Subscribe Us

वर्ग.7.विज्ञान.सजीव सृष्टी



सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण

प्रश्न 1 - शोधा पाहू माझा जोडीदार !

'अ' गट

'ब' गट

(1) कमळ

(अ) फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात.

(2) कोरफड

(आ) अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात.

(३) अमरवेल

(इ) वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित.

(4) घटपर्णी

(ई) पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित.

उत्तर – (1- E), (2- E), (3), (4 – A)

प्रश्न 2 - परिच्छेद वाचा व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

मी पेंग्विन, बर्फाळ प्रदेशात राहतो. माझ्या शरीराची पोटाकडील बाजू पांढरी आहे. माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. माझे पंख आकाराने लहान आहेत. माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत. आम्ही नेहमी थव्याने राहतो

(1) माझी त्वचा जाड, पांढऱ्या रंगाची व त्या खाली चरबीचे आवरण कशासाठी असावे ?

उत्तर - जाड त्वचा, पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण थंडीपासून संरक्षण करण्यासाठी असावे.

(2) आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून का राहतो ?

उत्तर - शत्रूपासून एकमेंकांना संरक्षण देण्यासाठी व थंडीपासून बचावप्र करण्यासाठी नेहमी थव्याने एकमेकांना चिकटून राहतो.

(3) ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का ?

उत्तर - पेंग्विनच्या त्वचेवरील लांब दाट केस, पांढरा रंग हे त्याचे वैशिष्ट्य आहे. पाठीवरील काळे केस त्यांना वरून आच्छादित करते. त्यांची जाड त्वचा त्याला संरक्षण देते. त्याच्या शरीरावरील मऊ केसांमध्ये हवेचा एक थर असतो. तो त्यांना थंड पाण्यापासून सुरक्षित ठेवतो.

(4) मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो ? का ?

उत्तर - मी दक्षिण ध्रुवारील अंटार्क्टिका या भौगोलिक प्रदेशात राहतो. कारण या प्रदेशात राहण्यासाठी पेंग्विन स्वतःला जलीय जीवन जगण्यासाठी अनुकूलित करून घेतो.

प्रश्न 3 - खोटे कोण बोलतो ?

(1) झुरळ : मला पाच पाय आहेत.

उत्तर - झुरळ खोटे बोलतो. कारण झुरळाला सहा पाय असतात.

(2) कोंबडी : माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत.

उत्तर - कोंबडी खोटे बोलते. कारण कोंबडीला बदकाप्रमाणे पाण्यांमध्नाह

पोहावे लागत नाही म्हणून तिची बोटे त्वचेने जोडलेली नाहीत.

(3) निवडुंग : माझा मांसल हिरवा भाग हे पान आहे.

उत्तर - निवडुंग खोटे बोलत आहे. कारण त्याचा मांसल भाग पान नसून है खोड आहे.

प्रश्न 4- खालील विधाने वाचून त्याआधारे अनुकूल संदर्भात परिच्छेद लेख करा.

(1) वाळवंटात खूप उष्णता आहे.

उत्तर - (i) वृष्टी व बाष्पीभवन हे दोन घटक ओसाड प्रदेशाच्या बाबतीत महत्त्वाचे असून त्यावरच या प्रदेशातील जलस्रोत अवलंबून असतो. (ii) वाळवंटातील हवा सर्वत्र अतिशय कोरडी असते. (iii) वर्षातील बहुतांश काळ सापेक्ष व निरपेक्ष आर्द्रता शून्याच्या जवळपास असतो. (iv) पाऊस अतिशय अनिश्चित व अनियमित स्वरूपाचा असतो. त्याचे वितरण खूपच विषम असते. (v) पावसाचा कोणताही निश्चित ऋतू नसतो. जो काही आकस्मिक पाऊस पडतो. तो तीव्र वादळाबरोबर पडतो. जेव्हा केवळ हलक्या सरी पडतात तेव्हा जमीन थोडीशी ओली होते. परंतु उष्णतेने ताबडतोब बाष्पीभवन होऊन जाते. सामान्यपेक्षा बाष्पीभवन अधिक होत असते. (vi) काही वेळा ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडू लागल्याचे दिसू लागते, परंतु तो जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच त्याचे बाष्पीभवन होऊन जाते. अशा प्रकारे वार्षिक सरासरी पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प असते.

(2) गवताळ प्रदेश हिरवागार असतो.

उत्तर - (i) पृथ्वीच्या उबदार आणि समशीतोष्ण कटिबंधातील भागात 500 ते 1300 मिलिमीटर पाऊस पडतो. (ii) 6 ते 8 महिन्यांत पडणाऱ्या चावस्रामुळे सच्छिद्र जमिनीवर गवताळ प्रदेश तयार होतात. (iii) पृथ्वीच्या सुमार

25% जमिनीवर असणाऱ्या गवताळ प्रदेशाच्या हवामानाप्रमाणे दोन प्रकार आहेत उष्ण अणि समशीतोष्ण, (iv) उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशात 1-ते 2 मीटर उंचीचे आणि तेवढ्याच उंचीचे झुडपे असतात. सोबत खुरटी- झाडेही विखुरलेली असतात.

