३. पृथ्वीगोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट
आपण हे शिकणार !
नकाशे
नकाशे हे दुविमिती असतात. द्विमितीय घटकाची लांबी, रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते.
नकाशाच्या साहाय्याने जगाचा तसेच मर्यादित प्रदेशाचाही अभ्यास करता येतो.
पृथ्वी गोल
पृथ्वीगोल हा त्रिमित असतो. त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि उंची मिळून त्याचे घनफळ तयार होते.
पृथ्वीगोल हा कितीही लहान किंवा मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते.
भौगोलिक सहल ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे.
क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते व स्थानिक लोकांशी चर्चा करण्याची संधी मिळते.
भूगोल दालन
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमध्ये मेन राज्यात 'यारमथ' येथे ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे.
'अर्था' हा जगातील एक सर्वांत मोठा फिरता पृथ्वीगोल आहे.
या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे.
प्रश्न १ - द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर - द्विमित साधनांची वैशिष्ट्ये -
(i) नकाशे हे द्विमिती असतात. (ii) द्विमिती घटकाला लांबी आणि रुंदी .
असते. लांबी आणि रुंदी मिळून त्याचे क्षेत्रफळ तयार होते.
त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये -
(i) पृथ्वीगोल हा त्रिमित असतो.
(ii) त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी आणि
उंची असते, तीनही गोष्टी मिळून त्याचे घनफळ तयार होते.
प्रश्न २ - अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील?
उत्तर - अगदी छोट्या पृथ्वीगोलावर प्रमुख अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखविता येतील. तसेच पृथ्वीवरील भूभाग, देश, बेट, सागर, महासागर इत्यादी बाबी दाखविता येतील.
प्रश्न ३ - एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते ?
उत्तर - नकाशा हे साधन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल.प्रश्न ४ - तुमचे गांव/शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल?
उत्तर - आमचे गाव/शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल.
प्रश्न ५ - पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल ?
उत्तर - पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना पृथ्वीगोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल.• कोहिनूर भूगोल – VI
(३) कोणत्या साधनामुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकता उत्तर – नकाशा या साधनामुळे आम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू
शकतो.
(४) कोणत्या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते ?
उत्तर - पृथ्वीगोल या साधनाने पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते.
(५) विशिष्ट प्रदेशाचा (जसे-देश, राज्य इत्यादी) तपशीलवार अभ्यास करण्यासाठी यापैकी कोणते साधन वापराल ?
उत्तर - विशिष्ट प्रदेशाचा (जसे-देश, राज्य इत्यादी) तपशीलवार अभ्यास करणसाठी यापैकी नकाशा हे साधन वापरू.
(६) कोणत्या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल ?
उत्तर - पृथ्वीगोल या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल.
प्रश्न - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे दया.
(१) विमितीय म्हणजे काय ?
उत्तर - रुंदी व लांबी अशा दोन मिती असलेल्या पृष्ठभागाला द्विमितीय असे म्हणतात.
(२) त्रिमितीय म्हणजे काय ?
उत्तर- रुंदी, लांबी व उंची असलेल्या पृष्ठभागाला त्रिमितीय असे म्हणतात.
(३) क्षेत्रभेटीमुळे काय जाणून घेता येते ?
उत्तर - क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणची भौगोलिक, सामाजिक परिस्थिती जाणून घेता येते.
• रचनात्मक मूल्यांकन
एका शब्दांत उत्तरे लिहा.
(१) लांबी व रुंदी मिळून काय तयार होते ?
क्षेत्रफळ
* (२) लांबी, रुंदी व उंची मिळून काय तयार होते ?
- घनफळ
(३) क्षेत्रभेटीमुळे स्थानिक लोकांशी प्रत्यक्षपणे काय करण्याची संधी मिळते ?
चर्चा
(४) संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती म्हणून कशाचा उपयोग केला जातो .पृथ्वीगोल
0 Comments