मुघल अर्थव्यवस्था
• मोगल काळात भारतात मुख्यत्त्वेकरून सर्व आवश्यक अन्नपदार्थ, कापड व धातू भारतात उत्पादित होत. मोगल काळात कापड सुती, रेशीम, लोकर, ताग, इत्यादीपासून बनवण्यात येत.
• भारतात उत्पादित होणारे सुती कापड परदेशात निर्यात होत.
• सुती कापड आफ्रिका, अरब, इजिप्त, ब्रह्मदेश, मलाक्काला निर्यात होत.
■ मोगल काळात सुती कापड उद्योग भरभराटीवर होता.
■ आइन-ए-अकबरी या ग्रंथात प्रसिद्ध कापड उत्पादन केंद्रांची नावे नमुद आहेत.
■ सोनारगांव हे तलम कापडासाठी प्रसिद्ध होते.
■ उच्च प्रतीचे कापड बनारस, आग्रा, माळवा, दख्खन व गुजराथ येथे होई.
■ कापडांच्या बाजारपेठांसाठी प्रसिद्ध लाहोर, बुऱ्हाणपुर, गोवळकोंडा हे प्रसिद्ध होते.
■ पश्चिम किनाऱ्यावरील खंबायत आणि दाभोळ तर पूर्व किनाऱ्यावरील विशाखापट्टनम हे प्रसिद्ध बंदर होते.
■ मुलतान, सक्कर, ठड्डा या केंद्रांशी व्यापार सिंधमार्ग होत.
■ खंबायत बंदरातून निर्यात होणारे कापड 'खंबायत कापड म्हणून ओळखतात.
■ बंदरातून निर्यात होणाऱ्या कापडाला त्या बंदराच्या नावे ओळखत.
■ बंदरातून निर्यात होणाऱ्या कापडाला त्या बंदराच्या नावे ओळखत.
■ बंगालला कापड पुरवठा सोनारगांव व अलाहाबाद हून होत.
■ खुष्कीच्या मार्गावरील औद्योगिक केंद्र बुऱ्हाणपुर आणि उज्जैन होते.
■ उत्तर भारतातील प्रसिद्ध कापड उत्पादन केंद्र - लाहौर, दिल्ली, आग्रा, अवध, जौनपूर, अलाहाबाद, बनारस, पाटणा, ढाक्का व लखनौ इत्यादी होत.
■ मोगल काळात कापड उद्योगाचे केंद्रिकरण गुजरात मध्यै झाले.
■ लाहोरमध्ये निर्माण होणाऱ्या कापडाच्या ०७ प्रकारा • पैकी 'ओर्मेसिन' आणि 'मच्छिवारा वाफ्ता' हे सर्व प्रसिद्ध होते.
■ सरहिंद या ठिकाणी लालशालू आणि चिटाचे कापड तयार होई.
■ दिल्लीचे चिटाचे कापड व रजई प्रसिद्ध होती.
■ आग्रा हे गालीचे तर गोकूळ हे गंजीसाठी प्रसिद्ध होते.
• चौतार आणि खासा कापडासाठी सरहाणपूर.
प्रसिद्ध होते.
■ लखनौ येथे तलम कापड व लष्करी कोट तयार होत.
■ जौनपूरला कंबरपट्टे, फेटा व गालिचे तयार होत.
■ माऊ, जलालाबाद व बनारस येथे 'मिहिरकूल' प्रकारचे कापड तयार होत.
■ बनारसची पगडी आणि गंगाजल कापड प्रसिद्ध होते.
■ कापसापासून सरकी अलग करण्यासाठी चरख्याप्रमाणे पायाने चालवण्याचे साधन वापरत.
■ धागा चातीवर तयार केला जात तर कापड मागावर विणण्यात येत.
लोकर, राजस्थान, पंजाब, काश्मीरमध्ये मेंढ्या, उंट, तूस, अंगोरा या प्राण्यापासून मिळवत तर श्रेष्ठ दर्जाची लोकर हिमाचल प्रदेश आणि तिबेटमध्ये मिळे.
अकबराने भारतात लोकर उद्योगाला प्रोत्साहन दिले. लाहोर हे लोकर उद्योगाचे मुख्य केंद्र होते. लाहोर येथे लोकर उद्योगाचे १००० उद्योग होते.
■ लोकरीपासून ब्लँकेटेस्, पागोटी, शाली, कमरपट्टे बनवत. लोकर आणि रेशमापासून लाहोर येथे 'मायान' प्रकारची प्रसिद्ध शाल बनवत.
■ आग्रा, जोनपूर, जाफराबाद, व फत्तेपूर सिक्री येथे लोकरीचे गालीचे बनवले जात.
