(१) देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे.
उत्तर - बंधुभाव
(२) राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे.
उत्तर – लोकशाही
(३) उद्देशिकेलाच म्हटले जाते.
उत्तर - सरनामा
(४) सर्व धर्माना समान मानणे,
उत्तर - धर्मनिरपेक्ष
प्रश्न २ - लिहिते होऊया.
(१) धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात ?
उत्तर - धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी असतात. (i) कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. (ii) नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. (iii) नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही.
(२) प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय ?
उत्तर - वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांच्या मत देण्याच्य अधिकाराला प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात.
(३) आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात ?
उत्तर - (i) भूक, उपासमार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे
निर्माण होतात. (ii) गरिबी दूर करायची असेल तर प्रत्येकाला आपले व कुटुंबाच पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. हे हक्क नागरिकांना आर्थिक न्यायामुळे मिळतात.
(४) समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल ?...
उत्तर जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा आपोआप समाजात व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल.
प्रश्न ३ - आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशाप्रकारे केला पाहिजे, तुमचे मत लिहा/सांगा. उत्तर - (i) प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य
असले तरी आपले मत व विचार कोणावरही लादू नये. (ii) आपल्याला सण उत्सव साजरे करण्याचे, श्रद्धास्थाने बाळगण्याचे व उपासनेचे स्वातंत्र्य असले तरी हे सण-उत्सव साजरे करताना काही नियम पाळावे लागतात. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्यावर बंधन येत नाही. (iii) आपल्याला स्वातंत्र्य असले तरी मनाला येईल तसे न वागता सर्वांनी जबाबदारीने वागावे. (iv) संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, परंतु त्यांचा बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. आपल्याला बोलण्याचे, भाषणाचे स्वातंत्र्य आहे, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही.
(१) समाजवादी राज्य –
उत्तर - ज्या राज्यामध्ये गरीब-श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या ता प्रपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. तसेच संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यांना समाजवादी राज्य म्हणतन्त.
(२) समानता -
उत्तर- जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल तसेच उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समता होय.
(३) सार्वभौम राज्य -
उत्तर - ज्या राज्यात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वातंत्र्य असेल. तसेच एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसते. अशा राज्याला सार्वभौम राज्य असे म्हणतात.
(४) संधीची समानता -
उत्तर - आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील, त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नभाही. त्याला 'संधीची समानता असे म्हणतात.
प्रश्न ५
भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा
उल्लेख केला आहे ? भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्त्वाच्या बाबींचा
उल्लेख केला आहे.
(i) सार्वभौम राज्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र्य झाला त्यावेळी भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. आपण आपल्या देशात योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत. एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे म्हणजे सार्वभौम राज्य होय. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय. लोकशाहीत सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्यांचे सार्वभौम अधिकार वापरण्याची परवानगी देते.
(ii) समाजवादी राज्य ज्या राज्यामध्ये गरीब-श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो. तसेच संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यांना समाजवादी राज्य म्हणताते.
(iii) धर्मनिरपेक्ष राज्य भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे. कोणत्याही एका धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही.
(iv) लोकशाही राज्य लोकशाही राज्यात राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असते. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. त्यासाठी निवडणूक घेण्यात येते. या निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात. निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या
द. कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात. संविधानाने नमूद केलेल्या कथा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात.
(v) गणराज्य - गणराज्यात सर्व सार्वजनिक पदे लोकांकडून निवडून देली जातात. कोणतेही सार्वजनिक पद वंशपरंपरेने येत नाहीत. जसे राष्ट्रपती, त्यानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, महापौर, सरपंच यांसारखी पदे सार्वजनिक असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला निवडणूक लढवून जाता येते. राजसत्ताक पद्धतीत ही पदे वंशपरपरेने एकाच कुटुंबातील व्यक्तींकडे जात्तात.
याशिवाय उद्देशिकेत सर्व भारतीय नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य व समता या तीन मूल्यांची व त्यानुसार व्यवहार करण्याची, कायदे करून ती मुल्ये प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याची हमी दिली आहे.
• अतिरिक्त प्रश्नोत्तरे
प्रश्न १ - योग्य पर्याय निवडा.
