४
मूलभूत हक्क भाग-१
प्रश्न १ - खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) मूलभूत हक्क म्हणजे काय ?
उत्तर - (i) संविधानाने संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती
निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत. (ii) अर्थात संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात
(२) विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत कोणकोणती पटके/पदव्या दिल्या जातात ?
(विविध क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यांना शासनामार्फत पद्मश्री, उत्तर पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न यांसारख्या पदव्या दिल्या जातात.)
(३) चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव का केला आहे ?
उत्तर - (i) संविधानात बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे. (ii) कारखाने, खाणी यांसारख्या ठिकाणी बालकांची नेमणूक करून त्यांच्याकडून काम करून घेता येत नाही. म्हणून चौदा वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे
(४) संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत ?
उत्तर - (i) जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो. त्याला उत्तम आरोग्य मिळावे. म्हणून संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करते. (ii) अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून जर सर्व व्यक्तींना संरक्षण मिळाले तरच व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करू शकतील. (iii) स्वतःच्या आणि संपूर्ण लोकसमूहाच्या विकासासाठी पोषक परिस्थितीची मागणी करणे, त्यासाठी आग्रह धरणे म्हणजे हक्क मागणे होय. संविधानाने अशी पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क दिले आहेत.
प्रश्न २ - 'स्वातंत्र्याचा हक्क' या विषयावर चित्रपट्टी तयार करा.
उत्तर - संविधानाने भारतीय नागरिकांना खालील प्रकारच्या स्वातंत्र्याची
हमी दिली आहे.
(i) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाने भारतीय नागरिकांना विचार करण्याचे आणि आपला विचार विविध माध्यमांतून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
(ii) सभा स्वातंत्र्य - शस्त्रे न बाळगता शांततेने एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य नागरिकांना आहे. यानुसार सभा आयोजित करणे, शांततेने मोर्चा, प्रभातफेरी, निषेध सभा इत्यादींचे आयोजन करू शकतात.
(iii) संघटना स्वातंत्र्य - समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात. त्यांना संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य आहे.
(iv) संचार स्वातंत्र्य - संविधानाने भारताच्या नागरिकांना देशाच्या कोणत्याही भागात मुक्तपणे वावरण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.•
(v) वास्तव्य स्वातंत्र्य भारताच्या नागरिकांना देशात कुठेही राहण्याचे व कायम वास्तव्य करण्याचे स्वातंत्र्य आहे.
(vi) व्यवसाय स्वातंत्र्य - भारतीय नागरिक' आपल्याला हवा तो कायदेशीर व्यवसाय करू शकतात.
(vii) कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक करता येत नाही.
(viii) शासन कोणत्याही व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य बेकायदेशीररीत्या हिरावून घेऊ
शकत नाही.
प्रश्न ३ - खालील वाक्ये दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) कोणत्याही व्यक्तीला हक्क जन्मतःच प्राप्त होत नाहीत.
उत्तर - कोणत्याही व्यक्तीला जन्मतःच हक्क प्राप्त होतात.
(२) सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हांला नोकरीपासून दूर ठेवू शकते.
उत्तर - सरकारी नोकऱ्या देताना सरकार धर्म, लिंग, जन्मस्थान यांवर आधारित भेदभाव करून तुम्हांला नोकरीपासून दूर ठेवू शकत नाही.
प्रश्न १ - योग्य पर्याय निवडा.
(१) संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना म्हणतात. (प्राथमिक हक्क / मूलभूत हक्क / सोयीचे हक्क)
(२) वर्षांखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला आहे. (१६/१४/५)
(३), संरक्षण दलातील कामगिरीसाठी जाते. (परमवीर चक्र/पद्मश्री/भारतरत्न) असे सन्मानाचे पदक दिले
उत्तर - (१) मूलभूत हक्क (२) पद्मश्री (३) भारतरत्न
पश्न २ खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे सांगा.
(१) व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास केव्हा करू शकेल ?
उत्तर - अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून जर सर्व व्यक्तींना रक्षण मिळाले तर व्यक्ती आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकासकरू शकेल
(२) संरक्षण दलातील कामगिरीसाठी कोणती पदके दिली जातात ?
