Subscribe Us

वर्ग.8.भुगोल.पृथ्वीचे अंतरंग



प्रश्न २ - चूक की बरोबर ते लिहा. चुकीची विधाने दुरुस्त करा.

(१) पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही.

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

(२) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.

उत्तर- हे विधान चूक आहे.

पृथ्वीच्या अंतरंगाच्या गाभ्यात लोह व निकेल या मूलद्रव्याचे प्रमाण जास्त आहे.

(३) बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही.

उत्तर- हे विधान बरोबर आहे.

(४) खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशिअम यांचे बनले आहे.

उत्तर- हे विधान चूक आहे.

खंडीय कवच हे सिलिका व अॅल्युमिनिअम या मूलद्रव्यांनी बनलेले आहे.

प्रश्न ३ - उत्तरे लिहा.

(१) भूकवचाचे दोन भाग कोणते? त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय?

उत्तर - भूकवचाचे खंडीय कवच व महासागरीय कवच असे दोन भाग आहेत. खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्या वर्गीकरणाचा आधार पुढीलप्रमाणे आहे.

(i) पृथ्वीचा सर्वांत वरचा भाग हा घनरूप असून तो भूकवच म्हणून ओळखला जातो. भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही. सरासरी जाडी ३० ते ३५ किमी मानली जाते. (ii) भूकवचाची खंडाखालील जाडी 16 ते

२४ किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणी खाली ४० किमीपेक्षा जास्त असते. तर सागर पृष्ठाखाली ती १० किमीपेक्षा कमी आढळते.

( २) प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात ?

उत्तर - (i) भूकवचाखाली प्रावरणाचे थर आढळतात. प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. (ii) उच्च प्रावरण हे जास्त प्रवाही असते. याच भागात शिलारस कोठी आढळते. ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. प्रावरणाच्या या भागास दुर्बलावरण असेही म्हणतात.

(३) पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे स्पष्ट करा.

उत्तर - पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, हे पुढीलप्रमाणे स्पष्ट होते.

(i) बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त होते. (ii) या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भू-जनित्र असेही संबोधले जाते. (iii) पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भू-चुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते. (iv) पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. हे पृथ्वीचे पाचवे व महत्त्वाचे आवरण आहे.

प्रश्न ५ - भौगोलिक कारणे लिहा.

(१) पृथ्वीच्या अंतरंगात निलगता आढळतो

उत्तर - कारण (i) भूकवच (शिलावरण) व प्रावरण यांच्या दरम्यानच्या थराला मोहो विलगता म्हणतात. (ii) प्रावरण व गाभा यांच्या दरम्यान थराला गुटेनबर्ग विलगता (खंडित्व) म्हणतात. यावरून हे सिद्ध होते की पृथ्वीच्या भूल अंतरंगात विलगता आढळतात.•

(२) मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे.

उत्तर - कारण (i) भूकवचाच्या वरचा थर हा खंडीय कवचाचा आहे. या थरातील खडकांमध्ये प्रामुख्याने सिलिका व अॅल्युमिनिअमचे प्रमाण अधिक आढळते. ही मूलद्रव्ये वजनाने हलकी असल्याने भूकवचाच्या वरच्या भागात असतात. यांचा सियाल असा उल्लेख केला जातो. (ii) भूकवचाच्या खालील थरास महासागरीय कवच आहे. या थरातील खडक सिलिका व मॅग्नेशिअमच्या संयुगाने बनलेले आहेत. हा थर खंडीय कवचापेक्षा जड असतो. याचा सायमा असा उल्लेख केला जातो. (iii) प्रावरण लोह-मॅग्नेशिअम यांच्या संयुगाने तयार झाले आहे. (iv) गाभा हा थर प्रावरणाखाली असून या थरात जड व कठीण खनिजे आढळतात. अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने लोह व निकेल या खनिजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे या भागाचा निफे असा ही उल्लेख केला जातो.

(३) प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे.

उत्तर - कारण (i) प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात. उच्च प्रावरण जास्त प्रवाही असून याच भागात शिलारस कोठी आढळते. (ii) ज्यामधून ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान हा शिलारस पृथ्वीपृष्ठावर येतो. (iii) भूकंपाची केंद्रे प्रामुख्याने या भागातच आढळतात. (iv) प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालींमुळे भूपृष्ठावर ज्वालामुखी, बीच्या भूकंप यासारख्यां प्रक्रिया घडतात. म्हणून प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्रे आहे, हे सिद्ध होते.

(४) भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.

उत्तर - कारण (i) भूकवचाची खंडाखालील जाडी १६ ते ४५ किमीच्या दरम्यान आहे. भूकवचाची जाडी पर्वतश्रेणींखाली ४० किमीपेक्षा जास्त असते, तर सागरपृष्ठाखाली ती १० किमीपेक्षा कमी आढळते. (ii) भूपृष्ठ व सागरपृष्ठ हे भूकवचाचेच दोन उपविभाग आहेत. भूपृष्ठीय कवचाची सरासरी जाडी सुमारे ३० किमी आहे. तर सागरीय पृष्ठाची या थराची सरासरी जाडी ७ ते १० किमी आहे. यावरून हे स्पष्ट होते की भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते.

(५) चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते.

