३. भरती-ओहोटी
• भरती-ओहोटी या नैसर्गिक घटना आहे. भरती-ओहोटी ही सागरजलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे.
• दर १२ तास २५ मिनिटांनी भरती-ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते. ही घटना वरवर पाहता सहज व स्वाभाविक वाटत असली तरी त्याचा थेट संबंध सूर्य, चंद्र व पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण बल व केंद्रोत्सारी बल यांच्याशी असतो.
केंद्रापसारक बल आणि गुरुत्वाकर्षण बल
• परिवलनामुळे पृथ्वीला जी प्रेरणा किंवा बल मिळते, ती प्रेरणा पृथ्वीच्या केंद्रापासून विरुद्ध दिशेत कार्य करते. त्यास 'केंद्रोत्सारी बल / प्रेरणा' असे म्हणतात.
• पृथ्वीवरील कोणतीही वस्तू केंद्रोस्तारी प्रेरणेमुळे पृथ्वीभोवती असलेल्या अवकाशात फेकली जाऊ शकते. परंतु त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाची प्रेरणा पृथ्वीच्या दिशेत कार्य करत असते.
भरती - ओहोटी
• सागरजलाच्या येणाऱ्या भरती-ओहोटीस चंद्र, सूर्य यांचे गुरुत्वाकर्षण
बल, तसेच पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे व चंद्राचे अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती फिरणे, परिवलनामुळे पृथ्वीवर निर्माण होणारी केंद्रोत्सारी प्रेरणा इत्यादी घटक कारणीभूत असतात.
• चंद्र, सूर्य व पृथ्वी यांच्या सापेक्ष स्थितीमुळे भरती-ओहोटी होत असते.
• पृथ्वीवर ज्या ठिकाणी भरती-ओहोटी येते त्याच्या विरुद्ध ठिकाणीही त्याच वेळी अनुक्रमे भरती-ओहोटी येते. हा पृथ्वीच्या केंद्रोत्सारी बलाचा परिणाम आहे.
भरती-ओहोटीचे प्रकार
• उधाणाची भरती-ओहोटी चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात. त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते आणि त्या दिवशी उधाणाची भरती येते. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते. ही उधाणाची ओहोटी असते.
• भांगाची भरती-ओहोटी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील अष्टमीला भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. सूर्यामुळे ज्या ठिकाणी भरती निर्माण होते. तेथील पाण्यावर काटकोनात असलेल्या चंद्राच्या
गुरुत्वाकर्षण बलाचाही परिणाम दिसून येतो. त्यामुळे निर्माण झालेल्या भरतीच्या पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी चढते व नेहमीच्या ओहोटीपेक्षा कमी उतरते, ही भागांची भरती-ओहोटी होय.
भरती-ओहोटीचे परिणाम
मासेमारी, वीजनिर्मिती, मीठ तयार करण्यासाठी भरती ओहोटीचा उपयोग होतो.
• कचऱ्याचा निचरा होऊन किनारे स्वच्छ होतात.
बंदरे गाळाने भरत नाही. भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात.
किनारी भागातील जैवविविधतेचा विकास होतो.
भरती-ओहोटीच्या वेळेचा अंदाज न आल्यास व्यक्तींना अपघात होऊ शकतो.
भरतीची वेळ रोजच्या रोज बदलते
• किनारी भागांत दिवसातून (२४ तास) साधारणतः दोन वेळा भरती व ओहोटी येते. दोन भरतीच्या वेळांतील फरक सुमारे १२ तास २५ मिनिटांचा असतो.
लाटा
• वाऱ्यांमुळे मिळणाऱ्या शक्तीने पाणी गतिमान होते. सागरजल ढकलले जाते आणि पाण्यावर तरंग निर्माण होतात, त्यांना 'लाटा' असे म्हणतात.
लाटांची निर्मिती ही एक नैसर्गिक व नियमित होणारी घटना आहे.
लाटेचि चरत
• वाऱ्यामुळे सागरी जल उचलले जाते व त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो. लाटेच्या या उंच भागाला 'शीर्ष' व खोलगट भागाला 'द्रोणी' म्हणतात.
• वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते.
लाटांची गती
लाटेच्या पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते.
• लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा हे आहे.