(3 कीटक जास्त प्रमाणात आढळतात.

क्ष उत्तर- (i) कीटक संधिपाद प्राणी त्रर्गातील कायटिनचे बाह्य आवरण ला असलेल्या या बहुपेशीय प्राण्यांचे शरीर, डोके, वक्ष आणि पोट अशा तीन प्रमुख प्रश भागांनी बनलेले असते. (ii) सर्वाधिक विविधता असलेला हा वर्ग आहे. आजपर्यंत सुमारे दहालाख कीटकांच्या प्रजातीचे वर्गीकरण झाले आहे. (iii) प्राणीसृष्टीमध्ये सहा ते दहा दशलक्ष जाती असतात. त्यापैकी नव्वद टक्के बहुपेशीय प्राणी जम्म आहेत. (iv) कीटक पृथ्वीवरील सर्व प्रदेशांत आढळणारा प्राणी आहे. (v) प्रत्यक्षात जा असलेला कीटक बहुविविधतेचा आकडा नक्की करणे कठीण असले तरी पा 14 ते 18 लाख कीटक पृथ्वीवर असावेत असा अंदाज आहे. (vi) दरवर्षी उपन असलेल्या कीटकांच्या यादीमध्ये वीस हजार नव्या कीटकांची भर पडते आहे. अस

(4) आम्ही लपून बसतो.

शक उत्तर (i) विषारी व बिनविषारी सापांची ओळख नसल्याने सापाला मारण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. (ii) मोरांना कायदयाने मिळणाऱ्या संरक्षणाने वाढणारी संख्या, शेतांमध्ये त्यांचे सतत दिसणारे कळप त्यांच्याकडून पिकांबरोबर सापांचा केला जाणारा सुपडासाफ यातून शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या बारी जाणाऱ्या सापांची संख्या जाणवण्याइतपत कमी झाली आहे. (iii) शेतीत तसेच (ii) पठारांवर पहायला मिळणारे साप यामुळे सहजासहजी दिसत नसल्याची बाब समोर टाकन येत आहे. (iv) ते स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बिळात लपून बसतात. 

5) आमचे कान लांब असतात.

• ( उत्तर - (1) ससा हा अतिशय लोभस, शांत व भित्रा प्राणी आहे. तसेच तो चपळ व लांब कोनाचा प्राणी म्हणून ओळखला जातो. (ii) याची ऐकण्याची क्षमता इतर प्राण्यापेक्षा जास्त आहे. (iii) शत्रू पासून स्वतःचे संरक्षण करण्याची क्षमता सश्यात आहे. कारण त्याचे कान लांब व मजबूत आहे. (iv) त्याच्या लांब कानामुळे तो स्वतःचा बचाव करू शकतो.

प्रश्न 5 - खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा.

(1) उंटाला 'वाळवंटातील जहाज' का म्हणतात ?

उत्तर - (i) वाळवंटातील हवामान अतिशय शुष्क व कोरडे असते. दिवसा जमीन खूप तापते व रात्री लवकर थंड होते. पाण्याची या भागात कमतरता जाणवते. (ii) या भागात उंट हा एकमेव प्राणी असा आहे की तो 21 दिवस पाण्याशिवाय गरम वाळूवर प्रवास करू शकतो. त्यामुळे वाहन म्हणून उंटाचा उपयोग केला जातो. (iii) उंटाची चालण्याची गती 65 किमी च्या जवळपास असते. तसेच लांबच्या प्रवासा दरम्यान त्याची गती 40 किमी पर्यंत कायम ठेवू शकतो. म्हणून उंटाला 'वाळवंटातील जहाज' असे म्हणतात.

(2) निवडुंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशांत

सहज का जगू शकतात ?

उत्तर - (i) वाळवंटी वनस्पतींना पाने नसतात किंवा असल्यास ती खूप बारीक सुईसारखी असतात किंवा त्याचे काट्यांमध्ये रूपांतर झालेले असते. (ii) या रचनेमुळे त्यांच्या शरीरातील अगदी क्सी पाणी वाफेच्या रूपात बाहेर टाकले जाते. (iii) खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते त्यामुळे ते मांसल बनते., (iv) पानांच्या अभावामुळे खोडांना प्रकाश संश्लेषन करावे लागते म्हणून ती हिरवी

असतात. (४) या वनस्पतींची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर जातात. या वनस्पतींच्या खोडावरदेखील मेणचट पदार्थांचा जाड थर असतो म्हणून निवडूंग, बाभूळ व इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशांत सहज जगू शकतात.

