सय्यद घराणे
1414 खिजरखान 1421
■ पैगंबराच्या अनुयायांना 'सय्यद' म्हणतात. 'सय्यद' लोक पैगंबरवंशीय मानले जातात.
■ खिजखाँने तुघलक वंशाचा शेवटचा शासक दौलतखाँच्या मृत्यूनंतर इ.स. १४१४ ला सत्ता हातात घेतली.
■ खिजखाँचे पालनपोषण मुलतान गव्हर्नर मलिक नासिरूल मुल्क मरदानने केले होते.
■ इ.स. १३९८ ला खिज्रखाँ तैमुरलंगच्या सैन्यात भरती झाला व सेनापती बनला.
■ तैमूरलंगने इ.स. १३९९ ला भारतीय प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून खिज्रखाँला नेमले.
■ दिल्लीचा तुघलक वंशीय सुलतान महम्मूद नासिरूद्दीनने इ.स. १३९९ ला कन्नौजमध्ये आश्रय घेतला. त्याच्या मृत्यूनंतर (इ.स. १४१४) दौलतखाँ नामक राजाला पराभूत करून तैमूरचा सेनापती खिजखाँने 'सय्यद' वंशाची सत्ता स्थापन केली.
■ खिजखाँ सैय्यदने राजपूत सरदारांचा पराभव केला. खिज्रखाँचा मृत्यू दि. २० मे १४२१ ला झाला.
1421 मुबारकशाह 1434
■ चिडलेला वजीर मलिक-उस-शार्क झाला असता.
■ खिज्जखाँने उत्तराधिकारी म्हणून मुबारकशाह यास नेमले.
■ मुबारकशाहने भटिंडा, खोकरांचा विद्रोह नष्ट केलां.
■ मुबारकशाहने समरकंद गादीपासून दिल्लीला स्वतंत्र घोषित केले.
■ मुबारकशाहनंतर दत्तकपुत्र मोहम्मद बीन फरीद हा मोहम्मद शाह नांवाने सत्तेवर आला. (इ.स. १४३४)
■ मुबारकशाहची हत्या इ.स. १४३४ ला वजीर सरवर-उल-मुल्कने केली.
1434 मोहम्मद बिन फरीद 1445
■ वजीर सरवरची हत्या अमीर कमाल-उल-मुल्कने केली.
■ मोहम्मद बिन फरीदचा हा वजीर कमाल-उल-मुल्क होता.
■ मोहम्मद-बिन-फरीदच्या काळात सरहिंदचा गव्हर्नर बहलोल खाँ लोदीने खोकर सरदार जसरथ साह्याने दिल्लीवर आक्रमण केले.
■ मोहम्मद-बिन-फरीदच्या मृत्यूनंतर इ.स. १४४५ ला त्याचा पुत्र अल्लाउद्दीन सत्तेवर आला.
१४४५ अल्लाउद्दीन आलमशाह १४५१
■ सैय्यद वंशातील शेवटचा शासक अल्लाउद्दीन आलमशाह हा होय.
■ दुबळ्या अल्लाउद्दीन आलमशाहचा कर्तबगार प्रधान मंत्री हमीदखाँ होता.
■ अल्लाउद्दीन आलमशाहने १४५१ ला दिल्लीतून बदायूँला आश्रय घेतला.
■ प्रधानमंत्री हमीदखाँने सरहिंद शासक बहलोल खाँ लोदीला दिल्लीत आमंत्रित करून सुलतानपद दिले.
■ अल्लाउद्दीन आलमशाहचा मृत्यू बदायूँ येथे इ.स. १४७८ ला झाला.
■ लोदी अफगाण होते. अफगाणी लोकांना पठाण म्हणतात.
■ बहलोल लोदी हा लोदी वंशाचा संस्थापक (इ.स.१४५२-१५२६) हा साहूखैल जातीतील होता.
1452 बहलोल मोदी 1489
■ बहलोलचे आजोबा मलिक बहराम फीरोज तुघलक काळात मुलतान शासकच्या सेवेत होते.
■ बहलोल लोदीने खोकर सरदार जसरथला पराभूत करून स्वतंत्रत्ता स्थापन केली.
■ बहलोल लोदीने इस्लामखाँच्या (काका) मुलीशी विवाह केला.
■ इस्लामखाँ खिजखाँच्या काळात सरहिंदचा गव्हर्नर होता.
■ इस्लामखाँनंतर बहलोल लोदी सरहिंदचा प्रांताध्यक्ष बनला.
