Subscribe Us

मध्य युगिन इतिहास..खिलजी वंश राज्यकर्ते

 खिलजी राजवंश


जलालुद्दीन खिलजी I.S. 1290-1296

■ डॉ. त्रिपाठी-जलालुद्दीनने कैकूबादची हत्या करुन खिलजी सत्तेची स्थापना केली या घटनेला खिलजी क्रांती' म्हणतात.

■ दिल्लीतील तुर्क सरदार खिलजींना अलग वागणूक देत. खिलजींना अफगाण पठाण समजत.

■ जलालुद्दीनचा जन्म इ.स. 1220 ला झाला.

■ बल्बनचा पुतण्या मलिक छज्जू आणि जलालुद्दीन यांच्यात शत्रुत्त्व होते.

- जलालुद्दीनने सुलतान कैकूबादचा वध करुन सत्ता हस्तगत केल्याने दिल्लीतील तुर्क सरदारांनी जलालुद्दीनला विरोध केल्यामुळे १ वर्षे जलालुद्दीनने किलोखरी येथून राज्यकारभार केला.

■ जलालुद्दीनने मलिक छज्जूला कडा-माणिकपूरचा जहागिरदार बनवले.

■ जलालुद्दीनने मलिक फकरुद्दीनला दिल्लीचा कोतवाल नेमले.

■ जलालुद्दीनने मलिक अहमद चपला अमीर-एम-हजीबपदी यांचे नाव घेतले.

■ जलालुद्दीन सुलतानपदी आला त्यावेळी त्याचे वय ७० वर्षे होते म्हणून त्याने रक्त त्याज्य नीती स्वीकारली.

■ मलिक छज्जूने इ.स. १२९२ ला विद्रोह केला. मलिक छज्जूचे मुळ नांव किशलू खाँ होते.

■ छज्जूने जलालुद्दीनने प्रदान केलेली कडा जहागिरदारी स्वीकारली.

■ मलिक छज्जूने अवध प्रांतपाल हातिमची मदत घेऊन दिल्लीवर आक्रमण केले. मलिक छज्जूचा पराभव जलालुद्दीन पुत्र अरकलीखाँने केला. जलालुद्दीन छज्जूला माफी दिली.

• अहमदच्या नेतृत्त्वाखाली दरबारातील तरुण खिलजी- सरदारांनी जलालुद्दीनच्या मवाळ धोरणाचा विरोध केला.

■ दिल्लीला लुटणाऱ्या ठग आणि चोरांना जलालुद्दीने शिक्षा करण्याऐवजी मार्गदर्शन केले.

• जलालुद्दीन खिलजीने संत सिद्दीमौलाची हत्या केली.

■ इ.स. १२९० ला जलालुद्दीनने ला रणथंबोरच्या किल्ल्यात वेढा दिला.

• जलालुद्दीनच्या काळात अल्लाउद्दीनने इ.स. १२९२ ला मंडवार, १२९२ ला माळवा, १२९४ ला देवगिरीवर आक्रमण केले.

■ जलालुद्दीनने १२९२ ला मंगोलनेता हलाकूचा नातू अबुलाचा पराभव सुनाम ठिकाणी केला.

■ अल्लाउद्दीन खिलजीने (जलालुद्दीनचा पुतण्या व जावई) देवगिरी शासक रामचंद्रदेवाचा पराभव केला.

■ जलालुद्दीन खिलजीचे पुत्र अरकली खान आणि कादरखान झाले असते.

■ अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर यशस्वी स्वारी करुन आल्यानंतर जलालुद्दीनची भेट मणिकपूर ठिकाणी घेतली. भेटीत अल्लाउद्दीनच्या आदेशाने १९ जुलै १२९६ ला जलालुद्दीनची हत्या मुहम्मद सलीम (अलाउद्दीन साह्यक) ने केली.

■ अल्लाउद्दीन खिलजीचा भाऊ उलगखाँ याने या घृणास्पद कार्यात अल्लाउद्दीनची मदत केली.

1296 अल्लाउद्दीन खिलजी 1316

अल्लाउद्दीनने 'यमीनुल खिलापन नासिर-ए-अमीरूल मौमिनीन' पदवी धारण केली.

■ अल्लाउद्दीनने खलिपाचे नाव शिक्क्यावरून मिटवले.

ल्लाउद्दीनने जलालुद्दीनची (सासरा) ची हत्या केली, हे कळताच जल्लालुद्दीनची पत्नी मलिका जहाँने

कादिरखाँ (इब्राहीम) रुक्नुद्दीनला सत्तेवर बसवले. ■ अल्लाउद्दीनने ३/१०/१२२६ ला दिल्लीत सत्ता हस्तगत

केली.

