Subscribe Us

वनस्पती .रचना आणि कार्य .भाग एक

 बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ (Radicle), तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर (Plumule) म्हणतात.आ

दिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो. पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास मूळ म्हणतात.ज

मिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. मुळे झाडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ (Tap root) असे म्हणतात.

मुळांच्या टोकांच्या भागांवर केसासारखे धागे असतात. त्यांना मूलरोम (Root hair) म्हणतात. मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो. मुळाची वाढ याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते. त्याला मूलटोपी (Root cap) म्हणतात.

2. काचेच्या बरणीत पाणी घेऊन त्याच्या तोंडावर एक कांदा, त्याची मुळे पाण्याच्या दिशेत राहतील, असा ठेवा. आठ दिवस वाढणाऱ्या मुळांचे निरीक्षण करा.

खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे Fibrous roots) म्हणतात.

मुळांचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे दोन प्रमुख प्रकार असून विदल वनस्पतींमध्ये सोटमूळ असते, तर एकदल वनस्पतींमध्ये तुमय मुळे असतात.मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी आगंतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्ये मुळांना करावी लागतात, त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना रूपांतरित मुळे म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने हवाई मुळे, आधार मुळे, धावती मुळे, श्वसन मुळे यांचा समावेश होतो.

खोड (Stem)

रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडावर पेरे (Node) असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. खोडाच्या दोन पेरांतील अंतराला कांडे (Internode) म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल (Bud) असे म्हणतात

खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र (Leaf blade) म्हणतात.

पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा (Leaf margin) म्हणतात. पर्णधारा या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात.

पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र (Leaf apex) म्हणतात. यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात. काही वनस्पतींच्या पानांना देठ (Petiole) असतात, तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात. पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल (Leaf base) होय. काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो. त्याला उपपर्णे (Stipules) म्हणतात. उपपर्णे सर्वच वनस्पतींमध्ये असतात का ? काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते, अशा पानांना साधे पान म्हणतात


तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये (Leaflet) विभागलेले असते, अशा


पानांना संयुक्त पान म्हणतात. साधे पान व संयुक्त पान हे पानांचे मुख्य प्रकार आहेत.

उतारा वाचून खालील प्रश्न सोडवा.

1आदिमुल म्हणजे काय

2.अंकुर म्हणजे काय

3=मूळ कशास म्हणतात

4.मुल रोम कशाला म्हणतात

5.मुल टोपी कशाला म्हणतात

6.तंतुमुळे म्हणजे काय

7.रूपांतरित मुळे कशाला म्हणतात

8=पेरे म्हणजे काय

9. कांडे कशाला म्हणतात

10.मुकुल म्हणजे काय

11. पर्न पत्र म्हणजे काय

12.पर्न धारा म्हणजे काय

13.पर्णाग्र म्हणजे काय

14.देठ म्हणजे काय

15.पर्न तल म्हणजे काय



Post a Comment

0 Comments