(२) निवडणुका घेणारी यंत्रणा -
उत्तर - निवडणुक आयोग
(३) दोन सूचींव्यतिरिक्त असलेली यंत्रणा -
उत्तर - समवर्ती सूची
प्रश्न ३ लिहिते व्हा.
(१) संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंस्था असतात.
उत्तर- (i) मोठा भूप्रदेश आणि खूप लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये राज्य करण्याची संघराज्य ही एक पद्धती आहे. (ii) मोठा भूप्रदेश असल्यास एकाच
ठिकाणाहून राज्यकारभार करणे अवघड असते, दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होते. (iii) तेथील लोकांना राज्यकारभारात सहभाग घेण्याची संधी मिळत नाही. म्हणून संघराज्यात दोन स्तरांवर शासनसंस्था असतात.
(२) शेषाधिकार म्हणजे काय ?
उत्तर - (i) संघसूची व राज्यसूची या सूर्चीव्यतिरिक्त तीसरी एक 'समवर्ती सूची' असून त्यात ४७ विषय आहेत. (ii) या तीन सूचींमधील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला असतो. या अधिकाराला 'शेषाधिकार' म्हणतात.
(३) संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.
उत्तर (i) वादग्रस्त प्रश्नांची जेव्हा आपापसात सोडवणूक होऊ शकत नाही तेव्हा ते न्यायालयाला सादर केले जातात. (ii) न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन, त्यात अन्याय झालेला असल्यास तो दूर करून
निवाडा करते. हे काम निरपेक्षतेने होणे आवश्यक असते. (iii) तसेच न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये. म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे.
प्रश्न ४ - इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र (EVM) वापरल्यामुळे कोणते फायदे होतात, याची माहिती मिळवा.
उत्तर - २००४ पूर्वी भारतामध्ये मतपत्रिकेतील उमेदवाराच्या नावासमोरील चिन्हावर शिक्का मारून मतदार मतदान करीत होते. नोव्हेंबर १९९८ मध्ये दिल्ली, राजस्थान आणि मध्यप्रदेश या ठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीत १६ मतदारसंघात या इलेक्ट्रॉनिक यंत्राचा पहिल्यांदा वापर केला गेला. यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीपासून मतदानाकरिता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर केल्या जाऊ लागला. मतदान यंत्रात उमेदवाराचे नाव आणि चिन्ह दिलेले असते. या चिन्हासमोरचे बटन दाबून मतदार आपले मत नोंदवितो. अशाप्रकारे मतमोजणीच्या दिवशी या मतदान यंत्रातील मते मोजली जातात. इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र वापरल्यामुळे वरील फायदे होता.
• अतिरिक्त प्रश्नोत्तरे
प्रश्न १ - रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(१) संपूर्ण देशाचा राज्यकारभार करते. (संघशासन / राज्यशासन / प्रशासन)
(२) भारतात (२९/३०/७) घटकराज्ये आहे
(३) प्रत्यक्ष राज्यकारभार करणारे मंत्रिमंडळ (लोकसभा/राज्यसभा/विधानसभा) निर्माण होते.
(४) .... यांना सहजपणे पदावरून दूर करता येत नाही. (पोलिस/न्यायाधीश/लिपिक)
उत्तर- (१)
फेडरल सरकार
(२) २
(3) लोकसभा (4) न्यायाधीश
प्रश्न २ - प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) मध्यवर्ती शासन कोणती कामे पार पाडते ?
उत्तर - संपूर्ण देशाचे संरक्षण करणे, परराष्ट्रांशी व्यवहार करणे, शांतता प्रस्थापित करणे इत्यादी कामे मध्यवर्ती शासन पार पाडते.
(२) राज्यशासन कशाला म्हणतात ?
उत्तर आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाचा कारभार पाहणाऱ्या शासनाला 'राज्यशासन' असे म्हणतात.
(३) संघराज्य कशाला म्हणतात ?
उत्तर - दोन पातळ्यांवर वेगवेगळ्या विषयांवर कायदे करून परस्पर सहकायनि राज्यकारभार करण्याच्या या पद्धतीला 'संघराज्य' म्हणतात.
