Subscribe Us

मध्ययुगीन इतिहास.तुघलक राज्यकर्ते .भाग एक

 तुघलक वंश



१३२० - गयासुद्दीन तुघलक - १३२५

• खुसरो मुबारकशाहची हत्या गाझी मलिकने करुन, तुघलक सत्ता स्थापन केली व गयासुद्दीन तुघलक उपाधी धारणं केली.

■ तुघलक राजघराण्याला करौना तुर्क राजवंश म्हटले जाते कारण गयासुद्दीन तुघलक हा करौना तुर्क होता.

ते तुर्क कोण आहे?

• Inbatuta

सिंध तुर्कस्तान दरम्यानच्या प्रदेशात निवास करणारे

मार्को पोलो

भारतीय माता आणि तारतार पित्यांची संतती 

तुर्क हे मध्य आशियातील करौनाचे होते.

■ गाझी मलिकची आई पंजाबमधील होती आणि त्याचे वडील बलबनचे तुर्की गुलाम होते.

■ अल्लाउद्दीनच्या काळात गयासुद्दीन तुघलक हा दीपालपूरचा प्रांतपाल होता.

■ गयासुद्दीनने २९ मंगोल आक्रमणाविरुद्ध लढा देवून मंगोलांना परतावून लावल्याने त्याला मलिक- उल-गाजी ही उपाधी देण्यात आली.

■ दि.८-९-१३२० ला मलिक-उल-गाजी गयासुद्दीन तुघलक हा सत्तेवर आला.

■ गयासुद्दीन तुघलक हा दिल्लीचा पहिला सुलतान होता जो गाझी होता (गाझी म्हणजे गैर-मुस्लिमांचा खून करणारा)

■ अल्लाउद्दीनने जप्त केलेल्या जमिनी गाजी मलिकने परत दिल्या.

■ गाजी मलिकने मुलगा जुनाखाँला वारंगळच्या प्रतापरुद्र देव दुसरा विरुद्ध दोन वेळा पाठवले.

■ वारंगळ साम्राज्यात विलीन न करता जिल्ह्यात विभक्त करुन वारंगळचे नाव सुलतानपूर ठेवले.

■ गाजी मलिक काळात बंगाल शम्सुद्दीन फिरोजशाहच्या हातात होता.

■ गाजी मलिकने बंगालच्या गृहयुद्धात हस्तक्षेप करुन पूर्व बंगाल जिंकला.

■ १३२४ ला मंगोलांचा पराभव गाजी मलिकने केला.

■ गाझी मलिक हा सुन्नी मुस्लिम होता.

■ तुघलकाबाद (किल्ला) गाझी मलिकची राजधानी बनली.

■ बंगाल विजय मिळवून गाजी मलिक परत येत असताना जौनाखाँने त्याचे स्वागत दिल्लीजवळ ६ मैलावर अफगाणपूर ठिकाणी एक लाकडी भवनात केले. ज्या खाली गाजी मलिकचा चेंगरून मृत्यु झाला.

■ अफगानपूर येथे बांधलेल्या लाकडी भवनाचा निर्माता अहमद आयाज (जौनाखाँचा मुख्य प्रधान) होता.

■ गाझी मलिक आणि अमीर खुसरोचा 1325 मध्ये झाला येथे मरण पावले.

■ गाजी मलिकने कर वसुल करण्याची बोली पद्धत बंद केली.

■ अल्लाउद्दीनने चालू केलेली जमीन मोजणी योजना गाजी मलिकने बंद केली.

.१३२५ - महम्मंद-बिन-तुघलक - १३५१

■ मुहम्मद बिन तुघलकचे झियाउद्दीन बर्णेकर यांचे 'तरिखा-ए-फिरोजशाही', फतवाये जहांदारी' इब्न बतूता यांचे 'तोहफत-उन-नुगजार्फी-गरैब-इल-हे माहिती देणारी साधने आहेत.

