कारणे लिहा
(१) ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करणे. उत्तर - (i) कारण ऐतिहासिक स्मारक हे आपल्या प्राचीन संस्कृतीचा ठेवा
आहे. (ii) त्या वास्तूंचे सौंदर्य व मूळ स्वरूप नष्ट करून आपल्या पूर्वजांचा सांस्कृतिक वैभवाचा वारसा नष्ट होईल म्हणून ऐतिहासिक वास्तू, इमारती, स्मारके यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
(२) वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते.
उत्तर - (i) शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. यासाठी शासनाने पेन्शन योजना राबवली आहे. (ii) सामाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांच्या उपजिविकेचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ही योजना राबवली जाते. (iii) वृद्धापकाळापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते.
(३) ६ ते १४ वयोगटांतील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
उत्तर - (i) सर्व भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून संविधानाने मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्त्वे यांतून अनेक तरतुदी केल्या आहेत. त्यापैकी शिक्षणाचा हक्क ही एक आहे. (ii) ६ ते १४ वर्षे हे वयोगट बाल्यावस्था असते. या वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्राथमिक शिक्षण आवश्यक असते. त्यामुळे शासनाने ६ ते १४ वयोगटांतील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे.
प्रश्न ४ - योग्य की अयोग्य का ते सांगा. अयोग्य विधान दुरुस्त करा.
(१) राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे.
उत्तर - हे विधान योग्य आहे.
(२) राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे.
उत्तर - हे विधान योग्य आहे.
(३) आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव लिहिणे/कोरणे.
उत्तर - हे विधान अयोग्य आहे. आपल्या ऐतिहासिक वास्तूवर आपले नाव
लिहू / कोरू नये.
(४) सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे.
उत्तर - हे विधान अयोग्य आहे. सारख्याच कामासाठी स्त्री व पुरुषांना समान
वेतन दयावे.
(५) सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवणे.
उत्तर- हे विधान योग्य आहे.
प्रश्न ५ - लिहिते होऊया.
(१) संविधानातील काही मार्गदर्शक तत्त्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत. ती कोणती ?
उत्तर - संविधानावरील काही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे दिली आहेत. (i) शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे. स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये. (ii) स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन दयावे. (iii) लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. (iv) पर्यावरणाचे रक्षण करावे. (v) राष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांचे म्हणजेच स्मारके, वास्तू यांचे संरक्षण करावे. (vi) समाजातील दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. (vii) वृद्धापकाळ, अपंगत्व, बेकारी यांपासून नागरिकांचे संरक्षण करावे. (viii) भारतातील सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा करावा.
(२) भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्वे नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का केली असेल ?
उत्तर - (i) स्वातंत्र्य मिळाल्यावर लवकरच नागरिकांच्या सर्वच सामाजिक व आर्थिक हक्कांची हमी देणे सरकारला शक्य नव्हते. (ii) कारण देशाचा आर्थिक विकास व्हायचा होता. तसेच भारताचे एका नव्या विकसित व प्रागतिक देशात रूपांतर करायचे होते. त्यासाठी केंद्रशासन व राज्यशासनाने कोणत्या•
विषयांना प्राधान्य दयावे, लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शक तत्त्वांद्वारे स्पष्ट केले आहे. राज्यांच्या धोरणांचे ते आधार बनवले. म्हणून भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद केली असेल.
(३) मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे का म्हटले जाते ?
उत्तर - (i) मूलभूत हक्कांमुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य
मिळते, तर मार्गदर्शक तत्त्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करतात. (ii) अर्थात एखादे मार्गदर्शक तत्त्व शासनाने राबवले नाही तर त्या विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही, परंतु विविध मार्गांनी शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा आग्रह आपण धरू शकतो. म्हणून मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हटले जाते.
प्रश्न ६ - पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात. हे उदाहरणासह लिहा.
उत्तर - (i) पर्यावरणाचे जतन व संरक्षण करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एक रोप लावावे. (ii) पर्यावरणातील झाडांची तोड करू नये. (iii) डोंगर, पोखरून खळी केल्या जाते. त्याचे प्रमाण कमी करावे. (iv) खाणकाम करण्यासाठी जमिनी पोखरल्या जातात. त्यावर नियंत्रण ठेवावे. (v) पाण्याचा वापर कमी करावा. (vi) कारखान्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालावा. त्या कारखान्यांतून
निघणारे सांडपाणी नदीत सोडू नये. (vii) सर्वांनी प्लॉस्टिकचा वापर कमी करावा. (viii) सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या बागबमिच्यांमध्ये कोणत्याही प्रकारची घाण करू नये, तेथील झाडांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. (ix) 'वृक्ष वल्ली आम्हां सोयरी' हे तुकाराम महाराजांचा अभंग आठवून झाडे लावावी. 'झाडे लावा जीवन जगवा' हे आपले ब्रीद ठेवावे. (x) पर्यावरणात ज्या वाहनांमुळे धूर होणार नाही म्हणजे ई-रिक्षा, ई-स्कूटर यांसारख्या वाहनांचा उपयोग करावा. म्हणजे वातावरणात प्रदूषण होणार नाही. ओझोनच्या थरातील घट कमी होणार नाही.
