सुलतानकालीन अर्थव्यवस्था
सुलतानकालीन अर्थव्यवस्थेचा आधार सुन्नी पंथिय हनीफाद्वारा प्रस्तुत अर्थसिद्धांत होता.
सल्तनतकालीन अर्थव्यवस्थेचे धार्मिक आणि इतरा ही दोन साधने होती.
■ मुस्लिम धर्मियांकडून घेतला जाणारा कर जकात नावाने ओळखत.
■ जकात वस्तू, धान्य, धातू, पशु स्वरुपात घेतली जाई.
■ जकात वस्तू मूल्य अथवा वजनाच्या २५% होती.
■ इस्लाम कायद्यानुसार १०% ते ५०% खिराजकर गैर-मुस्लिमांकडून घेण्यात येई
■ जजियाकर गैरमुस्लिमांकडून घेतला जाई व त्याबदल्यात सुलतान गैरमुस्लिम प्रजेची संपत्ती सुरक्षा आणि सैनिकी सेवेपासून मुक्तता असे.
■ जजिया कर स्त्रिया, लहान मुले, भिक्षु, साधू व अंध अपंगावर लावला जात असे.
■ 'खालिसा' म्हणजे सुरक्षित भूमी जिचा महसूल राजाला मिळत असे
■ 'मुशरिफ' हा राजस्व गोळा करणारा अधिकारी होता. हिशोब ठेवणाऱ्या वहिस 'वही' तर 'चराई' म्हणजे चारगाह कर होत.
■ आमिल हा राजस्व वसुल करणारा अधिकाऱ्यांचे बहुवचन म्हणजे 'उम्माल' होत.
■ आवश्यकतेवेळी सुलतान पुरोहिताकडून अल्पकर वसुल करे त्यास 'तनकी' म्हणत
■ फिरोजशाहने 'जजिया' ब्राह्मणावर लावला.
■ फिरोजशाहने जजिया कराचा दर ब्राह्मणावर १० टंक्का ऐवजी ५० जिंतल ठेवला.
■ हिंदू जनतेकडून जजिया ४८, २४, १२ दरहम दराने वसुल केला जाई.
• आयातीत मालावर मुल्याच्या १२.५% जकात घेतली जाई.
■ आयात केलेल्या घोड्यावर जकात ५% होती.
■ गैरमुस्लिम व व्यापाऱ्यांकडून जकात दुप्पट घेतली जात.
■ सिकंदर लोदीने धान्यावरील जकात रद्द केली..
■ सिकंदर लोदीनंतर भारतात कोणत्याच मुस्लिम राजांनी जकात ठेवली नाही.
युद्ध नुकसान भरपाईस 'धनीमहा' म्हणत
■ युद्धात प्राप्त लुटीचा २०% भाग राज्यकोषात जमा केला जात त्याला 'खम्स' म्हणत.
■ खनिज उत्पन्नाचा २०% भाग राज्य संपत्ती म्हणून जमा केला जात.
■ सापडलेल्या धनापैकी २०% भाग शासनाकडे तर ८०% भाग संशोधकाकडे राहत.
सल्तनत जमीन महसूल
■ सुलतानात उत्पन्नाचे मुख्य साधन 'भूराजस्व' होते. भूमिचे चार प्रकार होते खालसा, इक्ता, वक्फ, अथवा इनाम आणि सरदारांकडील जमीन.
■ 'खालसा' भूमी सुलतानाच्या ताब्यातील प्रत्यक्ष भाग असे. 'खालसा' भूमी व्यवस्थापन सुलतान अधिकाऱ्यामार्फत करे.
■ प्रत्येक तहसीलमधील 'आमिल' अधिकारी, चौधरी, मुकदम मार्फत भूराजस्व एकत्र केले जात
■ 'इक्ता' भूमी म्हणजे सैन्य अथवा सैनिकी अधिकाऱ्याला सैनिकी सेवेबद्दल देण्यात आलेली जमीन इक्ता मालकी हक्क अधिकाऱ्यास नसे.
■ अल्लाउद्दीन खिलजीने धार्मिक अनुदान वक्फ बंद केले.
■ अल्लाउद्दीन खिलजीने ५०% महसूल ठरवला
■ मिलक भूमी म्हणजे स्वअधिकारातील जमीन, इद्रात म्हणजे
निवृत्ती वेतन आणि वक्फ म्हणजे धार्मिक अनुदान होय.
■ अल्लाउद्दीन खिलजीने मुकदम, चौधरी, खोत इत्यादीवर चारगाह आणि घरपट्टी कर लावले.
