Subscribe Us

वर्ग.6.भूगोल.हवा व हवामान.



४. हवा व हवामान

आपण हे शिकणार !

हवा.

हवेत बाष्पाचे प्रमाण अधिक असल्यास कपडे लवकर वाळत नाही.

उन्हामुळे ओल्या कपड्यातील पाण्याचे बाष्पात पटकन रूपांतर होते व कपडे लवकर वाळतात.

एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची अल्पकालीन स्थिती म्हणजे 'हवा' होय.

हवामान

एखाद्या ठिकाणची हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती म्हणजे 'हवामान' होय. हवेचे अनेक वर्षे निरीक्षण करून हवेची सरासरी स्थिती निश्चित केली जाते.

हवेची अंगे

तापमान - पृथ्वीच्या पृष्ठभागास सूर्यापासून मिळालेल्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. तापलेल्या भूपृष्ठाच्या सान्निध्यामुळे जवळची हवा तापते. आणि क्रमाक्रमाने हवेचे थर तापतात. समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवांकडे तापमान कमी कमी होत जाते.

हवेचा दाब - हवेला वजन असल्यामुळे दाब निर्माण होतो. याला 'हवेचा दाब' असे म्हणतात. तापमानातील फरकामुळे हवेच्या दाबात बदल होतो.

हे बदल क्षितिज समांतर दिशेने घडत असल्यामुळे हवेचे वाऱ्यात रूपांतर होते.

घारे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षतीतिजसमांतर दिशेत वाहू लागते. त्यास 'बारा' असे म्हणतात.

आर्द्रता - वातावरणातील दमटपणास 'आर्द्रता' असे म्हणतात. वातावरणा- तील आर्द्रतेचे प्रमाण तापमानावर अवलंबून असते.

वृष्टी हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यांत होणारे रूपांतर व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी असे म्हणतात.

हवेतील बदल सहजपणे जाणवतो. तर हवामानातील बदल दीर्घकाळाने होतात.

अक्षवृत्तीय स्थान, समुद्रसपाटीपासूनची उंची, समुद्रसान्निध्य, सागरी प्रवाह तसेच पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचा हवामानावर परिणाम होतो.

प्रश्न १

मी कोण?

(१) मी नेहमी बदलत असते.

हवा

(२) मी सर्व ठिकाणी सारखे नसते.

हवामान

(३) मी जलबिंदूचे स्थायुरूप असते.

बर्फ

(४) मी वातावरणात बाष्परूपात असते.

आर्द्रता

प्रश्न २ उत्तरे लिहा.

(१) महाबळेश्वरचे हवामान अंड का आहे ?

उत्तर द्या

- (i) महाबळेश्वर हे ठिकाण अति उंचावर म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेत

उंच ठिकाणी आहे. (ii) समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. म्हणून महाबळेश्वरचे हवामान थंड आहे.

(२) समुद्रकिनाऱ्याजवळील चापान दाट असते कारण कौर्य ?

उत्तर -

(i) समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेने तापते. त्या

पाण्याची वाफ (बाष्प) हवेत मिसळते.

(ii) हवेतील बाष्पाचे प्रमाण अधिक

झाल्यास हवा दमट होते. म्हणून समुद्रकिनाऱ्याजवळील हवामान दमट असते.४) हवेची अंगे कोणती ?

उत्तर- तापमान, वारे, आर्द्रता, वायुदाब, वृष्टी ही हवेची मुख्य अंगे आहेत.

(५) समुद्रसान्निध्य व समुद्रसपाटीपासूनची उंची यांचा हवामानावर कोणता परिणाम होतो ?

उत्तर - (i) समुद्रसान्निध्याचा हवामानावर होणारा परिणाम - समुद्रसान्निध्य असणाऱ्या भागात सूर्याच्या उष्णतेने समुद्राचे पाणी तापल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाफ होऊन हवेत मिसळते. त्यामुळे या भागातील हवेत बाष्पाचे प्रमाण वाढून हवामान दमट होते. याउलट समुद्रसान्निध्य नसणाऱ्या भागात हवेत बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने हवामान कोरडे होते.