उत्तर - कारण (i) पृथ्वीच्या परिवलनामुळे ऊर्ध्वमुखी प्रवाहांना भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. (ii) पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भू-चुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौरवातांपासून संरक्षण होते. अशाप्रकारे चुबंकावरणामुळे पृथ्वीचे सरंक्षण होते.३०

(१) भूकप होतो म्हणजे नेमके काय होते?

उत्तर - भूकंपाच्या वेळी जमीन थरथरते. पृथ्वीच्या अंतरंगात होणाऱ्या हालचालींमुळे अकस्मात ऊर्जा मोकळी होऊन एखाद्या भागातील जमीन हादरते.

(२) अग्निजन्य खडक कसे तयार होतात ?

उत्तर - ज्वालामुखीच्या उद्रेकातूनबाहेर पडणारा लाव्हारस भूपृष्ठावर थंड झाल्यानंतर त्यापासून अग्निजन्य खडक तयार होतात.

(३) ज्वालामुखी म्हणजे काय ?

उत्तर - पृथ्वीच्या अंतरंगातील विशेषतः प्रावरणाच्या वरच्या भागातील शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर येणे म्हणजे ज्वालामुखी होय.

(४) ज्वालामुखी उद्रेकादरम्यान कोणकोणते पदार्थ बाहेर पडतात ?

उत्तर - ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान प्रचंड उष्ण लाव्हारस, वायू, वाफ इत्यादी पदार्थ बाहेर पडतात.

(५) हे पदार्थ कोणत्या स्वरूपात असतात ?

उत्तर - हे पदार्थ द्रवस्वरूपात असतात.

(६) हे पदार्थ थंड असतात की उष्ण असतात ? का?

उत्तर - हे पदार्थ उष्ण असतात. कारण पृथ्वीचा अंतर्गाभा हा उष्ण व प्रवाही जाडीचा आहे.

पृथ्वीचे अंतरंग कसे असेल याबद्दल १०-१२ वाक्ये लिहा. उत्तर- भूकंप तरंग किंवा लहरी यांच्याद्वारे पृथ्वीच्या अंतरंगाची रचना समजून येते. पृथ्वीच्या अंतरंगाचे तीन विभाग केले जातात. (१) शिलावरण किंवा भूकवच (२) मध्यावरण किंवा प्रावरण (३) गाभा

भूकवच किंवा शिलावरण व प्रवाही जाडीचा हा पातळ थर असून त्यात भूपृष्ठालगतचा सुमारे १६ ते ३३ किमी. ग्रॅनाईटचे प्रमाण जास्त आहे. या थरात सिलिका (Si) व अॅल्युमिनिअम या हलक्या धातूंचे प्रमाण जास्त असते. याथराची घनता २.६ ते २.७ आहे.

(२) मध्यावरण किंवा प्रावरण - भूकवचानंतर २९०० किमी पर्यंतच्या अराला मध्यावरण किंवा प्रावरण असे म्हणतात. या थरात बेसाल्ट खडक आढळतो. तसेच या थरात सिलिका व मॅग्नेशिअम या धातूंचे प्रमाण जास्त असते. या थराची घनता ३० ते ४.७ ग्रॅम आहे.

(३) गाभा- पृथ्वीच्या केंद्राजवळचा हा गाभ्याचा भाग २९०० किमी ते सुमारे ३४०० किमी जाडीचा असून त्यात निकेल (Ni) व फेरस-लोखंड (Fe) या जड धातूंचे प्रमाण जास्त आहे. म्हणून त्यास निफे असे म्हणतात. आत्यंतिक चुंबकत्व आणि लवचीकता हे याचे गुणधर्म आहेत. या अति तप्त घनभागाची घनता १३ पेक्षा अधिक आहे. गाभ्याने पृथ्वीच्या अंतरंगाचा जवळजवळ १/३ भाग व्यापला आहे.

प्रश्न ३ शोधा पाहू !

जागतिक वसुंधरा दिन म्हणजे काय? तो कशासाठी साजरा करतात?

उत्तर वसुंधरा दिन हा पर्यावरणविषयक कार्यक्रमांना पाठबळ देण्याचा पाया आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाच्या सार्वजनिक वचनबद्धतेला पुन्हा एकदा संजीवनी मिळते. हा दिन साजरा करण्यामुळे जगभर व्यापक वैविध्यपूर्ण कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक चालना मिळते. वसुंधरा दिन हा जगातील सर्वाधिक मोठा कार्यक्रम आहे. गेल्या ४५ वर्षापासून दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस 'वसुंधरा दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. १९७० च्या दशकामधील आधुनिक पर्यावरण चळवळीचा जन्म हा दिवस साजरा करण्यातूनच झाला.मानवाने केलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लक्ष वेधले जावे म्हणून अमेरिकेतील खड़ा सरू केली. आता जगभर हा दिवस 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला एका गटाने २२ एप्रिल रोजी 'वसुंधरा दिन' साजरा करण्याची प्रथा १९७० मध्ये गजाः जातो. या निमित्ताने पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन होईल याकरिता जगभर विविध कार्यक्रम राबवले जातात. आपल्या घराची, आपल्या निर्सगाची, धरतीची की आणि पर्यावरणाची जबाबदारी आपली आहे. प्रत्येक दिवस वसुंधरा दिवस S (F. असतो हे मनात ठेवावे आणि जागरुकपणे वागावे.

Post a Comment

0 Comments