■ अल्लाउद्दीन खिलजीने जमीन उत्पादन क्षमता जाणण्यासाठी जमीन मोजमाप प्रथा चालु होती
■ गयासुद्दीन तुघलकाने खोत, मुकदम, चौधरींना घरपट्टी, आणि चारगाह करापासून मुक्त केले.
■ गयासुद्दीन तुघलकाने जमीन मोजमाप बंद करुन सैन्यास जहागिरी प्रदान केल्या.
■ मुहम्मद तुघलकाने दुआब प्रदेशात महसूल ५०% केला.
■ मुहम्मद तुघलकाने कृषी सुधारासाठी 'दीवाण-ए- कोही' ची स्थापना केली.
■ फिरोज तुघलकाने थकित ऋण रद्द केले.
■ फिरोज तुघलकाने भुराजस्व अधिकाऱ्यांचे वेतन वाढवले व २४ कर रद्द केले.
■ फिरोज तुघलकाने भुराजस्व केवळ खिराज, खम्स, जजिया जकात आणि सिंचन कर असे ५ करच वसुल केले. फिरोज तुघलकाने भुराजस्व गुत्तेदारी पद्धतीने वसुल केले.
■ फिरोज तुघलकाने १०% जलकर वसुल केला.
■ मुहम्मद तुघलकाने 'दीवान-ए-अमीर-ए-कोही' हा विभाग पडिक जमीन उत्पादन क्षम्य बनण्यासाठी स्थापन केला.
■ गाय मांस विक्री करणाऱ्या कसाईकडून १२ जिंतल कर घेतला जाई त्यास 'जज्जारी' म्हणत.
■ 'शरा' मध्ये उन, खराज, खम्स, जकात, जजिया हे पाच कर नमुद आहेत.
■ अतिरिक्त रक्कमेस 'फवाजिल' तर वास्तविक रक्कमेस 'हासिल' म्हणत.
■ 'इदरार' म्हणजे कर मुक्त अनुदानीत जमीन होय. फिरोज
तुघलकाने भुराजस्व आणि जजिया बटई प्रथानुरूप वसुल केली.
फार्म शेअरिंग प्रकार
१. खेत - पीक पेरणीनंतर अथवा पीक तयार असताना शासकीय हिस्सा ठरवला जात.
२. लंक पीक रास तयार असताना भुशासह धुळीसह शासकीय हिस्सा दिला जात.
३. रास - रास तयार झाल्यानंतर धान्य आणि मुला अलग करुन धान्यापैकी दिला जाणारा शासकीय हिस्सा
४. मुक्ताई - भूराजस्व निश्चितीची प्रणाली 'मुक्ताई' होती
५. मसाहत - जमीन मोजून क्षेत्रफळाआधारे महसूल निश्चितीस 'मसाहत' प्रथा म्हणत.
६. नस्क - जमीन उत्पादन क्षमता ठोबळपणे लक्षात घेऊन महसूल ठरवला जाई त्यास नस्क प्रथा म्हणत.
'शारा' मध्ये नमुद 5
■ उन - मुस्लिम व्यक्तीकडील जमीन नैसर्गिक पाणीपुरवठा होत असेल तर 'उन' हा कर उत्पादनाच्या १०% घेतला जात.
■ खिराज - गैरमुस्लिमांच्या भुमीवर लावलेला कर उत्पादनाच्या १०% ते ५०% घेतला जात.
■ खम्स - युद्धात प्राप्त लुटीचा २०% भाग.
■ जकात - मुस्लिम व्यक्तीवर असलेला धार्मिक कर निश्चित संपत्तीच्या व्यतिरिक्त संपत्तीवर २.५% कर
लावला जात. निश्चित संपत्तीस 'निसाब' म्हणत. ■ जजिया - गैर मुस्लिमांकडून घेतला जाणारा कर संपत्ती व सुरक्षा प्रदान केली जात.
सल्तनत उद्योग व्यापार
■ 'अफाकी' म्हणजे मुळभूमी सोडून आलेला वर्ग.
■ दिल्ली सल्तनत काळात (इ.स. १२०६-१५२६) शहरे आणि व्यापाराचा विकास झाला
■ दिल्ली सल्तनतकालीन शहरांचा पुरातत्त्वीय आणि साहित्यिक आधारावरच इरफान हबीब यांनी 'शहरी क्रांती सिद्धांत' प्रतिपादन केला आहे.