■ सय्यदवंशी सुलतान मोहम्मद शाहला खिलजीसरदारांविरूद्ध लढण्यासाठी बहलाल लोदीने मद केली.
■ बहलोल लोदीने उदारहस्ते सय्यद अएन नामव संतास दान दिले.
सय्यदवंशी शेवटचा शासक अल्लाउद्दीन आल आणि त्याचा प्रधानमंत्री हमीदखाँ यांच्यात वितृष होते म्हणून हमीदखाँने बहलोल लोदीला आमंत्रण देऊन दिल्ली सत्ता बहलोलच्या हातात देण्यात आली
बहलोल लोदी काम
हमीद खाँस दंड, पंजाब विद्रोहाचा पाडाव, जौनपूरवर अधिकार, काल्पी-घोलपूर विद्रोहाचे दमण
■ बहलोल लोदीचा काका कुतुब खान याने हमीद खानला पकडले.
■ बहलोल लोदीचा दुसरा विरोधक जौनपूरशासक मोहम्मद शाह शर्की हा होता.
■ मोहम्मद शाह शर्कीने बहलोल लोदीपुत्र ख्वाज बयाजिद ह्यास दिल्लीत वेढले.
■ जौनपूरचा शासक महमूद शर्कीनंतरचा उत्तराधिकारी हुसैनचा पराभव बहलोल लोदीने करून जौनपूर राजा म्हणून आपला पुत्र बारबकशाहची नियुक्ती केली. (इ.स. १४८६)
■ बहलोल लोदी पंजाबमधील विद्रोहाचे पारिपत्य करण्यासाठी गेला असताना दिल्लीवर मुहम्मदशाह शर्कीने आक्रमण केले. (इ.स. १४७२)
■ जुलै १४८९ ला ३८ वर्षाच्या शासन कालावधीनंतर बहलोल खानाचा मृत्यू अतितापामुळे झाला.
1489 सिकंदर लोदी - 1517
■ बहलोलखानाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र 'निजामखाँ
ने सिकंदरशाह लोदी नावाने सत्ता हातात घेतली
■ सिकंदर लोदीच्या दरबारात दोन गट होते. एक गट सिकंदर लोदीचा तर दुसरा गट सिकंदर लोदीच्या भावाचा पक्ष घेणारा होता.
■ सिकंदर लोदीने प्रथमतः आलमखाँ (काका) ह्या रापरीच्या शासकाचा पाडाव केला.
■ सिकंदर लोदीने दरबारातील विरोधी गटाचा नेता बारबाक (भाऊ) चा पराभव केला.
■ बारबाक जौनपूरचा शासक होता, पराभूत बारबाकलाच सिकंदर लोदीने पुन्हा शासक नेमले.
■ सिकंदर लोदीने काल्पी विजयानंतर काल्पीचा शासक म्हणून मोहम्मद खाँला नेमले.
■ काल्पीविजयानंतर ग्वाल्हेर सिकंदर लोदीने जिंकले.
ग्वाल्हेर विजयानंतर बयाना सिकंदर लोदीने जिंकले.
■ जौनपूर शासक बारबाकच्या काळात हिंदूनी उठाव केला.
■ विद्रोह्यांनी हुसेनशाहला नेता निवडला पण त्याचा पराभव सिकंदर लोदीने केला.
• बिहारचा शासक हुसैनशाहचा पराभव करून सिकंदर लोदीने बिहार साम्राज्यास न जोडता परस्पर आक्रमणाचा करार करून हुसैनशाहला परत दिला.
• सिकंदर लोदीने घोलपरू, नारबाद नागार वर विजय मिळवला. (१५०८ व १५१० इ.स.)
आग्रा शहर
आग्रा शहराचे संस्थापक सिकंदर लोदी आय.एस. 1504.
• आग्रा शहर स्थापण्याचे कारण इटवा, वयाणा, कोल, घोलपूर, ग्वालेरवर तर्चस्व ठेवणे हे होते.
आग्रा ठिकाणी सिकंदर लोदीने दिल्लीहून राजधानी व निवासस्थान आणले.
• इ.स. १५०५ ला आग्ऱ्यास भूकंपाचे धक्के बसले.
■ सिकंदर लोदीने अलभ खान, ईशा खान, आझम हुमायून आणि तजर खान लोदी या सरदारांचा पराभव केला.
