
(iii) सूक्ष्मजीवांची वाढ तापमानावर अवलंबून असते. कमी तापमानात साठवण केल्यास पदार्थ जास्त वेळ चांगले टिकतात. थंड जागी पालेभाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतात. पालेभाज्या, फळे, शिजवलेले अन्न टिकविण्यासाठी ते कमी तापमानामध्ये साठवणे आवश्यक आहे. रेफ्रिजरेटरमध्ये 5° से च्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. अशाप्रकारे अन्न टिकवण्यासाठी आम्हीं या पद्धतींचा वापर करू.
प्रश्न 3 काय करावे बरे ?
(1) बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात.
उत्तर - उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे आरोग्यास घातक असते. त्यावर धूळ, माश्या बसतात. असे पदार्थ खाल्ल्याने आपण रोगाला आमंत्रण देतो. यासाठी असे उघड्यावरील मिठाई खरेदी करू नये. तसेच मिठाईवाल्यांना आरोग्या-
विषयी समजावून सांगू
(2) पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे.
उत्तर - अशा ठिकाणी आम्ही पाणीपुरी खाणार नाही व त्या विक्रेत्याला
प्रश्न 6 - असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
(1) गुणात्मक अन्ननासाडी होत आहे.
उत्तर अन्नरक्षण करताना अन्नसुरक्षेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे, अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते ग्राहकापर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, तसेच द्राक्षे, आंबे याची अयोग्य हाताळणी इत्यादी गोष्टी अन्नाच्या गुणात्मक नासाडीला कारणीभूत ठरतात.
उपाय - (i) परिरक्षकांचा अतिरेकी वापर टाळणे. (ii) अन्न जास्त वेळ व उघडे शिजवू नये. (iii) भाज्या पहिले धुवाव्या व नंतर चिराव्या. (iv) अन्न तयार
होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज बांधून घ्यावा.
(2) शिजवलेला भात कच्चा लागत आहे
उत्तर - शिजवतांना भातात पाणी कमी झाल्यामुळे भात कच्चा राहिला.
उपाय - त्या भातात थोडे पाणी टाकून त्याला प्रेशर कुकर मध्ये ठेवून दया व एक शिटी होऊ दया.
(3) बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे.
उत्तर - गव्हाच्या पिकाची कापणी झाली तेव्हाच तो गहू थोडा ओलसर असावा. त्याला नीट न वाळविल्याने तो ओलसर राहिला.
उपाय त्याला दोन दिवस कडक उन्हात वाळू दयावे. म्हणजे वर्षभर टिकेल व त्याला कीड ही लागणार नाही.
(4) दह्याची चव आंबट / कडवट लागत आहे.
उत्तर - हे दही ताजे नसावे. दही जास्त दिवस राहिल्यास ते चवीला आंबट व कडवट होते. कारण त्यात जिवाणूची जास्त प्रमाणात वाढ होते
उपाय - दही जास्त दिवस साठवून ठेवू नये. दही आबंट व कडवट लागल्यास ते फेकून न देता गोडलिंबाच्या झाडाला टाकावे. त्यामुळे गोडलिंबाच्या पानांना सुंगध चांगला येतो व खत म्हणून झाडाला ते पोषक होते. तसेच झाडाची वाढ चांगली होते.
(5) खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे.
उत्तर - कापलेल्या फळाचा हवेशी संपर्क आल्याने त्यात रासायनिक अभिक्रिया घडून येते. त्यामुळे ते फळ काळे पडले.
उपाय - फळे नेहमी ताजी खावीत. खूप वेळापूर्वी कापून ठेवू नये. जेव्हा
खायची असेल तेव्हाच ती कापावी व खावी.
प्रश्न 7- कारणे लिहा.
(1) 5° सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.
उत्तर - कारण - (i) सूक्ष्मजीवांची वाढ तापमानावर अवलंबून असते. कमी
तापमानात साठवण केल्यास पदार्थ जास्त चांगले टिकतात. (ii) थंड जागी पालेभाज्या जास्त वेळ ताज्या राहू शकतात. पालेभाज्या, फळे, शिजवलेले अन्न टिकविण्यासाठी ते कमी तापमानामध्ये साठवणे आवश्यक आहे. (iii) रेफ्रिजरेटरमध्ये 5° से च्या तापमानाला सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते आणि अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. म्हणून 5° सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात.
(2) सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.
उत्तर - कारण (1) बुफे पद्धत ही आजच्या पद्धतीत प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाते. (ii) बुफे मुळे वेळेची, श्रमाची बचत होते. (iii) अन्नाची नासाडी होते हे माहिती असूनही सध्याच्या प्रचलित पद्धतीमुळे सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात.
प्रश्न 1 फक्त नावे लिहा.
(1) वेफर्स व इतर खाद्यपदार्थ हवाबंद पिशव्यांमध्ये बंद करतांना या वायूचा वापर करतात.
उत्तर - नायट्रोजन वायू
काळी मिरी
पपईच्या बिया
धुण्याचा सोडा, कागदाचा लगदा
प्रश्न 2 - सांगा पाहू
(1) अन्न कोठे कोठे व कसे वाया जाते ?
उत्तर - लग्नसमारंभ, महाप्रसाद, वाढदिवस अशा मोठमोठ्या प्रसंगी अन्न वाया जाते. यांत सर्वात जबाबदार बुफे पद्धत आहे. लोक मनात येईल तेवढे अन्न घेतात व खाणे न झाल्यास फेकून देतात
प्रश्न 3 - विचार करा व चर्चा करा.
(1) लग्नसमारंभात अक्षता म्हणून वापरण्यात येणारे तांदूळ व अन्नपदार्थांचा अपव्यय कसा टाळता येईल ?
उत्तर - लग्नसमारंभात अक्षता म्हणून तांदळाचा वापर न करता फुलांचा वापर करावा. तसेच अन्न बुफे पद्धतीने न देता वाढून द्यावे. म्हणजे अन्न वाया जाणार नाही. व वाचलेले अन्न गरीब वस्तीत वाटून दयावे किंवा अनाथ आश्रमात नेऊन दयावे. त्यामुळे अन्नपदार्थांचा अपव्यय होणार नाही.
0 Comments