• लेखीपरीक्षा...
प्रश्न 1 - रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. (प्रारण, पांढरा, वहन, निळा, अभिसरण, दुर्वाहकता, सुवाहक, काळा, घरावर्तन)
(1) सर्वाधिक उष्णता रंगाच्या वस्तूकडून शोषली जाते.
(2) उष्णतेच्या साठी माध्यमाची आवश्यकता नसते.
(3)उष्णतेचे वहन पदार्थांमधून होते.
(4) थर्मास फ्लास्कमधील चकाकणारा पृष्ठभाग बाहेर जाणारी उष्णता क्रियेने कमी करतो.
(5) अन्न शिजवण्याची भांडी
• गुणधर्मामुळे धातूची बनवलेली असतात.
(6) सूर्यापासून पृथ्वीला मुळे उष्णता मिळते.
उत्तर - (1) काळा (
2) प्रारण (
3) सुवाहक (
4) परावर्तन
(5) वहन
(6) प्रारण
प्रश्न 2 - कोण उष्णता शोषून घेईल ? स्टीलचा चमचा, लाकडी पोळपाट, काचेचे भांडे, तवा, काच, लाकडी चमचा, प्लॅस्टिकची प्लेट, माती, पाणी, मेण.
प्रश्न 3 - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(1) ताप आल्यावर कपाळावर थंड पाण्याची पट्टी ठेवल्यास ताप कमी का होतो ?
उत्तर - पाणी हे उत्तम शीतक आहे. पाण्याची पट्टी कपाळावर ठेवल्यास पाणी उष्णता काढून घेऊन ठंड करण्यास मदत करते.
(2) राजस्थानमध्ये घरांना पांढरा रंग का देतात ?
उत्तर - पांढरा रंग हा सूर्याची किरणे परावर्तित करतात. पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही.) राजस्थानमध्ये उष्ण तापमान असल्यामुळे घरातील तापमान कमी ठेवण्यासाठी घरांना पांढरा रंग देतात.
(3) उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार लिहा.
उत्तर - (i) उष्णतेचे वहन (ii) अभिसरण (iii) प्रारण हे उष्णतेच्या संक्रमणाचे प्रकार आहेत.
(4) खारे वारे व मतलई वारे उष्णता संक्रमणाच्या कोणत्या प्रकारावर आधारलेले आहेत ते स्पष्ट करा.
उत्तर - खारे वारे अभिसरण प्रवाहाने वाहतात. खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. दुपारी जमिनीवर तापमान अधिक असते आणि समुद्रावर त्या मानाने ते बरेच कमी असते, दुपारी जमिनीवर हवेचा दाब कमी असतो आणि समुद्रावर जास्त असतो. हवा जास्त दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वाहते. तसेच मध्यरात्रीनंतर प्रारणोत्सर्जनामुळे जमीन बरीच थंड होते. पण समुद्र त्यामानाने उबदार असतो. त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब सागरावरील हवेच्या दाबापेक्षा जास्त असतो. म्हणून वारा जमिनीकडून समुद्राकडे वाहतो
5) अंटार्क्टिका खंडातील पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून ( काळा का असतो ?-
उत्तर - अंटार्क्टिका खंड बर्फाच्छित असल्यामुळे खूपच थंड असतो. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. पेंग्विन पक्षी पाण्यात खोलवर गेल्यावर सुद्धा सूर्याची किरणे किंवा उष्णता शोषून घ्यावी. म्हणून पेंग्विन पक्ष्यांचा रंग वरून काळा असतो.
(6) खोलीमध्ये हीटर खाली व वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर का बसलेली असतात ?
उत्तर - कारण हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे हवा थंड असते. थंड हवा ही जड असते आणि गरम हवा हलकी असते) त्यामुळे हिटरमध्ये थंड हवा शोषली जाते व गरम हवा बाहेर येते. म्हणून खोलीमध्ये हीटर खाली बसवलेला असतो.
तसेच, थंड हवा ही गरम हवेपेक्षा जड असते वातानुकूलन यंत्र हे थंड हवा देते. ती थंड हवा खोलीत पसरते आणि गरम हवा वरती जाते. ती गरम हवा वातानुकूलन यंत्रामध्ये शोषली जाते व खोलीच्या बाहेर फेकली जाते. म्हणून वातानुकूलन यंत्रे भिंतीवर उंचावर बसवलेली असतात.
प्रश्न 4 - शास्त्रीय कारणे लिहा.
(1) साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते, पण बोरोसिलने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही.
उत्तर - कारण - (i) साधी काचेची बाटली ही साध्या काचेची बनलेली असते. त्या बाटलीत उकळते पाणी टाकले तर त्या बाटलीतील आतील व बाहेरील तापमानात फरक असतो. (ii) बोरोलिनने बनलेली? बाटली ही सोडालाईम
व वाळू यापासून तपन पद्धतीने बनवलेली असते. त्यात उकळते पाणी टाकल्यामुळे त्या बाटलीतील आतील व बाहेरील तापमानात काहीही फरक पडत नाही. ती तडकत नाही. म्हणून साध्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकते, पण बोरोलिने बनलेल्या काचेच्या बाटलीत उकळते पाणी टाकल्यास ती तडकत नाही.
(2) उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात.
