१३५१-फिरोज तुघलक-१३८८
■ फिरोज तुघलकाचा जन्म इ.स. १३०९ ला झाला.
फिरोज तुघलक हा गयासुद्दीनचा भाऊ व रजब तुघलकाचा मुलगा होता.
■ फिरोज तुघलकचे वडील एक सैनिक होते आणि त्याची आई त्याची पत्नी नाइला होती.
■ बीबी नाइला ही राजपूत सरदार रणमल्लची मुळगी यांची मुलगी असती.
■ फिरोज तुघलक महम्मद तुघलकचा चुलतभाऊ होता.
■ महम्मद तुघलकाच्या मृत्युनंतर तुघलकाच्या इच्छेनुसार फिरोज तुघलक सत्तेवर आला.
■ दि.२३ मार्च १३५१ ला थट्टा ठिकाणी छावणीत फिरोजने सुलतानपद स्वीकारले..
■ शेख नासिरुद्दीनने फिरोज तुघलकाचे नाव सुलतान पदासाठी सुचवले..
■ फिरोज तुघलक "उत्तम राज्यकर्त्यापेक्षा एक धार्मिक व पंडीत होता.
■ फरोज तुघलकाच्या काळात प्रथम विद्रोह नायब ख्वाजा जहाँने केला.
■ फिरोज तुघलकाचा नायब वीर मलिक मकबुल होता.
■ फिरोज तुघलकाच्या राज्याची मालगुजारी ६.८५ करोड होती.
■ फिरोज तुघलकाने लुटीतील २०% भाग शासन जमा करण्याची प्रथा व सिंचन कर १०% ठरवला.
■ बंगालमध्ये फिरोज तुघलकाच्या वेळी हाजी इलियास स्वतंत्रपणे कारभार करत होता.
■ बंगालवर फिरोज तुघलकाने इ.स.१३५३ ला आक्रमण केले व बंगाल जिंकला.
■ बंगाल विजयानंतर सुलतानाने जाजनगर (ओरिसावर) आक्रमण केले व जगन्नाथपुरीच्या मंदिराची नासधूस केली.
■ पंजाबमधील कांगडा जिल्ह्यातील नागरकोट ठिकाणच्या प्रसिद्ध ज्वालामुखी मंदिरावर फिरोजने आक्रमण करून १३०० संस्कृत ग्रंथ हस्तगत केले.फिरोज तुघलकाचे महसूल धोरण
महसूल ठरवण्यापूर्वी जमीन मोजणी, महसूल विभाग प्रमुखपदी ख्वाजा हिसामुद्दीन जुनैदची नियुक्ती केली, १/१० ठरवला, व्यापारवृद्धीसाठी टॅक्स कमी केले, १२०० बाग उत्पन्नवाढीसाठी लावल्या, महसूल वसुलीसाठी अधिकारी नेमले.
■ इस्लाम धर्मानुसार घेतले जाणारे चार कर - खिराज, खम्स, जजिया आणि जकात.
■ भूमी कराला खिराज म्हणत, खम्स - लढाईतील लुटीतील २०% घेतलेले उत्पन्न होते.
■ जजिया- गैर मुस्लिम जनतेकडून वसुल केला जाणारा कर होता.
■ जकात - मुस्लिम व्यक्तीवर लावला जाणारा कर,
■ अल्लाउद्दीन खिलजीने बंद केलेली जहागिरी प्रथा पुन्हा फिरोज तुघलकाने चालु केली.
फिरोज तुघलकद्वारा बनवलेले चार कालवे.
• सतलज ते गंगा कालवा ९९ मैल लांब.
• यमुना नदी ते हिसारपर्यंत कालवा १५० मैल लांब.
• मंडवी ते हांसीपर्यंत कालवा.
• घग्गर ते हीरानीखेरा गावापर्यंतचा कालवा.
• १५० विहिरी खोदल्या.
■ फिरोजने सिंचन व्यवस्था करुन फिरोजाबाद, फत्तेहाबाद, हिसार, जौनपूर, फिरोजपूर इ.३०० वस्त्या वसवल्या.