■ अल्लाउद्दीनचे विरोधक इब्राहिम, मलिकाजहाँ, अहमद चाप व अरकलीजहाँ हे होते.■ सीमा रक्षणासाठी १३०४ ला अल्लाउद्दीनन गाल मलिकला नेमले.

■ अल्लाउद्दीन सम्राट सिकंदरप्रमाणे साम्राज्यविस्ता करू इच्छित होता. म्हणून त्याने उपाधी धारण केली. सिकंदर-ए-सा

■ अल्लाउद्दीनने एक नवा धर्म प्रस्थापित करण्यासा मलिक-अला-उल-मुल्कशी चर्चा केली होती.

अल्लाउद्दीनने जलालुद्दीन पुत्र अरकलीखाँचा पराभ करून सिंधचा गव्हर्नर उलुगखाँला नेमले.

अल्लाउद्दीनचे दक्षिण भारतातील विजय

■ देवगिरीच्या रामचंद्रदेवाचा पराभव केला.

■ तेलंगना (वारंगळ) च्या काकतीयवंशी प्रतापरुद्रदेव

पहिला याचा पराभव केला.

■ द्वारसमुद्रचे होयसळचा वीर बल्लाळ तृतीयचा पराभवा केला.


■ मदुरेच्या पांड्य शासक भारवर्मन कुलशेखरचा पराभव केला.

■ नेल्लोर राजा मणमासिद्धचा पराभव केला.

■ ओरिसा शासक भानुदेवचा पराभव केला. ■ कोलूमच्या रवी वर्मनचा पराभव केला.

मंगलौर शासक बंकीदेव अलुपेंद्रचा पराभव केला.

अल्लाउद्दीनने दक्षिण भारतात विजय हजार दिनारी मलूक कापूरच्या नेतृत्त्वाखाली मिळवले.

अल्लाउद्दीन - राजपूत संघर्ष

१) गुजराथ

■ गुजराथवर १२९९ ला नुसरतखाँ व उलगखाँला नेमले. त्यावेळी गुजराथ शासक बघेलावंशी रायकर्णदेव दुसरा होता.

■ रायकर्णदेव दुसरा याची पत्नी कमलादेवीशी अल्लाउद्दीनने विवाह केला.

■ रायकर्णदेव व त्याची मुलगी देवलदेवीने देवगिरीला आश्रय घेतला.

- अल्लाउद्दीनला गुजराथ स्वारीत नपुंसक मलिक कपूर ची प्राप्ती झाली.

२) रणथंबोर

• अल्लाउद्दीन काळात रणथंबोर शासक हमीरदेव होता.

■ रणथंबोरवर अल्लाउद्दीनने उलगखाँ व नसरतरखाँच्यानेतृत्वाखाली स्वारी केली त्यात नुसरतखाँचा मृत्यु झाला.

■ रणथंबोर शासक हम्मीरदेवाच्या सेनापतीने (रणमल्लने) फितुरी केल्याने रणथंबोर अल्लाउद्दीनने जुलै १३०१ ला रणमल्ला हा विश्वासघातकी म्हणून त्याची हत्या केली.

3. मेवाड

■ मेवाड सत्ताधीश गुहिलावंशी राजपूत होते, चित्तोड राणा रत्नसिंह पत्न पद्मीनीच्या प्राप्तीसाठी अल्लाउद्दीनने चित्तोडशी शत्रुत्त्व केले.


■ दि.२६-०८-१३०३ ला चित्तोडवर अल्लाउद्दीनने विजय मिळविला.

■ चित्तोडचे प्रशासन अल्लाउद्दीनने खिज्जखाँ नामक मुलाच्या हातात देऊन चित्तोडचे नाव खिज्ज्राबाद ठेवले.

■ इ.स.१३११ ला चितोड पुन्हा राजपुतांनी जिंकले.

■ पद्मीनी कथा महम्मंद जायसी रचित आहे, त्यास पद्मावत म्हणतात.

■ पद्मावत कथा जायसीने अमीरखुसरोच्या 'खजायन- उल-फतूह' तून घेतली आहे.

■ घौरी शंकर ओझा, डॉ. के.एस. लाल माटे पद्मावत ही काल्पनिक कविता आहे.

4. जैसलमेर

■ चारण साहित्यात अल्लाउद्दीनच्या जैसलमेर स्वारीचा उल्लेख आहे.

■ फारसीत लिखित तारिख-ए-मासूमीत जैसलमेर स्वारीचा उल्लेख आहे.