उत्तर - कारण (i) टेलिफोनच्या तारा या तांबा या धातूपासून बनलेल्या
असतात. धातू उष्णतेमुळे प्रसरण पावतात व थंडीमुळे आंकुंचन पावतात. (ii) उन्हाळ्यात तापमान वाढल्यामुळे तांब्याची तार प्रसरण पावते आणि लोंबकळते. याउलट हिवाळ्यात आकुंचन पावतात. म्हणून उन्हाळ्यात लोंबकळणाऱ्या टेलिफोनच्या तारा हिवाळ्यात समांतर झालेल्या दिसतात.
(3) हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात.
उत्तर - कारण - हिवाळ्यात रात्रीचे तापमान कमी असल्यामुळे हवेतील वाफ थंड होते. तिचे पाण्यात रूपांतर होऊन या पाण्याचे थेंब टूवबिंदूच्या रूपात गवतावर जमा होतात. म्हणून हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात.
(4) हिवाळ्यात रात्री आपल्या हाताला लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागतो.
उत्तर - कारण - (i) हिवाळ्यात रात्री वातावरण खूपच थंड असते. लोखंडामध्ये उष्णतेचे वहन होते कारण लोखंड हा धातू आहे. आणि उष्णतेचे सुवाहक आहे. (ii) लाकूड हा उष्णतेचे दुर्वाहक आहे त्यामुळे उष्णतेचे वहन होत नाही. म्हणून लोखंडाचा खांब लाकडी दांड्यापेक्षा थंड लागत
प्रश्न 2 - सांगा पाहू.
(1) कढईत बासुंदी डवळणारा हलवाई झाऱ्याच्या टोकाला कापड का बांधून ठेवतो ?
उत्तर - कढईत बासुंदी ढवळत असताना झारा गरम येतो. झारा हा धातूने बनलेला असतो, म्हणून तो उष्णतेचा सुवाहक आहे. हाताला चटके बसू नये म्हणून झाऱ्याच्या टोकाला कापड बांधून ठेवतात.
(3) फुलपात्रातून गरम दूध पिताना आपण फुलपात्र रुमालात का धरतो ?
उत्तर - फुलपात्र हे उष्णतेचे सुवाहक आहे. त्यामधून उष्णता सहज वाहून नेली जाते. फुलपात्रात गरम दूध टाकल्यावर ते लगेच गरम येते. म्हणून आपण फुलपात्र रूमालात धरतो.
प्रश्न 3 जरा डोके चालवा.
(1) आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे का घालतो ?
उत्तर - लोकर हे उष्णतेचे दुर्वाहक आहे. शरीरातील उष्णता ही लोकरीच्या कपड्यातून बाहेर जात नाही. म्हणून आपण हिवाळ्यामध्ये लोकरीचे कपडे घालतो.
(2) उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यात गडद काळ्या रंगाचे कपडे का वापरतात ?
उत्तर - उन्हाळ्यात तापमानात वाढ होते. पांढरे कपडे उष्णता शोषून घेत नाही. हिवाळ्यात तापमानात घट होते. गडद किंवा काळ्या रंगाचे कपडे सर्वाधिक उष्णता शोषून घेतात. व हे कपडे हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यात मदत करतात. म्हणून उन्हाळ्यात पांढरे तर हिवाळ्यात गडद / काळ्या रंगाचे कपडे वापरतात.•
(3) रेल्वेचे रूळ, सिमेंट काँक्रीटचे पूल यांच्या सांध्यांमध्ये फट का ठेवलेली असते ?
उत्तर - (i) रेल्वेचे रूळ, हे लोखंडाचे असतात. उन्हाळ्यात तापमान वाढल्याने लोखंड प्रसरण पावते. तापमान कमी झाल्यावर ते आकुंचन पावतात व मुळ स्थितीत येतात. (ii) तसेच उन्हाळ्यात उष्णतेने क्राँक्रिट गरम होते. त्यामुळे त्यातील लोखंड गरम होऊन प्रसरण पावते. (iii) प्रसरणासाठी जागा मिळावी म्हणून रेल्वेचे रूळ व सिमेंट काँक्रिटचे पूल यांच्या सांध्यामध्ये फट ठेवलेली असते.
(4) तापमापीमध्ये पारा, अल्कोहोल याचा वापर का करतात ?
उत्तर - (i) पारा चमकदार असल्याने चटकन दिसतो. पारा काचेला चिकटत नाही. पाऱ्याचे प्रसरण नियमित आणि एकसारखे होते. (ii) तसेच अल्कोहोल या गोठणांकात खूप कमी असल्यामुळे तापमापीमध्ये याचा वापर करतात.
प्रश्न 4 - माहिती मिळवा.
थर्मोवेअर म्हणजे काय ?
उत्तर - थर्मोवेअर म्हणजे अशा वस्तू ज्यामधून उष्णतेचे वहन आतून बाहेर होत नाही. उदा. स्वेटर, थर्मास फ्लास्क
प्रश्न 5. करून पहा.
हाताचे तळवे एकमेकांवर घासून आपल्या गालावर ठेवा व काय जाणवते ते पहा.
उत्तर - हाताचे तळवे एकमेकांवर घासल्यामुळे उष्णता निर्माण होऊन हात गरम येतात. यावरून हे लक्षात येते की घर्षणामुळे उष्णता निर्माण होते.
0 Comments