■ गयासुद्दीनचा पुत्र जौनाखाँने गयासुद्दीनच्या मृत्युनंत ४० दिवसांनी दिल्लीत सत्ता हातात घेऊन महम बिन-तुघलक नावाने राज्य प्रारंभ केले.

• जौनाखाँ खुसरोशाहच्या काळात अमीर-ए-आखून पदी होता.

■ खुसरोशाह काळात गयासुद्दीन तुघलक व जौनान विद्रोह केला.

• गयासुद्दीन तुघलक काळात राजकुमारी जौनान वारंगळवर इ.स. १३२१ व १३२३ ला स्वारी केली

■ इ.स.१३२५ ला जौनाखाँ उर्फ उलुगखाँने महम्मद बिन-तुघलक नावाने राज्यकारभार प्रारंभ केला

महम्मद तुघलकाने राजस्व सुधारासाठी प्रांतीय उत्पन्न व खर्चाच्या नोंदी ठेवण्याची प्रथा चालू केली

■ दुआबातील हिंदू जनतेला अंकित करण्यासाठी कर लावले पण दुष्काळ पडल्याने दुआबातील कर व्यवस्था असफल ठरली.

• सुलतान मुहम्मद तुघलकाने कृषि सुधारासाठी नवीन विभाग स्थापला त्यास 'दिवाण-ए-कबी' म्हणतात

■ कृषि प्रयोगासाठी ६० मैल जमीन निवडून दोन वर्षात सुलतानाने ७० लाख रु. खर्च केले.

■ मुहम्मद-बिन-तुघलकाने राजधानी दिल्लीहून महाराष्ट्रात दौलताबाद ठिकाणी आणली. (इ.स.१३२७)

दौलताबाद राजधानी बनवण्याची कारणे

दौलताबादचे मध्यवर्ती स्थान म्हणून, उत्तर-पश्चिम भागात सतत होणारी मंगोल आक्रमणे, दक्षिण भारतात होणारे सततचे विद्रोह, दक्षिण भारतातील समृद्धता, इब्नबतुतामते सुलतानाला दिल्लीच्या जनतेने दिलेला त्रास.

■ महम्मद-बिन-तुघलकाने दिल्लीवर मंगोलांचे आक्रमण होताच राजधानी परत दिल्लीला स्थलांतरित केली.

■ महम्मद तुघलकाने कृषि योजना, राजधानी परिवर्तन योजनेप्रमाणेच सांकेतिक मुद्राचाही प्रयोग केला.

■ महम्मद बिन तुघलकाला मुद्रा काढणारा व चालवणारा बादशाह म्हणतात.

• महम्मद बिन तुघलकाने सोन्याचे २०० ग्रेन्स् वजनाच्या काढलेल्या नाण्याला 'दीनार' म्हणतात.

- महम्मद तुघलकाने सोने-चांदी-तांब्याचे नाणे काढले.

सांकेतिक मुद्रा प्रयोगाची कारण

इ-तुटवडा, दुष्काळ आणि सुलतानाचे असफल प्रयोग, • चांदीचा जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेला सुलतानास नवयोजना प्रचलित करण्याचे व्यसन होते, विश्व विजय कामना पूर्ततेसाठी, सैन्य व सैन्यास धन आवश्यकता, सुलतानास पर्शिया व चिनी सुलतानाच्या मिळालेल्या प्रेरणा

■ इ.स.१३२९-१३३० ला मुहम्मद तुघलकाने तांब्याचे शिक्के प्रचलित केले

महम्मद बिन तुघलकाने देवगिरी/दौलताबादहून राज्यकारभार प्रारंभ केला, त्यावेळी इ.स.१३२८- २९ ला मुलतान-लाहौरवर मंगोलांनी रमाशिरीन नेतृत्वाखाली आक्रमण केले

■ महम्मद-बिन-तुघलक हा प्रथम सुलतान ज्याने भारताच्या बाह्य प्रदेशावर (खुरासान, ईराण) आक्रमणासाठी प्रयत्न केले.

खुरासान विजयासाठी मुहम्मद तुघलकाने ३ लाख ७० हजार सेना पाठवली.