(3) सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे ?

उत्तर - अनुकूलन व सभोवतालची परिस्थिती यांचा घनिष्ट संबंध दिसून येतो. (i) अनुकूलन ही लगेच होणारी प्रक्रिया नाही. ही प्रकिया निरंतर असते. हजारो वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले प्राणी आणि आजचे प्राणी यांच्या शरीरात दिसणारे बदल हे परिस्थितीनुसार झालेले अनुकूलनच होय. (ii) अधिवासानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगणे, पुनरूत्पादन करून स्वतःला टिकवणे, अन्न मिळवणे, शत्रूपासून स्वतःचे रक्षण करणे अशा अनेक बाबींसाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीर क्रियांमध्ये झालेले बदल म्हणजे अनुकूलन होय.

(4) सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते ?

उत्तर - सजीवांचे वर्गीकरण त्यांच्या गुणधर्मांचे निकष लावून केले जाते. (i) वनस्पतींच्या खोडाचा आकार व उंचीनुसार, जीवनक्रम कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. (ii) प्राण्यांचे पेशी रचनेनुसार, पाठीच्या

कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते.

प्रश्न 1 नावे सांगा.

(1) जलमय वनस्पती.

उत्तर - कमळ, अळू, शैवाळ.

(2) वाळवंटातील वनस्पती.

उत्तर - निवडुंग, बाभूळ.

(3) हिमप्रदेशात आढळणाऱ्या वनस्पती.

उत्तर-देवदार, पाइन.

(4) गवताळ प्रदेशातील प्राणी.

उत्तर- वाघ, सिंह, कोल्हा.

(5) सरपटणारे प्राणी.

उत्तपाल, साप, सरडा, गांडुळ.

* वर्गकार्य/गृहपाठ

प्रश्न 1 - थोडे आठवा.

(1) सजीवांमधील विविधता कोणकोणत्या बाबींमुळे लक्षात येते ?

उत्तर - सजीवांमधील विविधता पुढील बाबींमुळे स्पष्ट होते.

वनस्पतींमधील विविधता आपल्या सभोवती अनेक ठिकाणी वेगवेगळ्या

प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही वनस्पती गवतासारख्या खुरट्या तर काही वनस्पती उंच डेरेदार असतात. काही वनस्पती पाण्याखाली तर काही पाण्यावर तरंगताना दिसतात. वाळवंटामध्येही आपल्याला काही वनस्पती वाढताना दिसतात. एवढेच नाही, तर एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्येही आपल्याला विविधता आढळते. उदा. गुलाबाचे विविध प्रकार, वेगवेगळ्या चवीचे आंबे, तांदळाचे किंवा गव्हाचे विविध प्रकार. काही वनस्पतींना तर खोड, पान किंवा मूळ नसते. सर्वसामान्य

वनस्पतींपेक्षा त्या वेगळ्या असतात. प्राण्यांमधील विविधता - पर्यावरणात टिकून राहण्यासाठी निरनिराळ्या प्राण्यांनी

निरनिराळे आकार धारण केले आहेत. प्राण्यांमध्येही शरीररचनेत विविधता आढळून येते. डोळ्यांना न दिसणारा अमिबा, आकाराने मोठा असलेला हत्ती, लहान गोगलगाय, पाण्यात पोहणारा मासा, आकाशात उंच उडणारी घार, फुलांभोवती वावरणारी फुलपाखरे व इतर कीटक, भिंतीवर सरपटणारी पाल हे सर्व प्राणी आहेत. प्राण्यांना डोळे, मान, धड, शेपूट व हालचालींसाठी हातपाय असे अवयव असतात. शरीरातील विविध क्रिया करण्यासाठी विविध इंद्रियसंस्थाही असतात. या बाबतींत देखील प्राण्यांमध्ये विविधता आढळून येते.

(2) वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण का व कोणकोणत्या निकषांच्या आधारे केले जाते ? 

उत्तर- (i) पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे. त्यामुळे सजीवांमध्ये बऱ्याच प्रमाणात विविधता आढळून येते. ते ओळखता यावे आणि त्यांच्या विविधतेचा अभ्यास करता यावा म्हणून सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता आहे. (ii) वनस्पती व प्राण्याचे वर्गीकरण पुढील निकषाच्या आधारे केले जाते.

(i) प्राण्यांचे वर्गीकरण करणारे निकष पेशीरचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादन पद्धती व त्यांचा अधिवास.

(ii) नस्पतींचे वर्गीकरण करणारे निकष

वनस्पतींच्या खोडाचे आकार व उंची, जीवनक्रम कालावधीनुसार व त्यांचा अधिवास.

