(२) खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
(१) काळजात त्यांच्या भरली शहाळी
(१)
(२) झणी धरणीला गलबत टेकवा (२)
उत्तर - (१) कोकणातल्या माणसांचं हृदय शहाळीप्रमाणे मधुर असते.
(२) गलबत जमिनीला लवकर लागावे म्हणून गलबताचा वेग वाढवा.
प्रश्न
४- कवीने वाऱ्याला केलेल्या विनंतीचा अर्थ तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर - गलबताच्या शिडात वारे शिरले तरच गलबत चालते. म्हणून कवी वाऱ्याला विनंती करतात की तू अवखळपणा आणि तुझ्या साऱ्या खोड्या सोडून दे व शिडात शिडात शीर.•
व्याकरण व भाषाभ्यास
खेळूया शब्दांशी
प्रश्न १ कवितेतील शेवट समान असणारे शब्द लिहा.
(१) नाखवा (२) खाडी (३)
भोळी (४) साऱ्या
उत्तर - (१) नाखवा
दाखवा
(२) आखात
वाऱ्या
(३) भोळी
शहाळी
(४) साऱ्या
झाडी
प्रश्न २- खालील शब्दांचे तुम्हांला माहीत असणारे अर्थ लिहा.
(१) शीड (२) माड (३) खाडी (४) शहाळी (५) इझणी (६) गलबत
उत्तर -
(१) शीड वारा बांधण्यासाठी गलबतावरील कापडाचे साधन
(२) माड नारळाप्रमाणे उंच असलेले एक झाड.
(३) खाडी समुद्राचे पाणी भूमीत शिरते तो भाग.
(४) शहाळी गोड पाणी असलेली नारळाची एक जात
(५) झानी
ताबडतोब, त्वरेने
(६) गलबत होडी, नाव
प्रश्न १ - खालील उभयान्वयी अव्ययांचा वाक्यांत उपयोग करा.
(१) की गुरूजी म्हणाले की खोटं बोलू नये.
(२) म्हणून - पाऊस आला म्हणून शेतकऱ्यांना आनंद झाला.
(३) पण तू खेळायला जा पण लवकर घरी ये.
(४) परंतु - ती परत आली खरी परंतु तिच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता.
(५) अथवा हा प्रश्न सोडवा अथवा तो सोडवा.
(६) म्हणजे - तू नागपूरला ये म्हणजे आपण खूप मजा करू.
प्रश्न २ खालील वाक्यांतील उभयान्वयी अव्यये अधोरेखित करा.
(१) सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.
(२)आईने काटकसर केली; पण शिल्लक काही उरले नाही.
(३) ती कलिंगड किंवा खरबूज आणणार आहे.
उत्तरद्या
(१) सशाची आणि कासवाची पळण्याची शर्यत लागली.
(२) आईने काटकसर केली; पण शिल्लक काही उरले नाही.
(३) त कलिगंड किंवा खरबूज आणणार आहे.
* प्रकटवाचन
प्रश्न १ - 'गोमू माहेरला जाते' हे गीत तालासुरात म्हणा.
उत्तर - विद्यार्थ्यांनी या गीतातील कवीने केलेल्या कोकणातील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा. व हे गीत तालासुरात व अभिनयासह म्हणावे.
प्रश्न १ - तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना तुम्ही तुमच्या गावातील कोणकोणती स्थळे दाखवाल, त्या स्थळांचे थोडक्यात वर्णन करा
उत्तर - अंबाझरी तलाव हा तलाव फार मोठा. नागनदीचा उगम याच तलावातून झाला. संध्याकाळी तेथील सूर्यास्त पाहायला अनेक लोक येत असतात. तेथे अंबाझरी बगिचा आहे. काँग्रेसच्या अधिवेशनाला आले असताना पं. नेहरू याच बागेतील खास बांधलेल्या बंगल्यात उतरले होते.
महाराजबाग - हे प्राणिसंग्रहालय आहे. यात सिंह, वाघ, हत्ती, अस्वले इ. विविध प्राणी पाहायला मिळतात. प्रेक्षकांना बसण्यासाठी गवताचे हिरवेगार गालिचे आहेत.
अजबघर - हे ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहायल आहे. यात ऐतिहासिक नाणी, हत्यारे अशा अनेक वस्तू पाहायला मिळतात. शिवाय काही वस्तूंतून प्राचीन संस्कृतीचेही दर्शन घडते
प्रश्न १ आपल्या देशातील कोणकोणत्या राज्यांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या राज्यांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.
उत्तर - आपल्या भारत देशाला तिनही बाजूने समुद्र किनारा लाभला आहे. पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र व दक्षिणेला हिंदी महासागर आहे. समुद्रकिनारा लाभलेले राज्य
(१) गुजरात (२) महाराष्ट्र (३) गोवा (४) कर्नाटक (५) केरळ
(6)तामिळनाडू (7) आंध्र प्रदेश (8) ओरिसा (9) पश्चिम बंगाल
प्रश्न २ - आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा.
उत्तर - आपल्या महाराष्ट्र राज्यातील समुद्रकिनारा लाभलेल्या शहरांची व गावाची नावे पुढीलप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्याला पश्चिमेकडील अरबी समुद्र लाभला आहे.
(१) पालगर केळवे-माहिम
(२) मुंबई शहर
(3) मुंबई उपनगरे
(४) रायगड अलिबाग, जंजिरा, श्रीवर्धन
(५) रत्नागिरी - हर्णे, गुहाघर, जयगड, गणपतीपुळे, रत्नागिरी
(६) सिंधुदुर्ग - विजयदुर्ग, देवगड, सिंधुदुर्ग
0 Comments