प्रश्न 2 - योग्य जोड्या जुळवा.
'अ' गट
'ब' गट
(1) परजीवी. वनस्पती
(a) जमीन छत
(2) कीटकभक्षी वनस्पती
(ब) दगडफूल
(3 मृतोपजीवी वनस्पती
(a) ड्रोसेर
(4) सहजीवी वनस्पती
(d) अमरवेल
उत्तर – (1-d), (2), (3), (4-b).
प्रश्न 3 - खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.
(1) सजीवांना पोषणाची गरज का असते ?
उत्तर - सजीवांना पुढील कारणांसाठी पोषणाची गरज असते. (ⅰ) काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा व्हावा यासाठी पोषण आवश्यक आहे. (ii) शरीराची वाढ व विकास उत्तमरित्या व्हावी यासाठी. (ii) पेशींची झीज भरून काढण्यासाठी व ऊतींची दुरुस्ती करण्यासाठी. (iv) शरीराला रोगांपासून वाचविण्यासाठी प्रत्येक सजीवाला पोषण आवश्यक आहे.
(2) वनस्पतीची अन्न तयार करण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
उत्तर - काही वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात.
वनस्पतींची अन्न तयार करण्याची प्रक्रिया
(i) जमिनीतील पाणी, पोषकतत्त्वे व हवेतील कार्बन डायऑक्साइडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न
तयार करतात. या क्रियेला 'प्रकाशसंश्लेषण' असे म्हणतात.
कार्बन डायऑक्साइड + पाणी प्रकाश ऊर्जा अन्न (ग्लुकोज) + ऑक्सिजन 6 CO₂ + 6H₂O हरितद्रव्य CH2O + 602
(ii) वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. (iii) मूळ हे पाणी, खनिजे व क्षार जमिनीतून शोषण्याचे कार्य करते. तर खोड हे पाणी व क्षार पानांपर्यंत पोहोचवते. पानांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांवाटे हवेतील CO₂ घेतला जातो. पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात. पानांमधील हरितलवकात हरितद्रव्य असते. ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास मदत करते. या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो.
सूर्यप्रकाश
कार्बन डायऑक्साइड
ऑक्सिजन
पानांमधील हरितद्रव
पाणी, खनिजे, क्षार
प्रकाशसंश्लेषण
(3) परपोषी वनस्पती म्हणजे काय ? परपोषी वनस्पतींचे विविध प्रकार उदाहरणासह लिहा.
उत्तर- ज्या वनस्पती इतर सजीवांच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात व त्यांच्याकडून आपले अन्न मिळवतात त्यांना परपोषी वनस्पती असे म्हणतात. उदा. अमरवेल, बांडगूळ इत्यादी.
प्रश्न 4 - कारणे लिहा.
(1) कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.
उत्तर - कारण (i) कीटकभक्षी वनस्पती परपोषी असतात. त्यांचे पोषण दुसऱ्या वनस्पती किंवा कीटकांवर अवलंबून असते. (ii) स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नसल्यामुळे कीटकांना स्वतःकडे आकर्षित करणे फार गरजेचे असते. तसेच वनस्पतींची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होऊ शकत नाही. त्यासाठी जास्तीत जास्त भक्ष्य स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी कीटकभक्षी वनस्पतींचा रंग आकर्षक असतो.
(2) फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.
उत्तर - कारण फुलातील रस शोषून घेऊन अन्नग्रहण
करण्यासाठी फुलपाखराला नळीसारखी लांब सोंड असते.
प्रश्न 6 - विचार करा व खालील प्रश्नांची उत्तरे दया.
(1) आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का ?
उत्तर-नाही. कारण अन्न तयार करण्यासाठी आपल्याला अन्नपदार्थांची जुळवा जुळव करावी लागते. मानव हा मिश्राहारी प्राणी आहे. तो अन्नासाठी वनस्पती तसेच प्राणी या दोन्हींवर अवलंबून आहे. म्हणून आपण स्वयंपोषी नाही.
(2) स्वयंपोषी व परपोषी सजीवांपैकी कोणाची संख्या जास्त असते ? का ?
उत्तर - परपोषी सजीवांची संख्या जास्त असते. त्यामानाने स्वयंपोषी सजीव कमी आहेत. कारण परपोषीमध्ये मानव, प्राणी, काही वनस्पती यांचा समावेश होतो. तर स्वयंपोषी मध्ये फक्त हिरवी झाडे, झुडुपे, वेली यांचा समावेश होतो. म्हणून स्वयंपोषी सजीवांपेक्षा परपोषी सजीवांची संख्या जास्त आहे.
(3) वाळवंटी भागात परपोषींची संख्या कमी आढळते, मात्र समुद्रामध्ये जास्त संख्येने परपोषी आढळतात. असे का ?