(१) संविधानाच्या प्रस्तावनेला (प्रास्ताविका/दस्ताऐवज/संदर्भ) किंवा 'उद्देश पत्रिका' म्हणतात.
(२) भारतीय संविधानाने चे मूल्य स्वीकारले आहे. (समानतेचे/असमानतेचे/धर्माचे)
(३) वयाची देण्याचा अधिकार आहे. वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत
(१६/१८/१९)१२६
(४) परस्परांबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो.
(धर्मभाव/बंधुभाव / स्वातंत्र्य)
उत्तर - (१) प्रास्ताविका (२
) समानतेचे
(३) १८ (४) बंधुभाव
प्रश्न २ - प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(१) भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात कोणत्या शब्दांनी
उत्तर भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेची सुरुवात 'आम्ही भाय लोक' या शब्दांनी होते.
(२) लोकशाही म्हणजे काय ?
उत्तर - देशाचा राज्यकारभार लोकांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी करण्या पद्धतीला लोकशाही असे म्हणतात.
(३) बंधुता म्हणजे काय ?
उत्तर - आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांवि आत्मीयतेची भावना असणे म्हणजे बंधुता होय.
(४) प्रस्तावना म्हणजे काय ?
उत्तर - कायद्याची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांड म्हणजे प्रस्तावना होय.
प्रश्नं ३ - तुमच्या शब्दांत सांगा.
(१) धर्मनिरपेक्षता -
उत्तर - भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे.
कोणत्याही विशिष्ट धर्माला राज्याचा धर्म म्हणून मान्यता नाही, देशाच्या कारभारात कोणताही धर्म, संप्रदाय याचा हस्तक्षेप नसावा, हे संविधानात स्पष्ट केले आहे.
(२) समानता –
उत्तर - भारतीय संविधानाने समानतेचे मूल्य स्वीकारले आहे. अर्थात धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान यासारख्या बाबींच्या आधारे राज्याला व्यक्तींमध्ये भेद करता येत नाही. सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या दुर्बल समाजघटकांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार संविधानाने शासनाला दिला आहे.
(३) बंधुता -
उत्तर - बंधुता म्हणजे कोणताही भेद न करता सर्व लोकांविषयी आदर आणि प्रेमाची भावना असणे होय. भारतीय नागरिकांनी एकोप्याने रहावे, परस्परांवर विश्वास ठेवावा व देशाचा विकास साधावा असे बंधुतेत अपेक्षित आहे. अर्थात देशातील लोकांना एकमेकांबद्दल प्रेम आणि विश्वास असेल तरच राष्ट्राचे ऐक्य कायम राहू शकते. म्हणूनच बंधुभाव जतन करणे हे संविधानाचे एक उद्दिष्ट आहे.
प्रश्न ४ - आपला देश 'प्रजासत्ताक देश' आहे का ते स्पष्ट करा.
उत्तर - भारतीय संविधानाने लोकशाहीचा स्वीकार करून प्रत्येक भारतीय नागरिकाला राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार दिला आहे. अठरा वर्षे वयावरील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार आहे.
तसेच भारतात राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांसारख्या पदांसाठी निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्व भारतीय नागरिकांना आहे. आपल्या देशात या सर्व पदांवरील व्यक्ती जनतेकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडल्या जातात. म्हणून आपला देश 'प्रजासत्ताक देश' आहे
प्रश्न १ - एका शब्दांत उत्तरे सांगा.
(१) संविधानाने कोणते तत्त्व स्वीकारले आहे ?
उत्तर - धर्मनिरपेक्षतेचे.
(२) कोणताही भेद न करता सर्व लोकांविषयी आदर आणि प्रेमाची भावना म्हणजे काय ?
उत्तर - बंधुत्व.
(३) आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा कोणता ?
उत्तर - संविधान
(५) व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य को ?
उत्तर - विचार व अभिव्यक्ती.
उपक्रम
• तुमच्या परिसरातील वर्तमानपत्रांच्या नावांची यादी करा.
उत्तर - लोकमत, महाराष्ट्र टाईम्स, तरुण भारत, लोकसत्ता, देशोन्नती, हितवाद, नवभारत, दैनिक भास्कर, सकाळ.
0 Comments