Subscribe Us

वर्ग.7.भूगोल.वारे



 वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो.

उत्तर - कारण (i) पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. (ii) हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल, तेथे वारे मंद गतीने वाहतात. याउलट जेथे हवेच्या दाबातील फरक अधिक असेल, तेथे वारे वेगाने वाहतात. म्हणून वारे वाहण्यासाठी हवेच्या दाबामध्ये फरक असावा लागतो. 

प्रश्न ६ - धोडक्यात उत्तरे लिहा.

(१) ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त का असतो ?

उत्तर (1) ध्रुवीय प्रदेशात तापमान अतिशय कमी असते. दोन्ही गोलार्धांत वर्षभर तापमान ०० सेल्सिअसपेक्षाही कमी असते. त्यामुळे तेथे वर्षभर हवा थंड व जड असल्याने ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धात हवेचा दाब जास्त असतो.

(२) पृथ्वीच्या परिवलनाचा वाऱ्यांवर कोणता परिणाम होतो ?

उत्तर - (i) पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. (ii) पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत बदल होतो (iii) वारे ज्या दिशेकडून वाहत येतात, त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदा. पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे.

(३) आवर्त वारे चक्राकार दिशेनेच का वाहतात ?

उत्तर - (i) एखादया प्रदेशात केंद्रस्थानी अत्यंत कमी दाब असला व त्याच्या भोवताली सर्व दिशांना वायुदाब वाढत असला तर यात संभोवतालच्या. भागातून सर्व दिशांनी हवा दाबाच्या मध्यवर्ती केंद्राकडे वाहू लागते व दाब उतारानुसार तिची वाहण्याची दिशा असते. (ii) परंतु पृथ्वीच्या परिवलनामुळे फेरलेल्या नियमाप्रमाणे वाऱ्यांच्या दिशेने बदल होतो व प्रत्यक्षात ते समदाब. रेषांना समांतर न वाहता त्यांच्याशी कोन करून वाहतात. (iii) समदाब रेषांशी कोन करून वाहत असल्याने त्यांना चक्राकार गती प्राप्त होते. दाब उतार तीव्रअसल्यास चक्राकार गतीने वाहणारे हे वारे खूप जोरात वाहतात. अशाप्रकारे रावर्त वारे चक्राकार दिशेनेच वाहतात.'

(४) आवर्त वाऱ्यांची कारणे व परिणाम लिहा.

उत्तर - आवर्त वाऱ्यांची कारणे

(ⅰ) केंद्रस्थानी किंवा एखादया ठिकाणी

वेचा दाब कमी असणे. (ii) सभोवताली हवेचा दाब जास्त असणे.

आवर्त वाऱ्याचे परिणाम (i) आवर्त वाऱ्यामुळे आकाश ढगाळ असते.

ⅰ) वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो.

(१) उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते ?

उत्तर - उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे पूर्वीय वारे आहेत.

(२) पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणत्ती ?

उत्तर - पश्चिमी वाऱ्यांची दक्षिण गोलार्धातील दिशा वायव्येकडून आग्नेयेकडे असते.

(३) मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या फ्ट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तर गोलार्धात वाहतात ?

उत्तर - मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे पश्चिमी वारे उत्तर गोलार्धात वाहतात.

(४) ध्रुबीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच का नसते ?

उत्तर ध्रुवीय प्रदेशातील अधिक वायुदाब प्रदेशाकडून उपध्रुवीय कमी दाबप्रदेशाकडे हे थंड वारे वाहत असतात. ध्रुवीय वारे अतिशय वेगवान असतात. ध्रुवीय वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. परंतु पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यांवर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. त्यामुळे ध्रुवीय वाऱ्यांची दिशा दोन्ही गोलार्धांत सारखीच नसते.

(५) दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात ?

उत्तर - दक्षिण गोलार्धात वाऱ्यांचे पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे

इत्यादी प्रकार आढळतात.

१) दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात ?

उत्तर - दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. त्यामुळे जमिनीवरील हवा ही जास्त तापते व वायुदाब कमी होतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते म्हणून समुद्रावरील हवा कमी तापते. त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो. म्हणून दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात.

(२) भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहतात ?

उत्तर - भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे दिवसा वाहतात.

(३) आकृती 'अ' वरून वाऱ्यांच्या संदर्भात वर्णन करा.

उत्तर - आकृती 'अ' ही दिवसांची आहे. दिवसा जमीन लवकर तापते व उशिरा थंड होते. त्यामुळे तेथील हवा ही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. म्हणून दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात.