■ अल्लाउद्दीनने गुजरात स्वारीवर जाताना जैसलमेर जिंकले. (इ.स.१२९९)

५. माळवा-सेबना-जालोरे

■ माळवा शासक राय मद्रलक देवचा पराभव इ.स.१३०५ ला ऐन-उल-मुल्कने केला.

■ जैल्लोर शासक कनेरदेवचा पाडाव अल्लाउद्दीनने केला.

■ इ.स.१३०८ ला अल्लाउद्दीनने सेबानाचा परमार राजा सीतलदेवचा पराभव करुन जिंकला.

■ रामचंद्र देवाचा ज्येष्ठ पुत्र शंकरचा विवाह गुजराथ शासक कर्णदेव पुत्री देवलदेवीशी ठरवण्यात आला होता.

■ मलिक कपूरने देवलदेवीला कैद करुन उत्तरेत पाठवले व अल्लाउद्दीनने खिज्रखानशी तिचा विवाह लावला.

■ मलिक कपूरने पांड्य राज्य मदुरेत विजयाप्रीत्यर्थ रामेश्वरला अल्लाउद्दीन नामक मस्जिद बांधली.

■ मलिक कपूरने दक्षिण भारतात चार स्वाऱ्या केल्या.

• अल्लाउद्दीन व मलिक कपूरने मिळून दक्षिण भारतावर एकूण तीन स्वाऱ्या केल्या.

■ अल्लाउद्दीनने एक अलग राजस्व विभाग स्थापन करुन त्यावर नायब वजीर शर्फ कायिनीला प्रमुख नेमले.

■ अल्लाउद्दीनने जमीन मोजणी पंजाब, दुआब, १/२ माळवा व राजपुताना भागातच केली.

उत्पन्नाच्या ५०% घेतला जाणारा कर 'खिराज' होता.

अल्लाउद्दीनच्या काळात घरपट्टी व चाराकर घेतला जाई.

■ जजिया-गैरमुस्लिम व्यक्तीकडून घेतला जाणारा कर होता.

■ खम्स लुटीतील १५% उत्पन्न राज्याचे गृहित धरले जाई त्यास खम्स म्हणत.

• जकात - केवळ मुस्लिम व्यक्तीकडून घेतला जाणारा कर होता.

■ मिल्क जमीन स्वामीच्या अधिकाराखालची जमीन, इनाम जमीन - निःशुल्क भेट म्हणून प्राप्त जमीन तर वक्फ जमीन आ. अनुदानात देण्यात आलेली भूमी होती.

■ अल्लाउद्दीनने भ्रष्टाचार रोखण्यासाठी दीवान-ए- मुस्तखराज विभाग निर्माण केले.

■ फरिश्ताच्या मते, अल्लाउद्दीनकडे 4.75 लाख सैन्य होते.

■ अल्लाउद्दीनने सैन्य दलात उत्तम नस्लचे घोडे खरेदी करुन घोड्यांना 'डाग' देण्याची प्रथमा सुरु केली.

■ अल्लाउद्दीन सैन्यास वेतन नगदी मिळे. सैनिक स्वतः घोडा सांभाळे त्यास २३४ टंका मिळत त्यास एक 'अस्पा' म्हणत.

दोस्पा - एखाद्या घोड्यास जास्त खाद्य लागे त्यावेळी सैनिकास अतिरिक्त ७८ टंका मिळत त्यास दो अस्पा म्हणत.

■ किल्ल्याच्या रक्षणासाठी नियुक्त अधिकाऱ्यास 'कोतवाल' म्हटले जाई.

■ सैन्य अधिकारी 'आरिज-ए-मुमालिक' हा असे.

■ अल्लाउद्दीनने मंगोलाविरुद्ध सहा स्वाऱ्या व दक्षिण भारताच्या चार स्वाऱ्या केल्याने अर्थ सुधारासाठी बाजारनियंत्रण धोरण घोषित केले.

■ अल्लाउद्दीनने उगलखाँच्या मलिक मकबूल नामक नोकरास शहना म्हणून नियुक्त केले.

■ अल्लाउद्दीनने शासकीय बाजार (सराय-ए-आदल) दिल्लीत बदायूँ द्वारजवळ वसवला.

■ मुलतानच्या व्यापाऱ्यांच्या हातात सराय-ए-आदलचे व्यवस्थापन देण्यात आले.

■ दिवाण-ए-रियासत आणि शहाना-ए-मंडीने काम करावे.

■ अल्लाउद्दीनने सैन्यात चेहरा (शरीर वर्णन) व डाग पद्धत लागू केली.

■ दीवाने-ए-रियासत म्हणून मलिक याकूबला नेमण्यात आला.

