Subscribe Us

वर्ग.7.भूगोल. सूर्य,चंद्र आणि पृथ्वी भाग दोन.

 खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण



प्रश्न ५ - उत्तरे लिहा.

(१) दर अमावास्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत का येत नाहीत

उत्तर - (i) पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. (ii) चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५० चा कोन करते. (iii) परिणामी, चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या

परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो. (iv) प्रत्येक अमावास्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो १८०० असतो. त्यामुळे दर अमाः त्या व पौर्णिमेस चंद्र, पृथ्वी, सूर्य एका सरळ रेषेत येत नाही.

(२) खग्रास सूर्यग्रहण होत असताना पृथ्वीवर खंडग्रास सूर्यग्रहणही का

• अनुभवास येते ?

उत्तर - (i) सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते, तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. (ii) मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते, तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. (iii) त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, तेव्हा सूर्यबिंब अंशतः - ग्रासलेले दिसते. ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते.

(३) ग्रहणांविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा.

उत्तर - सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यात शुभ-अशुभ असे काहीही नसते. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते.

'दे दान सुटे गिराण' च्या अनेक आरोळ्यां तुम्ही ग्रहणाच्या वेळी ऐकल्या असतील. देशभरातल्या 'पवित्र' नद्यांमध्ये हजारो भाविकांनी डुबकी मारली असेल आणि दूरचित्रवाणीच्या अनेक वाहिन्यांवर हे ग्रहण कोणत्या राशींच्या व्यक्तींना शुभ अथवा अशुभ आहे याची प्रदीर्घ चर्चा तज्ज्ञ व्यक्तींकडून सुरू असते. प्रत्येक ग्रहणाच्या वेळी ही स्थिती असते. खरं तर ग्रहण हा निव्वळ

सावल्यांचा खेळ आहे. तुमची-माझी सावली पडते तशी चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण घडून येते. इतकी ती साधी आणि नैसर्गिक गोष्ट आहे. दूरचित्रवाणी ही तर विज्ञानाची देणगी आहे. पण याच साधनांचा वापर करून अनेक वाहिन्या अवैज्ञानिक विचारांना वारेमाप प्रसिद्धी देतात. दूरचित्रवाणी आता घराघरात पोहचली आहे. या दृकश्राव्य माध्यमाची शक्ती प्रचंड आहे. तिचा उपयोग अंधश्रद्धेच्या प्रचार-प्रसारासाठी अजिबात होता कामा नये.

*(४) सूर्यग्रहण पाहताना कोणती काळजी घ्याल?

उत्तर - सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक असतें, कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.

(५) उपभू स्थितीत कोणत्या प्रकारची सूर्यग्रहणे होतील ?

उत्तर - उपभू स्थितीत खग्रास सूर्यग्रहण व खंडग्रास सूर्यग्रहण .

(१) सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश यांप्रमाणे पृथ्वीप्रकाशही असेल का ? असल्यास तो कोठे असेल ?

उत्तर - पृथ्वी हा एक ग्रह आहे. ग्रह परप्रकाशित असतात. त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो.

(२) पा.पु.पृ.क्र. ३ वरील आकृती २.२ मधील चंद्राची अवकाशातील स्थिती व पृथ्वीवरून दिसणारी स्थिती तुम्ही कशी ओळखाल ?

उत्तर - (i) चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून दिसणारे

त्याचे स्थान नेहमी बदलत असते. (ii) आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा आकार दररोज बदलताना दिसतो. या बदलत्या आकारांना चंद्रकला म्हणतात. (iii) पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो. त्यास पौर्णिमा म्हणतो. चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही. त्यास अमावास्या म्हणतात. अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग वाढत जातो. या कालावधीला शुक्ल पक्ष म्हणतात. याउलट पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. या कालावधीला कृष्ण पक्ष म्हणतात. अशाप्रकारे चंद्राची पृथ्वीवरून दिसणारी स्थिती वरीलप्रमाणे ओळखू.

(३) चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीची तसेच अमावस्येच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या. चंद्र पृथ्वी-सूर्य यांच्यातील कोन किती अंशाचे असतील ? प्रत्येक महिन्यात असे कोन किती वेळा होतील ?