■ दिल्ली मुलतान, अन्हिलवाडा (पटना), खंबात, कडा, लखनौती, लाहौर व दौलताबाद या शहरांचा विकास झाला.
१ कापड उद्योग
■ मलमल, रेशीम, लोकर या तीन प्रकारच्या कापडाचे उत्पादन प्रमुख होते.
• दिल्ली, आग्रा, बनारस, सोनारगाव, पाटना, लाहोर, मुलतान, खंबायत, सुरत, देवगिरी ही कापड उद्योगाचे मुख्य केंद्रे होती.
# गुजरात आणि बंगाल कापड उद्योग आणि निर्यातीसाठी प्रसिद्ध होते. • श्रीमंत लोक तलम, मलमल, सॅटीन आणि जरीचे कापड (किनखाप) वापरत.
• ढाक्याची 'मलमल' प्रसिद्ध होती.
• अमीर खुनोने ढाक्क्याच्या मलमलीचा उल्लेख केला आहे.
∎ अमीर खुनोने ढाक्का मलमल आणि देवगिरीच्या तलम कापडाची प्रशंसा केली आहे.
■ महुआन प्रवासीने मलमल चे ६ प्रकार सांगितले आहेत - बैराम, नामोने, लिझती, दौझार, सिनाबाफ इत्यादी.
■ बंगाली कापड युरोपातील स्त्रिया डोक्यावरील आवरण म्हणून वापरत त्यास सिरबंद म्हणत त्याचा उल्लेख बार्बोसाने केला आहे.
■ सिनाबाफाचा उपयोग शर्टासाठी केला जात. बरनी किनखाप, जर, शुस्तरी, भिरैन, देवगिरी या कापड प्रकाराचा उल्लेख करतो.
■ इब्नबतुता प्रवाश्याने उत्कृष्ट मलमल कापडाच्या तागाची किमत १०० टंक्का नमुद केली आहे. पाटणा, मुर्शिदाबाद, काश्मीर, बनारस, कासीमबाजार, धोराघाट रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध होते.
■ खंबायतचा रेशीम उद्योग अल्लाउद्दीनच्या ताब्यात होता.
■ रेशिमी गालीचे सुरतचे प्रसिद्ध होते. आसाममधील खासी आणि मणिपुरी या जमाती रेशीम कापड बनवण्यात व्यावसायिक होत्या.
• रेशमाप्रमाणे ओरिसात तयार होणाऱ्या कापडाला तुस्सार म्हणत.
• लोकर उद्योगासाठी राजस्थान, लाहोर, काबूल, आग्रा, काश्मीर, फत्तेपूर सिक्री, पटना, जौनपूर, बुऱ्हाणपूर प्रसिद्ध होते.
■ काश्मीर हे शाल उत्पादनासाठी प्रसिद्ध होते.
• लाहोर ते अवधचा पट्टा हा नीळ उत्पादन आणि कापड रंगकामासाठी प्रसिद्ध होता.
• गोवळकोंडा, अहमदाबाद, मच्छलीपट्टनम्, ढाक्का कासीमबाजार रंगकामासाठी प्रसिद्ध होते.
२. धातू उद्योग
• सल्तनतकाळात धातूपासून तलवार, बंदुका, तोफा, शस्त्र, वस्तू, नांगर, अवजारे व भांडी बनवले जात.
■ गोदावरी नदीकाठ दिमदूर्ती आणि शिशा टेकड्याचा भाग शिस्ट अथवा पाटी दगडासाठी प्रसिद्ध होता
- सर जॉर्ज वुडच्या मते दमस्कच्या तलवारीची पाती भारतीय लोखंडापासून बनवत असत
- गुजराथ, गोवळकोंडा, सियालकोट, मुलतान, लाहौर, मेवाड हे लोखंड-पोलादासाठी प्रसिद्ध होते.
- धनुष्यबाण, खंजीर हे गुजराथमध्ये तर बंदुका मेवाड आणि सियालकोटला बनवत.
- कुशल सुवर्णकारी गुजराथमधील होती.
■ तैमुरलंगने भारतीय कलाकारांना समरकंदला नेले होते.
■ सुवर्ण-चांदीची कारागिरी दिल्ली, आग्रा, बैनारस येथील प्रसिद्ध होती.
■ तांबे आणि पितळ बिहारमध्ये सिंध भूम जिल्ह्यात राजस्थानमध्ये उदयपूर, सिंघाना येथे सापडत असे.
३. कागद व साखर उद्योग
■ चिनी लोकांनी सर्वप्रथम कागदाचा शोध लावला.