■ लोदी वंशातील कार्यक्षम सुलतान म्हणून सिकंदर लोदीला ओळखतात.
सिकंदर लोदीच्या प्रशासनातील सुविधा
जगा-खर्चासाठी निरीक्षक नियुक्त.
सुलतान प्रतिष्ठेसाठी अमीर सरदारांत शिस्त निर्माण केली.
कटकारस्थानी व्यक्तींना कठोर शिक्षा केली.
सुलतानाच्या फरमानाचा अमल रारदारांना आवश्यक केला.
निरंकुश शासन सत्तेसाठी द्वैध प्रशासन व्यवस्था.
जमीन मोजणी करून कर ठरवले.
अर्थव्यवस्था भक्कम केली.
न्याय व्यवस्था सरळ सोपी बनवली.
.■ सिकंदर लोदीने जमीन मोजण्यासाठी ३०" (इंच) चा एक गज बनवला त्यास 'सिकंदरी गज' म्हणतात.
■ सिकंदर लोदीच्याच आदेशानुसार 'मथुरा मंदिर' तोडण्यात आले.
■ उतगीरच्या हिंदू मंदिराचा, नगरकोटच्या ज्वालामुखी
मंदिरातील मूर्तीचा विध्वंस्व सिकंदर लोदीने केला. ■ दि. २२/११/१५१७ ला सिकंदर लोदीचा मृत्यू झाला.
■ सिकंदर लोदीने 'फारसी' मध्ये कविता लिहिल्या आहेत.
■ सिकंदर लोदीने दरबारात मियाँ भुआने 'औषधी शास्त्राचे' (संस्कृत) भाषांतर फारशीत केले.
1517 इब्राहिम लोदी - 1526
■ सिकंदर लोदीचा ज्येष्ठ पुत्र इब्राहीम लोदी दि.
२१/११/१५१७ ला सुलतान बनला.
■ इब्राहीम लोदीलाच 'इब्राहीमशाह' असे ही म्हणतात.
■ कांही अफगाण सरदारांनी सिकंदर लोदीच्या लहान मुलास जलालखाँला पंजाबमध्ये सुलतान घोषित केले.
■ जलालखाँला गोंडवाण्याच्या जहागीरदारांनी कैद करून इब्राहीम लोदीच्या हातात सुपूर्त केले.
■ जलालखाँच्या हत्येनंतर इब्राहिम लोदीवर बिहार शासक दरियाखाँचा मुलगा बहादुर हुसेनने आक्रमण केले व इब्राहीमचा पराभव केला.
■ पंजाब शासक दिलेरखाँचा मुलगा गाजीशी इब्राहीम लोदीने वाईट व्यवहार केला. त्यामुळे दिलेरखाँ आणि इब्राहीम लोदीचा काका आलमखाँ ह्यांनी बाबराला भारतात येण्याचे निमंत्रण दिले
इब्राहीम लोदीचे कार्य
• अंतर्गत विद्रोह - पाडाव.
• अमीर - सरदारांचा पाडाव.
जल्लालखाँ (भाऊ) ची हत्या.
• ग्वाल्हेर विजय.
राणासंगाशी युद्ध.
• इब्राहिम-बाबर संघर्ष,
■ इ.स. १५१७ ला इब्राहिम लोदीने ग्वाल्हे किल्ला राजा विक्रमादित्याकडून जिंकला
■ इब्राहीम लोदीचा मेवाड शासक राणासंगाशी संघर झाला.
■ राणासंगाने १८ युद्धात विजय मिळवला होता त्यापैकी २ युद्ध (बकरोल व घटोली) इनाम लोदीशी झाले होते.
■ मुस्लिम इतिहासकार राणासंगाचा पराभव लोदीने केला असे म्हणतात.
■ पंजाब प्रांत शासक दिलावर/दौलतखाँ लोदीने बाबराला भारतात येण्याचे निमंत्रण पाठवले होते.
■ १९ वे शतक. १५२४ मध्ये बाबरने पंजाबवर स्वारी करून लाहोर व दिपालपूर जिंकले.
■ इ.स. १५२५ ला बाबराने भारतावर पुन्हा आक्रमण करून पानिपत ठिकाणी इब्राहीम लोदीशी युद्ध झाले.
■ दि. २०/०३/१५२६ ला इब्राहीम लोदीचा मृत्यू झाला. लोदी सुलतान वंश नष्ट करून बाबराने दिल्लीत मुगल वंशाची स्थापना केली..
0 Comments