५ तापमान
आपण हे शिकणार !
पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असले तरी, पृथ्वी गोल असल्यामुळे ते किरण काही भागात लंबरूप तर काही भागात तिरपे पडतात.
पृथ्वी गोल असल्यामुळे सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण असमान असते. त्यामुळे विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे तीन कटिबंधांत विभाजन होते.
अक्षांश या कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात.
समुद्रसान्निध्य, खंडांतर्गतता, समुद्रसपाटीपासून उंची व प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते.
तसेच ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो..
जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता असते.
समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते.
खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त असते व रात्री कमी असते
किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानांतील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक जास्त असतो.
दिवसभराच्या कमाल व किमान तापमानांतील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन 'तापमान कक्षा' असे म्हणतात.
तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात.
क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व चारे यांमुळे निर्माण होतात.
दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडतो.
उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त असल्याने अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हींचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होतांना दिसतो.
थर्मामीटर
हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जाते.
तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते.
तापमान अंश सेल्सिअस (°C) किंवा फॅरनहाइट (°F) या एककात मोजतात.
हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजतात.
प्रश्न १ - मी कोठे आहे ?
(१) माझ्या परिसरातच ०° से. समताप रेषा आहे.
उत्तर - मी शीत कटिबंधातील परिसरात आहे.
(२) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान २५० से. आहे.
उत्तर - मी उष्ण कटिबंधातील परिसरात आहे.
(३) माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान १०० से. आहे.
उत्तर - मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे.
प्रश्न २ - मी कोण ?
(१) समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते. - समताप रेषा.
(२) तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो. - तापमापक.
(३) जमीन व पाण्यामुळे मी तापते.
हवा.
(४) जमीन व पाणी माझ्यामुळे तापते.
रवि.
सूर्य आणि पृथ्वी
पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. परंतु पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागांत लंबरूप पडतात तर काही भागांत तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर पुढील परिणाम होतो.
(i) ०० ते २३०३०' या उत्तर व दक्षिण पट्ट्यांत सूर्याची किरणे जास्तीत जास्त सरळ म्हणजे लंबरूप पडतात म्हणून या पट्ट्यांत तापमान जास्त असते. प्रखर प्रकाश व जास्त उष्णता यामुळे तेथील पृथ्वीचा पृष्ठभाग जास्त तापतो. त्यामुळे हा पट्टा उष्ण पट्टा म्हणून ओळखला जातो.
(ii) २३०३०' ते ६६०३०' या उत्तर व दक्षिण पट्ट्यात तिरपे प्रकाशकिरण पडते. ते किरण जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखस्ता कमी व उष्णता कमी असते. त्यामुळे या पट्ट्यात तापमान कमी असते. म्हणून या पट्ट्यांना समशीतोष्ण पट्टे असे म्हणतात.
(iii) ६६०३०० ते ९०० या उत्तर व दक्षिण पट्ट्यांत सूर्याची किरणे जास्त तिरपी पडतात. ते किरण अति जास्त जागा व्यापतात. अति जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता व उष्णता अत्यंत कमी असते. त्यामुळे या पट्ट्यांना शीत पट्टे असे म्हणतात.
(२) अक्षीय विस्ताराचा तापमानाशी संबंध.
उत्तर - (या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रश्न ३ मधील १ चे उत्तर पहा.) (३) समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो त्यांची कारणे कोणती आहेत ?
उत्तर - समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर पुढील कारणांमुळे बदल होतो. (i) भूपृष्ठावरून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी होत जाते. त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो.
(१) तापमापकाची नरः कशावर लावलेली आहे?
उत्तर - तापमापकाची की आधारपट्टीवर लावलेली आहे.
(२) तापमापकाच्या ळीतील द्रव्य कोणते असावे?
उत्तर - तापमापकाच्र नळीत पारा किंवा अल्कोहोल हे द्रव्य असावे.
(३) आधारपट्टीवल आकडे काय दर्शवितात?
उत्तर - आधारपट्टीरील आकडे तापमान दर्शवितात.
(४) तापमान कोणकोणत्या एककांत मोजतात?
उत्तर - तापमान सेन्सअस किंवा फॅरनहाइट या एककांत मोजतात.