■ बर्नियरने तुस लोकरीच्या शालीचे वर्णन केले आहे
■ रेशीम कापड उद्योग सूती आणि लोकरीप्रमाणे विकसित नव्हता.
■ रेशमापासून रेशीमवस्त्र आणि 'पटोला' वस्त्र तयार होई
• बासाच्या मते भारतातून रेशीम कापड गुजरात मधून तुर्क, तातार, सीरिया, अरब इत्यादी देशांना निर्यात होत.
■ रेशमाची आयात आशिया, इराण, चीन इत्यादी हून भारतात होत असे.
■ रेशीम उद्योगासाठी बंगाल, गुजराथ, दिल्ली, बनारस व चौल प्रसिद्ध होते.
■ कासीम बाजार येथून रेशीम वस्त्र तागे निर्यात होत.
■ सुरत-अहमदाबाद येते गालीचे आणि रेशीम वस्त्रावर सुवर्ण धाग्यांनी विणकाम केले जात.
■ कापडावर सुवर्ण धाग्यांनी विणकाम केले जात त्या कापडास 'सॅटीन' म्हणत.
■ आग्रा येथे उत्पादित रेशीम कापड फिलिपाईन्स, बोर्निओ, जावा व सुमात्राच्या बाजारपेठेत मिळे.
■ दिल्ली येथील नीळ कापडाच्या रंगासाठी वापरत.
लखनौत लाख तर आग्रा येथे रंग उत्पादन होत.
■ 'नुस्खा-खुलासतुल-मुजरेबात' ग्रंथात रंगकामाचे ७७ प्रकार नमुद आहेत.
■ नीळ उत्पादन/लागवड अवध ते लाहौरच्या प्रदेशात केली जाई
■ नीळपासून डार्क निळा, पाचुनिळी, पिवळसर हिरवा, फिक्कट निळा, जांभळा इत्यादी रंग तयार केले जात.
■ निळऐवजी चौकूंद झाडाच्या बियाही रंगासाठी वापरत.
■ लालरंग, लाख, कुसुंब, लोधवृक्ष, सुंठपासून बनवत.
■ लाख 'कवचलाख' आणि 'कांडीलाख' या दोन प्रकारची असे. कवचलाख श्रेष्ठ दर्जाची होती
■ कुसुंबापासून पिवळा रंग लाहोर, आग्रा, दिल्ली व अवध येथे तयार केला जात.
■ मद्दर झाडाच्या मुळापासून लालरंग बनवला जात.
■लाहोर ते अलाहाबादच्या पट्टयात हळद पिकविण्यात येत असे.
■ हळद (पिवळा) आणि निळ मिश्रीत करुन हिरवा रंग तयार होई.
■ हिरवा रंग नैसर्गिकरित्या डाळिंबाच्या झाडाच्या सालीपासून बनवत
2) बेहडा + तुरटी + लोह युक्त क्षारापासून काळा रंग तयार करत,
■■ नक्षीकाम केलेल्या कापडाला 'चिटाचे' कापड म्हणत
■ चिटाच्या कापडाचे मुख्य केंद्र - लाहोर, पटना, लखनौ व फरुखाबाद हे होते.
■ गडद छपाईचे कापड गालिचे अथवा चादर म्हणून वापरत.
मोगलकालीन कापड उद्योग विकास- कारणे
विस्तृत साम्राज्य, आर्थिकदृढता, व्यवस्थापन, जकात कमी, नागरी वस्त्यांचा उदय, दळण-वळण विकास, गुजरात विजय, बंदराचे महत्त्व, कापड दर्जा, वस्तु, सुरक्षा, व्यापाऱ्यांना दिलेल्या सवलती, कापूस-लोकर उत्पादन इत्यादी.
■ मोगल काळात ५० प्रकारचे कापड तयार होत..
■ सर्वात महाग कापड 'खासा' होते. (१ खासा तुकडा = १५ महुर)
■ चिटाचे कापड (भरडा) हातभर कापड १ रुपयास मिळे.
■ ढाक्यात मलमल कापड महिला तयार करत.
■ हमीद नकवीने सुती कापडाचे ४९ प्रकार नमुद केले आहेत.
■ सुती कापडावर चांदी-सुवर्ण धाग्याचे विणकाम असलेल्या कापडास 'जरी' म्हणत.
■ बंगाल-बिहारमध्ये साध्या कापडास 'अम्बरती' तर । गुजरातमध्ये 'बाफ्ता' म्हणत
■ लाहोर, अजमेर, ग्वाल्हेर, कुमाऊँ प्रदेशात लोह खनिज उत्पादन होत.
• राजस्थानात विपुल प्रमाणात लोह उत्पादन होत. लष्करी हत्यारे बिकानेर आणि मेवाड येथे तयार होत.
