Subscribe Us

सलतनत कालीन स्थापत्य.1206 ते 1526

 सुलतानघडी

सल्तनत वास्तुकला


■ दिल्ल सल्तनतचे सुलतान हे स्थापत्य निर्माते होते.

■ सल्तनतच्या स्थापत्यशैली 'पठाणी' आणि 'इंदोसरानी' होत्या.

■ मस्जिद, मकबरा व भवननिर्मितीसाठी सुलतान काळात हिंदु-जैन मंदिराच्या सामुग्रीचाही वापर केला गेला.

कुव्वत-उल-इस्लाम-मशीद

■ कुतुबुद्दीन ऐबकद्वारा निर्माण दिल्ली विजय प्रीत्यर्थ इ.स. ११९१ ला निर्मिती. दिल्ली रायपिथौराजवळ आहे. मस्जिद २७ मंदिराचे अवशेषांचा वापर. इ.स. १२३० ला अल्तुतमिश व अल्लाउद्दीनद्वारा विस्तार

कुतुबमिनार

■ प्रार्थनेसाठी इस्लामी जनतेस बोलावण्यासाठी निर्मिती नंतर विजयस्मृती स्तंभ बनला.

■ दिल्लीपासून १२ मैल अंतरावर मेहरौली ठिकाणी कुतुबुद्दीन ऐबकद्वारा निर्मिती.

■ उंची २२५ फूट आहे व तो ४ मजली आहे.

■ ऐबकद्वार पहिला मजला पूर्ण. बाकीचे काम इल्तुतमिशने पूर्ण केले

■ फिरोज तुघलक काळात वीज कोसळून नाश.

■ उंची 234 फूट c. 1503 ला पुनर्रचना.

इल्तुतमिश मकबरा

■ दिल्लीत कुतुबमिनारजवळ आहे.

■ इल्तुतमिश मकबरा चौकोनी आहे.

■ मकबरा सजावट अत्यंत कलापूर्ण आहे.

■ आतील भागातून फरशी, भिंती आणि छतावर कुराणातील आयते नमुद आहेत.

∎ निर्मिती काळ इ.स. १२३१-३३२.

• निर्मिता इल्तुतमिश यांचा मोठा मुलगा नसिरुद्दीन,

■चोहोबाजूने तटबंदी.

∎ चारही बाजूला गुंबज मागे बाह्य भाग संगमरवरी.

• गयासुद्दीन तुघलकाने तुघलकाबाद आणि तुघलकचा मकबरा बांधला.

• मुहम्मद तुघलकाने आदिलाबादचा लहान किल्ला आणि जहाँपना हे नर वसवले.

■ आदिलाबाद हे तुघलकाबादचे बाह्य विस्तारित क्षेत्र होते.

लाल घुमट

■ फकी रकबीरुद्दीन औलियाचा मकबरा त्यास

लाल गुंबज म्हणत.

■ नसिरुद्दीन मुहम्मद शाह (१३८६-९२) यांनी बांधले.

■ तुघलक मकबराची प्रतिकृती आहे.

■ फिरोजशाह तुघलकाने नगरे, दुर्ग, महल, बांध, मस्जिद व मकबरे बांधले.

■ फिरोजशाह तुघलकाने जौनपूर, फतेहाबाद, हिसार व फिरोज हे नगर वसवले.

• फिरोजशाह तुघलकाने दिल्लीत फिरोजाबाद हे नगर वसवले.

■ फिरोजशाह तुघलकाने फिरोजशाह कोटला वसवले.

तिलंगणी मकबरा

■ फिरोजशाह तुघलकाचा वजीर खान-ए-जहान- तिलंगानीचा मकबरा आहे. हा मकबरा अष्टभुजाकार आहे.

पतंगाची मशीद

अडीच दिवसांची झोपडी

■ अजमेर येथे कुतुबुद्दीन ऐबकद्वारा निर्मिती,

■ इ.स १२०० ला बांधकाम.

■ बांधकाम शैली - कुव्वत-उल-इस्लाम नुसार,

■ क्षेत्रफळ कुव्वत-उल-इस्लामच्या दुप्पट.

■ आंतरिक सौंदर्य - वैविध्यपूर्ण नाही.