प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) मूलभूत हक्क अधिकारावर निर्बंध घालतात.
(२) शासनाने... साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे.
(३) भारतातील सर्व नागरिकांसाठी समान.... करावा.
(४) लोकशाहीत नागरिकांवर जबाबदारी असते.
(५) समाजातील दुर्बल घटकांना विशेष संधी उपलब्ध करून ट्याव्यात. देऊन त्यांना विकासाच्या
उत्तर - (१) शासनाच्या (२) उपजीविकेचे (३) नागरी कायदा (४) दुहेरी
(5) संरक्षण
प्रश्न २- शोधा व लिहा.
(१) मार्गदर्शक तत्त्वे म्हणजे काय ?
उत्तर - शासनाने काय करावे याविषयीच्या काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनांचा हेतू म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेत जी उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत ती प्राप्त करण्यासाठीचे मार्गदर्शन होय म्हणूनच या सूचनांना 'मार्गदर्शक तत्त्वे' असे म्हटले जाते.
(२) संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश का करण्यात आला ?
उत्तर - भारतीय नागरिकांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हावी म्हणून संविधानात मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
प्रश्न ३ - लिहिते व्हा!
(१) भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये कोणती ते सांगा.
उत्तर - भारतीय नागरिकांची मूलभूत कर्तव्ये पुढील प्रमाणे आहे.
(i) प्रत्येक नागरिकाने संविधानाचे पालन करावे. संविधानातील आदर्शाचा, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करावा. (ii) स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे पालन करावे. (iii) देशाचे सार्वभौमत्व, एकता व अखंडत्व सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असावे. (iv) आपल्या देशाचे रक्षण करावे, देशाची सेवा करावी. (v) सर्व प्रकारचे भेद विसरून एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा आणतील अशा प्रथांचा त्याग करावा. (vi) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन करावे. (vii) नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगावी
(viii) वैज्ञानिकदृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी. (xi) सार्वजनिक मालमत्तेचे जतन करावे. हिंसेचा त्याग करावा. (x) देशाची उत्तरोत्तर प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न करावा. (xi) ६ ते १४ वयोगटातील आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दयाव्यात.
प्रश्न १ एका शब्दांत उत्तरे सांगा.
(१) यानुसार शासनाने धोरणे आखावीत -
उत्तर - मार्गदर्शक तत्त्वांनुसार
(२) स्त्री वे पुरुषांना समान कामासाठी दयावे.
उत्तर: समान वेतन
(३) लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी कराव्यात -
उत्तर- उपाययोजना
(४) यामुळे नागरिकांना अत्यावश्यक असे स्वातंत्र्य मिळते.
उत्तर - मूलभूत हक्कांमुळे
(५) प्रत्येक नागरिकाने याचे पालन करावे.
उत्तर - संविधानाचे
वेतनाच्या संदर्भात 'समान कामासाठी समान वेतन' असे मार्गदर्शक तत्त्व आहे. यातून संविधानांतील कोणती उद्दिष्टे साध्य होतील असे तुम्हांला वाटते ? स्त्री-पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार का आढळतात ?
उत्तर - वेतनाच्या संदर्भात 'समान कामासाठी समान वेतन' असे मार्गदर्शक तत्त्व आहे. यातून संविधानातील समानतेचे उद्दिष्ट साध्य होतील असे आम्हांला वाटते. समाजात स्त्रियांना दुर्बल समजले जाते. पुरुषांपेक्षा स्त्रियांची कार्यक्षमता कमी आहे असा लोकांचा समज आहे. त्यामुळे स्त्री-पुरुषांनी सारखेच काम करून पुरुषांपेक्षा स्त्रियांना कमी वेतन देण्याचे प्रकार आढळतो
(१) शासनाच्या या सुविधांमुळे कोणत्या सुधारणा होतील असे तुम्हांस वाटते ?
उत्तर - (अ) सार्वजनिक स्वच्छतागृहे सार्वजनिक स्वच्छतागृहांमुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होणार नाही. तसेच आजूबाजूच्या परिसरात
स्वच्छता राहण्यास मदत होईल. (ब) स्वच्छ पाणीपुरवठा स्वच्छता पाणीपुरवठा उपलब्ध झाल्यामुळे पाण्यामुळे होणारे रोग निर्माण होणार नाही. त्यामुळे सर्वांचे आरोग्य चांगले राहील.
(क) बालकांचे लसीकरण - बालकांचे लसीकरणाची सोय झाल्यामुळे बालकांना उत्तम आरोग्य मिळेल. त्यांचे पोलियो, क्षय यांसारख्या रोगांपासून संरक्षण होईल.
उपक्रम
बालकांच्या आरोग्यांसाठी शासन कोणत्या योजना राबवते, याविषयी माहिती मिळवा.
उत्तर - बालकांच्या आरोग्यांसाठी शासन पुढील योजना राबवते.
(i) एकात्मिक बाल विकास सेवा योजना.
(ii) लसीकरण
(iii) संदर्भ आरोग्य सेवा.
(iv) आरोग्य आणि सकस आहार विषयक शिक्षण
(v) पूरक पोषण आहार
(vi) अनौपचारिक प्री-स्कूल शिक्षण
(vii) आरोग्य तपासणी
***
0 Comments