• बंगाल मोहिमेवर असताना फिरोज तुघलकाने 'इकदलाचे' नामकरण 'आजादपूर' तर 'पंडुआ'
चे नामकरण 'फिरोजाबाद' केले.
■ फिरोज तुघलकाचा वास्तुकार गाजी शहना हा होता. - फिरोज तुघलकच्या काळात दुआबात ५२ नवीन वस्त्या वसल्या.
■ फिरोज तुघलकाच्या काळात लोकोपयोगी कार्यावर झालेला खर्च 'दीवान-ए-विजारतकडे' मांडण्यात येत असे.
■ फिरोज तुघलकाने स्थापन केलेल्या ०५ दवाखान्यांना 'दार-उल-शफा' म्हणत.
■ फिरोज तुघलकाने स्थापन केलेल्या दानगृहांना 'दिवाण-ए-खैरात' म्हणत.
■ फिरोज तुघलकाने अशोकाचा मेरठ व टोपरा स्तंभापैकी टोपरा स्तंभालेख फिरोजाबाद मस्जिदजवळ तर मेरठ स्तंभालेख हिंदुराव दवाखान्याजवळ दिल्लीत पुनर्स्थापित केला.
■ फिरोज तुघलकाने नोकरी संधी उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार विभाग स्थापन केला.
फिरोज तुघलक दरबारातील साहित्यकार
* झियाउद्दीन बरानी - साहित्यिक.
* शम्से सिराज अफीफ - इतिहासतज्ञ.
* आज-उद्दीन खालिद ३०० ग्रंथाचा फारसीत अनुवाद.
* मौल्ला जलालुद्दीन रूमी - इस्लाम कायद्याचा अध्यापक
■ फिरोज तुघलकाचे जीवनचरित्र फतूहात-ए फिरोजशाही या नावाने ओळखतात.
■ फिरोज तुघलकाने इस्लाम धर्म प्रसारासाठी दास प्रथा उत्तम व सरळमार्ग म्हणून १,८०,००० दास ठेवले.
■ फिरोज तुघलक जन्माने हिंदू (माता हिंदू) असला तरी सुन्नी पंथीय होता.
■ फिरोज तुघलकाने खलिपाचा नायब म्हणून राज्यकारभार केला.
■ फिरोज तुघलकाची सेना सामंतीसेना होती.
■ सैन्यास जहागिरी रूपात वेतन दिले जाई.
■ फिरोज तुघलकाच्या काळात सैन्यात वंशपरंपरागत अथवा उत्तराधिकारी नियम लागू झाला.
■ फिरोज तुघलकाने 'शाशगानी' नावाचे नाणे चालवले ज्याचे मूल्य ०६ जिंतल होते.
■ फिरोज तुघलक १/४ जिंतल मूल्याचे नाणे काढले त्याला 'आधा अथवा बीख' म्हणत..
■ टकसाळ विभागाचा प्रमुख कजरशाह हा होता.
फिरोज तुघलकाचे ३६ मंत्री होते.
■ फिरोज तुघलकाने राज परिवार व्यवस्थेसाठी कारखाना विभाग स्थापन केला.
■ फिरोज तुघलकचा वजीर 'खान-ए-जहाँ-मकबुल' हा हिंदू होता त्याचे नाव 'कन्नू' होते.
■ फिरोज तुघलकाचा ज्येष्ठ पुत्र फत्तेहखाँचा मृत्यु इ.स.१३७८ ला झाला.
■ फिरोज तुघलकाने दु. मुहम्मदच्या हातात राज्यकारभार दिला. तो विलासी होता.
■ फिरोज तुघलकाने फत्तेहखाँचा मुलगा गयासुद्दीनने तुघलकशाहच्या हातात सत्ता सुपुर्द केली.
■ फिरोज तुघलकाचा ८० व्या वर्षी (२०-९-१३८८) ला मृत्यू झाला.