कुमाऊं, बैराट, राजपुताना आणि रायपुरी येथे तांब्याचे उत्पादन होते.
तांब्याचा उपयोग भांडी तयार करण्यासाठी करत. भांड्यांना कल्हई कथलीपासून करत.
मुस्लिम प्रामुख्यांना तांब्याची तर हिंदु मुख्यतः पितळी भांडी वापरत.
∎ लखनौमध्ये तांब्याची भांडी आणि कोलकात्यात पितळ. बनारसमध्ये भांडी बनवली गेली
∎ अकबराने वस्तुऐवजी सारी रक्कम रोख रुपात घेण्यास प्रारंभ केल्याने तांब्याचे 'दाम' विपुल प्रमाणात चलनात आले.
■ स्वर्ण-चांदी टकसाळी पेक्षा तांब्याच्या नाण्याच्या टकसाळी जास्त होत्या.
• मीठ मोगल काळात सांभर सरोवर, शमसाबाद व बंगाल येथे तयार होई.
सांभार तलाव
■ मोगल काळातील प्रसिद्ध मीठगृह.
■ लहान-लहान तळ्याचा समुह. त्यास सांभर म्हणतात.
■ क्षेत्रफळ - ८ × ४ मैल = ३२२ मैल.
■ किनारी भागात मीठ उत्पादन होई.
■ वॅटच्या मेत १४०० वर्षे मीठ उत्पादन सांभर येथे झाले.
■ शमसाबाद येथे मिळणारे मीठ खनिज मीठ होते, शमसाबाद येथे टेकड्यांच्या परिसरात ४० मैल पट्टयात मीठाच्या खाणी होत्या, त्या मिठस 'सेंद्रीय मीठ' (सेंदीलोन) म्हणतात.
■ खनीज मीठाच्या खाणीवर १७० किलो करीता शासनास १ रुपया कर द्यावा लागे.
■ इ.स. १५९५ ला १० किलो मीठ किंमत १६ दाम होती.
■ बनारसमध्ये सांबार मिठाईची किंमत 1 मानस 4 रुपये आहे.
■ बंगालच्या मीठागृहातील मीठ सांभर व शमसाबादच्या मीठापेक्षा स्वस्त होते.
■ सिंधू-गंगा पट्टयात दिल्ली, आग्रा, बनारस, लखनौ, जौनपूर येथे साखर उत्पादन होत
■ बारीक व जाड प्रकारची साखर पौंडा नावाने ओळखत. ऊस हे नगदी आणि किंमती पीक मोगल काळातही मानले जाई.
■ साखर तयार करताना रसापासून अलग केलेला भाग (मळी) त्यास 'चोवा' म्हणत. 'चोवा' पासून मद्य बनवत.
इ.स. १७८१ ला ०१ मण खडी साखरेची किंमत ११ रुपये होती.
■ इ.स. १६३८ ला पांढरी दाणेदार साखर किंमत १ मण = ७ रुपये होती.
■ अमीर खुश्रो, अबुल फजल व पीटर मुण्डीने कागद उद्योगाची माहिती दिली आहे.
■ शाहजादपूर येथील कागद सर्वश्रेष्ठ होता.
तागापासून 'अरवली' कागद बनवला जात.
मऊ, पांढरा, टणक आणि स्वच्छ कागद 'मानसिंधी' होता तो सियालकोटला तयार केला जाई.
■ मोगलकालीन कागद निर्मितीचे शासकीय उद्योग आग्रा लाहोर येथे होते.
■ कागद चिंध्या, साली, बांबू, ताग इत्यादीपासून बनवला जात.
■ लखनौ येथे 'वस्ली' कागद चिंध्यापासून बनवला जात
■ खसखस लाहौर, मुलतान, आग्रा, दिल्ली, अवध येथे पिकवली जात व त्यापासूनच अफू तयार होत.
■ अकबराच्या काळात पोर्तुगीजांनी भारतात तंबाखू आणली
■ तंबाखू बंगाल, बुऱ्हाणपूर, गुजरात, कोरोमंडल या क्षेत्रात लागवड उपयुक्त ठरली.
मुघल व्यापा
■ मोगलकालीन विदेश व्यापार खंबायत, मालाबार, कोरोमंडल व बंगाल सागर किनाऱ्याहून होत होता.
■ कालिकत हे मुघल व्यापाराचे प्रमुख केंद्र होते
■ मोगलांचे सागरी व्यापारातील प्रतिस्पर्धी पोर्तुगिज होते.
मलाक्का ते मोझंबीकपर्यंतच्या सागरी व्यापारासाठी मोगल जहाजांना पोर्तुगिजांचा परवाना लागे.
