■ अकबराने राजपुतावरील जजिया आणि तीर्थयात्रा कर रद्द केला.
अकबराचे परकीयांशी संबंध
(१) पोर्तुगिज
•भारतात प्रविष्ट होणारे प्रथम पोर्तुगिज होते.
■ पोर्तुगिजांचे मुख्य केंद्र गोवा होते.
■ पोर्तुगिज व अकबर यांचा संबंध अकबराच्या गुजराथ स्वारीत आला.
■ सुरत ठिकाणी अकबराला पोर्तुगिजांकडून उपहार प्रदान करण्यात आले.
• अकबर-पोर्तुगिज यांच्यात करार 'मक्केला जाणाऱ्या यात्रेकरुला पोर्तुगिज उपद्रव देणार नाहीत' अकबराने पोर्तुगिज जेसूईटांना इसाईधर्म प्रसाराची परवानगी प्रदान केली.
(२) ब्रिटिश
■ भारत-इंग्लंड संबंध इ.स.१५४९ पासून प्रारंभ.
■ इ.स. १५९९ ला राणी एलिजाबेथ द्वारा अकबराकडे व्यापारी अधिकार मागण्यासाठी पत्रव्यवहार केला.
■ इ.स.१६०३ अकबराला ब्रिटिश व्यापाऱ्यांकडून भेट प्रदान केली.
अकबर मृत्यू
■ अकबराच्या मृत्युपुर्वीच अकबरपुत्र दानियाल व मुरादचा मृत्यु झाला होता.
■ अकबर असीरगढ मोहिमेवर असताना ) अकबरपुत्र सलिमने इलाहाबादला स्वतःला बादशाह म्हणून घोषित केले.
■ अकबराने सलिमचा विद्रोह मोडण्यासाठी मित्र अबुल फजला पाठवले.
■ सलीमने राजपुतराजा वीरसिंहच्या मदतीने अबुल फजलची हत्या केली.
■ अजीज कोका आणि राजा मानसिंहने खुसरो (अकबरपुत्र) ला बादशाह बनवण्यासाठी षडयंत्र रचले.
■ दि.१७ ऑक्टोबर १६०५ ला अकबराचा मृत्यु अतिसाराने झाला.
१. काबूल
अकबर साम्राज्यातील १८ प्रांत
2. लाहोर
3. मुलतान
4. दिल्ली
५. आग्रा
6. अवध
७. गुजराथ
8. बंगाल
९. बिहार
१०. ओरिसा
11. बेरार
१२. अहमदनगर
13. सिंध
14. अलाहाबाद
१५. अजमेर
१६. माळवा
१७. खानदेश
१८. काश्मीर
■ अकबराने भारत, फारसी आणि अरव शासन प्रणालीच्या तत्त्वावर आधारित शासन व्यवस्था लागू केली.
■ अकबराने न्यायपद्धतीत भेदभाव तत्त्व ठेवले नाही.
■ अकबराने धर्मनिरपेक्षता तत्त्व स्वीकारून राजस्व व्यवस्थेत आमुलाग्र बदल घडवले.
■ अकबराने शत्रू प्रती सहिष्णुता व उदारता ठेवून लोककल्याणकारी कार्य केले.
अ) केंद्र सरकार
■ सम्राट अकबर हा साम्राज्याचा प्रमुख होता.
■ तो न्याय आणि सेनाप्रमुख होता.
■ सम्राट अकबर निरंकुश व स्वेच्छाकारी शासक करी असला तरी लोककल्याणकारी होता.
■ अकबर २४ तासापैकी १६ तास दीवाने-आममध्ये धान कार्य करे.
■ सम्राटाला साह्य करण्यासाठी केंद्रीय मंत्री असत.
ब) प्रांतीय प्रशासन
■ अकबराने प्रशासकीय सोयींसाठी साम्राज्य १८ भागात विभक्त केले.
माहिती वाहक - 4 प्रकार
1) वाक-ए-नवीस - प्रांतीय वृत्त केंद्र.
२) सवानीह-निगार- दिलेल्या प्रांताच्या सूचना पडताळणी करणारा.
3) इंटेलिजन्स नेव्हीस - गुप्तहेर
■ वजीर - प्रधानमंत्री, सर्व विभागाची देखरेख, प्रांत शासन कार्याचा नियंत्रक.
■ दिवाण अर्थमंत्री - राजा टोडरमल हा अकबराचा अर्थमंत्री होता.