इ.स.१३३७ ला पंजाब प्रांतातील कांगडा जिल्ह्यातील नगरकोट किल्ल्याला वेढा देऊन विजय मिळविला.

■ इ.स.१३३७-३८ ला महम्मद तुघलकाने दिल्ली सभोवारचा पहाडी प्रदेश काराजाल जिंकण्यासाठी प्रयाण केले.

- ■ महम्मद-बिन-तुघलकाने चिनी सम्राटाकडे दूत पाठवला त्याचे नाव इब्नबतुता होते.

■ महम्मद-बिन-तुघलकाच्याच काळात दौलताबाद येथे 'हसनगंगु' ने उठाव करुन 'अल्लाउद्दीन बहमान शाह' उपाधी धारण करुन 'बहामनी' साम्राज्याचा पाया घातला.

■ महम्मद-बिन-तुघलकाच्याच काळात तुंगभद्रा नदीच्या काठी हरिहर आणि बुक्क यांनी सायण व माधवाचार्यांच्या आशीर्वादाने 'विजयनगर' चा पाया घातला.

■ गुजराथचा विद्रोही तगीचा पाठलाग करताना मुहम्मद-बिन-तुघलक थट्टा येथे पोहोचला व सिंध नदी ओलांडताना त्याचा दि. २० मार्च १३५१ ला मृत्यू झाला.

■ महम्मद-बिन-तुघलकने स्वेच्छाकारी प्रशासन केले.

■ महम्मद-बिन-तुघलकाला प्रशासनात साह्यासाठी परिषद होती.

■ महम्मद-बिन-तुघलकाने राज्यकारभार सुलतान बल्बनप्रमाणेच राजकुमार व मौल्ला-उलेमापासून दूर ठेवला.

■ महम्मद-बिन-तुघलकाने प्रशासन प्रांतात विभक्त करुन प्रांत प्रशासन 'नायब' च्या हातात दिले.

■ सुलतान महम्मद-बिन-तुघलकाच्या. मुख्य प्रधानाचे चार साह्यक होते. त्यांना 'डबीर' म्हणत. एका डबीरच्या अधिकारात ३०० लेखनीक असत.

■ महम्मद-बिन-तुघलकाच्या सैन्यातील अधिकारी- 'खान', 'मलिक', 'अमीर', 'सिपहसालार', 'जुन्द' हे होते.

■ महम्मद-बिन-तुघलकाच्या न्याय व्यवस्था विभागास 'सद्रजहान काजी-उल-कुजात' म्हणत.

■ काजीच्या साह्यास (न्यायाधीशाच्या साह्यास) 'मुफ्ती' असत.

■ महम्मद-बिन-तुघलकाने दुआबातील कर वसुलीसाठी १०००-१००० गावांचे समूह/संघटन बनवले. त्यास 'हजारह' म्हणत.

■ महम्मद-बिन-तुघलकाने प्रांताच्या जमिनी १००- १०० गावांत संघटित केल्या त्यास 'सदी' म्हणत.

■ मुहम्मद बिन तुघलकच्या काळात दरबार-ए-आम आणि दरबार-ए-खास आयोजित केले गेले.

महम्मद तुघलकाच्या असफलतेची कारणे

कर्मचारी अयोग्य, प्रजेचे असाह्य, प्रांतपालांचे विद्रोह, धर्म ठेकेदारांचा विरोध, योजना काळापुढच्या, प्रकृती

कोप, सुलतानाच्या वैयक्तिक चुका, विस्तृत साम्राज्य.

■ इतिहासकार एल्फिन्स्टन 'मुहम्मद तुघलकामध्ये वेडेपणाचे गुण होते' असे नमुद करतो.

■ डॉ. व्ही.ए. स्मिथ व डॉ. ईश्वरी प्रसाद 'मुहम्मद तुघलकाला विविध विरोधी भावनांचे आश्चर्यजनक संमिश्रण' म्हणतात.

Post a Comment

0 Comments