(५) तापमापकार दिसणारे तापमान लिहा
उत्तर - तापमापकर दिसणारे तापमान ३८० सेल्सिअस आहे.
(६) हे तापमान गणत्या ऋतूतील असेल
उत्तर- हे तापमान उन्हाळ्यातील असेल.
जरा विचार करा.
(१) तापमापतात पाणी किंवा तेल वापरले तर चालेल काय ?
उत्तर - तापमपकात पाणी किंवा तेल वापरले तर चालणार नाही.
(२) जिल्हा मुख्य ठिकाणाच्या तापमानाची नोंद कोठे ठेवली जाते ?
उत्तर - जिल्हा मुख्य ठिकाणाच्या तापशनाची नोंद जिल्ह्याच्या वेधशाळेत
ठेवली जाते.
(१) कोणकोणत्या किनारपट्ट्यांच्या भागांत तापमानात फरक पडेल ? अशा किनारपट्टींची नावे सांगा.
उत्तर - उत्तर अमेरिका खंडातील मध्य भागातील पूर्व किनारपट्टी, आफ्रिका खंडातील उत्तर भागातील पश्चिम किनारपट्टी आणि आशिया खंडातील उत्तर भागातील पूर्व किनारपट्टी इत्यादी किनारपट्टीच्या भागांतील तापमानात फरक पडेल.
(२) किनारी प्रदेशात तापमानात फरक पडण्याचे कारण काय असेल ?
उत्तर - किनारी प्रदेशात शीत प्रवाह व उष्ण प्रवाह एकत्र आले की तापमानात
फरक पडतो.
प्रश्न 2 - प्रदेशाचे हवामान समजण्यासाठी रेखीय मर्यादेपेक्षा अक्षीय विस्तार अधिक उपयुक्त आहे. हा कायदा खरा की खोटा
उत्तर - प्रदेशाचे हवामान समजण्यासाठी रेखीय मर्यादेपेक्षा अक्षीय विस्तार अधिक उपयुक्त आहे. हे विधान खरे आहे. कारण तापमान अक्षांसोबत बदलत असते.१) कोणत्या कागदावर प्रकाशझोताने व्यापलेली जागा जास्त आहे ?
उत्तर आकृती 'ब' चा कागद १२०० कोन (तिरपा) करेल असा धरल आहे, त्या कागदावर प्रकाशझोताने व्यापलेली जागा जास्त आहे.
(२) कोणत्या कागदावर ती कमी आहे ?
उत्तर - आकृती 'अ' चा कागद ९०० चा कोन (लंबरूप) करेल अस
धरला आहे, त्या कागदावर प्रकाशझोताने व्यापलेली जागा कमी आहे.
(३) प्रकाशझोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोन यांचा कशाप्रकार च सहसंबंध असेल ?
उत्तर- प्रकाशाच्या स्रोताशी कागदाने केलेला कोन कमी असल्याम प्रकाशझोत कमी जागा व्यापते. तर प्रकाशाच्या स्रोताशी कागदाने केलेला को जास्त असल्यास प्रकाशझोत जास्त जागा व्यापतो.
प्रश्न १ रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना ........ असतात.
(२) बाष्प नसल्याने हवा राहते.
(३) पाण्यावरील हवा उशिरा तापून थंड होते.
(४) मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान आहे.
उत्तर - (१) समांतर (२) कोरडी (३) उशिरा (४) विषम
प्रश्न २ - एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) कोणकोणत्या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते?
उत्तर - समुद्रसान्निध्य, खंडांतर्गतता, समुद्रसपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते.
(२) स्थानिक हवामानावर कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो ?
उत्तर - स्थानिक हवामानावर ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी घटकांचा परिणाम होतो.
(३) तापमान कक्षा कशाला म्हणतात?
उत्तर - दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात.
प्रश्नांची एका शब्दात उत्तरे लिहा.
(१) तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे कोणते प्रवाह निर्माण होतात ?
ऊर्ध्वगामी
(२) तापमान मोजण्यासाठी तापमापकात काय वापरतात ?
पारा किंवा अल्कोहोल
(३) हवेचे तापमान कशात मोजतात?
- सेल्सिअस
0 Comments