१. ऋतुनिर्मिती (भाग - १)
• पृथ्वीच्या परिवलनासाठी सुमारे २४ तास लागतात.
• पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. तिच्या या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरुपात कालगणना करणे शक्य झाले आहे.
• सूर्योदय, मध्यान्ह, सूर्यास्त तसेच दिनमान व रात्रमान या दिवसातील वेळेच्या वेगवेगळ्या अवस्था अनुभवास मिळतात.
(१) पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात ?
उत्तर - (i) पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. (ii) त्यामुळे सूर्याच्या प्रकाशात येणारा भाग काही वेळाने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग हळूहळू प्रकाशात येतो. (iii) ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तिथे दिन व ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोचत नाही तिथे रात्र असते. अशाप्रकारे पृथ्वीवर दिन व रात्र होतात.
(२) पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?
उत्तर - पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस परिभ्रमण म्हणतात.
(३) पृथ्वीला या क्रियेस किती कालावधी लागतो ?
उत्तर - पृथ्वीला या क्रियेस एक वर्षाचा कालावधी लागतो.
(४) आपला देश कोणकोणत्या गोलार्धांमध्ये आहे ?
उत्तर आपला देश (भारत) हा पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेकडील पृथ्वीच्या अर्ध्या भागास उत्तर गोलार्ध असे म्हणतात. भारत हा विषुववृत्ताच्या वर उत्तरेकडे आहे.
(५) पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप का पडत नाहीत ?
उत्तर - कारण (i) संपूर्ण पृथ्वीचा विचार करता फक्त कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यान सूर्याची किरणे लंबरूप पडतात. (ii) पृथ्वी गोलाकार असल्याने पृथ्वीवर सूर्यकिरणे सर्व ठिकाणी लंबरूप पडत नाहीत.
अतिरिक्त प्रश्नोत्तरे
प्रश्न-
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) पृथ्वीला परिवलनासाठी सुमारे तास लागतात.
(२) पृथ्वी स्वतःभोवती फिरताना पश्चिमेकडून कडे फिरते.
(३) पृथ्वीच्या परिवलनामुळे दिवसाच्या स्वरुपात झाले आहे. करणे शक्य झाले आहे
उत्तर - (1) 24 (2) पुर्वे (3) वेळेची गणना
0 Comments