■ खान-ए-सामान - गोदाम प्रमुख, राजाला अन्न- पाण्याची व वस्तुंचा पुरवठा करे.
■ मीर बक्शी - सैन्य विभाग प्रमुख, सैन्य वेतन देणे, सैन्यभरती करणे हे कार्य होते.
सदरे-ए-सुदूर-दान देण्याच्या विभागाचा प्रमुख. रमजान महिन्यात सम्राटाद्वारा दान देण्यासाठी व्यवस्था करणे.
■ दरोगा-ए-डाक चौकी – पोस्टल विभागाचे प्रमुख.
■ मीर अतिश - तोफ तोफगोळानिर्मिती विभाग प्रमुख.
काझी-उल-कुजात- न्यायाधीश
■ मोहतसिब-राजकीय आज्ञांचे पालन करुन घेणे.
प्रांत प्रशासन
■ सुभेदार - प्रांतीय प्रशासनाचा मुख्य. मुलकी- लष्करी प्रमुख. वंशपरंपरागत पद नाही. बदली होऊ शके.
■ दीवान - कृषिचा विकास करण्यासाठी केंद्राद्वारा
नियुक्त. सुभेदार-दीवान परस्पर नियंत्रण ठेवत. त्यास मालमंत्री म्हणत. ■
सदर- दीवानप्रमाणे केंद्रद्वारा नियुक्त. केंद्राला उत्तरदायी असे. मीर आदल आणि काजीवर नियंत्रण,
■ आमील कर वसूल करणारा अधिकारी.
■ बितकची - लेखनिक.
■ फौजदार-सुभेदाराद्वारा नियुक्त लष्करी अधिकारी.
■ कोतवाल - पोलिस प्रमुख.
■ करोडी - कर वसुल करणारा अधिकारी.
■ सुचना वाहक - सूचना देणारे.
कर वसुल करणारे अधिकारी करोडी, पोतदार, अमीन व कानुनगो हे होते.
अकबराच्या साम्राज्यात १८२ परगणे होते.
संगीत स्केलची पाचवी नोंजिल्हा प्रशासन (सरकार)
प्रांत - सरकार/जिल्ह्यात विभक्त होते.
फौजदार - जिल्हा प्रमुख असे.
कोतवाल - पोलीस प्रमुख/संरक्षक असे.
बितकची - नोंद ठेवणारा, कानुगो कार्यावर देखरेख.
पोतदार राजस्व अधिकारी
वाक-ए-नवीस- माहिती गोळा करणे.
साम्राज्य प्रांतात विभक्त होते.
जिल्ह्याला 'सरकार' आणि तालुक्याला 'परगणा' किंवा 'महाल' म्हणतात.
■ परगणा प्रशासन शिकदार, आमिल व कानूगोच्या अधिकारात होते.
'परगणा/महल' गावात विभक्त होते.
■ जमिदारी आणि रयतवारी असे गावाचे दोन प्रकार होते.
■ जमिदारीगाव- जमीनदारामार्फत गावातील कर वसुल केला जाई.
■ रैयतवारीगाव - प्रत्यक्ष शासनाकडे कर देणारे गाव.
गावाचा प्रमुख मुकदम गावातील कर वसुल करे.
■ गावातील नोंदी, जमा-खर्च 'पटवारी' नमुद करत.
तोडरमलची मालगजारी व्यवस्था
■ तोडरमलचा जन्म उत्तर प्रदेशात क्षत्रिय वंशात झाला.
शेरशाहच्या सैनेत काही काळ तोडरमल होता.
■ अकबराच्या सेवेत तोडरमल इ.स. १५६२ ला दाखल झाला.
■ इ.स.१५७२ ला तोडरमल अकबराचा अर्थमंत्री बनला.
■ 1582 मध्ये ला तोडरमल पंतप्रधान/वझीर बनले.
■ इ.स. १५८६ ला तोडरमलचा मृत्यु झाला.
■ इ.स.१५८२ ला मालगुजारी विभाग (दिवाने- अशरफ) बनवण्यात आला.
■ अकबराच्या साम्राज्याचा महसूल ३६३ करोड होता. त्यापैकी ९.७४ करोड रुपये केवळ भू- राजस्व होते.• अकबराने शेरशाहद्वारा लागू केलेल्या भू-राजस्व प्रणालीचे नुतनीकरण केले.
