Subscribe Us

वर्ग.8.भूगोल.सागरी प्रवाह.



५. सागरी प्रवाह

प्रश्न १ योग्य पर्याय निवडा.

(१) लॅब्रोडोर प्रवाह कोणत्या महासागरात आहे ?

(i) पॅसिफिक

(ii) दक्षिण अटलांटिक

(iii) उत्तर अटलांटिक

(iv) हिंदी

उत्तर- लॅब्रोडोर प्रवाह उत्तर अटलांटिक महासागरात आहे.

(२) खालीलपैकी कोणता प्रवाह हिंदी महासागरात आहे ?

(i) पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह

(ii) पेरू प्रवाह

(iii) दक्षिण ध्रुवीय प्रवाह

(iv) सोमाली प्रवाह

उत्तर - सोमाली प्रवाह हिंदी महासागरात आहे.

(३) सागरी प्रवाहांच्या जवळील किनारप‌ट्टीच्या प्रदेशात खालीलपैकी कशाचा परिणाम होत नाही ?

(i) पर्जन्य

(ii) तापमान

(iii) भूमीय वारे

(iv) क्षारता

उत्तर - सागरी प्रवाहांच्या जवळील किनारप‌ट्टीच्या प्रदेशात भूमीय वाऱ्यांचा परिणाम होत नाही.

(४) उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, त्या प्रदेशांत खालीलपैकी कशाची निर्मिती होते ?

(1) दव

(iii) बर्फ

(ii) दहिवर

(iv) दाट धुके

उत्तर- उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात, त्या प्रदेशांत दाट धुक्यांची निर्मिती होते.

(५) उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह कोणते ?

(i) उबदार समुद्राचा प्रवाह

(iii) पृष्ठभागावरील महासागर प्रवाह

(ii) थंड सागरी प्रवाह

(iv) खुल्या महासागराचा प्रवाह

उत्तर उत्तर ध्रुवीय प्रदेशापासून अंटार्क्टिकापर्यंत वाहणारे प्रवाह थंड सागरी प्रवाह आहेत.

प्रश्न २- खालील विधाने तपासा, अयोग्य विधान दुरुस्त करा.

(१) सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात.

उत्तर- हे विधान योग्य आहे..

(२) खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात.

उत्तर हे विधान योग्य आहे.

(३) पृष्ठीय सागरी प्रवाहांची निर्मिती सर्वासाधारपणे विष्ववृत्तीय प्रदेशात होते.

उत्तर हे विधान योग्य आहे.

(४) मानवाच्या दृष्टीने सागरी प्रवाहांना मोठे महत्त्व आहे.

उत्तर हे विधान योग्य आहे.

(५) हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक नसते.

उत्तर हे विधान अयोग्य आहे.

हिमनगांचे वहन जलवाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक असते.

(६) ब्राझीलजवळ सागरी प्रवाहांमुळे पाणी उबदार होते. याउलट आफ्रिका किनाऱ्यालगत पाणी थंड होते.

उत्तर - हे विधान योग्य आहे.

प्रश्न ३ - पुढील गोष्टींचा परिणाम सांगा.

(१) उष्ण प्रवाहांचा हवामानावर

उत्तर - (i) उष्ण सागरी प्रवाह थंड प्रदेशात ज्या किनारप‌ट्टीजवळून वाहतात, तेथे हवामान उबदार बनते. तर काही प्रदेशांत पावसाचे प्रमाण वाढते.

(ii) तसेच काही ठिकाणी उष्ण प्रवाहांमुळे तेथील थंडीची तीव्रता कमी होऊन हवामान उबदार बनते. त्यामुळे तेथील बंदरे हिवाळ्यातही गोठत नाहीत.

(२) शीत प्रवाहांचा हिमनगाच्या हालचालींवर

उत्तर - शीत सागरी प्रवाहांमुळे धुव्रीय प्रदेशांकडून हिमनग वाहत येतात. असे हिमनग सागरी वाहतूक मार्गांवर आले तर जहाजांना ते धोकादायक ठरतात.

(主) सागरात पुढे आलेल्या भूभागांचा सागरी प्रवाहांवर

उत्तर - सागरात पुढे आलेल्या भूभागामुळे सागरी प्रवाहांच्या दिशा बदलतात.

(४) उष्ण व शीत प्रवाहांच्या संगमाचे प्रदेश.

उत्तर - ज्या ठिकाणी उष्ण व शीत प्रवाह एकत्र येतात. त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते. न्यू फाउंडलैंड बेटाजवळ गल्फा उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोर शीत प्रवाह एकमेकांना येऊन मिळतात. त्यामुळे तिथे दाट धुके निर्माण होते.

