९. नात्याबाहेरचं नातं
सुभाष किन्होळकर
प्रश्न १ - खालील विधानांमागील कारणे लिहा.
(१) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
उत्तर - गावाबाहेर चंद्रप्रकाशात लेखक आपल्या मित्रांसोबत भेंड्या खेळत होते. थंडी कडाक्याची पडली होती. थोड्या अंतरावर असलेल्या कडूनिंबाच्या झाडाखाली एक कुत्र्याचे पिल्लू कडाक्याच्या थंडीमुळे कण्हत होते. लेखक त्याच्याजवळ गेले. त्याने करुणदृष्टीने लेखकाकडे पाहिले. लेखकाने त्याच्या अंगावर मफलर टाकले. त्याची हुडहुडी थांबली. तो थंडीने गारठू नये व कायमचा आधार मिळावा. म्हणून लेखकाने त्याला थेट घरी आणले.
(२) लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लांचे नाव 'डांग्या' ठेवले
उत्तर - कुत्र्याचे पिल्लू शरीराने दांडगे होते. म्हणून लेखकांनी त्या कुत्र्याच्या पिल्लाला शोभेल असे त्याचे नाव शोधले व त्याचे नाव 'डांग्या' ठेवले.
(३) लेखक डांग्याला 'पक्क्या हिमंतीचा राखण्या' म्हणतात.
उत्तर डांग्या अतिशय प्रामाणिक होता. तो शेताची राखणदारी करत होता. शेतातील त्याची रखवाली अट्टल चोराची दातखिळी बसवणारी होती
त्याच्या कर्तबगारीनं भलाभल्यांची बोबडी वळायची. म्हणून लेखक डांग्याला 'पक्क्या हिंमतीचा राखण्या' म्हणतात.
उत्तर- (१) कुत्र्याचं पिल्लू अंगाचं गाठोडं करून पडलेलं
(२) समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली
(३)। हुडहुडी रोखण्याचा चालवलेला प्रयत्न
प्रश्न १ - 'नात्याबाहेरचं नातं' या पाठाचे प्रकटवाचन करा.
उत्तर- विद्यार्थ्यांनी या पाठाचे न अडखळता स्पष्ट उच्चारात वाचन करावे.
त्तर -
माझा आवडता प्राणी
या जगात जलचर, सरपटणारे प्राणी, चतुष्पाद प्राणी व पक्षी असे चार प्रकारचे वाणी आढळून येतात. चारही प्रकारांमध्ये क्रूर व सौम्य असे उपप्रकार आहे.
प्रश्न ३ खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा.
कार्यक्रम
परिणाम
(१) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला.
मफलरमुळे काहीशी ऊब मिळाल्याने त्याचा चेहरा खुल्ला. हुडहुडीही थांबली. त्याला खुशी झाली. त्यानं लेखकाला चोरट्या नजरेनं आपुलकीनं न्याहाळलं.
(२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं.
त्यामुळे त्याला हवा असलेला पक्का आधार त्याला मिळाला. ब्लॅकेटच्या ऊबेमुळे त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं. त्याला मित्र मिळाल्याचं समाधान मिळालं.
(३) झाडांवरील माकडांची घाबरगुंडी उडायची.
डांग्याची छाती जबरदस्त होती. त्याचं झाडाखाली नुसतं बसून राहणंही माकडांच्या काळजात धस्स करणारं होतं. यामुळे माकडांची घाबरगुंडी उडायची.
(४) लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुसवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली.
याचा परिणाम असा व्हायचा की डांग्या शिळेच्या रोखाणं दुडदुडत धावत यायचा. त्यानं आपल्या वागण्यानं सर्वांना भुरळ घातली होती
प्रश्न ४- जोड्या
'अ' गट
'ब' गट
(१) पिल्लाची धडपड पाहूनं
(अ) थंडी असह्य होत होती.
(२) रात्र आगेकूच करू लागली
(आ) मन आकर्षित करत होती.
(३) वाऱ्याने हलणारी डहाळी
(इ) थंडीची लाट वाढली.
(४) इवल्याशा जिवाला
(ई) पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली.
उत्तर - (1 E), (23), (3 A), (4 A)
• व्याकरण व भाषाभ्यास
खेळूया शब्दांशी
न १ खालील शब्दांचे तुम्हांला समजलेले अर्थ लिहा.
(१) हुडहुडी (२) रुखरुख (३) फुलोर (४) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
(५) विश्वस्त (६) सोहळा
उत्तर - (१) हुडहुडी थंडी, गारवा
(२) रुखरुख चिंता
(३) फुलोर - मोहोर
(४) अष्टपैलू व्यक्तिमत्त्व अनेक गुणांनी युक्त असा वेगळेपणा
(५) विश्वस्त खात्रीचा
(६) सोहळा - समारंभ
(२) शांत * बडबड्या, बोलका
(३) मान X अवमान, अपमा
(4) मूळदेश
(५) आरंभ X शेवट, अखेर
प्रश्न ४ - खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
'अ' गट
'ब' ग
(१) कणव निर्माण होणे.