शहाना-ए-मंडीचे बाजारभाव पत्रक आहे.

■ कापडबाजार 'सराय अदज' नावाने ओळखला जाई. कापडबाजारात २० गज कापडाचे मुल्य १ टंका होते. बाजार नियंत्रण धोरणाच्या अंमलामुळे अल्लाउद्दीनला प्रतिवर्ष ४० लाख टंकांची प्राप्ती झाली.

■ मलिक कपूरने अल्लाउद्दीनची पत्नी व मुलगा खिज्जखाँला कैद केले. मलिका जहाँला दिल्लीत तर राजपुत्रांना ग्वाल्हेर किल्ल्यात कैद ठेवले.

■ दि. ०२-०१-१३१६ ला अल्लाउद्दीनचा मृत्यु झाला.

■ कपूरने शिहाब-उद-उमरला सत्तेवर बसवले. तो खिजखाँचा पुत्र होता.

अल्लाउद्दीनचा राजेशाही सिद्धांत

राजा हा सार्वभौम आहे. ईश्वराचा प्रतिनिधी आहे. राजाला ईश्वराने ज्ञान दिले आहे जे इतरांना नाही त्यामुळे राजइच्छा हाच राज्यनियम होय, राजास अन्य कोणत्याही राजाचे अस्तित्त्व अमान्य आहे, राज्य कारभारापासून सरदार-उलेमांना दूर ठेवण्यात आले, खलिपाची मान्यता मिळवणे आवश्यक मानले नाही.स ■ अल्लाउद्दीनने वेश्यावृत्ती बंद केली.

■ अल्लाउद्दीनने अमीर खुसरोला आश्रय दिला.

■ अमीर खुसरो काही काळ बल्बनपुत्र मुहम्मदच्या दरबारात होता.

खुसरोने 'तारीख-ए-अलाई,', 'आशिका' ची रचना केली. खुसरोद्वारा लिखित 'आशिका' चा विषय खिज्जखाँ-देवल देवीचे प्रेमसंबंध हा होय.

■ अल्लाउद्दीन मृत्युनंतर मुबारकशाहच्या दरबारात नूहसिपेहर तर गयासुद्दीन तुघलकच्या दरबारात तुगलकनामा ची रचना खुसरोने केली.

■ अल्लाउद्दीन दरबारात ४६ साहित्यकार असल्याचा उल्लेख बर्नी करतो.

■ अल्लाउद्दीनने 'सिरीचा' हा किल्ला बांधला.

■ इ.स.१३११ ला कुतुबमिनारचा विस्तार अल्लाउद्दीनने केला.

अमीर खुसरो

अमीर खुसरोचा जन्म इ.स. १२५६ ला पथियाळा येथे. अमीर खुसरोचे पिता काश (तुर्कस्थान) चा रहिवासी होता. मंगोल आक्रमणाबरोबर तो भारतात आला. अमीर खुसरोचे मुळनांव यमीनुद्दीन मुहम्मद हसन होते, अल्लाउद्दीनच्या दरबारात प्रथमतः राजकवि म्हणून दाखल, शेख निजामुद्दीन औलियाचा शिष्य, चार लाख 'छंदाची' रचना, अमीर खुसरोच्या रचना - 'तारीख-ए-अलाई,', 'नुहसिपेहर' इत्यादी. अमीर खुसरोला 'तुती-ए-हिंद' म्हणतात.

■ हजार स्तंभाचा राजवाडा अल्लाउद्दीनने बांधला ज्यास

'हजार सितून' म्हणतात. - नुसरखाँने गुजराथ स्वारीतील १००० दीनार

देऊन मलिक कपूरची खरेदी इ.स. १२९७ ला केली. ■ मलिक कपूरने देवगिरी इ.स.१३०६, तेलंगणा- १३०९, द्वारसमुद्र-१३१०, पांड्य इ.स १३२० ला जिंकले.

1316 कुतुबुद्दीन मुबारकशाह 1320

मलिक कपूरने अल्लाउद्दीनपुत्र खिज्जखाँ आणि शाहीदखाँ यांना अंध बनवले व मुबारकखाँला कैद केले. मुबारकशाहने देवगिरीचा गव्हर्नर म्हणून मलिक यकलकीला नियुक्त केले.मुबारकशाहने खिजखाँ, शादीखाँ व शहाबुद्दीन उमरची हत्या षडयंत्र/कटकारस्थानी व्यक्ती म्हणून केली.

• मुबारकशाहच्या काळात खुसरो एक प्रबळ सरदार बनला. दि. १५-०३-१३२० ला खुसरो साह्यक झारियाने मुबारकशाहची हत्या केली.