(५) सागरी प्रवाहांची वहनशक्ती

उत्तर (i) सागरी प्रवाह किनाऱ्याच्या अगदी जवळून वाहत नाहीत. साधारणतः ते समुद्रबूड जमिनीच्या अधः सीमेजवळून वाहतात. (ii) सागरी प्रवाहांचा वेग जरी कमी असला, तरी त्याबरोबर वाहून नेले जाणारे पाणी प्रचंड प्रमाणात असते. (iii) पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावाखाली म्हणजेच मध्य अक्षवृत्ताच्या आसपास सागरी प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, मात्र विषुववृत्तीय प्रवाह पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. यामुळे सागरी प्रवाहांचे चक्राकार आकृतिबंध तयार होतात.

(६) खोल सागरी प्रवाह

उत्तर - खोल सागरी जल पृष्ठीय भागापासून तळाकडे व तळाकडून पृष्ठाकडे हलवले जाते. पृष्ठीय भागातील उष्ण जल तळाकडे तर तळाकडील पोषक द्रव्यांनी समृद्ध व शीत जल पृष्ठाकडे नेले जाते

प्रश्न ४ - सागरी प्रवाहांचा नकाशा पाहून पुढील प्रश्नांची उत्तरे दया.

(१) हंबोल्ट प्रवाहाचा दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरील हवामानावर काय परिणाम होत असेल ?

उत्तर - हंबोल्ट हा शीत सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळून वाहत असल्याने तेथील पर्जन्याचे प्रमाण कमी होते. तसेच त्यामुळे तेथे ओसाड वाळवंटी प्रदेश तयार झाले आहे.

(२) प्रति विषुववृत्तीय प्रवाह कोणकोणत्या महासागरांत दिसत नाहीत व का?

उत्तर - प्रति विषुववृत्तीय प्रवाह हे हिंदी महासागर, दक्षिण महासागर व आर्क्टिक महासागर या महासागरांत दिसत नाहीत. कारण हे महासागर या प्रवाहापासून दूर आहेत. तसेच विषववृत्तीय प्रवाह हे अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागरातील विषुववृत्तीय पट्ट्यातच वाहतात.

(३) उत्तर हिंदी महासागरात कोणते प्रवाह नाहीत व का ?

उत्तर - उत्तर हिंदी महासागरात शीत प्रवाह नाहीत. हिंदी महासागर उत्तरेकडे भूवेष्टित आहे. या महासागराचे विषुववृत्तामुळे उत्तर व दक्षिण असे दोन भाग होतात. या महासागरावर मान्सून वाऱ्यांचा मोठा प्रभाव आहे. हे वारे हंगामानुसार दिशा बदलतात. त्यामुळे उन्हाळ्यात उत्तर हिंदी महासागरात सागर प्रवाह घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात, तर हिवाळ्यात ते विरुद्ध दिशेने वाहतात. त्यामुळे शीत प्रवाह तिथे पोहचू शकत नाही.

(४) उष्ण व शीत प्रवाह येणारी क्षेत्रे कोठे आहेत?

उत्तर - अटलांटिक महासागरातील उत्तर अमेरिका खंडाजवळील ग्रँड बँक,

युरोप खंडाजवळील डॉगर बँक, न्यू फाउंडलैंड बेट इत्यादी. ही उष्ण व शीत प्रवाह एकत्र येणारी क्षेत्रे आहेत.

प्रश्न ५ - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(१) खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे कोणती?

उत्तर - खोल सागरी प्रवाह निर्मितीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

(i) खोलवर वाहणारे हे प्रवाह सहसा महासागरातील वेगवेगळ्या भागांतील पाण्याच्या तापमान व घनतेतील तफावतीमुळे तयार होतात.

(ii) वेगवेगळ्या भागातील पाण्याचे तापमान हेही खोल सागरी प्रवाहांमागचे मोठे कारण आहे.

(iii) गरम झालेल्या पाण्याची क्षारता कमी असते व पर्यायाने घनताही कमी असते, असे पाणी पृष्ठभागावर येते, तर गार पाण्याची घनता जास्त असल्याने ते खाली जाते.

(२) सागरजल गतिशील कशामुळे होते ?

उत्तर (i) समुद्रसपाटीपासून ५०० मी खोलीपर्यंतचा भाग वरचा थर असतो. या खोलीपर्यंत सूर्यकिरणांची उष्णता सहज पोहचतो. (ii) या विभागातील सागरी जलाची हालचाल ही तापमान व क्षारता यामुळे होते. तर ग्रहीय वाऱ्यांमुळे सागरजलाला गती प्राप्त होते.

(३) साँगरी प्रवाहांना वाऱ्यामुळे कशी दिशा मिळते ?

