वनस्पती : रचना व कार्ये
प्रश्न 1 - वनस्पतींची तीन उदाहरणे दया.
(1) काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या
उत्तर - फणस, अननस, लिची, ब्लॅकबेरी
(2) खोडावर काटे असणाऱ्या
उत्तर- बोर, बेल, बाभूळ, निवडुंग
(3) लाल फुले असणाऱ्या
उत्तर - जास्वंद, गुलाब, कन्हेर
(4) पिवळी फुले असणाऱ्या
उत्तर- शेवंती, लीली, चाफा
(5) रात्री पाने मिटणाऱ्या
उत्तर - पीतांबर कृष्ण (मेणबत्तीचे झाड)
(6) एकच बी असणारी फळे असणाऱ्या
उत्तरबोर, आंबा, चारोळी, काजू
(7) फळामध्ये अनेक बिया असणाऱ्या
उत्तरे कलिंगड, खरबूज, फणस.
प्रश्न 2 - कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा. त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहून आकृती काढा.
उत्तर - गुलाब हा फुलांचा राजा आहे. गुलाब संपूर्ण काटेरी वनस्पती आहे. (i) या फुलाला लांब देठ असते. फुल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात. (ii) कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या (पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.
(iii) दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो. (iv) परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जावून पडतात. या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बियांमध्ये होते.
प्रश्न 3 - काय सारखे ? काय वेगळे ?
(1) ज्वारी आणि मूग
(2) कांदा आणि कोथिंबीर
(3) केळीचे पान व आंब्याचे पान
(4) नारळाचे झाड व ज्वारीचे ताट
(1) ज्वारी आणि मूग
दोन्हींची मुळे जमिनीत असतात.
ज्वारी एकदल बी आहे. मूग द्विदल बी आहे.
(2) कांदा आणि कोथिंबीर
दोन्हींची फुले सारखी असतात. दोघांच्याही फुलांमध्ये बी असते.
कांद्याचे मूळ तंतुमय असते. कोथिंबीराची मूळ सोटमुळे प्रश
असतात.
(3) केळीचे पान व आंब्याचे पान
दोन्ही पानांना देठ असते.
केळीचे पान आकाराने लांब असते. आंब्याचे पान आकाराने लहान असते.
(4) नारळाचे झाड व ज्वारीचे ताट
दोन्ही वनस्पतींना आगंतुक मुळे असतात.
नाराळाचे खोड मजबूत व टणक असते. ज्वारीचे ताट कमकूवत असते. (
प्रश्न 4 - खालील चित्रांविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर - (i) हे बी मका या वनस्पतींचे आहे. या बी चे दोन समान भाग होत
नाही म्हणून या बी ला एकदल बी असे म्हणतात.
(ii) चित्रातील हे बी वाटाण्याचे आहे. या बी चे दोन समान भाग होतात म्हणून या बी ला द्विदल बी असे म्हणतात.
प्रश्न 5 - वनस्पतींच्या अवयवांची कार्ये स्पष्ट करा.
उत्तर- (i) मूळ मूळ माती घट्ट धरून ठेवते. वनस्पतीला आधार देते. जमिनीतील पाण्याचे व पोषकतत्त्वाचे शोषण व वहन करणे ही मुळाची मुख्य कार्ये आहेत.
(ii) खोड - वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असते. खोड हे अन्ननिर्मिती, अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधार देते.
(iii) पान पान हे पसरट असते. अन्ननिर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असते. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. जमिनीतील पाणी, पोषकतत्त्वे आणि हवेतील कार्बनडायॉक्साइड यांच्या साहाय्याने अन्ननिर्मिती करतात. ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते.
(iv) फूल फूल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे. हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे कार्य करते.
(v) फळ - फळांपासून बियांची
निर्मिती होते. व या बियांपासून नवीन वनस्पती तयार होते.
प्रश्न 6 - खाली पानांचे काही गुणधर्म दिलेले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे ए पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. गुळगुळीत पृष्ठभाग, खडबडीत पृष्ठभाग, मांसल पर्णपत्र, पर्णपत्राद काटे.