■ दि.१५-०३-१३२० ला खुसरो नासिरुद्दीन हा सत्तेवर आला.

नसिरुद्दीन खुसरो I.S. 1320

■ १५ एप्रिल ते ५ सप्टेंबर १३२० पर्यंत त्याने राज्य केले खुसरोशाह मूलतः हिंदू होता.

■ खुसरोशाहने गाजी मलिकला पंजाबचा राज्यपाल नेमले.

■ गाजी मलिक आणि त्याचा पुत्र फकरूद्दीन मुहम्मद जोना यांनी दीपालपूरहून दिल्लीवर आक्रमण करुन ५ सप्टेंबर १३२० ला खुसरोशाहची हत्या केली व खिलजी सत्तेजागी तुघलक वंशीयसत्ता स्थापन केली. (इ.स.१३२०)

■ गाझी मलिकने तुघलक सत्तेची स्थापना केली.

खिलजी वंशाच्या पराभवाची कारणे

लोकप्रिय शासकांचा अभाव. अल्लाउद्दीनची हुकुमशाही व असफलता, मंगोल आक्रमणे, भ्रष्टाचारी अधिकारी, स्थायी सैन्य अभाव, कर्तबगार शासकांचा अभाव, वारसा प्रश्न बळावर सोडवणे, अल्लाउद्दीनचे दुर्बल उत्तराधिकारी, वाईट चरित्रता (मुबारकशाह), अंतर्गत विद्रोह, हिंदुंना अपमानास्पद वागणुक इत्यादी.अमीर सरदारांच्या पाडावासाठीचे चार आदेश

■ गुप्तहेर पुनर्रचना - सरदार व अमीरावर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तहेर नियुक्त केले.

■ मद्यपान बंदी - मद्यपानामुळे कटकारस्थाने होतात म्हणून मद्यपान बंदी केली.

■ सरदार-अमीरावर बंधने अमीर-सरदारांत रक्ताचे संबंध निर्माण होऊन प्रबळ बनतात म्हणून अशा विवाहास परवानगी आवश्यक केली.

■ जमिनी जप्त - अनुदान दिलेल्या जमिनींना वारसदार नसेल तर जमिनी जप्त करण्यात आल्या.

■ वक्फ मिल्क म्हणजे दान देण्यात आलेली भूमी.

■ हिंदू जमीनदारावर अल्लाउद्दीनने ५० टक्के कर लावला.

■ अल्लाउद्दीनचे चार जीवनगामित्र होते - उल्घखान, नुरसतखान, जफरखान आणि अल्पखान.

■ ट्रॉसआक्झियानाचा शासक दवाखाँने गजनीवर ताबा मिळवल्यानंतर १२९७-१३०६ दरम्यान मंगोलाची सहा आक्रमणे भारतावर झाली.

अल्लाउद्दीन काळातील सहा मंगोल आक्रमणे

■ कादर आक्रमण १२९७-९८ लाहौर - पंजाब विजयासाठी दुवाखाँद्वारा कादर रवाना. अल्लाउद्दीनने जफरखाँ व उलुगखाँला पाठवून जालंधरला मंगोल पराभूत केले.

■ साल्दीचे आक्रमण १२९९- सिंधमधील सिविस्तानवर आक्रमण-जफरखाँद्वारा मंगोल नेता साल्दी पराभूत झाला.

■ कुतुलुग ख्वाजाचे आक्रमण १२९९ दिल्लीला वेढा. दिल्ली कोतवाल आ-उल-मुल्कने संधीचा सल्ला दिला पण जफरखाँद्वारा मंगोल पराभूत. पण जफरखाँची हत्या झाली.

■ तार्गीचे आक्रमण - १३०३ अल्लाउद्दीन दक्षिणेत व्यस्त असताना मंगोल नेता तार्गीद्वारा दिल्लीला वेढा जफरखाँ, उलगखाँच्या मृत्युमुळे मंगोल दिल्लीत प्रविष्ट- ४० दिवस वेढ्यानंतर तार्गी परत गेला.

■ अलीबेग-तारताक-तार्गीचे आक्रमण १३०५ - तार्गीचा मृत्यु दुआब प्रदेशात झाला.

■ कुबाक इकबालमंदाचे आक्रमण - १३०६ तारताक अलीबेग मृत्यु बदला घेण्यासाठी दवाखाँने दोघांना रवाना केले. कुबाकु रावी नदीकेड तर इकबालमंदा नाधौरकडे रवाना - मलिककापूर व गाजीमलिकने दोघांना कैद. १३०६ ला दवाखाँचा मृत्यु झाला.

Post a Comment

0 Comments