उत्तर- (i) सागरी प्रवाह प्रामुख्याने सागरजलाचे तापमान, क्षारता व घनता तसेच ग्रहीय वारे यांमुळे निर्माण होतात. (ii) नियमितपणे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचे सागरजलपृष्ठाशी घर्षण होते. ते आपल्याबरोबर पाण्याला पुढें वाहून नेतात. त्यामुळे सागरी पाण्याला विशिष्ट दिशा व गती मिळते. त्यामुळे सागरी प्रवाह निर्माण होतात. (iii) महासागरातील जवळपास सर्वच सागरी प्रवाह ग्रहीय वाऱ्यांच्या दिशेने वाहतात, किनारपट्टीच्या स्वरूपाचा परिणाम होऊन त्यांची वाहण्याची दिशा बदलू शकते. (iv) एखाद्या प्रदेशात वर्षभर एकाच दिशेने वाहणारे वारे असतील तर त्याचा परिणाम सागरजलाच्या हालचालीवर होतो. उत्तर गोलार्धात ०० ते ३०० उत्तर अक्षवृत्तीय दरम्यान पूर्वीय वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात. तर दक्षिण गोलार्धात ०० ते १३० दक्षिण अक्षवृत्तांच्या दरम्यान ते आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. त्यामुळे विषुववृत्तीय प्रदेशात सागरजलाची हालचाल पूर्वेकडून पश्चिमेकडे होते. (v) पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात सागरी प्रवाहांचे चक्र घड्याळांच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने सुरू होते. अशाप्रकारे सागरी प्रवाहांना दिशा मिळते.

(४) कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात का गोठतात ?

उत्तर - (i) कॅनडाच्या पूर्व किनाऱ्याजवळून लॅब्राडोर हा शीत प्रवाह वाहतो त्यामुळे तेथील हवामान अतिशय थंड असते. (ii) शीत सागरी प्रवाहांमुळे ध्रुवीय देशाकडून या भागात हिमनग वाहत येतात. (iii) तसेच हिवाळ्यात जानेवारी हिन्यात २८० से इतके तापमान असते, तर जुलै महिन्यात १६० से इतके ापमान असते म्हणून कॅनडाच्या पूर्व किनाऱ्यावरील बंदरे हिवाळ्यात गोठतात.

- रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(१) एक स्वेडूप म्हणजे घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग असतो.

(२) सागरी प्रवाहांचा साधारण वेग ताशी २ ते किमी असतो.

(३) सागरी प्रवाह नसते तर समुद्र व महासागरांतील पाणी राहिले असते.

(४) शीत सागरी प्रवाहालगतच्या किनारपट्टीवर पर्जन्याचे प्रमाण असते.

उत्तर द्या

(1) 106 (2) 10 (3) जमा (4) घट७०

पदार्थ केव्हा प्रहाहितकेव्हा होतो ?

उत्तर - जेव्हा त्या पदार्थाला गती प्राप्त होते तेव्हा एखादा पदार्थ प्रवाहित होतो.

(२) पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके काय होते ?

उत्तर - पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे पदार्थाचे स्थानांतरण होते.

(३) प्रवाह निर्मितीसाठी पदार्थातील कोणकोणत्या विसंगती कारणीभूत होत असतील ?

उत्तर प्रवाह निर्मितीसाठी पदार्थाची घनता व वस्तुमान या विसंगती कारणीभूत होत असतील.

(१) सागरी प्रवाहांचे कोणते मुख्य प्रकार दिसतात ?

उत्तर - उष्ण प्रवाह व शीत प्रवाह हे सागरी प्रवाहांचे मुख्य प्रकार दिसतात.

(२) विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहे?

उत्तर विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे वाहणारे प्रवाह हे उष्ण प्रवाह आहे.

(३) ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह कोणत्या प्रकारचे आहेत ?

उत्तर ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे वाहणारे प्रवाह हे शीत प्रवाह आहेत.

(४) सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना त्यांच्या दिशेत उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणता फरक दिसतो ?

उत्तर - सागरी प्रवाह वर्तुळाकार फिरताना उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरतात, तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात.

(५) ज्या भागात दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी नेमके काय घडत असेल ?

उत्तर - ज्या भागात शीत व उष्ण हे दोन्ही प्रकारचे प्रवाह एकत्र येतात त्या

भागात वनस्पती, शेवाळ, प्लवंक इत्यादींची वाढ होते. हे माशांचे खाट्य असते. तसेच हे प्रवाह जेथे एकत्र येतांत त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होते. दोन वेगळ्या प्रकारचे प्रवाह एकत्र येतात. अशा भागाच्या किनाऱ्यालगत असणारी मानवी वस्ती, त्यांचे व्यवसाय यांच्याशी कोणता सहसंबंध असतो ?

उत्तर- उष्ण व शीत प्रवाह जेथे एकत्र येऊन मिळतात, त्या भागात वनस्पती, शेवाळ, प्लवंक यांची वाढ होते. हे माशांचे खाद्य असल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर मासे येतात. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात मत्स्यक्षेत्रे निर्माण झालेली आहेत. म्हणून अशा ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.

Post a Comment

0 Comments