(1) गुळगुळीत पृष्ठभाग
उत्तर वड हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे अतिविशाल, प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. यांच्यां फांदयांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोहचतात. त्यांना पारंब्या म्हणतात. पाने मोठी, रुंद, गोल, किंचित लांबट असतात. पानांचा पृष्ठभाग गुळगुळीत असतो. खोड मजबूत, गुळगुळीत व चीकयुक्त असते. वन का त्य उप अ
(2) खडबडीत पृष्ठभाग -
उत्तर - पारिजातक हे झाड सपुष्प वनस्पती आहे. याची पाने खडबडीत असतात. ही पाने वरून हिरवी तर खालून हलक्या रंगाची असतात. पारिजातकाची फुले गुच्छामध्ये येतात. फुलांच्या पाकळ्या या पांढऱ्या रंगाच्या असतात. ज्या नारंगी रंगाच्या दांडीला जुडलेल्या असतात.
(३) मांसल पाने
उत्तर - मांसल पर्णपत्र निवडुंग सुमारे 6 मीटर पर्यंत उंच वाढणारा हा गुळगुळीत पण काटेरी, मांसल, पानझडी, लहान जंगली - वनस्पती आहे. यांच्या फांदया गोलसर किंवा काहीशा पंचकोनी, मांसल, संधियुक्त असून त्या मंडलित किंवा झुबक्यांनी येतात. त्यांवर उपपर्णी जोडकाटे उंचवठ्यावर सर्पिलरित्या असतात. पाने साधी, मांसल 15-30 सेंमी लांब, एकांतरित, व्यस्त अंडाकृती असून फांदयाच्या टोकास येतात.
(4) पर्णपत्रावर काटे -
उत्तर कोरफड कोरफड ही औषधीयुक्त बहुवार्षिक वनस्पती आहे. पाने जाड मांसल असून पानामध्ये पाणी गराच्या रूपात साठवलेले असते. पाने लांबट असून खोडाभोवती गोलाकार वाढतात. पानाच्या कडांना काटे असतात. झाडाच्या मध्यातून एक लालसर उभा दांडा निघतो व त्यावर केशरी रंगाची फुले घोसाने येतात.
(2) वनस्पतींचे विविध अवयव कोणते ?
उत्तर - वनस्पतींचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादी विविध अवयव आहेत.
प्रश्न । - जरा डोके चालवा.
(1) चिंच, आंबा वा वनस्पतींची मुळे तंतुमय असती तर काष झाले असते ?
उत्तर - (i)
कमकूवत
) चिंच, आंबा ही मोठी वृक्षे आहेत. (
ii) तंतुमय मुळे अतिशय
असतात. (iii) मोठ्या वृक्षांना आधार देणारी व तग धरून ठेवणारी सोटमुळे असतात. (iv) तंतुमय मुळे चिंच व आंबा या वृक्षांचा भार सांभाळू शकणार नाही.
(2) मुळांच्या टोकाला इजा झाली तर काय होईल ?
उत्तर- (i) जमिनीतील पाण्याचे व पोषकतत्त्वाचे शोषण व वहन करणे ही
आणि,
मुळाची मुख्य कार्ये आहेत. (ii) मुळांच्या टोकाला इजा झाली तर पाण्याचे व पोषकतत्त्वाचे शोषण व वहन होणार नाही त्यामुळे वनस्पती जीवंत राहणार नाही.
(3) मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे कोणत्या प्रकारची आहेत ? उत्तर- मेथी, पालक, कांदा या वनस्पतींची मुळे तंतुमय प्रकारची आहेत.
(4) फुलांवर भिरभिरणाऱ्या फुलपाखरांचा वनस्पतींना कोणता उपयोग
होतो?
उत्तर- (i) फुलपाखरू फुलांवर बसल्यावर त्याच्या पायांना फुलावरील न? परागकण चिकटतात. (ii) फुलपाखरू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडतात. तीं त्यांच्या पायाला चिकटलेले परागकण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जाते व बीज प्रसार होतो.
0 Comments