Subscribe Us

वर्ग.7.भूगोल. भरती ओहोटी भाग दोन



प्रश्न ४ - पुढील बाबींचा भरती-ओहोटीशी कसा संबंध असेल ते लिहा.

(१) पोहणे (२) जहाज चालविणे (३) मासेमारी (४) मीठ निर्मिती (५) सागरी किनारी सहलीला जाणे.

जानाम (१) पोहणे - (1) समुद्रात पोहायचे असल्यास स्थानिक लोकांचा सामला ऐकणे महत्त्वाचे आहे. कारण पोहण्यावर भरती-ओहोटीचा परिणाम होतो. (1) ओहोटी असेल तर शक्यतो पाण्यात जाऊ नये. कारण ओहोटी आत। खेचून घेते व भरती बाहेर फेकते. (iii) काही किनारा एकदम खोल होत जातात, काही किनाऱ्यावर ओहोटीचे पाणी ओसरण्याचा आणि भरतीचे पाणी भरण्याचा बैगा जास्त असतो. काही ठिकाणी मध्येच खडक असतात, जे खूप घोकादायक उरू शकतात. (iv) भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास संमुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.


(२) जहज चालविणे - (i) भरतीच्या पाण्याबरोबर मोठी जहाजे बंदरापर्यंत जाऊ शकतात, तसेच ती परत सागरात जाऊ शकतात. (ii) सागरी प्रवाह जहाज चालविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. शक्यतो सागरी प्रवाहाला अनुसरून - जहाज चालविले जाते. कारण भरती-ओहोटीच्या वेळी समुद्राच्या लाटा वेगाने समोर येतात व परत जातात. त्यामुळे लाटांचा वेग वाढून जहाज ढकलले जाते व वेळेची बचत होते, तसेच इंधनाचीही बचत होऊन खर्च कमी होतो.


(३) मासेमारी (1) भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. (ii) भरतीच्या वेळी मासे पकडण्यासाठी फार दूर जावे लागत नाही. त्यामुळे मच्छिमाऱ्यांचे श्रम व वेळ वाचतो.


(४) मीठ निर्मिती - (ⅰ) मिठागरे हे समुद्राच्या किनाऱ्यावर मीठ तयारकरण्यासाठी केलेले वाफे असतात. (ii) भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी वाफ्यात

बेते. (iii) सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते व मीठ खाली राहते. अशाप्रकारे मीठ उत्पादनासारखे उद्योग समुद्र किनाऱ्यावर केले जाते.

(५) सागर किनारी सहलीला जाणे

(i) सागर किनारी सहलीला जातांना

भरती-ओहोटीच्या वेळांची पुरेशी काळजी घेतली पाहिजे, अन्यथा गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यासाठी आपल्याला भरती-ओहोटीच्या वेळा माहीत असणे गरजेचे आहे. (ii) या वेळा माहीत करून घेण्यासाठी तुम्हांला त्या त्या दिवसाची 'तिथी' माहीत असणे आवश्यक आहे. तिथीच्या पाऊणपट केले की ती पूर्ण भरती असण्याची वेळ असते. (iii) भरती-आहोटी बरोबरच एखादया ठिकाणची सागरी किनाऱ्याची रचना, उतार, खडकाळ भाग, किनाऱ्याजवळील प्रवाह यांचा विवार करून व स्थानिकांशी चर्चा करून मगच समुद्र किनारी सहलीला जावे.उत्तर - आकृती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमी या तिथीची आहे.

(२) चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी आहे ?

उत्तर - चंद्र, सूर्य व पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती काटकोनात आहे.

(३) या स्थितीचा भरती-ओहोटीवर नेमका काय परिणाम होईल ?

उत्तर - चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते. त्यामुळे भांगाची भरती सरासरीपेक्षा लहान असेल तर ओहोटी सरासरी ओहोटीपेक्षा मोठी असेलःप्रश्न ७- भरती-ओहोटीचे चांगले व वाईट परिणाम कोणते, ते लिहा.

उत्तर-भरती-ओहोटीचे चांगले परिणाम (i) भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात. त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. (ii) भरती-ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्रकिनारा स्वच्छ राहतो. (iii) बंदरे गाळाने भरत नाहीत. (iv) भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. (v) भरतीचे पाणी मिठागारात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. (vi) भरती-ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. (vii) भरती-ओहोटीमुळे

तिवराची वने, किनारी भागांतील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते.

भरती-ओहोटीचे वाईट परिणाम (ⅰ) भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो.

(१) पुढील छायाचित्रांचे निरीक्षण करा. प्रश्नांची उत्तरे सांगा

(१) दिलेल्या दोन्ही छायाचित्रे एकाच ठिकाणची आहेत, की वेगवेगळ्या ठिकाणची आहेत ?

उत्तर - दोन्ही छायात्रिचे एकाच ठिकाणची आहेत.

(२) दोन्ही छायाचित्रांमधील पाण्याबद्दलचे तुमचे निरीक्षण नोंदवा.

