स्थितिक विद्युत
प्रश्न 1 - रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
(सदैव प्रतिकर्षण, सदैव आकर्षण, ऋणप्रभाराचे विस्थापन, धनप्रभाराचे विस्थापन, अणू, रेणू, स्टील, ताबे, प्लॅस्टिक, फुगवलेला फुगा, प्रभारित वस्तू, सोने)
(1) सजातीय विद्युत प्रभारांमध्ये होते.
(2) एखाद्या वस्तूमध्ये विद्युतप्रभार निर्माण होण्यासाठी असते. कारणीभूत
(3) तडितरक्षक पट्टीपासून बनवला जातो.
(4) सहजपणे घर्षणाने विद्युतप्रभारित होत नाही.
(5) विजातीय विद्युतप्रभार जवळ आणल्यास होते.
(6) विद्युतदर्शन ओळखता येते.
उत्त्तर
(1) सदैव प्रतिकर्षण
(2) ऋण प्रभाराचे विस्तापन
(3) तांबे
(4) प्लॅस्टिक
(5) सदैव आकर्षण
(6). प्रभारित वस्तू
प्रश्न 2 - मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य का नाही स्पष्ट करा.
उत्तर- वीज ही उंच इमारत, उंच झाडे यांच्याकडे लवकर आकर्षित होते. छत्रीच्या पट्ट्या लोखंडी धातूने बनल्या असतात. लोखंड विजेला आकर्षित करून जीवहानी होऊ शकते. म्हणून मुसळधार पाऊस, जोराने विजा चमकणे किंवा कडकडणे सुरू असताना छत्री घेऊन बाहेर जाणे योग्य नाही.
प्रश्न 3 - तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा..
(1) विजेपासून स्वतःचा बचाव कसा कराल ?
उत्तर - विजेपासून स्वतःचा बचाव पुढीलप्रमाणे करू शकतो. (i) जर कुठलाही निवारा नसेल तर खुल्या मैदानात थांबा. (ii) कुठल्याही झाडाखाली थांबू नका. झाडांपासून दूर रहा. (iii) तसेच विद्युत खांबापासून दूर रहा आणि धातूंच्या वस्तूपासून सुद्धा दूर रहा. (iv) खुल्या मैदानात झोपू नका) (v) तुमचे हात गुडघ्यावर ठेवून तुमचे डोके हातावर ठेवून बसा. अशा स्थितीमुळे तुम्ही सगळ्यात कमी उंचीचे होण्यास मदत होईल. (vi) वीजा चमकतांना किंवा पाऊस पडतांना विद्युत उपकरणांची पीन काढून ठेवा.
(2) प्रभार कसे निर्माण होतात ?
उत्तर- काही विशिष्ट पदार्थ एकमेकांवर घासले तरच विद्युत प्रभाराची
निर्मिती होते. या वेळी काही ऋण कण एका पदार्थावरून दुसऱ्या पदार्थावर जातात आणि ऋण विद्युत प्रभार निर्माण होतो. तर ज्यावरून ते कण जातात त्यावर एक ऋण प्रभार कमी होतो. म्हणून तो धन प्रभारित होतो. म्हणून घर्षणाने पदार्थात प्रभार निर्माण होतात.
(3) वितरक्षकामध्ये वीज जमिनीत पसरण्य पाठी काय व्यवस्था केलेली असते ?
उत्तर - तडितरक्षक म्हणजे तांब्याची एक लांब पट्टी. इमारतीच्या सर्वांत उंच भागावर याचे टोक असते. या टोकाला भाल्याप्रमाणे अग्रे असतात. पट्टीचे दुसरे टोक जमिनीच्या आत बिडाच्या जाड पत्र्याला जोडले जाते. त्यासाठी जमिनीत खड्डा करून त्यात कोळसा व मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते व नुकसान टळते.
(4) पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार का खोचून ठेवतात ?
उत्तर - पावसाळी वातावरणात काम करताना वीजा चमकतात आणि त्या पडण्याची भिती असते. वीज अंगावर किंवा शेतात पडून जीवितहानी किंवा वित्तहानी होऊ नये. लोखंडी पहार ही वीजेला आकर्षित करून जमिनीत पसरवते. म्हणून पावसाळी वातावरणात काम करताना शेतकरी उघड्यावर लोखंडी पहार खोचून ठेवतात.
(5) पावसाळ्यात प्रत्येक वेळी विजा चमकलेल्या का दिसत नाहीत ?
उत्तर - पावसाळ्यात ढगाळ वातावरण हे जास्त असते. दाट ढगांमुळे प्रत्येकवेळी विजा चमकलेल्या दिसत नाहीत.•
प्रश्न 4 - स्थितिक विद्युतप्रभाराची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर - स्थितिक विद्युतप्रभाराची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. (i) स्थितिक विद्युतप्रभार घर्षणामुळे निर्माण होतात. (ii) हा प्रभार घर्षण झालेल्या ठिकाणीच असतो. (iii) वस्तूंवर प्रभार थोड्यावेळेपर्यंत राहतात. (iv) स्थितिक विद्युतमधील प्रभार दमट व ओलसर हवेत शोषले जातात. (v) स्थितिक विद्युतप्रभारित वस्तू प्रभार नसणाऱ्या वस्तूंना आकर्षित करतात.
प्रश्न 5 - वीज पडून काय नुकसान होते ? ते न होण्यासाठी जनजागृती कशी कराल ?
उत्तर - बीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते आणि काही वेळा झाडे, घर व नदीत वीज पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. हे न होण्यासाठी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर टाळले पाहिजे. कारण हवेत खूप प्रकारचे वायू असतात. जसे CO₂, NO,. त्यामुळे वातावरणात फरक पडतो. प्रदूषण थांबवले तर हे कमी होऊ शकते.