■ अकबराने ख्वाजा अब्दुल मजीदखाँ आणि मुजफ्फर तुरबानीच्या मदतीने भू-राजस्व नियोजन केले.
■ तोडरमलने सर्वप्रथम भूमापन करण्यासाठी दोरी ऐवजी लोखंडी साखळीचा उपयोग केला.
■ जमीन मोजमाप आराखडा पटवारी आणि माल विभागाकडे ठेवण्यात येई.
■ तोडरमलने इ.स.१५७०-८० मधील उत्पादनाची सरासरी काढून महसुल ठरवला.
जमिनीचे चार प्रकार
१) पोलाज-उत्तम जमीन वर्षात दोन पीक उत्पादित
२) पडौती- उत्पादन शक्ती कमी काही काळ 'उत्पादन शक्य नंतर पडिक ठेवली जाणारी जमीन.
३) चाचर - एक वेळ उत्पादन घेतल्यानंतर ३-४ वर्षे पडिक ठेवण्यात येणारी जमीन.
४) बंजर - ५-५ वर्षानंतर एकदा उत्पादन घेण्यास उपयुक्त जमीन.
■ अकबराने मालगुजारी व्यवस्था १० वर्षांसाठी लागू केली.
■ 'बितकची' हा जमिनीची मोजणी करणारा अधिकारी होता.
■ अकबराने एकूण उत्पादनाच्या ३३% उत्पादन
कर म्हणून निश्चित केले. ■ शेरशाह काळात ते २५% कमी होते.
■ भूराजस्व प्रणालीचा सर्व व्यवहार फारसी भाषेत होई.
■ 'गल्ला बख्सा' प्रणाली शेत प्रकारावर (दर्जानुसार) कर लावण्याची प्राचीन पद्धत होती. (जम्मू काश्मीर थट्टा, काबूल)
■ 'नसुक' प्रणालीत राज्य आणि कृषक यांच्यात मध्यस्थ नसे.
• अमील जमिनीची स्थिती तपासेल, बिटाक्ची जमिनीचे मोजमाप करेल, पटवारी महसूल गोळा करेल आणि कानुंगो परगणा अधिकारी असेल.
अकबराची सैन्य व्यवस्था
इ.स. १५७१ केली. ला अकबराने सैन्याची पुनर्रचना दि
■ अकबर काळात अधीन राजांची सैना, मनसब दारसेना, दाखिली सेना, अहदी सेना व स्थायी सेना असे ०५ प्रकारचे सैन्य होते.
सैन्य ०५ प्रकारचे होते.
■ अधीनराजांची सेना मांडलिकांचे सैन्य.
■ मनसबदारांची सेना मनसबदारांचे सैन्य.
■ दाखिली सेना - राज्याद्वारा भरती सैन्य.
■ अहदली सेना - सम्राटाद्वारा भरती सैन्य.
■ स्थायी सेना - कायमस्वरुपी सैन्य.
■ अकबराने इ.स. १५७१ ला जहागिरी प्रथा समाप्त करुन मनसब प्रथा प्रारंभ केली.
अधीन राजांचे सैन्य राजधानीच्या जवळ असे.
मनसबदारी व्यवस्था
■ मनसबदारी प्रथेचा प्रारंभ पर्शियात झाला.
■ मनसब हा अरबी शब्द असून त्याचा अर्थ 'दर्जा पद/Status' असा आहे.
मनसब केवळ सैन्य अधिकाऱ्यासच मिळत नसे तर
ती राजस्व व न्यायिक अधिकाऱ्यांनाही देण्यात येई.
- मनसब चा दुसरा अर्थ पदवी, गौरव किंवा प्रतिष्ठा होय.
■ मनसब प्रथा अकबराने प्रारंभ केली पण ती युरोपीयन पद्धतीपेक्षा अलग होती.
■ उच्चश्रेणी अधिकाऱ्यास मनसबदार तर निम्न शासकीय व्यक्तीस रोजनदार म्हणत.
■ अकबर काळात तोडरमलने लागू केलेली मालगुजारी व्यवस्था 'जब्ती' म्हणून ओळखतात.
■ अलाहाबाद, लाहोर, मुलतान, दिल्ली, आग्रा, अवथ,
• माळवा व गुजराथ या प्रांतात जब्ती प्रणाली होती.