उत्तर - संरक्षण दलातील कामगिरीसाठी परमवीर चक्र, अशोक चक्र, शौर्य चक्र अशी सन्मानाची पदके दिली जातात.
(३) शोषणाविरुद्धचा हक्क म्हणजे काय ?
उत्तर - शोषण थांबवण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा, आपले शोषण किंवा पिळवणूक होऊ न देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय.
प्रश्न ३ - लिहिते व्हा.
(१) समानतेचा हक्क तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर- (i) आपल्या संविधानाने सर्व नागरिकांना समानतेचा हक्क दिला आहे. (ii) समानतेच्या हक्कानुसार शासनाला नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान इत्यादी कारणांवरून भेद करता येत नाही. तसेच सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान असतात आणि सर्वांना कायद्याचे समान संरक्षण प्राप्त झालेले असते. (iii) सार्वजनिक सोईसुविधांचा वापर करण्याचा सर्वांना अधिकार आहे. त्याचप्रमाणे सर्व भारतीय नागरिकांना सरकारी नोकरीच्या समान संधीची हमी दिली आहे. तसेच संविधानाने अस्पृश्यतेच्या प्रथेचे निर्मूलन केले असून, अस्पृश्यतेचे पालन करणे हा गुन्हा ठरवला आहे.
(२) संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत परंतु त्याचा आपलाला कसा गैरवापर करता येत नाही ते सांगा.
उत्तर - (i) संविधानाने आपल्याला अनेक हक्क दिले आहेत. परंतु त्याचा आपल्याला बेजबाबदारपणे वापर करता येत नाही. (ii) अशा वागण्यामुळे इतरांचे नुकसान होणार नाही याचे भान आपण ठेवले पाहिजे. (iii) आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, परंतु चिथावणी देणारे लिखाण किंवा भाषण करता येत नाही.
(२) शोषणाचे प्रकार सांगा.
उत्तर - वेठबिगारी किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून तिची इच्छा नसताना काम करून घेणे, काही व्यक्तींना एखादया गुलामासारखे वागवणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्यावर जुलूम जबरदस्ती करणे हे शोषणाचे प्रकार आहेत.
प्रश्न १ - एका शब्दांत उत्तरे सांगा.
(१) संविधानात समाविष्ट केलेल्या नागरिकांच्या हक्कांना म्हणतात.
उत्तर - मूलभूत हक्क
(२) मूलभूत हक्कांचे पालन सर्वांना असते.
उत्तर - बंधनकारक
(३) अस्पृश्यतेचे पालन करणे हे काय असते.
उत्तर - दखलपात्र गुन्हा
(४) संविधानाने या पदव्या देण्यास बंदी घातली आहे.
उत्तर - राजा, महाराजा, राव बहादूर
(५) मूलभूत हक्कावर बंधने आल्यास याच्याकडे दाद मागू शकतो.
उत्तर - न्यायालयाकडे
प्रश्न २ चला, शोधू या.
(१) बालकांचे हक्क तुम्हांला माहीत असतील. त्यांचे महत्त्वांचे दोन हक्क तुम्ही सांगू शकाल का?
उत्तर - बालकांचे महत्त्वाचे हक्क -
(i) उत्तम आरोग्य मिळण्याचा हक्क
(ii) शिक्षणाचा हक्क
(२) महिलांचे हक्क, आदिवासींचे हक्क, शेतकऱ्यांचे हक्क अशा संज्ञाही आपल्याला माहीत आहेत. या हक्कांच्या संदर्भात आपणा सर्वांनाच काही प्रश्न पडले आहेत.
(१) हक्कांचा उपयोग काय असतो ? ते कोणी द्यायचे असतात ?
उत्तर - हक्कांमुळे व्यक्तीच्या गुणांचा आणि कौशल्यांचा विकास होतो. लेच अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यांपासून सर्व व्यक्तींना संरक्षण ळते. हा आपल्याला मिळालेल्या हक्कांचा उपयोग असतो. ते समाज आणि शासनाने यायचे असतात.
(३) अधिकार काढून घेतले जाऊ शकतात का?
उत्तर - हक्क काढून घेता येत नाही.
(४) तसे झाल्यास त्याविरुद्ध कोठे जाऊन दाद मागायची ?
उत्तर - तसे झाल्यास त्याविरुद्ध न्यायालयात जाऊन दाद मागता येते.
0 Comments