Subscribe Us

मोगल बादशाह औरंगजेब.1658 ते 1707

 बादशाह औरंगजेब


■ औरंगजेबाचा जन्म दि. २४-१०-१६१८ ला शाहजहाँ-मुमताजच्या पोटी झाला.

■ औरंगजेबला शिक्षण देण्यासाठी शाहजहाँने मीरमोहम्मद हाशिमला नेमल.

■ औरंगजेबास 'कुराण' आणि 'हदीस' पूर्णतः अवगत होते.

■ शाहजहाँने औरंगजेबाला दि. २३-१२-१६३४ ला १०,००० अश्वरोह्यांचा सेनापती नेमले.

■ बुंदेला शासकाचा पराभव इ.स. १६३५ ला औरंगजेबाने केला.

■ इ.स. १६३६-४४ पर्यंत औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार होता.

■ इ.स. १६४५ ला शाहजहाँने औरंगजेबला गुजराथचा गव्हर्नर बनवले.

■ इ.स.१६४५ दरम्यान औरंगजेब बल्ख आणि बदक्शाचा गव्हर्नर होता.

■ इ.स.१६४८-५२ पर्यंत दक्षिण गुजराथचा गव्हर्नर म्हणून औरंजेबाने कार्य केले.

■ औरंगजेबने दक्षिणेचा सुभेदार म्हणून ०६ वर्षे (इ.स. १६५२-५८) असताना अहमदनगर, विजापूर व गोवळकोंडा या शिया शाह्यांवर विजय मिळवला.

■ शाहजहाँने कंधार विजयासाठी आखलेल्या ०४ मोहिमांपैकी ०२ मोहिमांचे नेतृत्त्व औरंगजेबाकडे होते.

राज्याभिषेक

■ दि. ०४.०३-१६५८ ला औरंगजेब मुराद यांच्या सेना दिपालपूर या ठिकाणी आग्रा जाण्यानादी एकत्र आल्या.

■ औरंगजेबाने उज्जैनजवळ घरमत ठिकाणी दाराबा तर शाहजहाँच्या सैन्याचा सामूगढ ठिकाणी पराभव वेदन

■ औरंगजेबाने दोन वेळा राज्यारोहण केले.

१) आग्रा

2) दिल्ली

■ औरंगजेबाने दि. २१.०७.१६५८ ला शाहजहाँला कैद करुन आग्रा ठिकाणी सिंहासनारूढ झाला तर जुन १६५६ ला दिल्लीत राज्यभिषेक करण्यात आला.

■ औरंगजेबाने राज्याभिषेकावेळी आलमगिर ही पदवी धारण केली.

हिंदू विरोधी नीती

■ औरंगजेब सुन्नी पंथीय होता.

■ औरंगजेबाने गुजराथचा गव्हर्नर असताना मंदिराचा विध्वंस प्रारंभ केला.

■ औरंगजेबाने अहमदाबादच्या चिंतामणी मंदिरात गो हत्या करुन मस्जिद बांधली.

■ इ.स. १६५९ ते १६७१ पर्यंत औरंगजेबाने मंदिरे पाडली

■ सोमनाथ मंदिर (सोमनाथ), विश्वनाथ मंदिर (बनारस), केशवराय मंदिर (मथुरा) ही प्रसिद्ध तीन मंदिरे औरंगजेबाने नष्ट केली.

■ अकबराने रद्द केलेला हिंदुवरील जजिया नामक कर औरंगजेबाने पुन्हा चालू केला. (इ.स. १६७९)

■ इ.स. १६६६ ला औरंगजेबाने मुस्लिम जनतेला १००% जकात करापासून मुक्त केले.

■ औरंगजेबाने तुलादान प्रथा, झरोका दर्शन व तिलकप्रथा बंद केल्या.

■ गुजराथमध्ये दीपावली व होळी या हिंदु सण साजरा करण्यावर औरंगजेबाने बंदी घातली.

■ औरंगजेबाने हिंदु धर्म प्रसारक उद्धववैरणीची हत्या केली.