पश्न 2 - सांगा पाहू! (1) काश्मीर व राजस्थान या प्रदेशांत आढळणारे प्राणी व वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का ? त्यांमध्ये कोणता फरक तुम्ही सांगू शकाल ?

उत्तर काश्मीर व राजस्थान या प्रदेशांत आढळणारे प्राणी व वनस्पती

त्यमुळे

एकाच प्रकारचे नाहीत. त्यामध्ये बराच फरक आहे)

प्रत्येक सजीव ज्या परिसरात व वातावरणात राहतो त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडून येतो.

(i) काश्मीरसारख्या हिमप्रदेशात देवदार, पाईन असे सूचीपर्णी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात. तर राज्यस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशात बाभूळ, निवडुंगासारखी काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळते..

((ii)' काश्मीरसारख्या हिमप्रदेशात याक, ध्रुवीय अस्वल, पौढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, हिमबिबट्या यांसारख्ये लांब व दाट केस असणारे प्राणी आढळतात. तर वाळवंटी प्रदेशात पाण्याची तीव्र कमतरता असते. शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यासाठी तेथे राहणाऱ्या प्राण्यांची त्वचा जाड असते. पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात. नाकावर त्वचेची घडी असे प्राणी आढळतात. तसेच पापण्या लांब व जाड असतात. उदा. उंट.

(2) हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांट्यांचा त्यांना काय उपयोग

होतो ?

उत्तर: हिमनदी प्रदेशात भरपूर बर्फवृष्टी होते. झाडांच्या उतरत्या फांद्या फांद्यावर बर्फ जमा होण्यापासून रोखतात.

(3) रस्त्यावरून धावणारी वाहने व आकाशात उडणारी विमाने यांच्या रचनेतील मुख्य फरक कोणता आहे ?

उत्तर - रस्त्यावरून धावणारी वाहने आकाराने आयताकृती व जड असतात. तर आकाशात उडणारी वाहने दोन्ही टोकांना निमुळती असतात. त्यामुळे त्यांना उडताना हवेचा विरोध होत नाही.

पानांच्या पृष्ठभागांवरून पाणी ओघळून जाते.

(2) या वनस्पतींची पाने पाण्यामुळे सडून का जात नाहीत ?

उत्तर - या वनस्पतींच्या पानांवर मेणचट पदार्थांचा पातळ थर असल्यामुळे पाण्याच्या संपर्कात असूनही पाणी त्या पानांवर टिकून राहत नाही. म्हणून या वनस्पतींची पाने पाण्यामुळे सडून जात नाही.

(3)या वनस्पतींची मुळे आकाराने लहान व तंतुमय का असतात ?

उत्तर- या वनस्पतींची मुळे तळातील मातीशी घट्ट रुजण्यासाठी व तग धरून ठेवण्यासाठी आकाराने लहान व तंतुमय असतात.

आदिमानवापासून आजच्या मानवापर्यंत झालेले अनुकूलन कसे घडत गेले असेल, याची माहिती मिळवा.

उत्तर - एप वानरापासून उत्क्रांती होत आदिमानव निर्माण झाला. कुशल मानव ते प्रगत बुद्धीचा मानव यांची वाटचाल विविध टप्प्यात झाली.

कुशल मानव - हातांचा कुशलतेने

वापर करणाऱ्या या मानवाच्या अस्तित्वाचा पुरावा आफ्रिका खंडात मिळाला. या मानवाचा मेंदू एप वानरापेक्षा

अधिक मोठा होता.

ताठ कण्याचा मानव - याचा मेंदू

कुशल मानवाच्या तुलनेत अधिक विकसित होता. याला अग्नीचा वापर करण्याचे तंत्र कळले असावे. परंतु अग्नी निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते. शक्तिमान मानव - शक्तिमान मानवाची शरीरयष्टी धिप्पाड होती. याचा मेंदूताठ कण्याच्या मानवापेक्षा अधिक विकसित होता. त्याला अग्नी निर्माण करण्याची कला साधलेली होती.

बुद्धिमान मानव-विचार करण्याची अधिक क्षमता असलेल्या मानवाला बुद्धिमान मानव' म्हटले जाते. तो कामाच्या गरजेनुसार विविध प्रकारची हत्यारे आणि अवजारे बनवत असे. तो चित्रे काढू लागला होता व कलात्मक वस्तू बनवू लागला होता.

प्रगत बुद्धीचा मानव - बुद्धिमान मानवाची वैचारिक क्षमता अधिक प्रगत झाली. तेव्हा त्याला 'प्रगत बुद्धीचा मानवा असे नाव मिळाले. कल्पकता, बुद्धिकौशल्य आणि हस्तकौशल्य यांच्या आधारे स्वतःचे जीवन समृद्ध करण्याच्या सततच्या प्रयत्नांतून मानवी संस्कृती उदयाला आली आणि विकसित होत राहिली.



Post a Comment

0 Comments