आकारिक मूल्यमापन
* वर्गकार्य/गृहकार्य *
प्रश्न 1 - थोडे आठवा.
(पा.पु.पृ.क्र.51) खालील प्रसंग तुम्ही अनुभवले आहेत का? या प्रसंगांमध्ये तसे का घडले ?
(1) केसांवर घासलेला प्लॅस्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी कागदाच्या कपट्यांना आकर्षित करते.
उत्तर - केसांवर घासलेला प्लॅस्टिकचा कंगवा किंवा मोजपट्टी यांच्यावर
विद्युत प्रभार निर्माण होतो. याच प्रभारामुळे कागदाचे कपटे मोजपट्टी किंवा कंगवा यांच्याकडे आकर्षिले जातात.
(2) पॉलिस्टर पडद्याच्या जवळून सारखे येणे-जाणे केल्यास पडदा आपल्याकडे आकर्षित होतो.
उत्तर - घर्षर्णामुळे निर्माण होणाऱ्या विद्युतप्रभाराला घर्षणविद्युत म्हणतात. हे प्रभार घर्षण झालेल्या ठिकाणीच राहतात. त्यामुळे त्याला स्थितिक विद्युत असे म्हणतात. घषर्णामुळे ऋणप्रभारित कण हे धनप्रभारित कणांकडे आकर्षिले जातात. म्हणून पडदा आपल्याकडे आकर्षित होतो.
(3) अंधारात ब्लॅकेट हाताने घासून धातूच्या वस्तूजवळ नेल्यास ठिणगी पडते.
उत्तर - ब्लॅकेट हाताने वारंवार घासल्यास हातात उष्णता निर्माण होते. व धातूच्या वस्तूजवळ नेल्यास धातूमध्ये उष्णतेचे वहन होते व ठिणगी पडते.
प्रश्न 2 - करून पहा.
(1) स्पर्शाद्वारे वस्तू प्रभारित करणे. एका प्लॅस्टिकच्या कंगव्याला कागदाने घासा. या कंगव्याने दुसऱ्या कंगव्याला (प्रभार नसलेल्या) स्पर्श करा व तो कंगवा कागदाच्या कपट्यांजवळ न्या. काय होते ?
उत्तर कागदाचे कपटे आकर्षित होतील. कारण प्रभारित कंगवा प्रभाररहित कंगव्याजवळ आणला असता प्रवर्तनाने प्रभाररहित कंगव्यात प्रभार निर्माण होतो.
(2) खराब झालेली ट्युबलाइटची नळी अंधारात 'ठेवा. पातळ पॉलिथीन पिशवी जलदगतीने घासा काय झाले ? असे का घडले ?
उत्तर - जलदगतीने घासलेली पॉलिथीनची पिशवी त्यावर गरम झाली आणि लाइट लागल्यासारखा आपल्याला दिसता.
आपण एकाच ठिकाणी घासल्यावर ती जागा लवकर गरम झाली आणि ट्युबलाईटमध्ये CO, हा वायू असतो. त्यामुळे तो उष्णता शोषून घेतो आणि
लाईट चमकल्यासारखा होतो.
प्रश्न 3 - जरा डोके चालवा.
(1) सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतात का ?
उत्तर - होय. सर्वच वस्तू घर्षणाने प्रभारित करता येतात.
(2) भिंतीजवळ प्रभारित फुगा नेल्यास तो भिंतीला का चिकटतो ?
उत्तर आपण जेव्हा फुगा घासतो तेव्हा त्यावर ऋणप्रभार तयार होतो.. आणि भिंतीवर असलेल्या धनप्रभारामुळे फुगा हा भिंतीकडे आकर्षित होऊन चिकटतो.
(3) विद्युतदर्शीत सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील का ? त्या धातूत कोणते गुणधर्म असले पाहिजेत ? (पा.पु.पृ.क्र.55)
उत्तर - सोन्याऐवजी दुसऱ्या धातूची पाने लावता येतील. त्या धातूत तन्यता आणि विद्युतप्रभार ओळखण्याचे गुणधर्म असले पाहिजे.
(4) वीज पडून कोणते नुकसान होते ?
उत्तर - विज पडून पुढीलप्रकारचे नुकसान होते. (i) आग लागणे (ii) वित्त हानी (iii) जिवित हानी (iv) कधी कधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू होतो.
(5) वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी काय उपाय कराल ? उत्तर- वीज पडल्यावर होणारी हानी टाळण्यासाठी पुढील उपाय सूचव
(i) झाडाखाली उभे राहू नये.
(ii) उघड्या मैदानावर खाली झोपू
नये. (iii) उंच इमारतीवर जावू नये.
(iv) घरातील उपकरणांचा विद्युत प्रवाह
बंद करा. (v) टेलिफोनचा /मोबाईलचा उपयोग टाळा. (vi) पावसात शक्यतो छत्री घेऊन जाणे टाळा.
(6) तडितरक्षकाचा वरचा भाग टोकदार का असतो ?
उत्तर- वीज कोसळतांना ती टोकदार तडितवाहकाकडे आकर्षली जाते व ती तेथून थेट जमिनीत जाते. म्हणून तडितरक्षकाचा वरचा भाग टोकदार असतो.
(7) जमिनीतील खड्ड्यात कोळसा व मीठ का टाकलेले असते ?
उत्तर - वीज कोसळतांना ती तडीतवाहकाकडे आकर्षली जाते व तेथून ती थेट जमिनीत पसरली जावी म्हणून खड्ड्यात कोळसा व मीठ टाकलेले असते.
0 Comments