बितक गोळा
अकबराने मनसबदारांना ३३ वर्गात विभक्त केले. ॥ अकबराने इ.स.१५७१ ला मनसब लागू केली. लहान मनसब १० ची तर मोठीत मोठी १०,००० ची होती.
इ.स. १६०५ ला मनसब १२,००० पर्यंत देण्यात आली.
मनसबदारी वंश परंपरागत नव्हती.
मनसबदार श्रेणी-२ प्रकारच्या होत्या
'उमराह' १०००, २००० ते १२,००० मनसब नो प्राप्त म्हटले जाते. तर २० ते १००० मनसब प्राप्त व्यक्तींना 'मनसबदार' म्हणत.
'कप्तान' पद १२,०००-२०,००० घोडेस्वारास देण्यात येई.
मनसबदार हे उमराहापेक्षा जास्त होते.
■ जहांगिरच्या काळात एकूण मनसबदार ४३९ होते.
■ इ.स. १६०३-०४ ला अकबराने 'स्वार' सैनिकांचे संगठण केले. 'स्वार' म्हणजे वास्तविक रुपात बाळगलेले सैनिक होते.
'जात' म्हणजे मनसबदारांना बाळगावे लागणारे सैनिक होते.
मनसबदारांच्या तीन श्रेणी
प्रथम श्रेणी - जात- सवार संख्या समानतेने बाळगणारे मनसबदार
द्वितीय श्रेणी - 'सवार' सैन्य 'जात' पेक्षा अर्ध्या
बाळगणारे मनसबदार
तृतीय श्रेणी - 'सवार' सैन्य 'जात' पेक्षा अर्ध्या पेक्षा कमी बाळगणारे मनसबदार.
■ सरदारांना प्रतिमाह २५ रुपये प्रतिघोड्यामागे वेतन अकबर देत असे.
■ मनसबदाराच्या मृत्यूनंतर संपत्ती शासनजमा करण्यात येई.
मनसबदारी प्रथेचे गुण-दोष
गुण - सैन्य संगठण शक्य, सैन्यास राज्य वेतन देई, सैन्यनिष्ठा राज्याप्रती होत, जहागिरी सैन्य नसल्याने धोका राहिला नाही, साम्राज्य विस्तार मनसबदारामुळे, राजपुतांना मनसबी दिल्याने गौरवप्राप्त.
दोष - सैन्य बाळगण्याऐवजी मनसबदार आकडे दर्शवत, पैसा प्राप्तीचे साधन, भ्रष्टाचार वृद्धी, सैन्य निष्ठा केंद्राऐवजी प्रांताप्रती राहिल्या व मनसबदार शासक बनत गेले.
■ सम्राट अकबराच्या संरक्षणासाठी असणाऱ्या रक्षकास 'अहदी' म्हणत त्यांचे वेतन 'बख्शी देत असे.
स्थायी सेना ०५ प्रकार
प्रकार
काम
१.
२.
पायी
बंदुकधारी, तलवारधारी, दरवाज खिदमदगार, पैलवान इत्यादी असत.
घोडेस्वार
अकबराच्या सैन्याचा मुख्य भाग होता, डागपद्धत आणि चेहरेपट्टी घेतली जाई
३.
४.
हत्तींचा कळप
'खास' आणि 'हलकह' हे दोन दल होते.तोफ खणा
प्रमुखास मीर आतीश म्हणत.
■ अकबरासाठी वापरण्यात येणाऱ्या हत्तींना 'खास' :
म्हणत जर १०, २०, ३० गटात विभक्त हत्ती दलास 'हलकह' म्हणत.
न्याय व्यवस्था
अकबर स्वतःला ईश्वरी प्रतिनीधी मानत होता.
सर्वोच्च न्यायालय म्हणून 'दरबार-ए-आम' कार्य करे तर सर्वोच्च न्यायाधीश सम्राट अकबर होता.
■ केंद्रीय न्यायदानासाठी अदालत-ए-काज-उल-कुजात तर माल अदालत आणि फौजदारी अदालत होते.
■ अदात-ए-काजी-उल-कुजात हे सर्वोच्च न्यायालय होते व सम्राटानंतर काजी-उल-कुजात न्यायाधीश म्हणून कार्य करे.
■ माल अदालत आणि फौजदारी न्यायालयात वकील म्हणून मुफ्ती तर न्यायाधीश म्हणून मीर आदल कार्य करत.
■ न्यायदान हिंदु-मुस्लिम धर्मशास्त्राच्या आधारावर होई.
0 Comments