दप्तर वीणा शाळा
२) प्राणायाम/योग/ध्यानधारणा/श्वसनाची तंत्रे
उपक्रम क्रमांक: १
उपक्रमाचे नाव : सर्वांगासन व्यायाम
पूर्वनियोजित कृती :
• सर्वप्रथम शिक्षक सर्वांगासन व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्याचे नियोजन करतात व शिक्षक विद्यार्थ्यांकडून सर्वांगासन व्यायामाचे प्रकार करून घेतात. यासाठी नियोजन करतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती: शारीरिक लवचिकता, शारीरिक स्नायूंचा विकास, चपळता.
आवश्यक साहित्य: योगासन पट्टी
शिक्षक कृती :
१) शिक्षक सर्वांगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवतात.
२) सर्वप्रथम शिक्षक आसनपट्टीवर पाय जमिनीला समांतर ठेवतात.
३) त्यानंतर ९०० कोनात पाय वर घेतात.
४) त्यानंतर १८०० कोनात पाय हाताचा आधार घेऊन पाठीमागे घेतात.
५) त्यानंतर ९०० कोनात पाय वर घेतात व पाठीला हाताचा आधार देतात.
विदयार्थी कृती
१) सर्वप्रथम विद्यार्थी आसनपट्टीवर पाय जमिनीला समांतर ठेवतात.
२) त्यानंतर ९०० कोनात पाय वर घेतात.
३) त्यानंतर १८०० कोनात पाय हाताचा आधार घेऊन पाठीमागे घेतात.
४) त्यानंतर ९०० कोनात पाय वर घेतात व पाठीला हाताचा आधार देतात.
संदर्भ साहित्य:
१) आयुष मंत्रालय भारत सरकारची योगासनासंदर्भात अधिकृत यूट्यूब लिंक.
२) आयुष मंत्रालय भारत सरकार योगासन पद्मासनाचा व्हिडिओ.
https://youtube.com/@ministryofayushofficial?si=T8DRU5J7V2bqAjtj
एंटरप्राइझ क्रमांक: 2
उपक्रमाचे नाव : विविध योगासने
पूर्वनियोजित कृती :
• शिक्षक एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांना उपक्रमासंदर्भात आवश्यक साहित्य सोबत आणण्यासाठी सांगतात, तसेच वेळेसंदर्भात योग्य सूचना देतात.
विकसित होणारी कौशल्ये / फलनिष्पत्ती शारीरिक लवचिकता, शारीरिक स्नायूंचा विकास, चपळता, समन्वयता, एकाग्रता, श्वासावरील नियंत्रण.
आवश्यक साहित्य: योगासन पट्टी
शिक्षक कृती :
१) शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सोपी योगासने करून दाखवतात.
२) शिक्षक हास्याचे प्रकार करून दाखवतात.
३) श्वासासंदर्भात योगासनांचे प्रकार करून दाखवतात.
४) शिक्षक विद्यार्थ्यांना उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी हळुवार बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेण्यासाठी सांगतात. त्यानंतर अनामिका व करंगळीने डाव्या नाकपुडीला बंद करून उजव्या नाकपुडीवरील अंगठा बाजूला करून उजव्या नाकपुडीने श्वास घेणे. अशा प्रकारे तीन आवर्तने करून दाखवतात.
विद्यार्थी कृती :
१) विद्यार्थी सर्वप्रथम सोपी योगासने करतात.
२) विदयार्थी हास्यांचे प्रकार शिक्षकांसोबत करतात.
३) श्वासासंदर्भात योगासनांचे प्रकार करतात.
४) विद्यार्थी उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी हळुवार बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेतात. त्यानंतर अनामिका व करंगळीने डाव्या नाकपुडीला बंद करून उजव्या नाकपुडीवरील अंगठा बाजूला करून उजव्या नाकपुडीने श्वास घेतात. अशा प्रकारे तीन आवर्तने करून दाखवतात.
संदर्भ साहित्य:
१) 'आयुष' मंत्रालय भारत सरकारची योगासनासंदर्भात अधिकृत यूट्यूब लिंक.
2) भारत सरकारचे 'आयुष' मंत्रालय योगासन
३) https://youtube.com/@ministryofayushofficial?si=T8DRU5J7V2bqAjtj
0 Comments