■ इ.स. १६९९ ला जाट विद्रोहानंतर गोकुळ जाटास औरंगजेबाने बळजबरीने जाट बनवले.औरंगजेबाने शीख धर्मगुरू तेग बहादूरची हत्य केली. आहे

औरंगजेब काळातील विद्रोह

जाटांचे बंड

मथुरात जाटांनी विद्रोह केला. नेता गोकुळ होता. जाटद्वारा मथुरा हकीम अबुल नबीची हत्या. मुगल सेनापतीद्वारा मथुरा जाट विद्रोह दमण गोकुळ हत्या. गोकुळ परिवारास मुस्लिम बनवले. राजारामाच्या हत्येनंतर पुतण्या चुडामणिचा विद्रोह.

सतनामी बंडखोरी

दिल्लीपासून ७५ मैल दूर नारनूल ठिकाणी असलेला संप्रदाय सतनामी होय. सतनामी ब्राह्मण होते. दोन व्यक्तीतील भांडणामुळे विद्रोह-मुगल सेनाद्वारा इ.स. १६७२ ला सतनामीचा पाडाव.

बुंदेला बंड

बुंदेला शासक राजपुत होते. राजपुत सरदार चंपतरायने विद्रोह केला. पराभव होताच आत्महत्या केली. त्याचा पुत्र छत्रसालने औरंगजेबाविरुद्ध विद्रोह केला व पुर्व माळव्यात सत्ता स्थापन. इ.स. १७११ पर्यंत छत्रसाल सत्तेवर होता.

शीख बंड

शिख गुरु तेगबहादुरने काश्मीर विद्रोह. तेगबहादूर मुगल सेनेद्वारा कैद. दिल्लीत हत्या. तेगबहादूर पुत्र गुरु गोविंदसिंहने लढा चालू ठेवला. दोन पुत्रांचा संघर्षात बळी गेला.

औरंगजेबाची राजपूतविषयक नीती

■ शाहजहाँच्या आजार काळात झालेल्या वारसा युद्धात शाहजादा दाराला मदत राजपुतांनी दिली होती.

■ औरंगजेबाच्या दरबारात राजा जयसिंह व जसवंतसिंहांना उच्चपद प्राप्त होते.

■ इ.स. १६७९ ला जोधपूर शासक जसवंतसिंहाचा मृत्यु झाला.

• जसवंतसिंह निपुत्रिक असल्याने इंद्रसिंहला (नातेवाईक) जोधपूर गादीवर नाममात्र शासक म्हणून सत्तेवर बसवण्यात आले.

■ जसवंतसिंहाच्या मृत्युनंतर दोन महिन्यानंतर जसवंतसिंहाच्या पत्नीने दोन पुत्रांना जन्म दिला त्यापैकी अजीतसिंह हा एक होता.

■ जसवंतसिंहाचा मंत्री दुर्गादास याने औरंगजेबाच्या कैदेतून जसवंतसिंहाच्या दोन पत्नी व अजितसिंहाची सुटका जुलै १६७९ ला केली.

■ औरंगजेबाने स्वपुत्र अकबराला सप्टे. १६७९ ला मारवार मोहिमेवर पाठवले.

■ औरंगजेबाने दुर्गादास राठौडाचा पराभव केला व मारवाड जिंकले.

■ अजितसिंह, अजितसिंह माता व दुर्गादास राठोड यांनी मेवाडच्या सिसोदिया वंशीय राणा राजसिंहाच्या मदतीने औरंगजेबाशी ३० वर्षे लढा दिला.

■ औरंगजेब पुत्र बहादूरशाहने इ.स. १७०९ ला अजितसिंहाला मारवड शासक म्हणून मान्यता दिली.

■ मारवाड शासकाला चित्तोड शासक राणा राजसिंहने मदत केली म्हणून औरंगजेबाने चित्तोड वर इ.स. १६८० मध्ये स्वारी केली.

■ मोगल व राजपूत संघर्ष दि. १४.०६.१६८१ च्या संधीनुसार मिटला.

औरंगजेब - राजपूत करार - जून 1681

• मेवाड शासक म्हणून जयसिंहाला मान्यता

• जयसिंहला 5000 मनसब प्रदान केले

• चित्तोड दुर्गाची दुरुस्ती जयसिंह राजपूत हे करणार नाहीत. राठौडांना मदत नाही, दोन वर्षात रु.

२०,००,००० मोगलांना द्यावेत.