उत्तर - (i) वाळवंटी भागात पाण्याच्या कमतरतेमुळे निवडुंग, कोरफड यांसारख्या वनस्पती स्वतःच्या पोषणासाठी अन्न, पाणी हे घटक स्वतःच्या पानांमध्ये/खोडामध्ये साठवून ठेवतात. म्हणून त्या वनस्पती फक्त स्वतःचे पोषण त्या परिस्थितीमध्ये करू शकतात. (ii) इतर वनस्पती त्यांच्यावर अवलंबून राहूण्यास अनुकूल वातावरणं नसते. म्हणून परपोषी वनस्पती वाळवंटी भागात कमी आढळतात. (iii) याउलट परिस्थिती समुद्रामध्ये असते. सजीवांना पोषक वातावरण तेथे उपलब्ध असते, म्हणून समुद्रामध्ये परपोषी जास्त प्रमाणात आढळतात.
(4) हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही?
उत्तर - कारण (i) वनस्पतींचा पानांव्यतिरिक्त इतर कोणताही अवयव हिरवा नसतो. (ii) हिरव्या भागांत हरितलवक असते. त्या हरितलवकात हरितद्रव्य असून ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करते. म्हणून हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न तयार होत नाही.
(5) बाह्य परजीवी व अंतः परजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते ?
उत्तर - (i) बाह्य परजीवी प्राणी हे इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करतात. उदा. लिखा, गोचीड, ढेकूण तर अंतः परजीवी प्राणी हे मानवी शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. उदा. पट्टकृमी, गोलकृमी. (ii) बाह्य परजीवीमुळे प्राणी व मानव यांच्या शरीरावर जखम तयार होते व खाज सुटते. तर अंतःपरजीवीमुळे शरीरातील आंतरक्रिया बिघडते. जसे अतिसार, कॉलरा यांसारखे रोग उद्भवतात. •
रचनात्मक मूल्यांकन
* तोंडी काम
प्रश्न
1 - फक्त नावे दया.
(1) स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारा - स्वयंपोषी
(2) अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असणास - परपोषी
(3) पानांवरील छिद्रांना - पर्णरंध्
(4) हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न का तयार होत नाही?
उत्तर - कारण (i) वनस्पतींचा पानांव्यतिरिक्त इतर कोणताही अवयव हिरवा नसतो. (ii) हिरव्या भागांत हरितलवक असते. त्या हरितलवकात हरितद्रव्य असून ते सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करते. म्हणून हिरव्या भागांव्यतिरिक्त वनस्पतीच्या इतर अवयवांत अन्न तयार होत नाही.
(5) बाह्य परजीवी व अंतः परजीवी प्राण्यांमुळे काय नुकसान होते ?
उत्तर - (i) बाह्य परजीवी प्राणी हे इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्यांचे रक्त शोषून त्याद्वारे अन्न प्राप्त करतात. उदा. लिखा, गोचीड, ढेकूण तर अंतः परजीवी प्राणी हे मानवी शरीराच्या आतमध्ये राहून रक्ताद्वारे अन्नाचे अथवा प्रत्यक्ष अन्नाचे शोषण करतात. उदा. पट्टकृमी, गोलकृमी. (ii) बाह्य परजीवीमुळे प्राणी व मानव यांच्या शरीरावर जखम तयार होते व खाज सुटते. तर अंतःपरजीवीमुळे शरीरातील आंतरक्रिया बिघडते. जसे अतिसार, कॉलरा यांसारखे रोग उद्भवतात.
1 - फक्त नावे दया.
(1) स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारा - स्वयंपोषी
(2) अन्नासाठी इतर सजीवांवर अवलंबून असणास - परपोषी
(3) पानांवरील छिद्रांना - पर्णरंध्र
(4) एकपेशीय प्राणी अमीबा, युग्लीना, पॅरामेशिअम
(5) बहुपेशीय प्राणी झुरळ, डास, ढेकूण, नाकतोड्या, फुलपाखरू
(6) मिश्राहारी प्राणी वानर, चिपांझी, मानव
प्रश्न 1 - थाडे आठवा.
(1) कुपोषण म्हणजे काय ?
उत्तर - शरीरासाठी आवश्यक असणारी सर्व पोषकतत्त्वे योग्य त्या प्रमाणात आहारातून न मिळणे याला 'कुपोषण' असे म्हणतात.
(2) कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते ?
उत्तर - (i) कुपोषण निर्मूलनासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. (ii) 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके, गरोदर स्त्रिया, स्तनदा माता यांना सुक्षपोषकत्व युक्त आहार देण्यात येत असून 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांना महिला बचत गट/महिला मंडळ यांच्यामार्फत सकाळचा नास्ता, गरम ताजा आहार पुरविला जात आहे. (iii) कुपोषित बालकांची दर पंधरवाड्याला नियमित आरोग्य तपासणी, वैदयकीय उपचार, बालकांचे • लसीकरण, शिशुपोषणावर भर देण्याबाबत व समुदाय वृद्धीपत्रकाद्वारे पालकामध्ये जाणीव जागृती निर्माण करणे.