(अ) दया निर्माण होणे.
(२) काळजात धस्स होणे.
(आ) उत्साह वाढणे.
(३) उत्साह द्विगुणित होणे.
(इ) आकर्षित करणे.
(४) भुरळ घालणे.
(ई) भितीने धक्का बसणे.
उत्तर: (1- A), (2 E), (3- Aa), (4 - 3)
प्रश्न ५ खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा.
(१) नखशिखान्त - पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत.
(२) आपादमस्तक - पायापासून डोक्यापर्यंत.
उत्तर - (१) तो मुसळधार पावसात नखशिखान्त भिजला.
(२) पोलिसांनी चोराला आपादमस्तक न्याहाळले.
प्रश्न १ - 'नात्याबाहेरचं नातं' या पाठाचे प्रकटवाचन करा.
उत्तर - विद्यार्थ्यांनी या पाठाचे न अडखळता स्पष्ट उच्चारात वाचन करावे.
• वर्गकार्य / गृहपाठ
लिहिते होऊया.
प्रश्न १ - तुम्हांला आवडणाऱ्या प्राणिजीवनविषयक कार्यक्रमांची यादी तयार करा.
विविध प्राणी व त्यांचे प्रकार
आवडण्याचे कारण
स्वभाव व गुणवैशिष्ट्ये
त्याच्या बरोबरचा अविस्मरणीय प्रसंग
आवडता प्राणी कोणता ?
माझा आवडता प्राणी
उत्तर -
माझा आवडता प्राणी
या जगात जलचर, सरपटणारे प्राणी, चतुष्पाद प्राणी व पक्षी असे चार प्रकारचे वाणी आढळून येतात. चारही प्रकारांमध्ये क्रूर व सौम्य असे उपप्रकार आहे.
पोपट हा माझा आवडता पक्षी आहे. पोपटालाच राघू, कीर, तोता अशी नावे आहेत. माझ्या भावाने एकदा बाजारातून एक पोपट विकत आणला होता. त्यासाठी एक सुंदर पिंजराही त्याने आणला होता. पोपट त्या पिंजऱ्यात राहायचा. पोपटाला पेरू आवडतो. डाळिंबाचे दाणे आवडतात. कवठ आवडते. दादा काय आणि मी काय ही फळं त्याच्यासाठी विकत आणत होतो. पोपट भात, वरण, वरणात भिजवलेली पोळी असं माणसासारखंच जेवण घेतो.
मला तो आवडतो याचं मुख्य कारण तो पक्षी असुनही माणसासारखं बोलतो. त्याचे उच्चारही स्पष्ट असतात. त्याचं बोलणं मला फार आवडतं. तो आपल्या मनानं स्वतंत्र असं काहीच बोलत नाही. पण आपण जे त्याला शिकवू ते तो अचूक बोलतो. त्याचं पाठांतर चांगलं असतं.
पिंजऱ्याच्या दारातून आम्ही त्याला खायला दिलं की ते दार बंद करून ठेवत असू. तो दारातून पिंजऱ्यातून उडून जाईल अशी आम्हाला भीती वाटायची. पण एक दिवस दार उघडंच राहलं आणि तरीही तो उडून गेला नाही.
याचं कारण म्हणजे आमच्या कुटुंबावर तो आता प्रेम करत होता. मी पिंजऱ्याजवळ जाताच तो नाचतो. नाचत नाचत माझे स्वागत करतो. मी जे बोलतो तेच तोही बोलतो. अवंतीची शाळा सकाळची असते. म्हणून आम्ही तिला लवकर उठवतो. हे त्यानं पाठ करून घेतलं. आता तो आमच्या सारखंच तिला, 'अवंती ऊठ सकाळ झाली आहे. तुझी शाळा आहे' अशी हाक मारत असतो.
एकदा गंमतच झाली. एकदा तो 'घरात पाहा, घरात पाहा' असं जोरजोरान
ओरडला. यापूर्वी तो असं जोरजोराचं कधीच ओरडला नव्हता. यावेळी मध्यरात्र झालेली होती. मध्यरात्री त्याच्या ओरडण्यानं आम्ही खडबडून जागे झालो, लाईट - लावले. घरात जाऊन पाहलं तर दोन चोर लपलेले होते. आम्ही बाहेरून खोलीचं दार बंद करून घेतलं. पोलिसांना फोन' लावला. पोलीस आले. त्यांनी त्या चोरांना पकडलं व पोलीसठाण्यात नेलं. पोपटानं आमची संपत्ती वाचवली होती. हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आहे.
0 Comments