ईशान्य सीमा धोरण

• औरंगजेब सिंहासनरुढ समयी असताना

आसामच्या आहोमांनी सत्ता स्थापन केली.

• मुघल साम्राज्याची पूर्व सीमा आसाम/कामरूप

असल्यने औहोम व मोगल यांच्यात संघर्ष झाला.

• इ.स. १६६१ ला औरंगजेबाने बंगालचा गव्हर्नर

म्हणून मिरजुमलाला नेमले.

• इ.स. १६६१ ला मीरजुमलाने कूचबिहार राजधानी जिंकून औहोम लोकांना पराभूत केले.औहोम-मीरजुमला करार डिसेंबर १६६२

■ औहोमांनी मुघलांची गुलामगिरी स्वीकारली.

■ औहोम राजाने एका मुलीचा विवाह औरंगजेबाशी तर दुसरीचा खान-ए-खानाशी लावला. १२,००० तोळे सोने, ५० हत्ती मोगलांना प्रदान.

■ मीरजुमलाच्या मृत्युनंतर (एप्रिल १६६३) औरंगजेबाने शाईस्तेखानाला बंगालचा गव्हर्नर म्हणून नेमले.

■ शाईस्खानाने अराकान पर्वत रांगातील डाकूंचा बंदोबस्त करुन इ.स. १६६६ ला चटगांव जिंकले.

■ शाईस्तेखानाने चटगांवचे नामकरण इस्लामाबाद असे केले.

■ शाईस्तेखानाच्या काळात औहोम राजांनी इ.स. १६६७ स्वातंत्र्य प्राप्त केले.

■ औहोम राजा चक्रध्वजने गोहाटीवर विजय मिळविला.

■ इ.स. १६८१ ला आसामवर मोगलांनी पुन्हा हक्क प्रस्थापित केले. शाईस्तेखानाने पोर्तुगाल डाकूंचा बंदोबस्त करुन पोर्तुगालीद्वारा कैद हजारो कैद्यांची मुक्तता केली.

उत्तर-पश्चिम सीमा धोरण

■ इ.स. १६६८ ला युसूफजाई टोळ्यांनी भागू नामक व्यक्तीने विद्रोह केला.

■ युसूफजाई भागूने मोहम्मद शाहला राजा बनवून स्वतः मंत्रिपद ग्रहण केले.

■ युसूफजाई भागूने सिंधनदी व पंजाबमधील हजार किल्ल्यांवर आक्रमण केले.

■ औरंगजेबाने इ.स. १६६८ ला युसूफजाई टोळ्यांचा बंदोबस्त केला.

■ इ.स. १६७२ ला अफरिदी टोळ्यांनी आकमल खाँ नेतृत्त्वाखाली उठाव केला.

■ काबूलचा मोगल सुभेदर मोहम्मद अमीनखाँचा पराभव आफ्रिदी टोळ्यांनी केला.

■ आफ्रिदी टोळ्यांच्या प्रेरणेने खटक टोळीने खुशहाल खानाने विद्रोह केला पण औरंगजेबाने त्यास कैद

करुन रणथंबौरला ठेवले.

■ इ.स. १६७३ ला खटक टोळीचा नेता खुशहाल खानास औरंगजेबाने युसूफजाई व आफ्रिदीच बंदोबस्तासाठी पाठवले पण त्याने आफ्रिडी नेता अकमलखाँशी युती करुन अफगाणांनी विद्रोह केल

■ खटक नेता खुशाल खान आणि आफ्रिदी नेता आकम खांचाया यांनी औरंगजेबाला महात्मा सुजात खान, सुजात खान आणि राजा जसवंत सिंग यांना पाडव्यासाठी पाठवले.

■ औरंगजेबाने इ.स. १६७५ ला उत्तर-पश्चिमी सीमा भागातील विद्रोहाचा बीमोड केला.

■ औरंगजेबाने उत्तर-पश्चिमी भागात जास्त लक्ष दिल्यान दक्षिण भारतात मुगल प्रशासन कमकुवत होऊन छत्रपती शिवाजींच्या स्वराज्याचा विकास झाला

दक्षिण धोरण

■ औरंगजेबाच्या दक्षिण नीतीचा उद्देश मराठा साम्राज नष्ट करणे व शिया शासकांचा पाडाव करणे हे होते

■ औरंगजेबाने सत्तेवर आल्यानंतर २२ वर्षांनी दक्षिण विषयक धोरण स्वीकारले.

