Subscribe Us

वर्ग.7.मराठी. गचक अंधारी

 8. गचक अंधारी


• शब्दार्थ:

झुंजूमुंजू - पहाटेचा प्रकाश, पुळे पुढे, भेव भीती, लोयच – फारच, थोळसक - थोडस, तिकळे तिकडे, मलेही मलाही

• वाक्प्रचार :

(१) गिल्ला करणे गोंधळ करणे.

(२) युक्ती फळाला येणे यशस्वी होणे.

(३) शंकेची पाल चुळचुळणे शंका निर्माण करणे.

(४) जिवात जीव येणे निश्चिंत होणे.

१ खालील वाक्ये वाचा, प्रत्येक घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा

(१) सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.

उत्तर - गाढवावर मडकी लादून ती विकायला सदा बाजारात जात असे. बाजारात मडकी विकल्यावर काही मडकी शिल्लक राहायची. तो ती एखाद्याच्या घरी ठेवायचा. गाढवावर आता मडकी लादण्याचा प्रश्न नसल्यामुळे सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.

(२) गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.

उत्तर - गज्याने वडिलांसोबत बाहेरगावी जायचा हट्ट धरला. सदाने वाटेत कोल्हा, लांडगा, वाघ वगैरे प्राणी येतात असे सांगून त्याला येण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. पण गजा आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. तेव्हा खदाने त्याला गचाकअंधारी या काल्पनिक प्राण्याचे नाव सांगितले आणि तो वाघालाही खातो असे सांगितले. आता मात्र गजा घाबरला. म्हणून गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.

(३) वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.

उत्तर - आपण वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे लक्षात येताच सटाला कापरे भरले. तो थाडथाड उडू लागला. वाघाला मात्र वाटले की आपल्या पाठीवर बसलेला गचकअंधारी आपल्याला खाण्याची तयारी करतो आहे. या

कल्पनेने वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.

(४) सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.

आतपर - आपण गाढवाऐवजी वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे सदाच्या लक्षात आले. त्याला कापरे भरले. वाघाला आपण दिसलो तर तो आपल्याला खाल्ल्यावाचून राहणार नाही. म्हणून या संकटातून, या वाघापासून आपल्याला वाचवण्यासाठी सदा आकाशाकडे पाहत देवाची करुणा भाकू लागला.

खालील मु‌द्द्यांवर दोन तीन वाक्यांत माहिती लिहा.

सदाचा व्यवसाय

सदाचा मुलगा गजानन

सदाची झालेली फजिती

सदाने स्वतःची केलेली सोडवणूक

उत्तर - सदाचा व्यवसाय गाढवाच्या पाठीवर मडकी लादून बाजारात जाणे आणि विकणे हा सदाचा व्यवसाय होता.

सदाचा मुलगा गजानन हा हट्टी स्वभावाचा होता. त्याने सदाबरोबर बाजारात जायचा हट्ट धरला. सदाने त्याला बाजारात येण्यापासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने आपला हट्ट सोडला नाही. शेवटी सदाने गचकअंधारी या काल्पनिक प्राण्याचे नाव सांगून तो वाघालाही खातो असे सांगितले. तेव्हा गजा घाबरला व त्याने सदाबरोबर बाजारात जाण्याचा हट्ट सोडला.

सदाची झालेली फजिती आपण गाढवाऐवजी वाघाच्या पाठीवर बसलो

आहोत हे लक्षात येताच सदाला कापरे भरले. आपला जीव वाचवण्यासाठी तो देवाला करुणा भागू लागला. त्याला दरदरून घाम फुटला. एवढ्या थंड वातावरणातही

घामाने तो वरपासून खालपर्यंत थबथबला अशी त्याची फजिती झाली.

च्या सदाने स्वतःची केलेली सोडवणूक सदाला दूरवर वडाचे झाड दिसले. त्याच्या पारंब्या जमिनीपर्यंत आलेल्या होत्या. वाघ जेव्हा झाडाखालून जाऊ लिलागला तेव्हा सदाने लोंबणारी पालवी पकडून तो वाघाच्या पाठीवरून सरकला आणि सरळ वर गेला. अशी त्याने स्वतःची सोडवणूक केली

प्रश्न ३ - कोण, कोणास व का म्हणाले ?

(१) "कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा."

उत्तर- गजा सदयाला म्हणाला. गजाला सट्याबरोबर बाजारात जायचे होते. त्याने येऊ नये म्हणून सदया त्याला वाघाची भीती दाखवत होता. म्हणून मला वाघाबिघाची भीती दाखवू नका असे गजा म्हणाला.

(२) 'या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली तनू नोको मले."

उत्तर - सदा गजाला म्हणाला. गजा बाजारात येण्याचा हट्ट धरतो आणि त्याला वाघाची भीती दाखवली तरी तो आपला हट्ट सोडत नाही, असे पाहून सदा त्याला म्हणाला की, वाघालाही खाणारा गचकअंधारी नावाचा प्राणी जंगलात यावेळी येत असतो. तो आला आणि तुझ्यावर झडप घातली. तर मला दोष देऊ नकोस.