(४) संसदीय शासनपद्धती म्हणजे काय ?
उत्तर - संसदीय शासनपद्धती म्हणजे राज्यकारभाराची अशी एक पद्धत की जिथे संसदेला म्हणजेच कायदेमंडळाला निर्णय घेण्याचे सर्वश्रेष्ठ अधिकार असतात.
(५) भारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो ?
उत्तर - भारताच्या संसदेत राष्ट्रपती, लोकसभा व राज्यसभा यांचा समावेश असतो.
(६) भारतीय नागरिकत्व म्हणजे काय ?
उत्तर - भारताच्या संविधानानेतातील सर्व नागरिकांना एकच नागरिकत्व बहाल केले आहे. ते म्हणजे भारतीय नागरिकत्व होय.
प्रश्न ३ - लिहिते व्हा.
(१) निवडणूक आयोग यावर टिपण लिहा.
उत्तर - (i) भारताने लोकशाही शासनव्यवस्था स्वीकारलेली असल्याने जनतेला ठरावीक मुदतीनंतर आपले प्रतिनिधी पुन्हा नव्याने निवडून द्यायचे असतात. त्यासाठी निवडणुका घ्याव्या लागतात. (ii) या निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात होणे आवश्यक असते. तेव्हाच नागरिकांना कोणत्याही दबावाशिवाय आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला निवडून देता येते. (iii) शासनाने निवडणुका घेतल्यास असे खुले आणि न्याय्य वातावरण मिळेल याची खात्री नसते. म्हणून आपल्या संविधानाने निवडणुका घेण्याची जबाबदारी एका स्वतंत्र यंत्रणेवर सोपवली आहे. ती यंत्रणा म्हणजे 'निवडणूक आयोग' होय. (iv) भारतातल्या सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर असते.
(२) संघशासन व राज्यशासन यांच्यातील संविधानाने केलेली अधिकार विभागणी स्पष्ट करा.
उत्तर- संघशासन व राज्यशासन यांच्यात संविधानाने अधिकार वाटून दिले आहेत. त्यानुसार कोणत्या विषयाचे अधिकार कोणाकडे आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. (i) पहिल्या सूचीला 'संघसूची' म्हणतात. त्यात ९७ विषय असून या विषयांवर संघशासन कायदा करते. (ii) राज्यशासनासाठी 'राज्यसूची' असून त्यात ६६ विषय आहेत. या विषयांवर राज्यशासन कायदे करते. (iii) या दोन सूचींव्यतिरिक्त तिसरी एक 'समवर्ती सूची' असून त्यात ४७ विषय आहेत. दोन्ही शासनांना या सूचीतील विषयांव्यतिरिक्त एखादा विषय नव्याने निर्माण झाल्यास त्यावर कायदा करण्याचा अधिकार संघशासनाला असतो.
प्रश्न १ - एका शब्दांत उत्तरे सांगा.
(१) एका मर्यादित प्रदेशाचा राज्यकारभार पाहणारे शासन -
उत्तर - राज्यशासन
(२) भारतातल्या सर्व महत्त्वाच्या निवडणुकेची जबाबदारी घेणारे आयुक्त-
उत्तर - निवडणूक आयोग
आत्तापर्यंत भारतीय संविधानात किती वेळा दुरुस्ती झाली आहे ? उत्तर - भारतीय संविधानात इ.स. १९५१ पासून इ.स. २०११ पर्यंत ९६वेळ दुरुस्ती केली आहे.
प्रश्न ४ - सांगा पाहू.
(१) सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण ?
उत्तर - सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त.......
) निवडणुक्त आचारसंहिता म्हणजे काय ?
उत्तर - निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये. असे नियम त्यांना घालून देण्यात आले. त्याला निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात.
(३) मतदारसंघ म्हणजे काय ?
उत्तर - संसदेत किंवा राज्य विधिमंडळात मतदारांचे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व व्हावे म्हणून पाडलेले विभाग म्हणजे मतदार संघ होय.
0 Comments