बुलबांची कबर

■ दिल्लीत किल्ला-ए-रायपिथोरच्या आग्नेय भागात बल्बनचा मकबरा.

■ साधे बांधकाम, चौकोनी गुम्बजवाला हॉल.

• चारही बाजूला ३८ इंच प्रवेशद्वार

जमातखाना मशीद

• अल्लाउद्दीन खिलजीने निजामुद्दीन ओलीया तुघलक मकबराजवळ जमातखाना मस्जिद बांधली.

■ बांधकाम पूर्णतः इस्लामी शैलीचे आहे.

■ उत्तम प्रकारची सामुग्री खाणीतून काढून निर्माण.

लाल दगडातून बांधलेले तीन हॉल.

■ प्रथम निजामुद्दीन शेखचा मकबरा होता नंतर तुघलकद्वारा मस्जिदमध्ये रूपांतर

आला दरवाजा

■ निर्मिती - अल्लाउद्दीन खिलजीद्वारा इास १३११.

शहर

■ दक्षिण प्रवेशद्वार चौकोनी हॉल गुम्बजयुक्त संगमरवरचा उपयोग.

■ कुराण आयते अंकित आहेत.

हौज अलाई आणि हौस खास

■ अल्लाउद्दीन खिलजीद्वारा निर्मिती.

■ हौजखास हा तलाव आहे.

■ सिरी किल्लयाच्या पश्चिमी भागात आहे.

■ इ.स. १३०३ ला सिरीनगर स्थापना अल्लाउद्दीनद्वारा करण्यात आली.

■ ७०० एकर क्षेत्रफळ

■ लोदी (सिकंदरच्या) वजीराने मोठ मस्जिदची निर्मिती केली.

सल्तनतीच्या प्रमुख थडग्या

थडगे

जागा

इल्तुतमिश मकबरा

दिल्ली

बल्बन मकबरा

दिल्ली

खान-ए-जहान-तेलंगानी

दिल्ली

मुबारकशाह सय्यद

मुबारकपूर

सिकंदर लोदी

दिल्ली

हसन खंसुरी

सहस्राम

शेरशाहसुरी

सहस्राम

इस्लामशाहसुरी

मुलतान आर्किटेक्चर

■ मुल्तान हा प्रथम मुस्लिम आक्रमणाला बळी पडलेला प्रदेश. मुलतान प्रांतातील दोन प्राचीन मस्जिद

(1) मुहम्मदबिन कासिम निर्मित.

(२) आदित्य मंदिरावर बांधलेली मस्जिद.

■ शाहयुसूफ गरदीजी, बहा-उल-हक्क, शम्सुद्दीनचे भवन, इत्यादी महत्त्वपूर्ण होत.

■ गयासुद्दीन तुघलकद्वारा रुकन-ए-आलम मकबरा बांधला.

बंगाल - आर्किटेक्चर

■ वास्तूकला निम्न दर्जाची व दगडाऐवजी विटांचा वापर केला आहे.

■ गौड खलनौती, त्रिबेनी, पांडुआ मुख्य केंद्र हे त्रिबेनी (जिल्हा हुगळी) येथे जफरखाँ गाजीचा मकबरा आहे.

■ अदिनामस्जिद - निर्माण सिकंदरशाहद्वारा, पांडूआ

येथे क्षेत्रफळ ५०७.५ x २८५.५ फूट साधारण आणि मोठाड स्वरुपाच्या मस्जिदचे हे उत्तम उदाहरण आहे. ■

एकलखा-मकबरा हा जलालुद्दीन मुहम्मदशाहचा मकबरा आहे. बंगालमधील सुंदर मकबऱ्यापैकी तो एक आहे.

- साठ गुंबज मस्जिद इ.स. १४५९ बारबक शाहद्वारा (इ.स. १४५९-७४) निर्मिती एक दरवाजा बांधला. वीट-चुन्याचा उपयोग आहे. गुंबज अत्यंत सुंदर आहेत.

■ लोटन - मस्जिद - युसूफशाहची प्रियनर्तकी लोटनवरुन 'लोटन' मस्जिद हे नाव पडले. लोटन नर्तकीचा काळ इ.स. १४७४-८१ होय.

गुजराथ प्रांतातील वास्तू कला

• प्रांतीय वास्तुकलात सर्वश्रेष्ठ व सुंदर वास्तुकला गुजराथची होय.