(३) 'गचकअंधारी झटके देऊन रायली.'

उत्तर वाघ स्वतःशीच म्हणाला. आपण वाघावर बसलो आहोत हे सदाच्या लक्षात येताच त्याला कापरे भरले. तो थाड थाड उडू लागला. तेव्हागचकअंधारी आपल्याला खायच्या विचारात आहे. म्हणून ती झटके देत आहे असे वाघ स्वतःच्याच मनाशी बोलला.

(४) 'गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती.'

उत्तर- वाघ स्वतःशीच म्हणाला. सदाने वडाच्या झाडाची पारंबी पकडून तो झाडावर चढून गेला. वाघाला हायसे वाटले. कारण आपल्या पाठीवर गचकअंधारी बसला होता आणि तो आपल्याला खाल्ल्याशिवाय राहणार नव्हता असे वाघाला वाटले होते

उत्तर द्या

(१) प्रेम वाटणे - आपुलकी वाटणे, जिव्हाळा असणे, माया वाटणे, आत्मीयता वाटणे.

(२) राग घेणे - क्रोध येणे, संताप येणे, क्रोधाने डोळे लाल होणे, मुठी वळणे,

(३) दया वाटणे - करुणा वाटणे, सहानुभूती वाटणे, कीव येणे इ.

प्रश्न २ - आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहांबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा.

(१) ज्यास कोणी शत्रू नाही असा.

अजातशत्रू

(२) मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण.

पाणपोई

(३) धान्य साठवण्याची जागा.

कोठार

(४) दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा.

मनकवडा

(५) डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता.

प्रश्न ४ - कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदत्न करून वाक्ये पूर्ण करा.

(मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, सुसाट पळत सुटणे, शंकेची पाल चुकचुकणे.)

(१) पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच

(२) उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात

(३) लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव

(४) पोलिसांना बघून चोर

उत्तर - (१) गिल्ला केला. (२) शंकेची पाल चुकचुकली. (३) मेटाकुटीला

नाला. (४) सुसाट पळत सुटले.

आपण समजून घेऊया.

शब्द-संयुक्त infinitives

प्रश्न १ - खालील परिच्छेद वाचा. त्यातील शब्द‌योगी अव्यये अधोरेखित करा.

आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते.

उत्तर - आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते.

उदा., (१) इथे वाहन लावू नये.

(२) हिरवळीवर कचरा टाकू नये, हिरवळीवर कचरा टाकून ये.

इथे वाहन लावून य

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा.

उत्तर- (१) शिव्या देऊ नये

(२) धूम्रपान करू नये. धूम्रपान करून ये.

शिव्या देऊन ये.

* प्रकटवाचन प्रश्न १ - 'गचकअंधारी' या कथासंग्रहाचे प्रकटवाचन करा.

उत्तर - विद्यार्थ्यांनी या कथासंग्रहाचे वाचन विनोदाचा आस्वाद घेऊन न अडखळता स्पष्ट उच्चारात करावे.

• वर्गकार्य / गृहपाठ

विचार करा. सांगा.

प्रश्न १ - हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा.

उत्तर- (१) वाघाला गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला.

(२) सदाच्या अंगाला घाम फुटला. तो वाघाच्या पाठीवर पडला. पण त्यामुळे वाघच घाबरला. त्याला वाटले की गचकअंधारी आता आपल्याल

भाषेचा वापर करत असताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याचवेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

पाण्यात भिजवून भिजवून खाणार.

(३) आपला जीव वाचवण्यासाठी सदा वडाच्या झाडावर चढला. पण वाघाला मात्र आपणच गचकअंधारीपासून सुटलो याचा आनंद झाला आणि तो सुसाट पळत सुटला.

प्रश्न २ - 'गचकअंधारी' हे पात्र काल्पनिक आहे की खरे, याबाबत तुमचे मत लिहा.

उत्तर - गचकअंधारी हे पात्र पूर्णतः काल्पनिक आहे. कारण 'गचकअंधारी' या नावाचा कोणताही प्राणी अस्तित्वात नाही. ही लेखकाची एक कल्पना आहे.

प्रश्न ३ - पाठाच्या दृष्टीने 'गचकअंधारी' या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा.

उत्तर- गचकअंधारी हे पात्र काल्पनिक असले तरी ते या कथेचे नायक आहे. या कथेतील सर्व कथानक या पात्राभोवती फिरत राहते. 'गचकअंधारी' चे नाव व वर्णन ऐकून सदाबरोबर बाजारात जाण्याचा आपला हट्ट गजा सोडून देतो. वाघाने गचकअंधारीला पाहिले नसले तरी वाघ त्याला घाबरतो. शेवटी गचक अंधारीपासून आपली सुटका झाली या आनंदात वाघ पळून जातो. एकूणच संपूर्ण कथानक गजकअंधारीने व्यापलेले आहे. हे या पात्राचे महत्त्व आहे.




Post a Comment

0 Comments