(४) आकृती 'ब' चे आकृती 'अ' शी तुलनात्मक वर्णन करा. यात हवेचा दाब, तापमान व वाऱ्यांचा विचार करा.

उत्तर - दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते, तेथील हवा ही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरी (खारे) वारे होत. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते. तेथे हवेचा दाब जास्त असतो. तेव्हा भूमीय (मतलई) वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात.

(५) सागरीय (खारे) वारे व भूमीय (मतलई) वारे कशाला म्हणतात ?

उत्तर - दिवसा समुद्रकिनारी जमिनीवर हवेचा दाब कमी व पाण्यावर जास्त असते. त्यामुळे हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. म्हणून दिवसा जे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. त्या वाऱ्यांना सागरीय (खारे) वारे म्हणतात.

रात्री पाण्यावर हवेचा दाब कमी व जमिनीवर दाब जास्त असतो. त्यामुळे - रात्री जे वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. त्या वाऱ्यांना मतलई वारे म्हणतात.

(६) भारतातील कोणत्या प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतात ?

उत्तर - भारतातील पूर्व व पश्चिम समुद्र किनारी प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतात.

(७) तुमच्या गावात सागरीय व भूमीय वारे अनुभवता येतात का ?

उत्तर - (टीप - या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः लिहावे. समुद्रकिनारा जवळ असल्यास 'होय' नसल्यास 'नाही' असे लिहिता येईल.)

करून पहा.

प्रश्न १ - दिलेल्या चित्राचे निरीक्षण करा. दरीय वाऱ्यांची माहिती चित्रावरून लिहा. (पा.पु.पु.क्र. २३)

दरीय वारे - वैशिष्ट्ये

उत्तर- (i) दरीय वारे तापमानातील फरकामुळे निर्माण होतात.

(ii) दिवसा दरीतील हवा जास्त तापते, हलकी होते व डोंगरउतारावरून अशी हवा वर वर जाते. ही हवा दरीकडून वर जात असल्याने या हवेस दरीतील वारे म्हणतात.

(iii) दरी क्षेत्रात शिखर भागापेक्षा वायुदाब जास्त असतो. म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात्.

(iv) रात्री दरीतील हवा उबदार असते.

(v) दरीय वारे दिवसा वाहतात.

प्रश्न २ - खालील दिलेल्या माहितीचे लक्षपूर्वक वाचन करून त्या आधारे पर्वतीय वारा दर्शवणारी आकृती काढा. (पा.पु.पृ.क्र. 

पर्वतीय वारे - वैशिष्ट्ये (ⅰ) रात्री पर्वतशिखर लवकर थंड होते. दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. (ii) पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. (iii) पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. (iv) दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते, त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. (v) पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात.

प्रश्न १ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) वाऱ्याचा वेग कोणत्या परिमाणात मोजतात ?

उत्तर - वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉटस् या परिमाणात मोजतात.

(२) ध्रुवीय वारे कशाला म्हणतात ?

उत्तर - दोन्ही गोलार्धांत ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात, त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात.

(३) स्थानिक वारे कशाला म्हणतात ?

उत्तर - काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात, त्यांना स्थानिक वारे असे म्हणतात.

(४) 'गरजणारे चाळीस' कशाला म्हणतात ?

उत्तर - ४०० दक्षिण अंक्षाशापलीकडे जे वारे अतिशय वेगाने वाहतात. त्या वाऱ्यांना 'गरजणारे चाळीस' असे म्हणतात.

(५) 'खवळलेले पन्नास' कशाला म्हणतात ?

उत्तर - ५०० दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहतात. म्हणून या भागात त्यांना 'खवळलेले पन्नास' असे म्हणतात.

(६) 'किंचाळणारे साठ' कशाला म्हणतात ?

उत्तर - ६०० दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबर प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना 'किंचाळणारे साठ' असे म्हणतात.

(७) अश्व अक्षांश कशाला म्हणतात ?

उत्तर – कर्कवृत्त व मकरवृत्ताजवळच्या २५० ते ३५० उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे. म्हणून याला अश्व अक्षांश असे म्हणतात.

प्रश्न १ - खालील प्रश्नांची एका शब्दांत उत्तरे लिहा.

(१) मोसमी वाऱ्याचा परिणाम कोठे आढळते ?

उत्तर-भारतीय उपविभाग

(२) कोमते मोसमीवारे बाष्पयुक्त असतात ?

उत्तर-नैऋत्य

(३) कोणते मोसमी वारे कोरडे असतात?

उत्तर - ईशान्य

(४) कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे कोणत्या नावाने ओळखली जातात ?

उत्तर - चक्रीवादळे

Post a Comment

0 Comments