• सागरतळांशी होणारे भूकंप व ज्वालामुखींमुळे देखील लाटा निर्माण होतात. उथळ किनारी भागांत अशा लाटांची उंची प्रचंड असते. त्या अत्यंत विध्वंसक असल्यामुळे मोठ्याप्रमाणावर जीवित व वित्तहानी होते. अशा लाटांना 'त्सुनामी' असे म्हणतात.
• लाटांमुळे समुद्रात घुसलेल्या भू-भागांची झीज होते, तर उपसागरासारख्या सुरक्षित भागात वाळूचे संचयन होऊन पुळ निर्माण होते.
२- भौगोलिक कारणे सांगा.
(१) भरती-ओहोटीवर सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
उत्तर कारण (1) सूर्यापेक्षा चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आहे. (1) त्यामुळे पृथ्वीवर चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलापेक्षा जास्त परिणाम करते. म्हणून भरती-ओहोटीवर सूर्यपिक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो.
(२) काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलीचा बनतो.
उत्तर कारण (i) सागर किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात सागर जलाचा परिणाम होत असतो. (ii) त्यानंतर सावकाशपणे तरंगघर्षणामुळे सागरीय चबुतऱ्यांची वाढ होते आणि सागर किनाऱ्याच्या पृष्ठभागावर गाळाचा पातळसा थर साचत राहतो. (iii) कालांतराने तरंगघर्षित मैदानाचा पूर्ण विकास झाल्यावर हे सागर- किनारे लाटांनी वाहून आणलेल्या पदार्थांनी भरून निघतात. अशा प्रकारे वाळूच्या संचयनाने खाजण तयार होते. तसेच पाण्याच्या संचयनामुळे दलदलीचा भाग तयार होतो. म्हणून काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा • किंवा दलदलीचा बनतो
प्रश्न ३ - थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) जर सकाळी ७.०० वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढी ओहोटी व भरतीच्या वेळा कोणत्या, ते लिहा.
उत्तर (1) जर सकाळी ७.०० वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही दुपारी १.१२ मिनिटांनी व भरती रात्री ७. २५ मिनिटांनी होईल. (ii) भरती-ओहोटी ही सागरजलाची दररोज आणि नियमितपणे होणारी हालचाल आहे. (iii) सागरातील पाण्याच्या पातळीत ठरावीक कालावधीने बदल होत असतो. दर १२ तास २५ मिनिटांनी भारती-ओहोटीचे एक चक्र पूर्ण होते.
(२) ज्या वेळी मुंबई (७३० पूर्व रेखावृत्त) येथे गुरु दुपारी १.०० वाजत भरती असेल, त्या वेळी दुसऱ्या कोणत्या रेखावृत्तावर भरती असेल सकारण लिहा.
उत्तर - ज्या वेळी मुंबई (७३० पूर्व रेखावृत्त) येथे गुरुवारी दुपारी १.०० वाजता भरती असेल, त्यावेळी १०७० पश्चिम रेखावृत्तावर भरती असेल. कारण पूर्व रेखावृत्ताचा भाग हा चंद्रासमोर आल्याने तेथे भरती येईल व त्याचवेळी पूर्व रेखावृत्ताच्या विरुद्ध बाजूस १०७° पश्चिम रेखावृत्तावर भरती येईल.
(३) लाटानिर्मितीची कारणे स्पष्ट करा..
उत्तर-लाटानिर्मितीची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. (i) वेगवान वारा एकाच दिशेने वाहत असल्यास मोठ्या लाटांची निर्मिती होते. म्हणजेच लाटेच्या निर्मितीचे मुख्य कारण वारा आहे. (ii) तसेच सागर तळाशी झालेला भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक यांमुळेही लाटांची निर्मिती होते.
३) ओहोटीच्या ठिकाणाच्या विरुद्ध रेखावृत्तावरदेखील ओहोटीच येते.
उत्तर - कारण (1) पृथ्वी व चंद्र यांच्या परस्परांभोवती फिरण्यामुळे निर्माण होणारे केंद्रोत्सारी बल आणि चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल हे एकमेकांच्या विरुद्ध - दिशेत कार्यरत असतात. (ii) एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असेल, तर या दोन रेखावृत्तांशी काटकोनात
0 Comments