■ औरंगजेबाने शाहजहाँ काळातच विजापूर आदिलशाहचे अस्तित्त्व मिटवले होते.

■ शाहजहाँच्या हस्तक्षेपामुळे विजापूर विजय औरंगजेबास सोडावा लागला.

■ औरंगजेबाने आदिलशाह सिकंदरशाहचा पराभव इ.स. १६६८ ला करुन वार्षिक १,००,००० पेन्शन देऊन दौलताबाद किल्ल्यात पाठवले.

■ विजापूर विजयानंतर औरंगजेबाने गोवळकोंड्यांच्या अबुल हसन कुतुबशाहवर स्वारी केली.

■ अबुल हसन कुतुबशाहचा सर्व राज्यकारभार अकन्न व मदन्ना या दोन व्यक्तींच्या हातात होता.

■ औरंगजेबाने गोवळकोंड्यांचा किल्लेदार अबुलखाँला लाच देऊन किल्ला जिंकला.

■ इ.स. १६८७ सप्टेंबर औरंगजेबाने कुतुबशाह अबुल हसनला वार्षिक ५०,००० पेन्शन देऊन

दौलताबाद किल्लयात ठेवले. ■ औरंगजेबाचे साम्राज्य २१/२४ प्रांतात विभक्त होते. - औरंगजेब दर बुधवारी न्यायदान करे.

औरंगजेबाने फतवा-ए-आलम नामक गाणी

औरंगजेब काळातील प्रसिद्ध ३ मार्ग

१) आग्रा ते काबूल मार्ग (कंदहारशी संलग्न)

२) आग्रा ते ढोलपूर-ग्वालेर, मारवाड, असीरगड-

गोवळकोंडा मार्ग.

३) आग्रा - इलाहाबाद - बनारस - पटना (पुर्व भागात) आग्रा - लाहौर - श्रीनगर हे मार्ग होते.

Π औरंगजेबाने वारसा युद्धात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने १४ कर (खाफिखाँ मते १८) रद्द केले. उदा. सहदारी, पण्डारी, गृहकर इत्यादी.

■ औरंगजेबाने शिक्क्यांवर 'कलमे' लिहिण्यास बंदी घातली व फारस उत्सव 'नौरोज' बंद केला.

■ औरंगजेबाने दक्षिणेचा सुभेदार म्हणून शाईस्तेखानास दाउतखाँ पन्नीनंतर पाठवले.

■ औरंगजेबाने स्वशासनाची गणना करणारे शाहजहाँद्वारा प्रारंभ केलेले इलाही वर्ष बंद केले.

■ इ.स. १६७० ला दरबारातून औरंगजेबाने नृत्य व गायन बंद केले.

■ औरंगजेबाने व्यक्तीपूजा रूढ होते म्हणून 'झरोखा दर्शन' प्रथा बंद केली.

■ नौरोज हा इराणीयांचा दिवस /सण औरंगजेबाने बंद केला.

■ इ.स. १६७१ ला तुलादान प्रथा/रिवाज औरंगजेबाने बंद केली.

■ औरंगजेबाने विजयादशमी/दसरा उत्सवात भाग घेण्यास बंदी केली.

जुगार खेळणे व नशा करण्यावर औरंगजेबाने बंदी घातली.

गायन आणि वाद्य वाजवण्याची परवानगी फक्त औरंगजेबाने अहमदाबादच्या शेख चिश्तीलाच दिली होती.

इ.स. १६६९ वा मोहरम प्रथा औरंगजेबाने बंद केली.

इ.स. १७०३ अहमदाबाद-साबरमती किनाऱ्यावर मृत्यु संस्कार करण्यास औरंगजेबाने बंदी घातली.■ इ.स. १७०२ ला औरंगजेबाने हिंदूंच्या अंगठ्यावर (रिंग) मुस्लिम कारागिरांना हिंदू प्रतिमा कोरण्यास बंदी घातली.

■ इ.स. १७०० ला हिंदूनी पालखीत बसणे व मुस्लिम पोषाख परिधान करण्यास औरंगजेबाने बंदी घातली.