■ दिल्ली सुलतान काळात सागरात वर्चस्व मुस्लिमांचे होते पण मोगल काळात प्रथम पोर्तोगिज-डच व नंतर ब्रिटिशांचे वर्चस्व झाले.
■ निर्यात मुख्यतः युरोपशी मसाला पदार्थांची होत.
.• भारतापासून युरोपात पाठवल्या जाणाऱ्या मसाला वस्तुत मिरे, विलायची, दालचिनी, लवंग, जायफळ, सुंठ, हिरे इत्यादी होत्या.
■ मोगलकालातील व्यापार अनुकूल होता.
■ वस्तु विनियमात व्यापारी चांदीचे चलन स्विकारत.
मोगलकालीन प्रसिद्ध बंद
प्रदेश/किनारा
माकड
सिंध
लहरी
गुजरात
सुरत, भडोच, खंबाय
बंगाल
सातगाव, हुगळी, श्रीपूर
■ सिंधमधील 'लहरी' बंदराचा सर्वप्रथम नावानीशी उल्लेख अल्बेरूनीने केला आहे. लहरी बंदरातून व्यापार ६० लाख रुपये चा प्रतिवर्ष होत असे.
व्यापाराच्या दृष्टीने खंबायतच्या आखातात मोठ्या जहाजांना प्रवेश गैर होता. (पाणी कमतरतामुळे)
■ खंबायत बंदरातून कापड मोठ्या प्रमाणात आफ्रिकेत निर्यात होई
मुघल काळातील प्रसिद्ध उद्योगपती
■ अली अकबर बिन हाजी कमाल इस्तफानी
■ नबाव कालीजखान
■ अबुल हसन
■ नवाब कुतुब खान
■ मीर जुमला
■ चंदन, हिंगूळ, दमस्की, गुलाबपाणी, गुलाम, सोने, चांदी, तांबे व घोडे आयत केले जात.
■ अकबराने आयातीत वस्तुवर २.५% कर लावला.
■ सुरत या गुजराथमधील प्रसिद्ध बंदरातून मक्केला यात्रेकरू जात.
■ हुगळी नदीच्या किनाऱ्यावरील सतगाव हे बंदर प्रसिद्ध होते.
खुष्कीचे दोन मार्ग
■ लाहोर ते काबूल -
चीनहून जाणाऱ्या मार्गाला हा मार्ग मिळे.
■ मुलतान ते कंदाहार -
इराणहून इराकला जाणाऱ्या मार्गाला जोडत असे.
करण्यासाठी
मेघना नदीवरील श्रीपुर व्यापारासाठी प्रसिद्ध होते
, ■ व्यापार मोगल काळात सागरी, नद्यांतर्गत खुष्कीमार्गे होत असे.
नाही.
खुष्कीचा व्यापार हा असुरक्षित होई. व ठराविक
■ सिंधू, गंगा, तापी आणि बंगालमधील नद्याअंत व्यापार होत.
■ सिंधू नदीतील अंतर्गत व्यापारामुळे लहरी बदन तर सिंधु - रावी नद्यावरील व्यापारामुळे 'भक्कर' हे शहर उदयाला आले.
■ गंगा-यमुाच्या उपनद्या चंबळ, शोण, घाग्रा नया मुळे बंगालच्या त्रिभुज प्रदेशाचा विकास झाला.
■ अन्न-धान्य वहन करणाऱ्या जनावरास 'टण्डा' तर बंजारा समाजाच्या वस्तीस 'टांडा' म्हणत.
मोगलकालीन प्रसिद्ध ०५ महामार्ग
क्र. नाव
मार्ग
१. काबूल
आग्रा व दिल्लीहून काबूलपर्यंत या मार्गे व्यापार होत.
२. कंधार
आग्रा व दिल्ली प्रदेशातून कंधारपर्यंत हा रस्ता जात होता.
3. खंबायत
पट्टन व नहरवालामार्गे खंबायत हा मार्ग होता.
४. बुऱ्हाणपूर
ग्वाल्हेर ते बुऱ्हाणपूर हा मार्ग होता.
५. सोनारगाव
आग्रा येथून दुहेरी रस्ता सोनारगावाकडे जात होता तो जोनपूर येथे मिळत असे.
■ मोगलकालीन प्रसिद्ध ०५ रस्ते व्यापाराने व दळण- वळणाने गजबजलेले होते.
■ शेरशाहने १७०० सराया (प्रवाशांना विश्रांती देणारे स्थळ) बांधले. अकबराने कोतवालाकडून सराये बांधून घेतले
सुलतान काळात लाहोर एक गांव होते, बल्बन हा लाहोर विकसित करणारा प्रथम सुलतान होता
■ अकबराने लाहोरच्या किल्ल्याचे बांधकाम करुन मजबुतीकरण केले.
0 Comments