उत्तर - कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमी व अमावस्येच्या दिवशी चंद्र- पृथ्वी-सूर्य यांच्यातील कोन पुढील अंशाचे असतील. (i) कृष्ण पक्षातील अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोन ९०० चा असेल. (ii) शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशी चंद्र पृथ्वी-सूर्य यांच्यातील कोन ९० अंश

अंशाचा असेल. (iii) तर अमावस्येच्या दिवशी चंद्र पृथ्वी-सूर्य यांच्यातील कोन ०० अंशाचा असेल. प्रत्येक महिन्यात अष्टमीच्या स्थितीतील कोन दोन वेळा व अमावस्येच्या स्थितीतील कोन एक वेळा होईल.

(४) ज्या अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही, तेव्हा चंद्राला सावलीच नसते का? 

उत्तर - (i) सूर्यग्रहण अमावास्येला होते, पण प्रत्येक अमावस्येला होत नाही. (ii) ज्या अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही तेव्हा चंद्राला सावली असते. कारण काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो. म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. ती अवकाशातच संपते.

जरा डोके चालवा 

(१). सूर्यग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवरील कोणत्या भागातून ग्रहण दिसणार नाही ?

उत्तर - सूर्यग्रहणाच्या दिवशी दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडणार नाही. त्या भागातून ग्रहण दिसणार नाही.

(२) कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकते काय ? 

उत्तर - नाही. कारण खग्रास सूर्यग्रहण हे चंद्र पृथ्वीपासून उपभू स्थितीत असते तेव्हा होते. तर कंकणाकृती सूर्यग्रहण अपभू स्थितीत होते. म्हणून कंकणाकृती आणि खग्रास असे सूर्यग्रहण एकाच वेळी होऊ शकत नाही● 

(३) चंद्रग्रहण कंकणाकृती का दिसणार नाही ?

उत्तर - पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे म्हणजेच सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच सरळ रेषेत आल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहे. त्याची बांगडीप्रमाणे कडा दिसणे शक्य नाही. त्यामुळे चंद्रग्रहण कंकणाकृती दिसणार नाही.

(४) चंद्रावर गेल्यास तुम्हांला कोणकोणती ग्रहणे दिसू शकतील ?

उत्तर - चंद्रावर गेल्यास आपल्याला खग्रास व खंडग्रास सूर्यग्रहणे दिसू शकतील.

(५) इतर ग्रहांमुळे होणारी सूर्यग्रहणे आपण का पाहू शकत नाही ?

उत्तर - कारण सूर्य व चंद्र हे पृथ्वीच्या जवळ आहेत. इतर ग्रह पृथ्वीपासून खूप दूर अंतरावर आहेत त्यामुळे इतर ग्रहांमुळे होणारी सूर्यग्रहणे आपण पाहू शकत नाही.

प्रश्न १ - योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा..

सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो.

(a) पृथ्वी

(b) चंद्र

(a) मंगळ

(d) बुध

(२) अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रबिंबाचा भाग

(अ) वाढतो

(ब) कमी होतो

(क) कमी जास्त होतो

(ड) स्थिर राहतो

(३) पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे.

(अ) वर्तुळाकार

(ब) अर्धगोलाकार

(क) लंबवर्तुळाकार

(d) फ्लॅट

(४) चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या बाजूस असतो.

(a) विरुद्ध

(ब) सरळ

(क) डाव्या

(ड) उजव्या

उत्तर: (1-ब), (2-अ), (3-अ), (4-अ).

प्रश्न २- खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे किती अंशाचा कोन करते ?

उत्तर - चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५० (अंशाचा) कोन करते.

(२) कंकणाकृती सूर्यग्रहण कशाला म्हणतात?

उत्तर - जेव्हा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो. तेव्हा चंद्रची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. ती अवकाशातच संपते. अशावेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखादया वर्तुळाप्रमाणे दिसते. त्यास 'कंकणाकृती सूर्यग्रहण' असे म्हणतात.

प्रश्न १ - एका शब्दांत उत्तरे दया.

(१) आपल्याला चंद्राच्या किती बाजू दिसतात ?

उत्तर - एकच

(२) चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो, त्या स्थितीला काय म्हणतात ?

उत्तरः उपभूस्थिती

(३) चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त दूर असतो, त्या स्थितीला काय म्हणतात ?

उत्तरः अपभू स्थिती

(४) शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांमध्ये किती अंशाचा कोन होतो.

उत्तर - 90

Post a Comment

0 Comments