■ औरंगजेबाने मुस्लिमांच्या उद्यानातील उत्पादनावर १६.६% तर हिंदूंच्या उद्यानातील उत्पादनावर २०% कर लावला.

■ औरंगजेबाने ब्राह्मणासह हिंदूकडून जजिया कर वसूल केला.

औरंगजेब काळात जजिया कर

उत्पादन

जिझिया कर

200 दिरहम

12 दरहम

200-2500 दिरहम

24 दरहम

2500-10000 दिरहम

48 दरहम

■ इ.स. १६१६ ला इंग्रजांना जहाँगिराने मसौल्लीपट्टम् येथे कारखाना स्थापण्यास परवानगी दिली.

■ इ.स. १६३९ ला फ्रांसीसी डे ने चंद्रगिरीच्या राजाकडून काही जमीन भाडे तत्त्वावर घेतली. याच ठिकाणी फ्रांसने प्रसिद्ध किल्ला फोर्ट सेंट जॉर्ज बांधला.

■ शाहजहाँने इ.स. १६५०-५१ ला ब्रिटिशांना हुगळी व कासिम बाजारामध्ये व्यापारास परवानगी दिली.

■ ईस्ट इंडिया कंपनीने चार्ल्स द्वितीय कडून मुंबई ६० पौंड वार्षिक किरायावर घेतली.

■ इ.स. १६८५ ला बंगाल राज्यपाल शाईस्तेखानाने इंग्रज व्यापाऱ्यांना कर लावला.

■ औरंगजेबाने शाहजादा मुअज्जमला विजापूर गोवळकोंडा प्रती सहानुभूती दर्शविली म्हणून इ.स. १६८७-९५ पर्यंत कैदेत ठेवले.

■ औरंगजेबाचा मृत्यु ८९ व्या वर्षी दि. ४ मार्च १७०७ ला अहमदनगरला झाला तर कबर खुल्ताबादला आहे.

या. १५२६

दिल्ली सत्ताधीश 1707

क्र. शासक

कार्यकाळ

१. बाबर

इसवी सन १५२६-३०

2. हुमायून

AD 1530-40/55-56

3. शेरशाह सूर

१५४०-४५

4. इस्लामाबाद

इसवी सन १५४५-५३

५. मो. आदिलशाह

 १५५३-५७

6. अकबर

१५५६-१६०५

७. जहांगीर

१६०५-२७

8. शहाजहान

१६२७-५८

९. औरंगजेब

१६५८-१७०७

■ दिल्ली गादीवर बाबर ते औरंगजेबपर्यंत मोगल वंशात ६ बादशाह झाले.

■ औरंगजेबाचा मुख्य न्यायाधीश ईश्वरदास नागर होता.

■ औरंगजेबाचे ४ पुत्र मुहम्मद मुअज्जम, शाहआलम, कामबख्श व अकबर हे होते.

■ शाहजहानने मुमताज प्रीत्यर्थ 'ताजमहल' बांधला तर औरंगजेबाने रबिया-उल-दौरान प्रित्यर्थ औरंगाबाद ठिकाणी ताजमहल प्रतिकृती 'बिबी का मकबरा' बांधला.

■ औरंगजेबाच्या मृत्युवेळी मोगल साम्राज्य २१ प्रांतात विभक्त होते, त्यापैकी १४ प्रांत उत्तर भारतात, ०६ प्रांत दक्षिण भारतात तर ०१ प्रांत अफगाणिस्तानमध्ये होता.

■ दक्षिण भारतात १७०२-०४ या काळात प्लेग व दुष्काळामुळे २० लाख लोक मृत्यु पावले.

■ शाहजहान काळात ८००० मनसबदार होते औरंगजेब काळात १४४४९ झाले. त्यापैकी ७४५० मनसबदारांना नगदी वेतन प्राप्त होते

■ औरंगजेबाच्या दरबारात कर्तबगार सरदार म्हणन वजीर आसदखाँ चा उल्लेख केला जातो.

औरंगजेबाने एकूण ८० कर रद्द केले.

औरंगजेबाच्या राज्याभिषेकास शिवाजी राजाचा वकील सोनोपंत हा हजर होता.


Post a Comment

0 Comments