■ फिरोज तुघलकाचा वजीर म्हणून मकबूलने १३७० पर्यंत व नंतर मकबूलपुत्र जुनाशाहने कार्य केले.१३८८ फिरोजशाह तुघलकाचे - उत्तराधिकारी-१४१४
■ फिरोज तुघलकाच्या मृत्युनंतर फत्तेखाँपुत्र गयासुद्दीन द्वितीय सत्तेवर आला. (इ.स.१३८८-८९)
■ फिरोज तुघलकानंतर ५ उत्तराधिकारी झाले.
■ गयासुद्दीन तुघलकशाह द्वितीय विलासी, भोगी असल्याने १३८९ इ.स. ला त्याची हत्या करून 'अबूबक्र' सत्तेवर आला.
■ फिरोज तुघलकाचा लहान मुलगा नासिरुद्दीन मोहम्मद इ.स. १३९० ला सत्तेवर आला. त्याने अबुबक्रला मेरठ किल्ल्यात कैद ठेवून दि.३१/०८/ १३९० ला फिरोजाबादला राज्याभिषेक केला, त्याचा मृत्यू जानेवारी १३९४ ला झाला.
■ नासिरुद्दीन मोहम्मदनंतर त्याचा मुलगा अल्लाउद्दीन सिकंदरशाह उर्फ हुमायूँ सत्तेवर आला. (इ.स. १३९४)
■ अल्लाउद्दीन सिकंदरशाहानंतर त्याचा लहान भाऊ महमुद नासिरुद्दीन गादीवर आला. (इ.स.१३९६-१४१४)
महम्मुद नासिरुद्दीनच्या काळात तैमुर लंगने भारतावर आक्रमण केले-
एका युद्धात पाय गमवल्याने त्याला 'तैमुरलंग म्हणतात.
■ इ.स.१३७० ला तुर्क सरदारांनी त्याला निवडले : व तो चुगताई सरदारांचा प्रमुख बनला.
■ इ.स.१३७० ला तो समरकंदचा शासक बनला. तैमूरने भारतावर आक्रमण करण्यापूर्वी नातू पीर मोहम्मद सिंध स्वारीवर पाठवले.
■ सतलज ठिकाणी पीर मुहम्मद व तैमुरलंग एप्रिल १२९८ ला समरकंदहून निघून एकत्र भेटले.
तैमुरलंगचा भारतातील आक्रमणाचा मार्ग
समरकंद - सतलज - भटनेर सिरसा फतेहाबाद अहरवान - तोहाना - कैथल पानिपत दिल्ली मेरठ - हरिद्वार - जम्मू.
सतलज किनाऱ्याहून तैमुरलंगने दिल्लीवर आक्रमण करुन जाताना भटनेर राजा दुलचंदचा पाडाव केला.
■ तैमुरलंगने दिल्लीवर आक्रमणासाठी नोव्हेंबर १३९८ ला पानिपत ठिकाणाहून प्रयाण केले.
■ दि. १० डिसेंबर १३९८ ला तैमूर सेना दिल्लीत प्रविष्ट झाली.
■ दिल्ली सुलतान मुहम्मद नासिरुद्दीनचा मंत्री मल्लू इकबालने तैमुरचा विरोध दि.१२.१२.१३९८ ला दिल्लीत केला.
■ तैमुरलंगने दिल्लीत १५ दिवस मुक्काम केला. ■ दिल्लीतील अत्याचारानंतर तैमुरलंगने मेरठवर आक्रमण करुन. इलियास अफगाणला पराभूत केले.
■ तैमुरलंगने मुलतान-लाहौर-दीपालपूरचा गव्हर्नर म्हणून खिज्रखाँला नियुक्त केले.
■ तैमूरलंग १९ मार्च १३९९ ला सिंधु नदी ओलांडून समरकंदला वापस गेला.
तैमुरलंग आक्रमणाचे परिणाम
तुघलक सत्ता ऱ्हास, सय्यद वंश सत्तेवर, मोगलांचा मार्ग खुला, हिंदु - मुस्लिम शत्रुत्त्व वाढले, हिंदू रितीरिवाजात बदल, अन्नभांडार नष्ट, प्रांत स्वतंत्रता, हत्याकांड, सुंदरभवन व कलाकृती नष्ट, समरकंद्रचे वैभव वाढले.
0 Comments