■ आबूचे जैन मंदिर इ.स. १०३२ ला बांधून पूर्ण झाले.

■ अहमदाबाद हे शहर अहमदशाहने वसवले.

■ महमूद बेगडाच्या काळात गुजराथमधील स्थापत्य कला श्रेष्ठ दर्जाची होती.

■ महमूद बेगडाने चंपानेर येथे नगर आणि प्रसाददुर्ग बांधला.

■ महमूद बेगडाने चंपानेर येथे बांधलेल्या जामा मस्जिदही गुजराथमधील श्रेष्ठ मस्जिद होय.

माळवा प्रांतातील वास्तुकला

■ माळवाची प्रथम राजधानी धार होती. धारमध्ये दोन मस्जिद होत्या.

■ माळव्याच्या सुलतानांची मांडू ही राजधानी बनवली.

■ नर्मदा नदीच्या काठावर एक हजार फुट उंचीवर मांडूचा किल्ला आहे.

■ मांडू येथे जामा मस्जिदचे बांधकाम प्रारंभ हुशंगने केला. महमूद खिलजी काळात ते पूर्ण झाले.

■ महमूद खिलजीने दरबार हॉल बांधला त्याला हिंडोला महल म्हणतात. हिंडोला महल 'T' आकाराचा आहे.

हिंदोळा महाल

■ निर्मिती महमूद खिलजीद्वारा

■ हिंडोला महल दरबार आहे.

■ आकार 'T' सारखा. क्षेत्रफळ १६० x १०० फुट आहे.

■ दोन मजली तळभाग दरबार. दुसरा भाग खोल्या इत्यादी.

■ हुशंगने स्वतःचा बांधलेला मकबरा हा पूर्णतः संगमरवरी आहे.

■ भारतातील प्रथम संगमरवरी मकबरा हुशंगने स्वतःचा बांधला.

■ अटाला मशीद I.S. 1377 ला बांधली तर I.S. 1408 ला इब्राहिमशाह शर्की यांनी पूर्ण केले.

■ अटाला मस्जिद अटालादेवीच्या मंदिरावर बांधलेली आहे. (जौनपूर)

शार्की वास्तुशैली - जौनपूर

■ जनपूरचे शासक शर्की वंशी म्हणून शर्की शैलीचा जौनपूर येथे विकास झाला.

■ सुक्ष्म व बारकाव्याऐवजी विशालता जास्त आहे.

■ मोगलशैली पूर्वची शैली आहे. उदा. अटाला मस्जिद, झंझरी मस्जिद इत्यादी.

■ राणाकुंभाद्वारा कुम्भलनेर दुर्ग बांधण्यात आला.

■ राणा कुंभाने विजयस्तंभ/कीर्तिस्तंभ बांधला.

कृष्णदेवराय द्वारानिर्मित 'हजारा मंदिर' सर्वश्रेष्ठ आहे.

■ मुहम्मद आदिलशाहचा मकबरा 'गोलघुमट' नावे ओळखतात.

सल्नत काळातील प्रसिद्ध इमारती.

■ गुलामगिरीचा काळ c. 1206-1290 अजमेर मशीद, कुतुब मशीद, कुतुबमिनार

■ खिलजी काळ इ.स 1290-1320 सिरी किल्ला, हजर सिटून महल, हौज अलै हौज खास

■ तुघलक काळ - इ.स. 1320-1414 तुघलकाबाद, 300 शहरे, फिरोजाबाद, फतेहाबाद, जौनपूर, हिस्सार इ. चार कबरी, 30 राजवाडे, 100 मिनार, 100 शॉवर, 10 स्नानगृहे.

■ सय्यद-लोदी काळ इ.स.पू. १४१४-१५२६ छोटेखान, बडेखान मकबरा, मोठ मशीद.

■ बंगाल

हुसेनशाह मकबरा, सुनहाली मशीद, कदमरसूल, दिना मशीद.

गुजरा

अहमदनगर, चंपानेर, मशीद, मुहाफिज खान मशीद इ.

■ मांडू

जालिया मशीद, हिंदोळा महाल, जहाज महल, हशंगशाहचा मकबरा


Post a Comment

0 Comments