(ii) समुद्रसपाटीपासूनच्या उंचीचा हवामानावर होणारा परिणाम समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे हवेचे तापमान कमी होते. त्यामुळे हवामान थंड असते. याउलट समुद्रसपाटीजवळच्या भागात भूपृष्ठाजवळची हवा तापलेली असल्याने हवामान उष्ण असते.(१) कोणत्या ठिकाणचे वाळत घातलेले कंपडे लवकर वाळतील ते सकारण सांगा.

उत्तर - मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ या ठिकाणचे वाळत घातलेले कपडे लवकर वाळतील

कारण (i) भोपाळला कडक ऊन आहे. (

ii) ओल्या कपड्यांतील पाण्याचे

बाष्पात पटकन रूपांतर होईल व कपडे लवकर वाळतील.

(२) कोणत्या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील व का ?

उत्तर द्या

- (i) मसुरी कर्कवृत्ताच्या उत्तरेस असल्याने तेथे सूर्याची उष्णता

कमी मिळते.

(ii) पर्वतीय प्रदेशामुळे हवा थंड असते.

(iii) थंड हवा व बेताच्या

उन्हामुळे कपडे वाळण्यास जास्त कालावधी लागतो. म्हणून मसुरी या ठिकाणी कपडे उशिरा वाळतील.

(३) या ठिकाणांच्या वातावरणाची स्थिती नेहमी अशीच राहील की त्यात बदल होईल ?

उत्तर - वातावरणाच्या स्थितीत सतत बदल होत असतो.(२) पाऊस पडत असेल त्या वेळी आपण कोणते विशेष कपडे घालतो ?

उत्तर - पाऊस पडत असेल त्या वेळी आपण रेनकोट हे विशेष कपडे घालतो.

(३) लोकरीचे कपडे आपण केव्हा वापरतो ?

उत्तर - लोकरीचे कपडे आपण हिवाळा या ऋतूत वापरतो.

(४) तलम सुती कपडे प्रामुख्याने कोणत्या ऋतूत वापरतात ?

उत्तर- तलम सुती कपडे प्रामुख्याने उन्हाळा या ऋतूत वापरतात

(१) थंड हवेच्या प्रदेशांत तुम्ही कोणते व्यवसाय कराल?

उत्तर- थंड हवेचा प्रदेश विशेषतः पर्यटन म्हणून जास्त प्रसिद्ध असतो. अशा ठिकाणी आम्ही रेस्टारेन्ट, खानावळ, मार्गदर्शक इत्यादी व्यवसाय करू. तसेच लोकरीच्या कपड्यांची दुकाने, गरम पेयांची दुकाने, सुरू करू.

(२) उष्ण हवेच्या प्रदेशात तुम्ही कोणते व्यवसाय कराल ?

उत्तर उष्ण हवेच्या प्रदेशात

(i) कुलर, पंखे, एसी, फ्रीज इ.

प्रश्न १ - रिकाम्या जागा भरा.

(१) पर्वतीय प्रदेशात हवा असते.

(२) पृथ्वीच्या पृष्ठभागास पासून उष्णता मिळते.

(३) हवेला असते.

उत्तर - (१) थंड (

२) सूर्य

(३) वजन

प्रश्न २ - खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.

(१) हवा कशाला म्हणतात ?

उत्तर एखाद्या ठिकाणच्या विशिष्ट वेळेला असणाऱ्या वातावरणाच्या अल्पकालीन स्थितीला 'हवा' असे म्हणतात.

(२) हवामान म्हणजे काय ?

उत्तर - एखाद्या प्रदेशातील हवेच्या दीर्घकालीन सरासरी स्थितीला 'हवामान' असे म्हणतात.

(३) हवामानाचा कशावर परिणाम होत असतो ?

उत्तर - हवामानाचा दैनंदिन व्यवहारावर व जीवनशैलीवर परिणाम होत असतो.एका शब्दांत उत्तरे लिहा.

(१) पृथ्वीच्या पृष्ठालगत हवेचा दाब कसा असतो ?

आर्द्रता

(२) वातावरणातील दमटपणास काय म्हणतात ?

(३) वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कशावर अवलंबून असते ? - तापमान


Post a Comment

0 Comments