उत्तर-आकृती (अ) या छायाचित्रामध्ये समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या खूप जवळ आल्याचे दिसत आहे. तर आकृती (ब) या छायाचित्रामध्ये समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून आतपर्यंत दूर गेल्याचे दिसत आहे.

(३) अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात?

उत्तर - अशा प्रकारच्या नैसर्गिक घटनेला भरती-ओहोटी असे म्हणतात.

(१) पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते कोणत्या बलाच्या विरोधात कार्य करतात.

उत्तर - पृथ्वीपासून दूर अवकाशात जाण्यासाठी मोठे अग्निबाण वापरावे लागतात. ते गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात कार्य करतात.

अतिरिक्त प्रश्नोत्तरे

प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(१) दर पूर्ण होते.. तास मिनिटांनी भरती-ओहोटीचे एक चक्र

(२) किनारी भागांत दिवसांतून साधारणतः ओहोटी येते. वेळा भरती 

(३) लाटेच्या उंच भागाला म्हणतात. व खोलगट भागाला

(४) लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील वहन होते.

उत्तर - (१) १२, २५ (२) दोन (३) शीर्ष, द्रोणी (४) ऊर्जेचे

प्रश्न २- खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा

(१) केंद्रोत्सारी प्रेरणा म्हणजे काय ?

उत्तर - परिवलनामुळे पृथ्वीला एक प्रकारचे बल किंवा प्रेरणा मिळते. 

प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. तिला केंद्रोत्सारी प्रेरणा असे म्हणतात.

(२) भरती-ओहोटीचे दोन प्रकार सांगा.

उत्तर आहेत. उधाणाची भरती-ओहोटी व भांगाची भरती-ओहोटी हे दोन प्रकार

३) लाटा कशास्ना म्हणतात ?

उत्तर - वाऱ्यांमुळे सागरजल ढकलले जाते व पाण्यावर तरंग निर्माण होतात. त्यांना लाटा असे म्हणतात.

प्रश्न १ - एका शब्दांत उत्तरे दया.

(१) भरती-ओहोटी ही कोणती घटना आहे?

उत्तर - नैसर्गिक

(२) भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत आल्याने त्याचा फायदा कशासाठी होतो?

उत्तर - मासेमारी

(३) भरती-ओहोटीच्या क्रियेमुळे काय निर्माण करता येते?

उत्तर: बियाणे

(४) लाटेच्यां निर्मितीचे मुख्य कारण काय आहे?

उत्तर - वारां 

- सागरी लाटांपासून वीजनिर्मिती कशी केली जाते याची आंतरजालाद्वारे माहिती मिळवा. अशा प्रकारे वीज निर्मिती कोणकोणत्या ठिकाणी होते ते शोधा ?

उत्तर द्या

वारंवार येणाऱ्या त्सुनामी लाटांमुळे आपल्याला आता समुद्राच्या लाटांची शक्ती चांगलीच माहिती झाली आहे. याच लाटांच्या शक्तीचा उपयोगसमुद्राच्या तळाशी टर्बाईन्स लावून ती फिरवून ऊर्जा निर्मितीसाठी केला जा शकतो. समुद्री लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रकल्प उभे केले तर समुद्र जीवनाचाही प्हास न होता उत्तम प्रकारे वीज निर्मिती केली जाऊ शकते.

वीज निर्मितीसाठी भरती-ओहोटीच्या लाटांमध्ये किमान काही मीटर्स उंचीच्य लाटांची गरज असते. पहिला प्रकल्प 'रिव्हर व रॅन्स' असून तो फ्रान्समध्ये इंग्लिश चॅनलमधील १४ मीटर उंचीपर्यंत उसळणाऱ्या लाटांचा वापर करून घेण्याच्या दृष्टीने उभारण्यात आला आहे.

२४० मेगावॅट निर्मिती क्षमतेचा हा प्रकल्प बऱ्यापैकी यशस्वी ठरला. भरतीच्या वेळी धरणाचे दरवाजे उघडण्यात येतात आणि ओहोटीच्या वेळी बंद करण्यात येतात. लाटा खाली कोसळतांना अडवलेले पाणी वाहून दिले जाते. त्यामुळे प्रत्येकी १३ मेगावॅट वीज निर्माण करतात.

अद्याप तरी सागरी भरती-ओहोटीच्या लाटांद्वारे वीज निर्मितीचे हे गेल्या ४० वर्षातील एकमेव उदाहरण आहे.

सध्याची तंत्रज्ञान स्थिती लक्षात घेता यापैकी जेमतेम एक ते दहा टेरावॅट इतकाच स्रोत उपयुक्त म्हणावा लागेल. परंतु एनर्जी सिनर्जी साधून आपलं जीवन सुकर बनविण्याकरिता ते शक्य त्या सर्व साधनांचा शाश्वत वापर लक्षात घेऊन सागरी लाटांपासून विजेचा विचार व्हायलाच हवा हे मात्र नक्की. त्यासाठी विशेष

प्रयत्न मात्र करावे लागतील.

Post a Comment

0 Comments