५. वारे
• पृथ्वीवर हवेचा दाब एकसमान नसतो. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिजसमांतर दिशेत होते. या हालचालींमुळे वाऱ्याची निर्मिती होते.
सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल, तेथे वारे वेगाने वाहतात.
• वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो.
• पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्यांच्या मूळ दिशेत बदल होतो. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात, त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जाते.
ग्रहांची वस्तू
• पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. त्यामुळे त्यांना 'ग्रहीय वारे' असे म्हणतात.
• उत्तर गोलार्धात ग्रहीय वारे ईशान्येकडून नैऋतेकडे, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील
हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना 'पूर्वीय वारे' असे म्हणतात.
• दक्षिण गोलार्धात ग्रहीय वारे वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना 'पश्चिमी वारे' असे म्हणतात.
• दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात, त्यांना 'ध्रुवीय वारे' असे म्हणतात.
स्थानिक वारे
• काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. त्यांना 'स्थानिक वारे' असे म्हणतात.
स्थानिक वारे निरनिराळ्या प्रदेशात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. उदा. दरीय वारे, पर्वतीय वारे, खारे (सागरीय) वारे, मतलई (भूमीय) वारे.
खारट (सागरी) आणि खारट (पार्थिव)
• समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरी (खारे) वारे होत.
• रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते. तेथे हवेचा दाब जास्त असतो. तेव्हा भूमीय (मतलई) वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात.
हंगामी वारे (मोसमी)
जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी-अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात.
• उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे आणि हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.
मोसमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा यांशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू होतात. त्याचप्रमाणे भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्यांच्या प्रभावाने होते.
• मोसमी वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. यांना 'नैऋत्य मोसमी वारे' म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात.
• सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. यांना 'ईशान्य मोसमी वारे' असे म्हणतात. हे वारे कोरडे असतात.
आवर्त
• एखादया ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो. तेव्हा आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते.
पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात.
आवर्त वाऱ्यांचे प्रभावक्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांचा कालावधी वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग 'L' या अक्षराने दाखवतात.
आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते. या आवर्ताना वादळ किंवा 'चक्रीवादळ' असे म्हणतात.
चक्रीवादळे
पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात, जपान, चीन, फिलिपाइन्स इत्यादी देशांच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे 'टायफून' या नावाने ओळखली जातात. ही वादळे जून ते ऑक्टोबर या महिन्यांत निर्माण होतात.
• कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे 'हरिकेन्स' होय.
प्रत्यावर्त
• एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो. केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात.
• हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग 'H' या अक्षराने दाखवतात.
प्रश्न १ - योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
(१) हवा प्रसरण पावली, की
(अ) घन होते.
(आ) नाहीशी होते.
(इ) विरळ होते.
(ई) दमट होते.
उत्तर - (इ) विरळ होते.
- (२) वारे हवेच्या जास्त दाबाकडून
(अ) आणखी जास्त हवेच्या दाबाकडे वाहतात.
(आ) थंड हवेच्या दाबाकडे वाहतात.
(इ) हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.
(ई) आहे तेथेच राहतात.
उत्तर-
(इ) हवेच्या कमी दाबाकडे वाहतात.
(३) उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे
(अ) दक्षिणेकडे वळतात.
(आ) पूर्वेकडे वळतात.
(इ) पश्चिमेकडे वळतात.
(ई) उत्तरेकडे वळतात.
उत्तर -
(४) भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात
(अ) आग्नेयेकडून वायव्येकडे असते.
(आ) नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे असते.
(इ) ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे असते.
(ई) वायव्येकडून आग्नेयेकडे असते.
उत्तर - (इ) ईशान्येकडून नैर्ऋत्येकडे असते.
(५) 'गरजणारे चाळीस' वारे दक्षिण गोलार्धात
(अ) विषुववृत्ताकडे वाहतात.
(आ) ४०० दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.
(इ) ध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडून वाहतात.
(ई) ४०० उत्तर अक्षांशाच्या भागात वाहतात.
उत्तर द्या
(आ) ४०० दक्षिण अक्षांशाच्या भागात वाहतात.
प्रश्न २. - खालील वर्णनावरून वाऱ्यांचा प्रकार ओळखा.
(१) नैऋत्येकडून येणारे वारे भारतीय उपखंडावर पाऊस आणतात. जून ते सप्टेंबर या काळात भारतात पाऊस पडतो. या कालावधीनंतर हे वारे परत फिरतात.
उत्तर - नैऋत्य मोसमी वारे
४- एकच भौगोलिक कारण लिहा,
(१) विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो.
उत्तर - कारण विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे ५० अक्षवृत्तापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत. म्हणून विषुववृत्ताजवळ हवेचा पट्टा शांत असतो
(२) उत्तर गोलार्धातील नैर्ऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.
उत्तर - कारण (i) उत्तर गोलार्धात भूभाग जास्त असून भूपृष्ठाच्या उंचसखलपणाचा अडथळा असल्यामुळे वाऱ्याच्या वेगावर मर्यादा येतात. वतं (ii) दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सखलपणाचा अडथळा नाही. (iii) कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे उत्तर गोलार्धातील नैऋत्य वाऱ्यांपेक्षा दक्षिण गोलार्धात वायव्येकडून येणारे वारे जास्त वेगाने वाहतात.
(३) उन्हाळ्यातील मोसमी वारे समुद्राकडून, तर हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात.
उत्तर - कारण (i) उन्हाळ्यात जमिनीचे संपूर्ण तापमान जास्त असते, त्यामुळे वायुदाब अतिशय कमी असतो. उलट समुद्रावर तापमान कमी असल्याने वायुदाब जास्त असतो. त्यामुळे उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्राकडून जमिनीकडे येतात. (ii) तर याउलट स्थिती हिवाळ्यात असते. हिवाळ्यात जमिनीचे संपूर्ण तापमान कमी असते. त्यामुळे वायुदाब अतिशय जास्त असतो. तर समुद्रावरील हवेचा दाब कमी असतो. त्यामुळे हिवाळ्यातील परतीचे मोसमी वारे जमिनीकडून येतात.
0 Comments