■ अरब लोक काथ्याचा वापर कागदासाठी करत.
■ सुलतान काळात चिंध्या आणि झाडाच्या सालीचा वापर कागदासाठी करत.
■ महुआनने झाडाच्या सालापासून बनवल्या जाणाऱ्या पांढऱ्या कागदाचा उल्लेख केला आहे.
■ गुजरातमध्ये विपुल कागद निर्मितीबद्दल निकोलो कोंटीने लिहिले आहे.
■ अमीरमध्ये खुश्रोने शामीकागद (सिरीयन) दिल्लीत वापरात असल्याचे लिहिले आहे.
■ कागद उत्पादनासाठी काश्मीर, सियालकोट, गुजराथ, दिल्ली, अवध, गया, बिहार प्रसिद्ध होते.
• भारतात लाहोर ते दिल्ली आणि माळवा ते बंगाल हा पट्टा उसासाठी प्रसिद्ध होता.
■ दाणेदार आणि शुभ्र स्फटिकमय साखरेला 'कंड' म्हणत.
■ महुआन हा प्रवासी सुलतान गियासुद्दीन अझमशाह (इ.स. १३८९-१४०९) या काळात बंगालमध्ये येऊन गेला.
■ बंगाल हे सल्तनत काळात साखर उत्पादनाचा मुख्य प्रदेश होता.
■ बरनी मते अल्लाउद्दीन खिलजीकडे भवन ७० हजार कारागीर होते
■ महसूल सल्तनत काळात नगदी रुपात घेण्यास प्रारंभ झाला.
■ व्यापार गांव आणि शहर आणि बाजारपेठात विकसित होता.
■ अरब व्यापाऱ्यांनी उत्तर सल्तनतकाळात उत्तर भारतात आपले व्यापार केंद्र स्थापन केले.
■ भारतीय बंदरातून दक्षिण-पूर्व आशियाशी व्यापार होत.
■ भारतातून जवाहिर, मोती, हस्ती दंत, चंदन, उद, लवंग, मिरची, जायफळ, कापूर, जर, सुत, रेशीम, ताग, नारळ निर्यात होत.
निर्यातक बंदरे
राज्य
प्रमुख बंदर
सिं
देवल
गुजराथ
भडोच आणि कॅम्ब
महाराष्ट्र
ठाणे
विजयनगर
मंगलोर
बहामनी
चौल व दाभोळ
मलबार
कालिकत, क्विलॉन कन्याकुमारी
■ घोडे तुर्क आणि अरबस्थानातून सुलतान करत.
■ सल्तनतकालीन व्यापार हा भारतासाठी अनु होता.
■ बल्बनहा डाकू आणि चाचांचा बंदोबस्त चा व्यापाराला प्रोत्साहन देणारा प्रथम सुलतान होता
■ अल्लाउद्दीन खिलजीने विशाल सैन्य व्यवस्थेसाठी 'बाजारनियंत्रण' धोरणाचा पुरस्कार केल
■ इ.स. १३५१-८८ हा काळ आर्थिक संपन्नतेचा काळ होता.
■ इ.स. १३८९ ला तैमुरलंगच्या आक्रमणामुळे सल्तनत अर्थव्यवस्था खिळखिळी बनली.
■ फिरोज तुघलकाने दलालांवरील कर 'दलालात ए-बजारहा' हा बंद केला.
• हर्मुजहून मीठ तर मालद्विपहून सिंपले आयात होत.
■ इटालीयन प्रवासी बार्बोसा मते खंबायत बंदरात प्रतिदीन एक देशी-विदेशी जहाज येत असे
बरनी अन्नधान्याच्या व्यापाऱ्यांना 'कारवानी' म्हणतो तर सुफि नासिरुद्दीन 'नायक' म्हणतो.
'मिफताह-उल-मुजाला' या फारसी शब्दकोषात (इ.स. १४६०) दोन बैलांच्या नागरांचे चित्र निर्देशित आहे.
पिकाची कापणी विळ्याने केली जाई व रास बैलाद्वारे करत. विहिरीतून पाणी बादली, चरखा, बैलाद्वारा ओढणारा चरख, ढेंकली व राहट याच पाच प्रकारे काढले जात.
इंग्रजीत राहटास नोरिया म्हणतात. घोड्यांना नाळ मारण्याची कला तुर्काची आहे. अबुल फजलने आईने-ए-अकबरीत कलईचा भांड्यांना पलिश) उल्लेख केला आहे.
0 Comments