(3). वनस्पती कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात ? का ? (पा.पु.पृ.क्र.27) उत्तर - (i) वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. तसेच बाष्प रूपात
खाण्याचे उत्सर्जन करतात. काही वनस्पतींच्या खोडातून डिंक बाहेर पडतो. हा त्या वनस्पतींचा उत्सर्ग होय. (ii) वनस्पती काही पदार्थ उत्सर्जित करतात. कारण ज्या पदार्थांची वनस्पतींना पोषणासाठी गरज नसते. असे पदार्थ निरुपयोगी म्हणून वनस्पती बाहेर टाकून देतात.
(4) अन्नामध्ये असणारी विविध पोषकतत्त्वे कोणती ? त्यांचा काय उपयोग होतो ?
उत्तर - कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ ही अन्नामध्ये असणारी विविध पोषकतत्त्वे आहे.
(1) कर्बोदके - कर्बोदकांमुळे शरीरात आवश्यक असणारी ऊर्जेची गरज भागविली जाते.
(ii) स्निग्ध पदार्थ - उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जेची गरज भागविली जाते.
(iii) प्रथिने - वाढीसाठी, शरीराची होणारी झीज भरून काढण्यासाठी व इतर जीवनक्रियांसाठी प्रथिने आवश्यक आहे.
(iv) जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुम पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती व शरीराच्या इतर जीवनावश्यक क्रियांसाठी ही पोषकतत्त्वे आवश्यक आहे.
प्रश्न 2 सांगा पाहू !
(1) वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः कसे तयार करतात
उत्तर - (i) जमिनीतील पाणी, पोषकतत्वे आणि हवेतील कार्बन डायऑक्साइड
यांच्या साहाय्याने अन्ननिर्मिती करतात. (i) ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्धे होत असते. पानांमधील हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्याने या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला 'प्रकाश संश्लेषण' म्हणतात.
(2) अमीबासारख्या एकपेशीय सजीवामध्ये. अन्नग्रहण कसे होते ?
उत्तर - अमीबामध्ये हात, तोंड असे भाग नसतात. हा एकपेशीय प्राणी आहे. तो शरीराच्या म्हणजे पेशीच्या कोणत्याही पृष्ठभागातून अन्न आत घेऊ शकतो. अन्नकणाला सर्व बाजूंनी वेढून तो कण आपल्या पेशीमध्ये समाविष्ट करतो. त्यानंतर अन्नकणांवर विविध विकरांची क्रिया घडून त्याचे पचन होते.
प्रश्न 3 - माहिती मिळवा.
(1) पिवळ्या, जांभळ्या तसेच तांबड्या रंगाच्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया कशी होते ?
उत्तर - (i) पिवळ्या, जांभळ्या तसेच तांबड्या रंगांच्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषण पानांद्वारे होत नाही. कारण त्यात हरितद्रव्य नसते, म्हणून वनस्पतीचे हिरवे भाग जसे खोड यांद्वारे प्रकाश संश्लेषण क्रिया होते. (ii) तसेच वनस्पतींच्या नानांमध्ये कॅरोटीनॉइड व अॅन्थोसायनिन हे पदार्थ असतात. ते सुद्धा सूर्याची
ऊर्जा शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करतात.
(2) रासायनिक संश्लेषण म्हणजे काय ? कोणत्या वनस्पती या क्रियेतून
अन्न तयार करतात ? उत्तर - (i) असेन्द्रिय रासायनिक अभिक्रियामध्ये जी ऊर्जा निर्माण होते,
त्याचा वापर अन्न तयार करण्यासाठी करतात. या प्रक्रियेस रासायनिक संश्लेषण असे म्हणतात. (ii) ही प्रक्रिया समुद्रात खोलवर राहणाऱ्या वनस्पतींमध्ये घडते, जेथे सूर्यप्रकाश पोहचू शकत नाही.
उदा. खोल समुद्रात राहणाऱ्या वनस्पती व जीवाणू.
प्रश्न 4 - जरा डोके चालवा.
(1) बांडगूळ वनस्पतींमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रिया कोणामार्फत होते ?
उत्तर - ज्या मूळ वनस्पतींवर बांडगूळ वाढते त्या मूळ वनस्पतींमार्फत प्रकाशसंश्लेषण क्रिया होते.
(2) त्यांना पाणी व क्षार कोठून मिळतात ?
उत्तर - बांडगूळ वनस्पतीच्या मुळ्या मूळझाडाच्या खोडातील पाणी व क्षार शोषून घेते.
(3)बांडगूळ वनस्पती ही अर्धपरजीवी वनस्पती म्हणून का ओळखली जाते ?
उत्तर - बांडगूळ ही वनस्पती एखाद्या मोठ्या झाडावर वाढते. त्या झाडातील पाणी व क्षार शोषून घेते. व झपाट्याने वाढते. मात्र मूळ झाड कमकुवत होते.
(4) घटपर्णीमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रिया होत असूनही ती कीटकभक्षण का करते ?
उत्तर - घटपर्णीमध्ये प्रकाशसंश्लेषण क्रिया होत असूनही, काही पोषणतत्त्वे (नाईट्रोजन, फॉस्फरस) त्यांना पोषणासाठी अपुरे पडतात. ती पूर्ण करण्यासाठी म्हणजेच पुरेसे पोषण करण्यासाठी ते कीटकभक्षण करतात.
0 Comments